जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।। Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।।

"ब्लॅक टीशर्ट मध्ये तर.. हाय मे मर जावा...!!" अस बोलून मी आरशातल्या निशांतची लांबुनच नजर काढली आणि स्वतःच काम करत बसले.. स्वतःच्या धुंदित मी स्वताच काम आवरलं आणि निघाले... बाहेर नाश्ता करायला बसले असता आईने विषय काढला...

"अग एकटीच आलीस का..??? निशांत कुठे आहे..??"

मी हातातला कांदेपोह्यांचा चमचा खाली ठेवत आईकडे पाहिलं....

"अशी प्रश्नार्थक चेहऱ्याने काय बघत आहेस प्राजु..! निशांत कधीपासून तुझ्या रूममधे आहे. तु बोलली नाहीस का त्याच्याशी..?? तु अंघोळीला गेलीस म्हणून बाहेर आलेला.. त्यानंतर तुझ्या चाहुलीने परत आता गेला होता. दिसला नाही का तुला..???!!" आई जे काही बोलत होती ते मला काहीच ऐकू जात नव्हतं. मी हातातले पोहे तिथेच टाकुन धावतच माझ्या रूममध्ये गेले, तर निशांत माझ्या बेडवर बसला होता. मला बघताच तो उभा राहिला.

मी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि त्यांनतर थोडं मारली ही...
"तु वेडा आहेस का..?? मी मघाशी बोलत होते तेव्हा एकदा ही बोलावसं वाटलं नाही का तुला..?? पागल.., मूर्ख मुला.." अस बोलत मी त्याला मारू लागले.. ते खोट खोटं मार तो खात होता आणि ओरडत असा होता जस की मी त्याला खरचं जोरात मारत आहे..

"मग काय करणारं.. मी आलो तेव्हा गाढ झोपली होतीस.. आणि मला तुला उठवायचं नव्हतंच. पण लेट होणार म्हणुन उठवाव लागलं."

"पण एक सांग कोणतं अस स्वप्न बघत होतीस ग... निशांत जाऊदे.., बघेल कोणीतरी.. आणि काय तो लाजलेला चेहरा.. बापरे.. स्वप्न जरा जास्तच रोमँटिक वाटत होतं." निशांत मला त्रास देण्यासाठी बोलत होता. पण ते स्वप्न खरच एवढं रोमँटिक होत की त्याबद्दल आठवून मी लाजत होते..

"काही नाही. चल नाश्ता करायला. आणि मला तुझ्याशी खुप महत्त्वाच बोलायच आहे." माझ्या या वाक्यावर त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं..

"अरे राज चा बर्थडे आहे ना.. त्या बद्दल बोलायच होत. काय गिफ्ट घेणार आहेस तू.. आणि काय घालणार आहेस. झाली का काही शॉपिंग....??" माझ्या सगळ्या प्रश्नांवर त्याने फक्त स्वतःचे हात वर केले. ज्यावर मी स्वतःच्या डोक्यावर हात मारला.

त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि एकत्र नाश्ता केला. आजच शॉपिंग ला जायचं ठरवुन मी आणि निशांत कॉलेजसाठी निघालो. आजच्या शॉपिंगमध्ये आई देखील येणार होती.

आम्ही कॉलेजमध्ये गेलो. ते संपवुन आम्ही बाईक घेऊन आधी माझ्या घरी आलो आणि त्यानंतर कॅब करून तिघे ही शॉपिंगसाठी निघालो...

आई-बाबा ही येणार असल्याने आम्हाला सर्वानाच चांगले कपडे घ्यायचे होते. खरतर इनविटेशन हे सर्वांना होत.. माझ्या आई-बाबांना. निशांतच्या आजी-आजोबांना. पण त्यांच्या तब्बेतीमुळे ते काही येणार नव्हते. त्यामुळे आम्ही चौघेजणच जाणार होतो. दोन दिवस आधीच गेले असल्याने आज आम्हाला काही करून शॉपिंग करायची होती. त्यात त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट ही घ्यायचं होत..

राज श्रीमंत असल्याने त्याच्यासाठी काय घ्यावं हा मोठा प्रश्न होता. त्याच्याकडे सार काही होत. शेवटी अनही चांगलं घड्याळ घेण्याच ठरवलं.

यावेळी पार्टी साठी कोणतीच थीम नव्हती. आम्ही एका शॉपमध्ये गेलो. जिथे माझं लक्ष एका गाऊनकडे गेला.
तो रेड वेलवेटचा गाऊन बघुन माझं मन तर मला थांबवू शकत नाही. तो हातात घेऊन मी त्याला पाहिलं..

सुंदर आणि मुलायम असा त्याचा कपडा होता आणि त्याचं आकर्षक होत ते त्याच्या गळ्याला असलेले डायमंड....घातल्यावर अस वाटेल की एखादा डायमंड चा नेकलेस घातला असावा.. मी तो, आई आणि निशांतला दाखवला. आणि त्यांनी मला घालून दाखवायला सांगितलं. मी घालुन बाहेर आले तेव्हा निशांतने आपले डोळेच मोठे केले... आईने ही मला ग्रीन सिग्नल दिला. माझी आजची शॉपिंग लवकर झाली. निदान ड्रेस तरी घेऊन झाला होता.

निशांतसाठी डार्क नेव्ही ब्लू रंगाचा कोट, व्हाईट शर्ट आणि कोटच्या रंगाची पॅन्ट घेतली होती. ट्रायलमध्येच मी त्याच्यावर फिदा होते. तर त्या पार्टीमध्ये माझं काय होईल हे साध्य तरी सांगणं कठीण होत.

आमच्या कपड्यांच्या शॉपिंगनंतर आईसाठी ट्रेंडी साडी घेतली तर बाबांसाठी निशांतसारखा कोट घेतला. त्यानंतर आम्ही थोडी अजून शॉपिंग केली. थोडं खाणं ही झालं.. होणारच ना एवढी शॉपिंग करून...!!!.

राजसाठी गिफ्ट घेतलं. आणि बाकीची शॉपिंग करून आम्ही घरी जायला निघालो. घरी येऊन आम्ही अक्षरशः सोफ्यावर स्वतःला टाकलं. एवढी धावपळ करून ही आईनेच चहा केला... रात्र होतच आली होती. आणि त्यात शुक्रवार असल्याने आम्हाला शनिवारी सकाळी लवकर निघायचं देखील होत. त्यामुळे निशांत आज इकडेच राहणार होता.

खुप धावपळ झाल्याने आम्ही बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं. बाबा ही आले होते. ते फ्रेश होताच आम्ही जेवायला बसलो कारण त्यानंतर आम्हाला थोडी पॅकिंग ही करायची होती. खरतर मला वाटलं की आजी-आजोबा ही येतील. त्यानिमित्ताने आम्हची छान अशी पिकनिक ही होऊन जाईल. पण कसल काय आजोबांनाच्या तब्येतीने मधेच घोळ घातला आणि आम्हाला चौघांनाच जावं लागणार होतं.

बाबांना आम्ही घेतलेला कोट खूप आवडला. त्यानंतर आम्ही सर्वांनी परत एकदा ड्रेस घालुन ट्रायल घेतले. मी मला लागणाऱ्या वस्तु माझ्याकडे असलेल्या छोट्या बॅगेत भरत होते. तेव्हा निशांत आला..

"काय मग मॅडम... झाली का मनासारखी शॉपिंग..??! नाही तर परत बोलशील..." निशांत काही तरी बोलण्याचा बहाणा कडुन आला होता.

"हो झाली हा चांगली शॉपिंग....!." मग मी देखील त्याला मुद्दाम बोलून दाखवले.

"अरे ते गिफ्ट तुझ्याकडे आहे ना... ???" माझ्या या प्रश्नावर त्याने स्वतःच्या हातातून आणलेला बॉक्स माझ्यासमोर धरला.

"अरे...! तुझ्याकडे ठेव. बस तिकडे राहिला नाही ना...!! यासाठी विचारलं मी."

"अग हो.. कळलं मला. पण मी तुलाच द्यायला आलो आहे. म्हणजे गिफ्ट तुझ्याकडे राहुदे... आपण तिकडे गेलो की देऊ सोबत..." निशांत माझ्याकडे बघत बोलला. तसा तो बॉक्स मी घेतला आणि माझ्या बॅग मध्ये टाकला.

"खडूस... ड्रेस चांगला आहे ना..???"

"खुप मस्त. सिम्पल आणि क्लासि... आणि तुझ्यावर कोणती ही स्टाईल छानच वाटते. बघ तु सर्वांत सुंदर दिसशील तिथे गेल्यावर... माझी नजर तर फक्त तुलाच शोधेल....." निशांत माझ्या डोळ्यात बघून बोलत होता..

"हो का... ते कळेल हा. तिकडे गेल्यावर... कोणाची नजर कोणाला शोधते आहे..." मी डोळा मारत बोलले, तसे निशांतने माझ्या डोक्यावर एक टपली मारली... आणि मी स्वतःची जीभ बाहेर काढुन दाखवली...
आमच्या गप्पा चालु असताना आई आली.

"चला आता.., उद्या गप्पा मारा गाडीमध्ये. झोपायचं नाही आहे का तुम्हाला...??"

जरा त्रासिक चेहऱ्याने आम्ही झोपायला गेलो. म्हणजे निशांत गेला. गेस्ट रूममधे. मी स्वतःच्या रूमचा दरवाजा लावून घेतला आणि बेडवर झोपले...

परत एकदा वस्तुंची लिस्ट डोक्यात आठवता आठवता मला झोप लागली.. हे देखील कळलं नाही मला.

पण उद्याचा दिवस नवीन आठवणी घेऊन येणार होता.. उद्या आम्ही एकत्र असणार होतो..

मी..., निशांत आणि आमचा प्रवास.....

to be continued....

(कथा काल्पनिक आहे.)

स्टेय ट्युन अँड हॅप्पी रीडिंग गाईज.

©हेमांगी सावंत(कादंबरी)