स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 1 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 1 )

कुछ मेहसुस हुवा है यु मुझको
तेरी रुहँ से जुडकर
जिंदगी हो तो तेरे साथ हो
वरणा छोड दु ये जहाँ तुमको नजरो मे भरकर ...

गोवा ..अथांग सागर ..बाजूला वाळूवर खेळणारी छोटी छोटी मूल ..पाण्याच्या लाटा वाळूवर येऊन परत निघून जायच्या आणि ती मूल पुन्हा हसरे चेहरे घेऊन पाण्यात जाऊ लागायची ..पुन्हा एकदा पाण्याने त्यांच्याकडे धाव घेतली की ती मूल आपल्या आई वडिलांकडे धावत कुशीत शिरायची ...नित्या हे सर्व दुरूनच पाहत होती आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद निर्माण होऊ लागला ..सायंकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी थोडी वाढू लागली होती तर नित्या त्या गर्दीतही एकटीच होती ..सूर्याच्या केशरी छटांनी सर्व आभाळ आपलंसं करून घेतलं होतं आणि त्या क्षणांना समुद्र आणखीच खास बनवत होता ..नित्या त्या क्षणात हरवलीच होती की तिच्या मोबाइलवर मॅसेज येऊन धडकला ..तिने घाई घाईने मोबाइल हातात धरला आणि मॅसेज ओपन करून बघू लागली ..

📱 सॉरी सॉरी ..मला माहित आहे तुला वाट पाहायला आवडत नाही ..पण मी ट्राफिकमध्ये अडकलोय ग ..अर्ध्या तासात नक्की पोहोचणार आहे बघ मी ..वाट बघ हा !!..मी येतोय लवकरच ..

नित्याने मॅसेज वाचून फोन बाजूला ठेवला ..आतापर्यन्त तिच्या चेहऱ्यावर जो आनंद जाणवत होता तो कुठेतरी दूर पळून गेला आणि माथ्यावर चिंतेच्या रेषा झडकू लागल्या ..तिचे डोळे इकडे तिकडे काहीतरी शोधू लागले पण तिला हवं ते सापडत नव्हतं ..वेळ जात होता नि गर्दी कमी होऊ लागली ..वाऱ्याच्या थंडया स्पर्शात देखील तिला घाम फुटत होता ..आणि तिचे डोळे फक्त आता त्याच्या येण्याकडे होते..तो तर काही येत नव्हता पण एकटीच बसून असल्याने तिच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी धाव घ्यायला सुरुवात केली होती ..तिला बीपी चा त्रास असल्याने चेहरा घामाघूम झाला होता ...तिला काहीसं अस्वस्थ वाटू लागलं होतं ..तिने पर्स मधला रुमाल काढत चेहऱ्यावरचा घाम पुसून घेतला आणि घाम पूसताच तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला .तिच्या चेहऱ्यावरच टेन्शन आता कुठेतरी दूर पळाल आणि ती धावतच त्याच्याकडे गेली ..तिला त्याला मिठी मारावीशी वाटत होती पण तिने स्वतःला रोखून धरल ..तो तिच्या समोर होता ..उंच ..रंगाने सावळा आणि चेहऱ्यावर स्मित करीत तो तिच्याकडे पाहत होता आणि त्याला पाहून तिचा चेहराही क्षणात खुलला ..तिला त्याला मिठी मारायचं आहे हे लक्षात येत होतं पण तिला सर्वांसमोर हे नको होतं जाणवलं आणि तो तिला बोलत करायला म्हणाला , " मॅडम आता असच बघत राहणार आहात का ? बॅगच ओझं खांद्यावर वाहून खांदा दुखू लागला आहे ..जरा बॅग घ्यावी माझी तर पाहत बसली आहेस ..ती त्याला शांतचित्ताने पाहत होती आणि त्याच्या शब्दाने ती भानावर आली .तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि जोराने बॅग खेचून ती समोर जाऊ लागली तर तो एकही शब्द न बोलता तिच्या मागे चालू लागला ।.काही क्षणात ते हॉटेलवर पोहोचले ...रिसेप्शनवर त्याच्याबद्दल माहिती विचारण्यात आली नि दोघेही आपल्या रूम मध्ये दाखल झाले ..आतून दार लावत नाहीच की तिने बॅग बेडवर फेकून त्याला घट्ट मिठी मारली ..मिठी इतकी घट्ट होती की त्याला काय करू नि काय नको अस झालं ..त्याला तीच अस वागणं अपेक्षित नव्हतं तरीही त्याने तिच्या भावना समजून घेतल्या आणि आणि तिला जवळ करत आपले हात घट्ट केले ..काही वेळ ती तशीच आहे हे पाहून तो म्हणाला , " किती घाणेरडी आहेस ना तू मला फ्रेश होऊ द्यायचं तर चिपकुन बसली आहेस ..घामाचा किती वास येतोय बघ जरा !! "

आतापर्यंत शांत असलेली ती अचानक ओरडत म्हणाली , " तु ना खूप खडूस आहेस ..माझ्या भावनांची तुला काही कदरच नाही ..जा मी नाही बोलणार तुझ्याशी .."

बाजूला पडून असलेला टॉवेल तिने त्याच्या चेहऱ्यावर फेकून मारला ..तोही आपली बॅग खाली ठेवून लगेच फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये पोहोचला ..

तो आतमध्ये गेला तर नित्या आपलं सामान बाहेर काढू लागली ..ती येताच फ्रेश झाली होती त्यामुळे तिने त्याच सर्व सामान बाजूला नीट ठेवलं ..काही वेळातच तो बाहेर आला ..ओल्या झालेल्या केसांना त्याने जाणूनच हलविले आणि थोडस पाणी तिच्या चेहऱ्यावर पडताच ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली ..तोही आपली नजर चोरत आरशाकडे पाहू लागला ..त्याने कपडे चेंज केले आणि आरशात बघत होताच की ती म्हणाली , " सारांश किती नटनार आहेस ..तुला इथे काही मुली पटवायच्या नाहीत हा ..मला जाम भूक लागली आहे ..तुझी वाट पाहत बसले होते ना म्हणून ..चल लवकर .." त्यानेही आपलं लगेच आवरलं आणि जेवायला बाहेर गेले ..त्याने खायच ऑर्डर केलं तेव्हाही नित्या फक्त त्याच्याकडे पाहत होती ।.सारांशला हे सर्व जाणवत होतं पण तो तिच्याशी नजर मिळवू शकत नव्हत..सारांशला जे जे आवडत होत ते सर्व नित्याने मागवून घेतलं होतं आणि सारांश तिच्याकडे पाहतच राहिला ..काहीच वेळात दोघांचं जेवण झालं आणि ते परत रूमवर पोहोचले..

दोघेही जेवण करून रूमवर परतले होते ..दिवसभरच्या प्रवासाने त्यांना थकवा जाणवत होता त्यामुळे कपडे चेंज करून लगेच बेडवर पडले ..सारांश आपल्या स्वभावाप्रमाणे खूप काही बोलत होता तर नित्या नेहमीप्रमाणे शांत होती ..तशी त्याच्याजवळ ती फार बोलत असे पण आज तो समोर असताना तिने शांत राहनच पसंद केलं होतं ..त्यानेही तिला बोलायची विनंती केली पण ती एकही शब्द बोलली नव्हती ..बोलता बोलता रात्र सरु लागली तरीही दोघे गप्पा करण्यात हरवले होते ..रात्रीचे सुमार दीड वाजले होते . सारांश थकल्याने त्याला झोप लागत होती म्हणून तो अंगावर चादर घेऊन बेडवर पडला ..तर नित्या त्याच्याकडे पाहत होती पण त्याची तिरकस नजर तिची वाट सोडत नव्हती ..किती तरी वेळची शांत असलेली नित्या सारांशच्या बाजूने सरकली आणि त्याला घट्ट मिठी मारली ..हे सर्व बघून तो लगेच गालात हसला . त्याच ते हसन तिने अगदीच नजरेत सामावून घेतल..पाहता पाहता दोघांच्याही नजरा एकमेकांशी येऊन भिडल्या आणि हृदयात धडधड वाढू लागली ..शरीरामध्ये फार फरक नव्हता पण ओठ मात्र एकमेकांसाठी अतृप्त झाले होते ..नित्या त्याच्या अधिकच जवळ गेली होती तर सारांश देखील आता तिच्या जवळ आला होता .त्याला इतकं जवळ येताना पाहून तिने आपले डोळे घट्ट मिटले ..सारांशच्या ते लक्षात आलं आणि त्याने ओठांवर चुंबन देण्याऐवजी कपाळावर आपल्या प्रेमाची मोहोर उमटवली ..त्याच्या अशा वागण्याने ती थोडी हिरमुसली आणि क्षणभर आनंदही झाला ..तो आपला फायदा घेणार नाही या गोष्टीचा आनंद तर त्याला आपण नको की काय असा प्रश्न तिच्या मनात निर्मान झाला आणि तिला स्वतःच्या वागण्याच वाईट वाटलं म्हणूनच ती विरुद्ध दिशेने तोंड करून झोपू लागली ...तीच ते वागणं त्याच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही आणि त्याने स्वतःहून तिला घट्ट मिठी मारली ..त्याने मिठीत घेताच थोड्या वेळापूर्वीचा रुसवा तिने क्षणात नाहीसा केला आणि तीही त्याच्या कुशीत जाऊन शिरली....

रात्र सरत होती ..सारांश तिला मिठीत घेऊन झोपला होता तर नित्याला काही झोप येईना ..तिच्या डोक्यात बऱ्याच प्रश्नांनी धाव घेतली होती ..अशी धाव जी तिला बुचकाळ्यात पाडत होती आणि क्षणात आनंदही देत होती..विचारात असतानाच तिने आपली मान त्याच्याकडे वळवली आणि मोर पिसारा फुलवावा तसा आपला हात तिने त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला ..तीच संपूर्ण लक्ष फक्त त्याच्या निरागस चेहऱ्याकडे होत .. तिला त्याच्या चेहऱ्यावर न संपणारा आनंद दिसू लागला ..आणि ती आणखीच त्याच्यात बुडू लागली ..

" स्पर्श म्हणजे तरी नक्की काय ? आनंद की यातना ..स्पर्श म्हणजे नक्की तरी काय मोरसारखं पिसारा काढून थुईथुई नाचण की एकांतात सतत स्वतःला त्रास करून घेणं ..स्पर्श म्हणजे नक्की तरी काय ? " अस तीच मन तिला विचारू लागलं ..स्वाभाविकच त्याला काही कारणे होते ..ज्या कारणांनी नित्याला शांत ..नाही तर ..खूप शांत केलं होतं ..

वय 21 वर्षे ..फुलपाखरासारखी स्वैरभैर उडणारी नित्या ..बी.एससी.च्या अंतिम वर्षाला होती .. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक संपन्न कुटुंब ..नित्या लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली ..त्यामुळे ती तेव्हाच एकटी पडली ..पण वडिलांनी मात्र पुन्हा दुसर लग्न करून स्वतःचा एकटेपणा कायमचा दूर केला ..ती त्यांना इतकी नकोशी झाली होती की अगदी तीच शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांनी तिच्या लग्नाचा बेत आखला होता ..पण तिने कस बस आपलं शिक्षण पूर्ण केलं ..शेवटी संपूर्ण कुटुंबासमोर हार मानून तिच्या तिने लग्नाला होकार भरला . वयाच्या 21- 22 व्या वर्षी जेव्हा तिला संसार हा शब्द कळत नव्हता त्या वयात तिने संसार करायला सुरुवात केली ..आणि मनात होती एकच माफक अपेक्षा ..जे वडिलांनी प्रेम दिलं नाही ते कमीत कमी जोडीदाराने द्यावं ..

लग्नाचे विधिविधान पूर्ण झाले आणि नित्या नावाचं ओझं वडिलांच्या आयुष्यातून कायमच नाहीस झालं ..तिलाही त्या दिवशी रडावस वाटलं नव्हतं ..तिने एकदा त्यांच्या डोळ्यात झाकून बघितलं ..त्यात तिची जागा कुठेच नव्हती ..हे दिसताच तिने आपल्या अश्रूंना आपल्या डोळ्यातच कैद केल आणि इतरांना वाईट वाटू नये म्हणून त्यांचे चरणस्पर्श करून ती नव्या आयुष्यास निघाली .

अस आयुष्य ..ज्यात जोडीदार तर अनोळखी होता पण तीही नैराश्याने ग्रासली होती ...आणि मनात आशा होती ती त्याने तिला तनमनापासून फुलवण्याची ..नित्याच्या आयुष्यात आता मृन्मय आला ..तो इंजिनिअर होता शिवाय घरच्यांचा स्टेटसला जुळणारा होता म्हणून सर्व फारच आनंदी होते ..तर नित्या त्या नवीन वातावरणात स्वतःला कसतरी सांभाळून घेत होती ..त्यांच्याव्यतिरिक्त घरात सासु सासरे होते ..सासू म्हणजे अगदी कडक व्यक्तिमत्त्व ...जिला चुका मान्य नव्हत्या आणि बोल एकवण्यास ती माघार घेणार नव्हती ...लग्नाचं आटोपल्यावर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघाले होते ..आणि नित्या आपल्या कामात दिवसभर व्यस्त होती ..घरी जास्त लोक असल्याने तिला सकाळपासून कामात फुरसद मिळाली नव्हती ..तर स्वयंपाक , धुनी भांडी आवरता आवरता तिला सायंकाळच झाली होती ..तीच विश्व म्हणजे चाळीतल एक छोटस घर जिथे चार लोक कसेतरी दाटीवाटीने राहत होते ..सायंकाळ झाली आणि घरातले सर्वच लोक कुठेतरी बाहेर जाऊ लागले ..तिला घरात नक्की काय चालल हेच कळत नव्हतं पण त्या सर्वांना प्रश्न विचारण्याची हिम्मत तिने काही केली नाही ..तर नवऱ्याने आज फक्त दोघांचा स्वयंपाक बनवायला सांगितला होता ..ती रात्रीचा स्वयंपाक बनविण्यात व्यस्त झाली होती आणि घर देखील रिकाम झालं होतं . नवरा तिच्या मागे घिरट्या घालू लागला होता ..तिला त्याच नक्की काय चालल आहे हे कळत नव्हतं तरीही तिने आपलं पूर्ण मन कामात लावलं होत ..इतकं असतानाही त्याच किचनरूम मध्ये येन काही बंद झालं नव्हतं ..तासाभराने स्वयंपाक झाला आणि तिने त्याला जेवायला बोलवून घेतले ..त्यानेही क्षणाचा विलंब न करता प्रस्थान केले ...जेवण करतानाही त्याची नजर तिच्यापासून हटली नव्हती ..तो तिला बघून स्मित करीत होता तर ती जेवण करण्यात स्वतःच मन लावून घेत होती ..त्याच तिच्याकडे अस बघन तिला कदाचित आवडलं नव्हतं ..प्रयत्न करूनही ती स्वतालास शांत करु शकली नव्हती .
..काहीच वेळात तीच जेवण आटोपलं आणि ती किचन मधल काम आवरून टीव्ही पाहायला बसली ..अगदी 5 मिनिट झाले असतील ..मृन्मय तिच्यासमोर येऊन उभा राहिला ..तिच्या हातात असणारा टीव्हीचा रीमोर्ट आपल्या हातात घेत त्याने टीव्ही बंद केली आणि पुढच्याच क्षणी तिचा हात पकडत तो तिला बेडवर घेऊन गेला ..तिला त्याच नक्की काय चालल आहे हे कळत नव्हत .ती त्याला काही विचारणार तेवढ्यात तोच म्हणाला , " नित्या तुला माहिती आहे लग्नाच्या पहिल्या रात्री काय होत .." तिला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं त्यामुळे तिने नकारार्थी मान हलवली ..त्याला तिचा राग आला पण आपला राग व्यक्त न करता त्याने मोबाइलवर एक चित्रफीत लावली ..मोबाइलमधून कसले तरी आवाज येत होते ..नित्याला ते सर्व पाहणं नकोस झालं होतं तर मृन्मय इकडे मनातून बहरला होता ...तिने त्या चित्रफितीवरून नजर हटवली आणि बाजूला सरकली ..आणि मृन्मयला तीच ते तस वागणं अपमान वाटलं आणि एखाद्या शिकार्यासारखा तो तिच्या शरीरावर येऊन पडला ..तिला काही बोलायची संधीच नव्हती ..एखादा व्यक्ती खूप दिवस उपाशी असल्यावर जेव्हा त्याला जेवण मिळत आणि तो जेवणावर तुटून पडतो तशीच मृन्मयची अवस्था झाली होती ..त्याला स्वतःला सावरता आलं नाही आणि त्याने आधाशीपनाणे नित्या आणि त्याच्या शरीरामध्ये येणारे सर्व संकट दूर केले ..त्याचे मोठं मोठे डोळे तिच्या शरिराकडे रोखून पाहत होते ..डोळ्यात होती ती वासना ..आणि आता त्यासमोर त्याला काहीच दिसणार नव्हतं ..नित्याच्या चेहऱ्यावर असलेलं भय देखील त्याला दिसलं नव्हतं ..आणि तो एखाद्या भुकेल्या जनावरप्रमाणे तिच्यावर तुटून पडला ..त्याला आपला पहिला स्पर्श खास बनवायचा असल्याने तो तिच्याशी अगदी कठोरपणे वागत होता ..आणि पहिला स्पर्श होताच नित्याच्या शरीराला पहिला घाव बसला ..तिला खूप ओरडावस वाटत होत पण तो अधिकार देखील त्याने तिला दिला नव्हता ..तीच्या तोंडावर आपले हात मजबुतीने ठेवून तो तिच्या शरीराचा उपभोग घेत होता तर नित्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता ज्याकडे मृन्मयसारख्या पुरुषाची नजर जाण कठीणच होत..

क्रमशः ....