स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 11 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 11 )

तुझमेही सुबहँ
तुझंमेही शाम धुंड लेती हु
तुमही हो मेरी पेहली और आखरी मोहब्बत
आज ये दुनिया से एलान करती हु


जेमतेम डिसेंबर उजाळला होता ..सर्विकडे थंडी वाढायला सुरुवात झालं होती तर मुंबईमध्ये दमट वातावरण असल्याने फार काही जाणवत नव्हतं ..सायंकाळची वेळ होती ..संध्या पाळण्यात झोपून होती तर नित्या घराची कामे करत होती ..साफसफाई करून ती संध्याजवळ पोहोचली तर संध्या तिच्याकडेच पाहत होती ..संध्याला थंडी वाजू नये यासाठी नित्याने पुरेपूर काळजी घेतली होती ..संध्या तिला पाहत असताना नित्या गुडघ्यावर टेकत म्हणाली , " पिल्लू तू झोपली नाहीस ..ममा काम करत असताना लपून लपून पाहत आहेस होय ..( आणि अचानक संध्या हसू लागली ) ..अरे वा !! म्हणजे आज मूड मस्त आहे वाटत आमच्या राजकुमारिचा ..किती गोड हसतेस ना तू !! अशीच कायम हसत राहा ..तुला सांगू पिल्लू मला न तुला तुझ्या आयुष्यातील सर्व सुख तुझ्या पायाखाली आणून ठेवायची आहेत ..क्षणभर उसासा घेत ..करू शकेन ना ग मी पूर्ण ? ..पिल्लू तुला एक सांगू ..कुणाला सांगणार तर नाहीस ना ?..चल सांगतेच ...तुला माहिती आहे पिल्लू ज्यादिवशी तुझा जन्म झाला तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता ..त्याआधी माझ्या या जीवनाला कुठलाही अर्थ नव्हता पण तू आलीस आणि माझेही जीवन पुन्हा आनंदाने बहरून निघाले ..तुला माहिती आहे माझी आईना मी लहान असतानाच निघून गेली ..मला तर आठवत पण नाही की तिचा चेहरा कसा दिसतो ..आजोबा सांगत होते की आईचा पहिला मुलगा मरण पावला ..त्यानंतर डॉक्टरांनी बाबाना सांगितले की आई खूप कमजोर आहे तेव्हा दुसरा गर्भ वाढू देऊ नका ..पण बाबाने एकल नाही आणि मी झाले आणि आमच्यातून आई निघून गेली ..मी पोरकी झाले ..त्यानंतर आजी आजोबा मला स्वतःकडे घेऊन गेले ..नंतर 6 महिनेच गेले असतील तर बाबांनी दुसर लग्न केलं ..आजीने मला लहान असतानाच स्वयंपाक शिकविला होता अगदी छोटी छोटी कामे मी करत होते ..मी तिथे बऱ्यापैकी रुळले होते की बाबांनी मला परत बोलावून घेतले ..सावत्र आई माझ्याशी नीट वागायची नाही पण तरीही मी तिच्यात आईला शोधू लागले ..ती जे जे काम सांगायचे ते ते सर्व काम मी केले ..त्यात कधीही तक्रार केली नाही पण तिने मला कधीच आपल मानलं नाही ..मी आईच्या प्रेमासाठी किती आसुसले होते हे कुणालाही कळत नव्हतं ...कधी कधी वाटायच की बाबा तरी समजून घेतील पण ते आईच्या शब्दाच्या बाहेर कधीच गेले नाही ..मला छोट्या छोट्या गोष्टीसाठी कितीतरी विनंती करावी लागत असे पण तुझ्यासोबत तस होणार नाही हा ..मी माझ्या राजकुमारिला जगातील सर्व सुख देईन ..पिल्लू मला सोडून जाऊ नको हा कधीच...( तिचा हात हातात घेत ) ..प्रॉमिस ? ...कितीतरी दिवस हे सर्व मनात ठेवलं होतं आज तुला सांगून फार मस्त वाटत आहे ..कुणाला सांगू नको हा ..ममाज प्रॉमिस ? "

ती आपले अश्रू पुसतच होती की मृन्मय घरात आला ..तीही त्याला पाहून चहा बनविण्यासाठी किचनरूम मध्ये जाऊ लागली ..दोघेही विरुद्ध बाजूला जात असताना एकमेकांची भेट झाली आणि न राहवून मृन्मयने नित्याच्या पृष्ठावर हात फेरला ..तिला ते कळलं होतं पण ती त्याला काहीच म्हणाली नाही ..

मृन्मय फ्रेश होऊन खुर्चीवर बसला होता..तर नित्या चहा घेऊन मृन्मयकडे आली ..चहाचा कप त्याला देतच होती की त्याने तिच्या हाताना स्पर्श केला..तिने त्याच्या चेहऱ्यावर नजर टाकली आणि तिला त्याच्या मनातल्या सर्व भावना बिनचूक कळाल्या ..तिने नजर खाली टाकत चहाचा कप त्याला दिला आणि संध्याकडे जाऊ लागली ..संध्या आताही वर पाहत होती ..ती झोपत नाही म्हणून नित्याने तिला हातात घेतले आणि इकडून तिकडे फिरू लागली ..आज दिवसभर ती सर्वांच्या हातात असल्याने तिला झोपच लागली नव्हती ..ती झोपल्याशिवाय नित्याला स्वयंपाक करणं कठीण होत त्यामुळे ती संध्याला हातात घेऊन इकडून तिकडे फिरू लागली ..तिच्या पाठीवर हात फेरता फेरता संध्या केव्हा झोपी गेली ते कळलंच नाही ..तिचा शांत चेहरा पाहून नित्याही समाधानी झाली ..बरीच कामे आवरायची असल्याने ती संध्याला पाळण्यात टाकतच होती की मृन्मयने नित्याला मागून येऊन मिठी मारली ..काही क्षणातच त्याचे हात तिच्या छातीवर फिरू लागले ..नित्याने संध्याला नीट पाळण्यात टाकले आणि त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवत म्हणाली , " मृन्मय आता तरी स्वतःला थोडं सावर ना !! बघ आपल्याला किती गोड मुलगी झाली आहे ..तिला आपण दोघांनीही वेळ द्यायला हवा..विशेष म्हणजे मी ..माझ्याशिवाय ती राहत पण नाही तेव्हा तू काही दिवस वाट पाहू शकत नाही का ? फक्त आपल्या मुलीसाठी ..? "

तीच बोलणं ऐकून मृन्मयचे हावभाव बदलले होते ..त्याचा चेहरा थोडा रागीट झाला होता . तो दोन पाय मागे जात बेडवर जाऊन बसला ..त्याला काहीतरी बोलायच होत तरीही तो शांत बसला होता ..पण त्याला आपल्या रागाला सावरता येत नव्हतं त्यामुळे डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत म्हणाला , " मुलगी झाली , आपली जबाबदारी वाढली ते ठीक आहे पण या नादात हे विसरू नको की तुला नवराही आहे आणि त्याला आनंदी ठेवणही तुझीच जबाबदारी आहे .."

तो फारच संतापला होता ..त्यामुळे त्याला क्षणभरही तिचा चेहरा पाहायचा नव्हता ..त्याने ड्रॉवरमध्ये असलेली चावी सोबत घेतली आणि लगेच बाहेर पडला तर नित्या आताही तिथेच उभी होती ..मृन्मय जो काही बोलला त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता ..एक पुरुष स्पर्शासाठी इतका वेडा असतो आणि त्यासमोर दुसर काहीही महत्त्वाचं नसत हे तिने आज जाणले होते ..ती उभीच होती की बाहेरून सासूबाईचा आवाज आला आणि ती स्वयंपाक बनवायला लगेच किचनमध्ये पोहोचली ..

नित्याचा स्वयंपाक आवरून झाला होता ..मृन्मयची वाट बघून आईबाबा कंटाळले आणि त्यांनी जेवण करून घेतलं तर नित्या आताही त्याची वाट पाहत होती ..ती कधी बाहेर जाई तर कधी अंथरुणावर येऊन बसायची ..रात्रीचे 12 वाजून गेले होती तरी त्याचा पत्ता नव्हता ..तिलाही फार भूक लागली होती पण तरीही तो ओरडणार म्हणून ती जेवण करत नव्हती ..पाच - दहा मिनिटे गेले असतीलच की मृन्मय घरात आला ..त्याच्या चालण्यावरून समजत होत की आज त्याने खूप जास्त ड्रिंक केली आहे ..तो अडखळत - अडखळतच आतमध्ये आला ..त्याला सावरत नित्या म्हणाली , " मृन्मय चल मी जेवायला वाढते .." मृन्मय इतक्या रागात होता की तो तिचा हात जोराने झटकत म्हणाला , " तूच घे गिळून..मी आलोय खाऊन ..आणि मला ना तुझ्याशी बोलायचच नाही ..चल हो बाजूला मी झोपतोय .."

नित्याला बाजूला करत तो बेडवर जाऊन पडला..नित्या त्याच्या बोलण्याने दुखावली ..तशी तिला फार भूक लागली होती पण त्याच्या शब्दांनीच तीच पोट भरल होत ..जेवण करायचं नव्हतं पण किचनमध्ये जाऊन तिने सर्व काही नीट ठेवलं आणि अंथरुणावर येऊन पडली...नित्या अंथरुणावर पडली होती पण तिला काही झोप येत नव्हती ..तिच मन आणखीच विचारात हरवलं होत तेवढ्यात तिला संध्याचा रडण्याचा आवाज येऊ लागला ..सर्वांची झोप मोड होईल म्हणून नित्या लगेच धावत संध्याकडे गेली ..बहुतेक तिला भूक लागली आहे हे नित्याच्या लक्षात आलं आणि नित्या तिला कडेवर घेऊन शांत करू लागली ..घरात सर्वांची झोपमोड होऊ नये म्हणून नित्या मुलीला समोर बाल्कनीत घेऊन गेली ..बाहेर गार वारा वाहत होता ..नित्याला आणखीच थंडी वाटू लागली ..नित्याने साडीचा पदर संध्याच्या अंगावर घेत दूध पाजायला सुरुवात केली ...संध्याला फारच भूक लागली असल्याने ती शांतपणे दूध पित होत ..काहीच क्षणात तीच पोट भरलं आणि संध्या नित्याकडे पाहून हसू लागली ..नित्याही तिला हसून म्हणाली , " खूप भूक लागली होती न पिल्लू !! आता कस वाटत आहे बर तुला !! ( संध्या हसायला लागली ) ..किती गोड ना !! आणि काय ग तुला आईला झोपू द्यायला आवडत नाही का ..अशी तर खूप शांत असतेस पण मी झोपायला लागले की लगेच रडायला लागतेस लबाड कुठली !! आईला छळायला गंमत वाटते होय ..आणि मी सोबत नसलेच तर कस होईल बर तुझं माझ्याविना ..पण घाबरू नको मी नाही जाणार दूर ..बर आता थंडी बाहेर वाढली आहे सो चला झोपुया आपण .."

नित्या संध्याला घेऊन रूममध्ये तर गेली होती पण संध्या काही आज झोपायच्या मूड मध्ये नव्हती ..नित्याचे डोळे झोपेने उघडझाप करत होते पण संध्या झोपली नसताना तिलाही झोपने योग्य वाटले नाही त्यामुळे ती फक्त संध्याकडे पाहत होती..ती झोपत नाही हे पाहून आपल्या मुलीची करमणूक व्हावी म्हणून वेगवेगळे इशारे करून ती संध्याला हसवू लागली ..साधारणतः दीड तास झाला होता पण संध्या काही झोपली नव्हती त्यासोबतच नित्याही झोपली नव्हती ..ती हळू आवाजात अंगाई एकवू लागली तेव्हा कुठे संध्या झोपी गेली आणि अंगाई गाता - गाता नित्याचे डोळे केव्हा लागले तिलाच कळले नाही ...

-----------

" ए महाराणी इथे मधातच कुठे झोपली आहेस , तुला जागा पण अपुरी पडली आहे का " , सासूबाई म्हणाल्या

सासूबाईचे शब्द कानावर पडताच नित्या खडबडून जागी झाली ..तिने इकडे तिकडे बघितलं तर तिला आठवलं की काल आपण अंगाई गाताना इथेच झोपी गेलो म्हणून सासूबाई ओरडत आहेत ..तिच्या डोळ्यावरची झोप उघडली नव्हतीच की पुन्हा सासूबाई म्हणाल्या , " आता उठणार आहेस का ? सूर्य डोक्यावर आला आहे याचं तरी भान असू दे .."

तिने खिडकीतुन बाहेर पाहिलं तर खरच दिवस उजाळला होता ..तिची अंथरूनावरून उठायची इच्छा नसताना देखील ती उठली आणि फ्रेश होऊन सर्वांसाठी चहा घेऊन आली ..सर्वांनी चहा घेतला होता ..तिने घड्यालीकडे नजर टाकली तेव्हा सव्वा आठ वाजले होते ..मृन्मयला ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून चहा न घेताच ती पुन्हा स्वयंपाकाला लागली ..स्वयंपाक करत असतानाही तिची नजर फक्त मृन्मयकडे होतीे ..मृन्मय ऑफिसला जाण्याची तयारी करत होता ..त्याला कळत होतं की नित्या आपल्याकडे बघते आहे तरीही त्याने तिच्याकडे लक्ष दिले नव्हते ..मृन्मयची तयारी झाली आणि तो टिफिनसाठी घाई करू लागला ..त्यामुळे नित्याने पटापट आवरून पावणे दहाच्या सुमारास त्याला टिफिन हातात दिला ..टिफिन घेतानाही त्याने तिच्याकडे पाहिले नव्हते ..उलट आपल्या मुलीला बघून , नित्याशी एक शब्दही न बोलता तो ऑफिसला निघून गेला ..नित्याला फार वाईट वाटले होते पण तो सायंकाळी आला की सर्व नीट होईल असा विचार करून तिने चहाचा कप ओठी लावला ..मृन्मय गेला आणि स्वयंपाकाच टेन्शन कमी झालं ..संध्याही उठली आणि आजीआजोबांच्या हातात खेळू लागली त्यामुळे ती लवकरात लवकर सर्व कामे आवरु लागली ..विशेष म्हणजे तिला झोप येत असल्याने लवकर आवरून थोडी झोप घ्यावी या विचाराने ती पटापट काम आवरत होती ..

नित्याच काम आवरलं तेव्हा दुपारचे तीन वाजले होते ..नित्याने सर्व काम आवरत संध्याला झोपविले होते आणि स्वतःही झोपी गेली ..अर्धा - पाऊण तास झाला असेल तेव्हाच तीच्या खांद्यावर एक हात येऊन पडला आणि ती खडबडून जागी झाली ..समोर अनु होती ..अनुचा चेहरा पाहून ती आनंदीही झाली तर झोपेच खोबर झालं म्हणून तिला रागही येत होता ..अनु समोरून बोलत आहे हे पाहून तिने चेहऱ्यावर पाणी घेतलं आणि तिच्याजवळ पाण्याचा ग्लास देत म्हणाली , " सॉरी हा अनु जरा झोप लागली होती ..थांब चहा टाकते .."

अनु नाही म्हणत असतानाही तिने सर्वांसाठी चहा बनविला..अनु मात्र संध्याच्या उठण्याची वाट पाहत होती ..ती उठली म्हणजे हातात घेता येईल अस तिला वाटत होतं ..नित्याही आपला चहा अनुकडे घेऊन येत म्हणाली , " हा बोला मॅडम ..काय म्हणता ..आज आमची कशी कशी काय आठवण झाली की रस्ता विसरलात ? "

नित्याचा टोमणा तिने बरोबर हेरला आणि दुःखी मनाने बोलू लागली , " सॉरी यार संध्याच्या नामकरनाच्या वेळी मी बाहेर होते ..म्हणून येन जमलं नाही पण जशी घरी आले तशीच भेटायला आले बघ .."

नित्याही चेहरा टाकत म्हणाली , " हो ना तुला आता आमची आठवण कशी राहणार ..तुला वेळ कमी पडतो कुणासोबत तरी .."

अनु लगेच तिच्या डोक्यावर मारत म्हणाली , " अस काहीही नाही आहे यार बस थोडं काम होत ..पण आले ना आता ..मग कशाला रागवत आहेस बर .."

या दोघांच बोलणं सुरू होत आणि संध्या रडू लागली ..नित्याने तिला हातात घेण्यापूर्वीच अनुने तिला उचलून घेतले आणि लाडात येत म्हणाली , " हे प्रिन्सेस सॉरी हा !!! मला याआधी तुला पाहण्यासाठी यायला जमलं नाही पण मी आता आले आहे .."

संध्या अनुच्या गोबऱ्या गालावर हात लावत होती आणि त्यात तिला जाम मज्जा येत होती त्यामुळे रडणारी ती केव्हा शांत झाली कुणालाच कळले नाही ..तर अनु पुन्हा म्हणाली , " संध्या मी तुझी मासी ..तुला आवडेल माझ्यासोबत बोलायला ..( संध्या लगेच हसली ) ..अरे बापरे !! वाटलं नव्हतं इतक्या लवकर तयार होशील म्हणून !! ..किती गोड हसतेस ग !!..ए नित्या मी घेऊन जाऊ का घरी तुझ्या लेकीला .."

अनु बोलतच होती की घरात बसलेल्या सासूबाई बाहेर निघून गेल्या ..नित्याला काय झालं ते कळून चुकलं तर अनु संध्याशी खेळण्यात व्यस्त झाली ..काहीच क्षण गेले असतील ..अनुच्या लक्ष्यात आलं की नित्या अचानक कुठेतरी हरवली आहे ..तिची गंमत घ्यावी म्हणून समोर चुटकी वाजवली आणि नित्या घाबरली ..अनुला कळून चुकलं काहीतरी झालं आहे म्हणून संध्याला पाळण्यात ठेवत अनु म्हणाली , " नित्या सांग ना काय झालंय ..तू इतकी गुमसुम का आहेस ? "

नित्याने एक नजर दाराकडे टाकली ..दारात कुणीच नव्हतं ..तशीच ती अनुकडे सरकली आणि हळूच आवजात म्हणाली , " अग मुलगी लहान आहे म्हणून मी त्याला स्पर्शासाठी नाही म्हणाले तर बघ हा असा करतोय ..रुसून बसलाय ..कालपासून एक शब्द पण बोलला नाही उलट दारू पिऊन आला ते वेगळंच ..काय चुकलं ग माझं !!..म्हणे नवर्याला पण खुश ठेवायच आहे ..कुठे चुकतेय ग मी!! सर्व काही तर या घरासाठी अर्पण केलं मग मला का समजून घेत नाही कुणी .."

नित्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते ..अनु तिला शांत करू लागली ..तिने अश्रू पुसले आणि पुन्हा नित्या म्हणाली , " अनु मला न आता खूप भीती वाटू लागलीय मृन्मयची कारण तो जर असाच तुटून पडला तर माझ्या मुलीच कस होईल ..आजपर्यंत मी सर्व सहन केल पण मुलीसमोर हे घडत जाईल तेव्हा कस वाटेल ..मला न खरच खूप भीती वाटू लागली आहे .."

अनुला कळून चुकलं की वाटत तेवढं सोपं प्रकरण नाहीये तरीही तिला समजावत म्हणाली , " अस काही नाही ग !! मुलगी त्याची पण आहे ना घेईल समजून तो ..काळजी नको करू ..तस पण तूच म्हणाली होतीस ना तो बदलत चालला आहे .."

नित्याने अनुच्या बोलण्यावर फक्त मान हलविली ..तेवढ्यात बाहेरून सासूबाई आतमध्ये आल्या आणि अनुला कळून चुकलं की आता इथे राहन योग्य नाही त्यामुळे नित्याला मिठी मारत ती घराबाहेर पडली ..नित्याही तिला सोडायला खाली आली होती.. अनु जाताच नित्या वर आली ..एकदा नजर तिने आपल्या मुलीवर टाकली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले ..आणि मृन्मयच्या वागण्याच्या विचारात ती खोलवर बुडाली ..विचार एकच होता की तो स्पर्शासाठी काय करेल आणि त्याच्या माझ्या मुलीवर तर काही परिणाम होणार नाही ना ?


क्रमशः ..