Sparsh - Anokhe roop hai - 10 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 10 )

लाखो दुवाओ किस्मत से लढकर
इस पल मे पाया है तुझे ..
लगा था हर घाव दिलं पे यु तिर की तरह
फिरभी सब कुछ भुलकर अपना बणाया है तुझे
अब तो , ना तकरार है
ना है किसींसे कोई आरजु ..
तुम को पा लिया तो लगे
सब कुछ जी लिया है मैने
जी लिया है मैने ..


नित्या ऑपरेशन थेटरमध्ये होती ..तिची स्थिती आणखीच खालावली होती ..डॉक्टर शक्य होईल तेवढे प्रयत्न करत होते ..बाळ अगदी काही क्षणातच आईच्या गर्भातून बाहेर येणार होते आणि नित्याला वेदना असह्य झाला ..ती शरीरातून पूर्ण ताकद काढून ओरडत होती आणि काही वेळात शांत झाली ..समोरून छोट्याश्या मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला ..सुदैवाने नित्यदेखील वाचली होती पण मुलीचा जन्म होताच ती बेहोष पडली ..डॉक्टर ऑपरेशन पार पाडत बाहेर आले..तिथे मृन्मय त्यांची वाट पाहत होता ..डॉक्टर येताच त्यांची नजरानजर झाली ..आणि न राहवता डॉक्टर म्हणाले , " तुम्हाला आधीच म्हणालो होतो ना की तिला ऍडमिट करा मग तिचा जीव धोक्यात घालून तुम्हाला काय मिळाल ?..तुमचं नशीब की त्या दोघी पण वाचल्या नाही तर आज अनर्थ घडून गेला असता ..जा आपल्या मुलीला बघून घ्या .."

डॉक्टर मृण्मयवर तिरकस नजर टाकत केबिनकडे जाऊ लागले ..तर वॉर्डबॉय नित्याला दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट करू लागला ..अगदी समोरच नर्स त्या छोट्याश्या परीला घेऊन उभी होती ..मृन्मय लगबगीने तिच्याकडे पोहोचला आणि तिला न्याहाळू लागला ..ती परी अगदी मृण्मयवर गेली होती ..अगदी नाक असो की चेहरा त्या सर्वात त्याला आपलीच प्रतिमा दिसत होती ..पहिल्यांदा त्याने तिच्या इवल्याश्या हाताना स्पर्श केला नि एक वेगळाच अनुभव त्याला येऊ लागला ।.तो स्पर्श होता बापाचा ..जो जगात सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलीवर करतो ।.थोड्या वेळात नर्सने तिला नित्याच्या रूममध्ये दाखल केले .आजपर्यंत कुणकुण करणाऱ्या सासूबाई देखील तिला पाहताच तिच्या प्रेमात पडल्या आणि आजी होण्याचे सर्वोच्च सुख त्यांच्या पदरी पडले ..त्यांची नजर त्या सुंदर परिवरून हटतच नव्हती ..तर इकडे घरी सर्व चिंता करत असतील म्हणून मृन्मयने त्यांना फोन करून आनंदाची बातमी कळविली ..घरात आलेल्या पाहुनीने जणू सर्व वातावरण बदलून टाकलं होतं ..

दुसऱ्या दिवशीची सकाळ ..नित्या होशमध्ये आली आणि तिची नजर आपल्या मुलीला शोधू लागली..नित्याच्या उजव्या बाजूला पाळण्यात तिला ठेवण्यात आलं होतं ...तीच लक्ष जाताच नित्याच्या डोळ्यात अश्रू आले ..पण हे अश्रू दुःखाचे नाही तर आनंदाचे होते कारण कालच्या प्रसंगानंतर तिला खरच वाटलं नव्हतं की ती आजचा दिवस पाहू शकेल पण ते शक्य झालं आणि आज ती आपल्या मुलीसोबत होती ..तिने मुलीच्या जवळ जात तिला अलगद उचलून घेतले ..तिला छान शुभ्र कापडात गुंडाळून ठेवले होते आणि डोळे लावून शांत झोपलेली ती नित्याच्या मनाला अधिकच शांत करून गेली ..नित्या तिला हातात घेऊन कितीतरी वेळ पाहत होती ..तिला पाहल्यावरही तीच मन काही भरेना ..तिला पाहतच नित्या म्हणाली , " कशी आहेस माझी पिल्लू !! किती वाट पाहायला लावली ना तू ममाला ..पोटात किती त्रास दिलास तू !!..तुला आवडत का ममाला त्रास द्यायला ..लबाड आहेस हा !! तरीही मला आवडलं हा तुझं अस वागणं ..आज तू माझ्या कुशीत आहेस कस सांगू तुला किती आनंद होतोय मला!! ..आजपर्यंत आयुष्यात काहीच मिळालं नाही पण तू आलीस आणि वाटू लागलं जणू मला सर्वच मिळालं ..आता काहीच नको मला ..धन्यवाद पिल्लू मला हा सर्वोच्च आनंद देण्यासाठी .."

ती फारच भावुक झाली होती आणि तिने आपले ओठ मुलीच्या कपाळावर टेकवले ..ती रूममध्ये इकडून तिकडे चकरा मारत होती ..ती मुलीला हातात घेऊन खिडकीजवळ जाऊन उभी राहिली ..वातावरण अगदी प्रसन्न होत आणि तिने कधीतरी वाचलेल्या ओळी तिला आठवू लागल्या आणि हळुवार आवाजात ती गुणगुनू लागली ..

पहिले - वहिले रडणे तुझे
का उगाच सुखावून जाते
असता संसार सोबती दुःखाचा
तुझे हसणे , जगणे शिकवून जाते ...

किती आणि काय मिळाले
कस सांगू तरी तुझ्या येण्याने
तू आलीस जगी आज
आणि देहात प्राण माझ्या आले ..

तूच माझा आनंद
तूच श्वास ग माझा
तुझ्या पावलं चरणांनी
सजल्या इंद्रधनूच्या वाटा ..

( तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत )

बहरेल मीही नव्याने
साथ तुझी अशी असू दे
समाजच काय ? पूर्ण जगाशी लढेन
हात कायम तुझा माझ्या हाती असुदे
माझ्या हाती असुदे

ती आपल्या मुलीशी बोलतच होती की बाहेरून मृन्मय आला ..तीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून थोड्या जोरानेच म्हणाला , " नित्या तू कालपासून काहीच खाल्लं नाहीस आणि आपल्या मुलीलाही भूक लागली असेल तेव्हा थोडं खाऊन घे ..बर वाटेल .."

त्याने नित्यासाठी काही फळ आणलं होती ..पण त्याच्या बोलण्याकडे तीच लक्ष नव्हतं ..ती इकडून तिकडे चकरा मारतच होती आणि बारीक नजरेने तीच मृन्मयकडेही लक्ष होत ..तो आला तेव्हापासून आपल्या मुलीकडेच पाहत होता हे बघून नित्याने त्याला मुलीला उचलून घेण्यास सांगितले आणि त्याने तिला हातात धरले ..तोही तिच्याकडे तसाच पाहत होता आणि तिला पाहत म्हणाला , " किती गोड ना माझं बाळ !! तू ठीक आहेस ना ..किती घाबरवल ना तू सर्वाना ...आता नको करू हा अस काही ..'पपा खुप बोलतात का ग ..कंटाळली आहेस ..( नित्या शांत झोपून होती ) ..बघा बघा आज तुला कोण कोण भेटायला आल आहे ..मोठी आई आहे , आत्या आहे ..तुला भेटायचं आहे का त्यांच्याशी ? "

मृन्मयच बोलणं ऐकून आतापार्यंत बाहेर वाट पाहत बसलेले सर्व रूम मध्ये आले आणि रूममध्ये थोडा गोंधळ होऊ लागला ..त्या आवाजाने मुलीची झोप उघडली आणि ती जोरात रडू लागली ..प्रत्येकझन तिला आपल्या कुशीत घेऊन शांत करू पाहत होता पण ती काही शांत होत नव्हती ..परंतु तिला स्पर्श करण्याचा मोह मात्र कुणाला आवरेना त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती तिला आपल्या हातात घेत होते तरीही ती शांत होत नाही हे पाहून नित्याची ननंद म्हणाली , " नित्या घे ग तुझ्या लेकीला बहुतेक भूक लागली असेल ..तिला दूध दे मग होईल बघ गप्प .."

नित्याने तिला पुन्हा एकदा आपल्या हातात घेतले आणि लेकीला दूध पाजू लागली ..छोटीच्या पोटात दूध जावं आणि ती लगेचच शांत झाली ..

बातमी मिळाल्यापासून दिवसभरच सर्वांचे येणे जाणे सुरू होते ..त्या छोट्याशा मुलीला बघून प्रत्येक व्यक्ती आनंदित होत होता ..ही बातमी नित्याच्या बाबाना कळली आणि तेही त्यांना पाहायला हॉस्पिटलमध्ये पोहोचले ..त्यांनी नित्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नित्या आपल्या आई वडिलांशी एक शब्द देखील बोलली नव्हती त्यामुळे आपल्या नातीला बघून ते परतले होते ..तेवढ्या वेळ का होईना नित्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता पण नित्या आज खूप खुश होती ..काही वेळात सर्व गर्दी कमी झाली ...रूम मध्ये सासूबाई आणि नित्याच होत्या ..नित्या एकटीच त्यांना न्याहाळत होती तर सासूबाई आपल्या नातीला हातात घेऊन तीच निरीक्षण करत होत्या ..नित्याने बघितलं की त्यांचा स्वभाव थोडा बदलला आहे ..हल्ली खूप ओरडणार्या सासूबाई छोट्याश्या मुलीसमोर इतक्या शांत होईल असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं ..पण ते झालं होतं ..एका छोट्याश्या मुलीच्या येण्याने पूर्ण घराचे रंग रूपच बदलले होते..आणि नित्या आकाशात उडत होती ..आपल्या मनमर्जीने ..

नॉर्मल डिलिव्हरी असल्याने नित्याला केवळ 6 - 7 दिवसच हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं व त्यानंतर लगेच सुट्टी देण्यात आली ..नित्याला स्वतःची काळजी घेता यावी म्हणून मृन्मयने दोन - चार दिवस कुठलंही काम करायला बंदी घातली होती त्यामुळे सासूबाईचा त्रास आणखीच वाढला ..सासूबाई नित्याला नेहमीच ओ महाराणी म्हणायच्या पण यावेळी खरच ती महाराणी होती ..अगदी बेडवर बसून ती आपल्या सासूबाईला काम करताना पाहत होती आणि तिला स्वतःच हसू आवरता येईना ..मागील काही दिवसात ती फार कमजोर पडली होती त्यामुळे मृन्मयने तिच्याकडे खास लक्ष द्यायला सुरुवात केली ..तिच्या औषधापासून तर खान पिन सर्व काही मृन्मय लक्ष देत होता आणि नित्या आपल्या मुलीसोबत काही सुंदर क्षण जगत होती ..मुलीच्या रडण्यापासून तर तिच्या छोट्या छोट्या हालचाली टिपण्यात नित्याला खूप मज्जा येत असे ..तिच्या इवल्याश्या हातांचा स्पर्श झाल्यावर तीच मन सुखावू लागलं होतं ..आज पहिल्यांदा ती इतकी खुश होती ..आणि तिच्यासमोर तिला दुसर काहीच दिसत नव्हतं ..

अर्थात हे सर्व फक्त काहि दिवसच चाललं ..तिला थोडं बर वाटू लागलं आणि तिला पुन्हा एकदा कामाला लागाव लागलं ..नित्याला आधीच सर्व घरचे काम करताना स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता त्यात तिच्या मुलीने तिला आणखीच हैराण करून सोडलं ..एक तर ती तिला रात्रभर झोपू देत नव्हती आणि दिवसभर भूक लागली की रडत बसायची त्यामुळे नित्याला सर्व काम सोडून तिच्याकडे बघत बसावं लागत होत अर्थात ती हे सर्व आनंदाने करत होती ..मुलीची अंघोळ मालिश मात्र स्वतः सासूबाई करत होत्या ..नित्याला त्यांचं अस वागणं विचित्र वाटायचं पण मुलगी त्याचंच रक्त असल्याने त्या स्वतः तीच काळजीने बघत होत्या .. तेवढाच नित्याला आराम मिळत होता ..मुलगी आजी आजोबांकडे , आत्याकडे असली की तिला थोडी काळजी नसे आणि ती त्या वेळात आपले सर्व काम आवरून घेई पण एकदा तिने रडायला सुरुवात केली की मग नित्याशिवाय तिला कुणीच शांत करु शकत नसे ..नित्याही लवकर उठून आपलं सर्व काम आवरत असे आणि नंतर आपल्या सुंदर परिसोबत काही क्षण सोबत राही ..

मृन्मयच्या घरात खूप दिवसांनी गोड बातमी मिळाली होती ..त्यामुळे आपल्या मुलीचा नामकरण विधी करायचं ठरवलं ..डोहाळे जेवण करताना नित्याला थोडा त्रास झाला होता पण यावेळी तिला यातलं काहीच करावं लागणार नव्हतं ..यावेळी मृन्मयने खूप मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि त्यासाठी जय्यत तयारीही केली होती ..डीजे असो की घराची सजावट की जेवण असो यात त्याने कुठलीही कमतरता ठेवली नाही ..तर पहिल्यांदाच नित्या कुठलंही काम न करता केवळ आपल्या मुलीसोबत काही सुंदर क्षण घालवत होती ..त्या दिवशी त्यांचे सर्व नातेवाईक आले होते ..आजूबाजूची सजावट बघून प्रत्येक व्यक्ती खुश होता ..नित्याचे बाबादेखील आले होते ..तस नित्याला बोलायच नव्हतं पण तरीही सर्वांसमोर तिला भांडण नको होतं त्यामुळे ती त्यांच्याशी थोडं फार बोलली ...पण पहिल्यांदा जेव्हा त्यांनी नित्याच्या मुलीला हातात घेतले तेव्हा मात्र ती आनंदाने न्हाहून निघाली ..मृन्मयने खूप सुंदर सजावट केली होती .तर डीजेच्या आवाजावर सर्व लहान मूल थिरकत होते ..नित्या ते सर्व पाहत असताना पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले ..आपल्या मुलीचा हा दिवस इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केला जाईल अस तिला वाटत नव्हतं ..जवळपास सर्वच नातेवाईक जमा झाले आणि नित्याला आपल्या मुलीला परिसारखं नटवून सर्वांसमोर आणले ..आज सर्वांची नजर फक्त नित्या आणि तिच्या मुलीकडे होती ..नित्याला फार तर सजायला आवडत नसे पण आज आवडीने तिने शालू घातला होता ..केसात गजरा गुंफून , गळ्यात दागदागिने घालून ती आज कितीतरी दिवसांनी अशी नटली होती ..तिने आपल्या मुलीला आणले आणि पाळण्यात झोपविले ..प्रथेप्रमाणे बायांनी गाणं म्हणायला सुरुवात केली आणि आत्या हळूच मुलीच्या कानात काहीतरी पुटपुटली आणि तिच्याकडे बघून हसू लागली ..आता सर्वच तीच काय नाव ठेवलं हे ऐकून घेण्यास आतुर होते ..पण आत्याही अडून बसली शेवटी जेव्हा मृन्मय तिला साडी घेऊन देतो म्हणाला तेव्हा तिने तीच नाव सांगितल ..त्या सुंदर परिच नाव ठेवण्यात आलं .." संध्या "...नाव ऐकल्यावर सर्वांचा चेहरा आनंदाने खुलला ..बाया आपल्या प्रथा पार पाडण्यात व्यस्त होत्या तर पुरुष मंडळी नाचण्यात व्यस्त होते ..मृन्मय स्वतः नाचत असल्याचे बघून नित्या त्याच्यावर हसू लागली होती ..आज प्रत्येकाच्या नजरेत तिला मुलीबद्दल प्रेम दिसत होतं जणू ती स्वतःच्याच विश्वात हरवली होती आणि जे घडतंय त्यावर तिला विश्वासच बसत नव्हता ..सर्वांची जेवण आटोपली आणि सर्व आनंदी होऊन घरी परतली ..तर नित्या आपल्या मुलीला हातात घेऊन तिचे लाड करत होती ..तिला सांगत होती की मी तुला या जन्मात काहीही कमी होऊ देणार नाही ..आज तिच्याही मनात अनेक इच्छानि जन्म घेतला होता ..जणू संध्याच्या जन्माने तिला एक नवीन आयुष्यच मिळालं होतं..

" अस म्हणतात की जेव्हा बाळ प्रथमतः रडत त्याच वेळी आईच्या ओठांवर हसू असत तर इतर वेळी ती आपल्या बाळाच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देत नाही .."

आई हा जरी एक शब्द असला तरी त्यात सर्व नाती लपलेली असतात ..तिला कुठलाच मोह नसतो..ती आपल्या बाळासाठी आयुष्यभर खपत असते ..

" आणि जेव्हा बाळ हसू लागत तेव्हा मात्र तिच्या आनंदाला सीमा नसतात ..ती एकमेव व्यक्ती असेल जिला बाळाच्या मनातलं न सांगताही कळत .."

संध्याला हसताना बघून नित्याही आनंदी राहू लागली ..तीच हसू म्हणजे तिच्यासाठी एक मोठा सोहळा होता आणि तिला हसताना पाहून तिच्या मनी काही ओळी धाव घेऊ लागल्या ..

" तुम आये तो आया मुझे याद
गली मे आज चांद निकला
जाणे कितने दिनो के बाद
आज गली मे आज चांद निकला
तुम आये तो आया मुझे याद
गली मे आज चांद निकला ..

क्रमशः ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED