स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 9 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 9 )


कैसे बया करू
हाल - ए - दिलं तुझसे
मै केहँ भी दु तो क्या
तुझं ने समझने की ताकद है ...
औरत हु मै ..औरत हु मै ..



नित्याच्या गर्भाला नऊ महिने पूर्ण झाले होते ..बाळ केव्हाही बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागली होती ..नित्याही डॉक्टरांकडे सतत चेकप करू लागली ..एक तर तिला सतत उलट्या होऊ लागल्याने ती अशक्त पडत चालली होती तर दुसरीकडे पोटात येणाऱ्या कळा तिला आणखीच हैराण करून सोडत होत्या तर सर्व लोक बघ्याची भूमिका घेत होते ..मृन्मयदेखील फक्त आई काय म्हणते तेच एकत असायचा त्यामुळे नित्याला फारच राग यायचा ..मृन्मय पुन्हा एकदा तिला हॉस्पिटल घेऊन गेला तेव्हा त्यांनी सिजर केल्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं ..मृन्मयला त्यात काहीही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे त्याने तिला ऍडमिट करायची सहमती दर्शवली ..पण जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याच्या आईने सिजर करण्यापासून मनाई केली ..कारण त्यांना सर्व काही निसर्ग नियमानुसार घडलेल हवं होतं ..आईने त्याला इतक्या सुंदर पद्धतीने समजावलं की त्याने सिजर करायचा विचारच सोडून दिला ..त्यामागे खर कारण म्हणजे सिजर करायला जास्त पैसे लागतील हे होत आणि ते नित्याने अचूक हेरलं ...तर इकडे नित्याच्या वेदना वाढल्या होत्या ..मृन्मय यावर दुसरा काही उपाय निघतो काय म्हणून नित्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला ..ज्या स्थितीत तिला उठण देखील कठीण होऊ लागलं होतं अगदी त्याच स्थितीत तो तिला सोबत घेऊन हॉस्पिटलच्या चकरा मारू लागला ..नित्याला ते सहन होत नव्हतं तरीही तीच कुणी ऐकणार नाही म्हणून तिला नाईलाजने उठ बस करावी लागत होती ..दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यानी नॉर्मल प्रेग्नेंसी होऊ शकते हे सांगितलं पण त्यामागे एक अट टाकली की नित्या जेवढं जास्त सहन करेल तेवढीच नॉर्मल प्रेग्नन्सी होण्याची शक्यता जास्त वाढेल....मृन्मयने जेव्हा ही गोष्ट घरी सांगितली तेव्हा घरच्यांना आपले पैसे वाचले म्हणून फार आनंद झाला ...आणि सुरू झाली नित्याची सहन करण्याची परीक्षा ..अशी परिक्षा जी माणसाच्या माणूसपणाचे सत्य बाहेर आणणार होती ...

नित्या सात - आठ दिवस वेदनेने ओरडत होती ..बेडवर पडलेली असताना तिला उठण होत नव्हतं ..मृन्मय सुद्धा ते सर्व पाहत होता ..त्याचा आईला कळून चुकलं होत की बाळ होण्याची वेळ आली आहे पण डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे ती जेवढं सहन करेल तेव्हढाच फायदा होईल म्हणून बाळ होण्याची वेळ आल्यावरही त्यांनी आणखी एक दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला। .अर्थातच त्याला विरोध करणार कुणी नव्हतं ..नित्या वेदनेने तडफडत होती ..तो 9 वा दिवस होता ..रात्र झाली होती ..नित्याला वेदना असह्य होऊ लागल्या त्यामुळे बेडवर स्वतःवरच राग काढत होती ..तिने स्वतःला काही करून घेऊ नये म्हणून सर्वांनी तिला पकडून ठेवलं होतं ..इतक्या जवळ असतानाही तिचे अश्रू तिची तडफड कुणाला जाणवत नव्हती ..उलट सर्व लोक काही होतच नाहीये अस वर्तन करीज आपल्याच धुंदीत वावरत होते ..नित्याने आतापर्यन्त खूप परीक्षा दिली होती पण आता हे सहन करन तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ लागलं ..नित्याने खूप वेळ त्याला हॉस्पिटल घेऊन जाण्याची विनंती केली होती पण त्याला पाझर फुटत नव्हता ..तो आईला काही विचारायला गेला की आईच एकच म्हणणं असायचं , " मी देखील तीन मुलांना जन्म दिला आहे तेव्हा मला नको सांगू काय करायचं आहे तर ..मी सांगतेय तेच कर .."

मुळात त्या स्त्रीने तीन मूल जन्माला दिल्यावरही नित्याला होणाऱ्या वेदना त्यांना कळत नव्हत्या हे बघून नित्याचे डोळे आणखीच पाणावले ..नित्या काही क्षणातच आपली संपूर्ण ताकद लावून बेडवरून उठली ..मृन्मय जिथे बसून होता तिथे गेली ..तिला खाली वाकता येत नव्हतं तरीही त्याचे पाय पकडत म्हणाली , " मृन्मय आता माझी सहन करण्याची शक्ती संपली ..तुला खरच माझ्या वेदना दिसत नाही आहेत का ? आणि दिसत नसतील तर तू स्वतःच मारून टाक ..आणि नसेल जमणार तर मला घेऊन चल ..नाही तर कदाचित मी इथेच माझा प्राण सोडेल .."

नित्या त्याच्या पायाला पकडून होती ..तिची अवस्था फारच खराब झाली होती ..डोळ्यांची उघडझाप सुरू होती तर चेहरा घामाघूम झाला होता ..तर वेदना सोबत होत्याच ..तिला अस पाहून मृन्मयदेखील फार घाबरला आणि शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला त्यांनी सहमती दिली ..

रात्रीचे 12 वाजले होते ..मृन्मयदेखील नित्याला काही होऊ नये म्हणून घाबरला होता आणि पळतच घराबाहेर पडला ..12 वाजले असल्याने बाहेर फार रिक्षा दिसत नव्हत्या ..त्यामुळे धावत धावत तो समोर पोहोचला ..साधारणतः 10 मिनिटे वाट पाहिल्यावर एक रिक्षा चालक यायला तयार झाला ..रिक्षा मिळताच तो घरी परत आला ..तिच्यासोबत सासूबाई येणार होत्या त्यामुळे थोडं फार लागणार सामान त्यांनी आधीच भरून ठेवलं होतं ..खालून मृन्मयचा आवाज येताच त्याची ताई आणि आई नित्याला पकडून खाली घेऊन येऊ लागले ..सोसायटीत नक्की काय चालल म्हणून बाजूची मंडळी त्यांना टक लावून पाहत होती ..त्यांना नित्याचा स्थितीवर चिंता होत होती तर नित्या आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती ..त्या दोघीनी कसतरी सावरत तिला खाली आणले ..मृन्मयने तिला काळजीपूर्वक रिक्षात घेतले आणि रिक्षा हॉस्पिटलकडे जाऊ लागली ..रिक्षामध्ये नित्या मधात तर एका बाजूला सासूबाई आणि दुसऱ्या बाजूला मृन्मय बसला होता ..आतापर्यंत वेदनेने विव्हळणारी नित्या मरणोसुन्न दिसू लागली ..डोळ्यांची फक्त उघडझाप सुरू होती तर नित्याला काही होत की काय म्हणून दोघेही चिंतेत होते ..मृन्मयने घरून निघताच डॉक्टरांना ऑपरेशनची तयारी करायला सांगितली होती त्यामुळे डॉक्टर तिथे वाट पाहत बसले होते ..तर नित्यासाठी हा प्रवास जीवघेणा ठरत होता ..जर लवकर ऑपरेशन झालं नाही तर नित्या जग सोडून जाईल याबद्दल डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं आणि डॉक्टर त्यांना ओरडत पण असल्याने मृन्मयला जास्तच भीती वाटू लागली ..त्यामुळे तो मनातून फारच घाबरला होता ..मधातच तो रिक्षा फास्ट चालवा म्हणून चालकावर ओरडत होता ..तर मधातच नित्या डोळे मिटत जाई आणि मधातच जोराने ओरडायला लागायची ....एक एक सेकंद तासासारखा वाटत होता ..शेवटी रिक्षा हॉस्पिटलसमोर पोहोचली ..वॉर्डबॉयने बाहेर स्ट्रेचर आणलं आणि नित्याला ऑपरेशन थेटर मध्ये नेण्यात आल पण डॉक्टर त्यांच्यावर ओरडण्याचे विसरले नव्हते ..कारण केवळ त्यांच्यामुळे आणि फक्त त्यांच्यामुळे नित्याचा जीव धोक्यात आला होता ..डॉक्टर दोघांनाही रागाने बघत ऑपरेशन रूम मध्ये पोहोचले ..तर सासूबाई आणि मृन्मय आतमध्ये काय होत आहे याकडे बारकाईने लक्ष देऊ लागल्या ..

क्रमशः ...