Sparsh - Anokhe roop hai - 3 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 3 )

अजब दस्तुर है दुनिया का
जो जमाणे से परे है
बेटी का हर गुनाह माफ है
बहु की गलती भी गुनाह है

नित्या रात्रीचा स्वयंपाक आवरून एकटीच बसली होती ..खर तर तिला खूप भूक लागली होती पण मृन्मयच्या आधी जेवण करणं तिच्या सासूबाईंना पटलं नसत त्यामुळे ती पोटावर हात धरत त्याची वाट पाहू लागली ..रात्रीचे सुमारे 11 वाजले होते जेव्हा दारावर थाप पडली ..त्याचे आई बाबा बाहेर इतरांशी गप्पा मारत बसले होते ..नित्याने धावत जाऊन दार उघडले ..मृन्मय अगदीच तिच्या समोर उभा होता आणि चेहऱ्यावर होत ते हसू ..त्याने रूम मध्ये यायला पाऊल टाकले आणि लगेच अडखळला ..त्याचा पाय अडकला असेल म्हणून नित्याने त्याचा हात धरून उभे केले परंतु त्याच्या जवळ जाताच तिच्या लक्षात आलं की मृन्मय ड्रिंक करून आला आहे ..मुळात तिला लग्नाआधी याबाबत कुणीही कल्पना दिली नव्हती त्यामुळे तीच डोकं आणखीच भडकल होत ..ती रागाच्या भरात म्हणाली , " म्हणजे तुला हाही शौक आहे तर ? " ..तिने बोलावं आणि त्याच उत्तर येणार नाही हे शक्यच नव्हतं ..तो तिच्यावर ओरडत म्हणाला , " तुझ्या बापाची पितो की काय ? ..माझे पैसे आहेत मला जे वाटत ते करीन ..तू कोण मला बोलणारी आणि जास्त बोलायच काम नाही जे मिळत त्यात खुश राहा ..चल उगाच चढू नको माझ्यावर ..जेवायला वाढ ..भरपूर भूक लागली आहे .."

तो खूप नशेत होता त्यामुळे त्याला आता काहीही बोलून फायदा नव्हता ..तिने त्याला आतमध्ये घेतलं आणि दोघांसाठीही जेवण वाढलं ..जेवण करतानाही तो तिच्याकडे बघून हसत होता तर नित्याला तो दारूचा वास सहन होत नव्हता ..नाकावर हात ठेवत ती कसतरी जेवण करत होती ..काहीच वेळात जेवण झालं आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला ..त्यानेही भरपूर प्रमाणात ड्रिंक घेतली असल्याने बाजूला जाऊन पडला ..आईबाबा गप्पा मारून घरी परतले आणि झोपी पण गेले होते ..

साधारणतः रात्रीचा 1 वाजला होता ..मृन्मय दारू पिऊन आल्याने आजची रात्र तरी तिला त्रास होणार नाही या विचाराने ती शांतचित्ताने झोपी गेली होती ...तिला झोप लागलीच होती की पुन्हा मृन्मयने तिला हलवलं ..आणि यावेळी ती त्याचा स्पर्श होताच जागी झाली ..तो तिला इशाऱ्याने काहीतरी सांगत होता ।.मुळात तिला घरच्यांसमोर अस उठून जाण बर वाटत नव्हतं पण त्याने तिचा हात पकडून बाजूला नेलं आणि तिला काहिही करता आलं नाही .।मृन्मय चाळीतल्या एका छोट्या घरात राहत होता ..जिथे सर्व कुटुंब एकाच रूममध्ये राहत होते त्यामुळे कुणालाही आपले खासजी क्षण जगायचे असतील तर थोडी फार जागा असलेल्या किचनमध्ये जावं लागतं असे ..मृन्मय देखील तिला हळूच किचनमध्ये घेऊन गेला ..किचनच हळूच दार लावून त्याने तिच्यावर ताबा मिळविला ..या दोन दिवसात तिची काय अवस्था झाली होती याकडे त्याने जरासुद्धा लक्ष दिलं नव्हतं तर गेले 30 वर्ष ज्या स्पर्शापासून तो दूर होता तो स्पर्श तो मनभरून जगून घेत होता ..हे सर्व जगत असताना त्याला तिच्या वागण्याच काही घेणं देणं नव्हतं ..तिला आत नेताच तो तिच्यावर स्वार झाला ..एक तर थकवा आणि दुसरा त्याच्या तोंडून येणारा दारूचा वास यामुळे तिला तो नकोसा झाला होता त्यामुळे तिने आपला चेहरा बाजूला केला पण त्याला तेही नको होतं ..त्याने तिचा चेहरा स्वतःकडे केला आणि त्याला होणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर शोधू लागला ..पण त्याक्षणी तरी तो आनंद तिच्या चेहऱ्यावर येणार नव्हता ..ती आपल्यासारखी आनंदी का नाही म्हणून तो जितकं कठोर होईल तितकं तिच्या शरीराशी खेळ करू लागला ..तिला हे सर्व असह्य झालं होतं तरीही पुढचे काही मिनिट ते तिला सहन कराव लागणारच होत ..काही क्षण असेच गेले आणि तो तिच्यापासून दूर झाला ..तर नित्या स्वतःला आवरत पुन्हा आपली निद्रा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली ..त्या रात्री तिला हे नक्कीच पटलं होत की आपण काहीही केलं तर हे सर्व आयुष्यभर सोसायचा आहे तेव्हा आता जे नशिबात असेल ते भोगायला तयार राहू ..

त्या दिवसानंतर तिच्या आयुष्याचा एक दिनक्रम ठरला ..रात्री उशिरापर्यंत तो तिच्यावर स्वार व्हायचा आणि मग उठायला उशीर व्हायचा ..तर सासूबाईंचा ओरडा खान आता हे रोजच होऊ लागलं ..तीही सुरुवातीला त्याच टेन्शन घ्यायची पण आता रोजच घडू लागल्याने तीही त्याकडे दुर्लक्ष करू लागली ..मृन्मयच ते वागणं तर ती सहन करून घेत होती पण सासूबाईच वागणं मात्र तिला फार विचित्र वाटायचं आणि त्याचा त्रासही व्हायचा ..अगदी सुरुवातीच्या दिवसातच तिला सासुरवास सहन करावा लागला होता ..सासुरवास फक्त सासूबाईंचाच होता असे नाही तर बाजूला असलेल्या त्यांच्या मुलीचा देखील होता ..त्यांची मुलगी सर्व काम झाले की आईच्या घरी येउन बसायची आणि त्यांचं सर्व करता - करता नित्याच्या नाकी नऊ यायचे ...कुणाचाही पाहुणचार असला की नित्याला दिवसरात्र किचनमध्ये राबाव लागायच आणि एवढं करून देखील तिला उलटेच बोल सहन करावे लागायचे ..कधी कधी नित्याला प्रश्न पडून जायचा की एक आई आपल्या मुलीच्या सर्व चुका माफ करते ..आणि तिला पुन्हा नव्याने त्याच गोष्टी शिकविते तर मग नवीन आलेल्या सुनेसोबत तेच वर्तन का केल्या जात नाही ? ..तीही कुणाची तरी मुलगी असतेच ..तिलाही तेवढच प्रेम दिलं तर ती स्वतःला त्यांच्यासाठी अर्पण करायला मागे पाहणार नाही हे त्या विसरूनच जातात ..विचार येताच ती स्वतःवर हसली कारण हे सत्य माहिती असतानाही कुठलीही सासू आजपर्यंत बदलली नाही .. ही पूर्वापारपासून आलेली प्रथा आहे जी तिची सासू देखील सांभाळत होती शेवटी तिच्या सासूलाही भीती असेलच की हिने जर आपल्या मुलावर ताबा मिळविला तर मग माझा या घरावरचा हक्क नाहीसा होईल .हो पण त्यासाठी एवढ्या खालच्या थराला स्त्री जाऊ शकते याच एक स्वतः स्त्री असल्याने नित्याला वाईट वाटत होतं ..हे सर्व घडत होतं आणि नित्या मुकाट्याने सहन करत होती ..कधी कधी नित्याला मृन्मयचा खूप राग यायचा ..ज्या मुलीला त्याने सात जन्मासाठी सोबत आणलं होतं तिची बाजू घेणे तर दूरच पण साधी तिची आठ्वन सुद्धा यायची नाही ..आई तिच्याशी चुकीच वागते हे पाहून सुद्धा तो तिच्या विरुद्ध काहीच बोलत नाही हे पाहून नित्याला खूप राग यायच्या ..या क्षणानंतर तिने तर त्याच्याकडून अपेक्षासुद्धा सोडून दिल्या होत्या ..आणि जशा सर्व स्त्रीया सहन करतात तेच सर्व सहन करत तिने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला ..

हळूहळू आयुष्य वेग घेऊ लागल ..तिनेही इतर स्त्रियांप्रमाणे भारतीय स्त्रियांचा वारसा जपला आणि सर्व काही शांतपणे सहन करू लागली ..नित्या आता अस एक शरीर बनली होती जिला मन नव्हतं ..फक्त जो तो तिचा उपभोग घेऊ पाहत होता ..तिनेही स्वतःशी तक्रार करणं सोडून दिलं त्यामुळे आपल्यासोबत काही चुकीच घडत आहे असं तिला वाटतसुद्धा नव्हतं ..पण मृण्मयच्या अत्याचारात काहीच घट झाली नव्हती ..तिला आनंदी ठेवण म्हणजे फक्त तो तिच्या शरीराला आनंदी ठेवणे समजत होता आणि नित्यानेही तो आपल्याला समजून घेईल ही आशा सोडून दिली ..ती जगत होती बेजाण शरीर बनून ...

नित्याच्या लग्नाला आता दोन महिने पूर्ण झाले होते ..आज मृण्मयच्या ऑफिसला सुट्टी असल्याने तो घरीच होता ..रात्रभर आनंद लुटल्यावर तो काही लवकर उठणार नव्हता ..त्यामुळे आज त्याला उठायला 10 वाजले होते ..आज खूप दिवसानंतर नित्या आरामशीर स्वयंपाक बनवत होती ..कारण तिला त्याचा टिफिन करावयाचा नव्हता ..मृन्मय फ्रेश होऊन पून्हा किचनमध्ये आला आणि पुन्हा त्याच स्टाइलमध्ये नितंबाला स्पर्श ..तिला तो अस वागताना फार राग यायचा पण यावेळी तिने शांत राहूनच त्याचा हात बाजूला सारला ..तो मात्र किंचित हसला..तिची खेचायला त्याला फार गंमत वाटत होती ..त्याने लवकर किचनमधून निघावं म्हणून नित्याने त्याला चहा दिला ..शिवाय आईचा आवाज आल्याने किचनमधून धूम ठोकत टीव्हीसमोर जाऊन बसला ..नित्याची भात आणि भाजी बनवून झाली होती तर आता चपात्या बनवायच्या कामाला ती लागली ..बाबा आधीच कुठेतरी बाहेर गेले होते तर आई मागून येत म्हणाली , " बेटा मृन्मय मी जरा बाहेर जाऊन येते ..तू लवकर जेवून घे ..रोज काम करून फार थकतोस ना ..आज पूर्ण दिवस आराम कर .." आणि एवढं बोलून ती बाहेर निघून गेली ..चोराच्या मनात चांदन त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं ..त्याने लगेच चहा संपवला आणि आई चाळीच्या दूर जात नाही तोपर्यंत तो तिच्याकडे लक्ष देऊन होता ..काही वेळाने आई दिसेनाशी झाली आणि मृन्मयने घराचं दार आतून बंद केलं ..काहीच वेळात किचनमध्ये येऊन त्याने किचनची खिडकी बंद करून घेतली ..नित्या चपात्या लाटत असतानाच त्याने गॅस बंद केली .नित्याला त्याचे इरादे कळून चुकले होते आणि ती म्हणाली , " मृन्मय प्लिज आता नको ना !!.आई परत येतील तेव्हा त्यांना स्वयंपाक पूर्ण झालेला दिसला नाही तर रागावतील रे माझ्यावर!! ..नंतर करूया ना प्लिज !! " ..मिळालेली संधी सोडणाऱ्यातला तो मुळीच नव्हता त्यामुळे शंभरदा आर्जव करून देखील त्याने तीच काहीही एकल नव्हतं आणि तिला पालथं घालून तो तिथेच सुरू झाला ..नित्याला कधी कधी प्रश्न पडायचे की आपल्याला या घरात नक्की काय स्थान आहे ..कारण इथे शरीर माझं असलं तरीही वर्चस्व गाजवणारे वेगळेच आहेत .का एखादी स्त्री उठून याविरुद्ध आवाज उठवू शकत नाही ..की त्यांना या बंदिस्त वातावरणाची सवय झाली आहे अगदी माझ्यासारखी ..ती त्याही क्षणी फक्त विचारच करत असायची जेव्हा की तिला ते क्षण आनंद द्यायला हवे असायचे ..तो अर्धा तास तिला हवं त्या पद्धतीने वापरत होता आणि नंतर बाजूला झाला .काहीच वेळात खिडकी दरवाजे उघडले गेले आणि सासूबाईच पदार्पण झालं ..नित्याच अजूनही आवरलं नाही हे पाहून त्या तिच्यावर ओरडल्याच आणि ती सर्व शांतपणे सहन करू लागली ..मुळात उशीर व्हायला कारण हा मृन्मय होता पण आई तिच्यावर ओरडताना तो आईला एक शब्द देखील उलटून बोलला होता ..अशा वेळी तिला वाटायचं की त्याने आपली बाजू घ्यावी पण अस कधीच झालं नव्हतं ..

सर्वांचे जेवण आटोपले होते ..तशी पाण्याची सोय घरात होती पण कधीकधी जास्त पाणी लागलं की तिला खाली आणायला जावं लागत असे ..आजही प्यायचं पाणी जास्त लागणार असल्याने ती खाली आणायला गेली होती ..ती घरातून खाली जाताना प्रत्येक स्त्री तिच्याकडे बघून हसत होती ..तिला सुरुवातीला ते लक्षात आलं नाही पण जेव्हा खाली गेली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसलं तेव्हा तिला जाणवलं की आज घराचे दार खिडक्या बंद होते त्यामुळे ह्या सर्व माझ्यावर हसत आहेत ..तिला ते सर्व नकोस झालं होतं ..त्यांच्या चेहऱ्यालाही ती तोंड देऊ शकत नव्हती ..तिला वाटलं की नको हे पाणी पण मला आता हे सहन होणार नाही पण वर जेव्हा सासूबाईकडे नजर गेली तेव्हा मात्र त्याही अवस्थेत नाईलाजाने तिला पाणी भराव लागलं ..तो क्षण देखील खूप काही सांगत होता ..या दोन महिन्यात नित्या एकदाही हसली नव्हती आणि तिने सहनही खूप काही केलं होतं ..मृन्मय शरीराला कुठेही , केव्हाही स्पर्श करायचा हे तिने स्वीकारलं होत एवढं काय काम करत असताना तो तिला उचलून न्यायचा हेदेखील तिने स्वीकारलं पण आज जे घडलं होत त्याने तिचा आत्माच खचला होता..तिला मृन्मयला सांगायचं होत की तु हवं तसा उपभोग घे पण अस जगासमोर नको रे !! ..शेवटी मलाही भावना आहेत ..पण सध्या तरी ते शब्द तिच्या तोंडातच राहिले ..त्या दिवसानंतर ती त्याला त्याबद्दल बोलली होती पण तो म्हणाला , " सर्व विधिविधान करून मी तुला लग्न करून आणलं आहे ..तेव्हा आमच्या घरात आम्ही काहीही करो त्यांना काय घेणं देणं .." नित्याने त्यावेळी स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेतला आणि जे मिळेल ते सहन करू लागली ..तिला आशा होती की कधीतरी हेही दिवस जातील ..

आणखी काही दिवस गेले ..सर्व सोबती असतानादेखील नित्या एकटी पडत चालली होती ..तिचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क उरला नाही ..आणि ती त्या चार भिंतीत कैद झाली ..आज नित्या सर्व काम आवरून बेडवर पडली होती ।.घरात कुणीच नव्हतं त्यामुळे ती शांती तिला सुखद आनंद देत होती ..त्याच क्षणी तिच्या सेलफोनवर एक कॉल आला ..फोनवर अनुचे नाव बघताच तिचा चेहरा खुलला ..तिने लगेच फोन स्वीकारला ..तर समोरून अनु म्हणाली , " हाय मेरी जाण ..जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून मला विसरूनच गेली ..एक वेळ होती की जेव्हा माझ्याविना राहत नव्हतीस ..विसरलीस ना मला नवरा भेटला तेव्हापासून .."

तर नित्या तिला थांबवत म्हणाली ," नाही ग तुला विसरन शक्य तरी आहे का ..हा पण घरात ऍडजस्ट करताना थोडा वेळ लागतो म्हणून शक्य झालं नाही .."

अनु आज थोडी मस्तीच्या मूड मध्ये होती आणि तिला म्हणाली , " बर बर ...पण हनिमून वगैरे घेऊन गेले नाही का जीजू तुला ?..गेलेच असतील म्हणा !!.मज्जाही केली असशील खूप .."

नित्या आता रूममध्ये एकटीच जोर्याने हसू लागली ..काही वेळ हसल्यावर स्वतःला सावरत ती पुन्हा म्हणाली , " मेरी जाण !! ..हनिमूनला जाऊन पैसे कशाला खर्च करायचे ..हनिमूनमध्ये जे करतात ते सर्व घरीच तर होत आणि त्यांना वाटत तितक्या वेळ होत ..मग कशाला बर पैसे खर्च करायचे ? "

हसता हसता नित्याचे डोळे अश्रूने भरले आणि आज कितीतरी दिवसांनी ती मनमोकळं रडली ..अनुने तिला रडण्याच कारण विचारलं तेव्हा नित्याने सर्व काही तिला सांगून टाकल ..ते सर्व ऐकल्यावर अनुला तर शॉकच बसला होता ..तिलाही काय बोलावं नि काय नाही ते सुचत नव्हतं ..तीही स्वतःची अश्रू सावरत म्हणाली , " नित्या मग हे सर्व किती दिवस चालणार ..आयुष्यभर सहन करणार आहेस का तू ? "

आणि नित्या हळुवार आवाजात म्हणाली , " बघूया ग जोपर्यंत शक्य होईल ..जोपर्यंत सहन करण्याची मर्यादा आहे तोपर्यंत सहन करेन आणि नाहीच झालं तर .."

अनु तिचे शब्द मधातच तोडत म्हणाली , " नाहीच झालं तर ? "

आणि नित्या जोराने हसत म्हणाली , " मेरी जाण तुला माहिती आहे त्याच उत्तर .."

अनुने फोन ठेवला . तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती ...तिला नित्याचे शब्द खूपच घाव देऊन गेले होते त्यामुळे तिची फार काळजी वाटत होती ..आणि शेवटी तिच्या लक्षात राहून गेले ते नित्याचे शब्द .." डिअर तुला त्याच उत्तर माहिती आहे ....प्रत्येक स्त्रीला समाजाने दोनच पर्याय दिले की सहन करत जगणं की शेवटचा पर्याय ......? "

क्रमशः ...

( जर या कथेमुळे कुणाला कळत नकळत त्रास झाला अस तर सर्वप्रथम माफी मागतो ..कथेचा विषय फार नाजूक आहे हे लक्षात आलंच असेल ..पण पूर्ण संपूर्ण कथेत हा विषय नसेल .सुरुवातीचे चार - पाच भाग मी मुद्दामच यावर लिहित आहे त्यानंतर कथा आणखी रोमांचक होत जाईल ..आणि एक स्त्री प्रामाणिक असताना देखील तिला हा समाज कसा ट्रीट करतो याबद्दल ही कथा भाष्य करेल ..)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED