कादंबरी- जिवलगा . भाग -३७ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा . भाग -३७ वा

कादंबरी – जिवलगा

भाग -३७ वा

-------------------------------------------------------

ट्रेनमध्ये हेमू प्रवास करीत होता हे खरे ..पण..त्याचे मन, ते तर कधीच विचारात बुडून गेले

होते ..की उद्या शनिवार ..आणि मग रविवारी काय काय घडणार आहे कुणास ठाऊक ?

मामा एखादेवेळी ..समजून घेईल सुद्धा ..

पण.मामी .तिला जेव्हा आपली लव्ह-स्टोरी कळेल

आणि तिने पसंत करून ठेवलेल्या मुलीला नकार मिळणार आहे हे जेव्हा जाणवेल ..

त्यानंतर जे काही होईल ..त्यातून फक्त ..गोंधळ आणि गोंधळ ,

नात्यामधले तणाव वाढणे , आणि गैरसमजाने एकमेकात धुसफूस होणार ..

हेमुने आपण ठरवलेल्या पोरीला नकार दिलाय “

ही गोष्ट मामी स्वतःचा मोठा अपमान झाला आहे “ही भावना मनात खोलवर धरून ठेवणार .

हे तर नक्कीच ..होणार आणि त्याचा हा राग ती किती दिवस

आपल्या मामावर आणि आपल्या आईवर धरून ठेवील ..याचा काही अंदाज करणे शक्य नव्हते .

हेमुला आज राहून राहून ..त्या दिवशी आपल्या मामाला सांगून बसलोत ..की -तुम्ही पोरगी पसंत करून

ठेवा ..मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये.

आपली हेकेखोर मामी ..आता याच शब्दात आपल्याला पकडून ठेवणार आहे ..

एक गोष्ट नक्की ..की यातून हेमुची सुटका सहजपणे होणे ..खूप मोठे अवघड काम आहे.

हे झाले मामा आणि मामीचे ...

पण आपल्या आई-बाबंना आपण परस्पर असे ठरवले आहे “हे आवडेल कि नाही ?

हा प्रश्न पण भेडसावणारा आहेच ...

शेवटी हेमू आपल्याच मनाला धीर देत म्हणाला –

आता कसचा विचार करायचा नाही..

ज्यावेळी .समोरासमोर जे घडेल ..त्याला त्या त्या वेळी सामोरे जात प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा .

उगीच ..हे होईल का , ते होईल का ?,असे झाले तर ?

तसे नाही झाले तर ? अशा काल्पनिक भीतीने स्वतःच्या मनाला घाबरवून टाकायचे नाही.

असे ठरवल्यावर ..हेमूच्या मनाला धीर आला .. सकाळी दहा वाजता ..त्याची ट्रेन पोंचणार होती ..

त्याने एकदा घड्याळात पाहिले ..मध्यरात्रीचे अडीच वाजत आले होते ..

अजून सात-आठ तास प्रवास शिल्लक होता ..ट्रेनच्या स्पीडच्या तालावर बर्थ झुलत होत्या ..त्या लयीत

त्याला कधी तरी झोप लागली .

इकडे ..

नेहाच्या रूमवर रोजच्या वेळेला सकाळ झालेली होती ..तिघी पहिला चहा घेत होत्या ,

पेपर आलेला होता ..त्यातली पाने वाटून घेत..बातम्या वाचीत वाचीत चहा घेणे सुरु होते .आणि

अनिताचा मोबिल सकाळी सकाळी वाजतो आहे, हे लक्षात आले ..

इतक्या सकाळी अनिताला कुणाचा फोन ?

सोनियांनी मोबिल स्क्रीनवर नावे वाचले ..रोहन ..आणि म्हटले ..

उठा ,तयार व्हा आणि पळा लगेच ..

तुझ्या हीरोला आठवण होते आहे ..शनिवार –रविवार ..तू आमच्यात नसणार .

..जा मुली जा ..

अनिताने सोनियाच्या बोलण्याकडे फक्त हसून पाहिले ..आणि बेडरूम मध्ये जाऊन कॉल घेत

बोलत बसली ..तिचे बोलणे लवकर आटोपणारे नाह्ये ..हे लक्षात घेत ..सोनिया म्हणाली ..

नेहा .आता दोन दिवस तू आणि मी ..आपणच आपली करमणूक करून घेऊ या ..

भटकंती करू या ..बाहेरच जेवण ..वगरे ..उगीच रूम वर बोर होत बसण्यपेक्षा .बाहेर मन

रमेल तरी ..

सोनियाच्या बोलण्यात ..खूप उदासी जाणवते आहे ..असे वाटून नेहा म्हणाली ..

काय ग , तुझा मूड कशाने गेलाय आता ?

आठवण येते आहे का तुला तुझ्या शैलेशची ?

यावर सोनिया म्हणाली ..मला त्याची आठवण येत नाहीये ..उलट त्यचे नाव काढले तरी

नुसता संताप होतो माझ्या मनाचा .

मला आठवण होते ..माझ्या पिल्लूची ..राजू ची .. बापाच्या आडमुठेपणामुले आईच्या प्रेमाला

पारखा होऊन बसलाय माझा मुलगा . माय –लेकराची ताटातूट करून शैलेशला काय समाधान

मिळतंय ? ते त्यालाच माहित .

स्वतः त्या बाईच्या प्रेमात आंधळा होऊन बसलाय ..आणि माझ्या पोराची विनाकरण फरफट होते आहे .

देव करो नि या शैलेशला अशी शिक्षा घडो की ..जन्माची अद्दल घडली पाहिजे .

नेहा तिची समजूत घालीत म्हणाली ..

सोनिया – शैलेशला त्याच्या अपराधाची शिक्षा नक्कीच मिळेल . तू तुझ्या तोंडाने असे शिव्या –शाप

कशाला देतेस त्याला ..त्याला काही झाले तर त्याचा फटका ..तुझ्या पिल्लूला ..राजूला बसणार आहे “,

हे तू कसे विसरतेस ?

हे ऐकून सोनिया म्हणाली ..

नेहा , खरेच की ग , तुझे बोलणे एकदम करेक्ट आहे. आता नाही असे बोलणार परत कधी.

अनिताचे बोलणे संपले असावे ..ती या दोघींच्या समोर बसत म्हणाली ..

बाय सोनिया , बाय नेहा ..

दो दिन ..मी तो चली ..मेरे पिया की गली ..

पण, रात्री येणार नेहमी प्रमाणे ..तेव्हा दरवाजा उघडा बरे का ..

अनिता रोहनला भेटण्यासाठी किती अधीर झालेली असते.हे नेहा आणि सोनिया पाहत होत्या ..

त्या पण बाहेर फिरून येण्याच्या तयारीला लागल्या ..

आता तिघी जणींची भेट ..रात्रीच होणार होती ...

इकडे ...

हेमुची ट्रेन अपने निर्धारित समय पार स्टेशनवर पोंचली होती . बाहेर पडल्य्वर रिक्षा करून

हेमू बस स्टेशनवर आला ..तिथून १ तास प्रवास केला कि हेमूच्या आई-बाबांचे गाव .

बस स्टेशनवर खूप गर्दी होती ..आणि आता इकडच्या भागात देखील कार –टैक्सी सुरु झाल्या होत्या .

त्यामुळे हेमूने एक टैक्सी बुक केली आणि तो निघाला . बसपेक्षा कार फास्ट पोंचली सुद्धा .

हेमुचे आई-बाबा त्याची वाट पहात होते.

यावेळी बरेच दिवसांनी हेमू गावाकडे आलेला होता ,आणि त्याच्या येण्याचे कारण तसेच महत्वाचे

आणि आनंदाचे होते ..

घरात येऊन स्थिर-स्थावर होऊन बसल्यावर ..तिघांचे बोलणे सुरु झाले.

हेमूने विचारले .. मामा –मामी उद्या कधी आणि कसे येणार आहेत ? काही निरोप आला असेल ना ?

बाबा म्हणाले – मामानी इतक्या घाईत हा कार्यक्रम ठरवलाय की.विचारू नको ..

तुझ्या एकाही बहिणीला कळवता आले नाही ..काय वाटेल त्यांना उद्या कार्यक्रम झाला असे माहिती

झाल्यावर ?

बाबांचे म्हणणे एकदम बरोबर होते – हेमू म्हणाला

हो ना , त्यांना नक्कीच वाईट वाटेल ..की,हेमूचा कार्यक्रम आणि आम्ही गैरहजर ..! असे कसे ठरवले ?

हे ऐकून आई म्हणाली –

हेमू ..हा कार्यक्रम ठरवण्याचा सगळा खटाटोप तुझ्या मामीचा आहे.. आणि तिने जे ठरवले

ते झालेच पाहिजे

मामीचा ..हा स्वभाव ,तिचा हट्ट आणि हेका ..सगळ्यांना माहिती आहे. एरव्ही गोष्ट वेगळी ..

पण, तुझ्यासाठी मुलगी पसंत केलीय तिने ..मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना ,सोबत पाहुण्यांना

घेऊन येण्याची जबाबदारी घेतलीय तिने ..

मला फोन केल्यावर म्हणाली ..

तुमच्याच मुलासाठी खटपट करते आहे बरे का नणंदबाई ..!

लाखात एक मुलगी आणते आहे तुमच्या मुलासाठी ...माझ्याच नात्यातली आहे..

अगदी डोळे मिटून ..जुळवावी सोयरिक ..!

मुलीला पाहिल्यावर ..हेमू तिला नाही म्हणणार नाही ..

कारण त्याने त्याच्या मामला शब्द दिलाय ..तुम्ही पसंत केलेली मुलगी ..

मी शब्दा बाहेर नाही तुमच्या .

आणि मी त्याची मामी ..अशी तशी पोरगी कशी आणेल बरे ..माझ्या भाच्यासाठी ?

आईचे बोलणे ऐकून..हेमुला त्या दिवशी मामाला दिलेल्या शब्दाचा राहून राहून पश्चाताप होत होता .

त्या बोलण्याचे इतके भयंकर परिणाम होणार ..याची कल्पना असती तर ..

आपण नक्कीच बोलून बसलो नसतो ..

पण..त्या दिवशी असे बोलताना ..नेहा समोर बसलेली असतांना .असे बोललो म्हणून तर

नेहाने ..आपल्या प्रेमाचा स्वीकार केला ,आणि तिचे प्रेम आपल्याला मिळाले ..

असे केले नसते तर ..अजून ही आपण नेहाच्या प्रेमात झुरत बसलो असतो.

हेमुचे बाबा ..म्हणाले –

हे पहा ..हेमूच्या आई ..

तुमच्या भावाने आणि भावजयीने जे काही ठरवले .आहे ..त्याप्रमाणे सगळे काही ठरल्या प्रमाणे

रीतसर होऊ द्या , हेमूने मामला शब्द दिलाय हे ठीक ..पण, म्हणून काही ..तो त्याचा अंतिम

निर्णय असू शकत नाही. मुलगी पाहून ..तिला भेटून –बोलून ..मगच पुढचे ठरवता येते ना .

आता आपण शांतपणाने काय काय होईल, कसे कसे होईल ? हे पहात राहू.

आणि सगळे काही होण्या अगोदरच मामा आणि मामीला काही बोलून दाखवणे घाईचे होईल ,

आणि आता तर मामा-मामी दोघे ही काही ऐकून घेण्याच्या मन स्थितीत नसणार , मग ,

आपण बोलून गोंधळात भर कशाला टाकयची ?

बाबांचे सांगणे ..आईला आणि हेमू दोघांना पटले . शांतपणे वागणेच या वेळी योग्य आहे “

असे हेमुचे मन त्याला सारख्या सुचना देऊ लागले .

चहा-पाणी चालू होते ..त्याच वेळी ..बाबांचा मोबाईल वाजला ..

नंबर आणि नाव वाचीत ते हेमूच्या आईला म्हनाले –

आलच बघा तुमच्या भावजयीचा फोन – बोला आता तुम्हीच ..

हेमूच्या आईच्या कानावर मामीचा आवाज नव्हता ..तर हेमूचा मामा सांगू लागला ..

अक्का ..उद्याचे पाहुणे .आणि त्यांच्या कार्यक्रमात थोडा बदल झालाय ..आम्ही सगळे उद्या

सकाळी येणार होतो ना ,

त्या ऐवजी ..पाव्हणे दुपारी येतील तुमच्याकडे ..म्हणजे ..लगेच कार्यक्रम करून संध्याकाळी

वापस ..असे ठरलाय पाव्ह्न्याच .

आता त्यांचा निरोप आला , ऐकून लगेच तुम्हाला फोन लावलाय.

आता बाकी निवांत चालू द्या .

आणि ..हेमू आला असेल न सकाळी ?

त्याला सांग .. मी आजच येतोय म्हणव मुक्काम्ला तुमच्याकडे.

त्याची मामी ..येईल पाव्ह्ण्यासोबत .

मामाचे बोलणे आईने जसेच्या तसे ..हेमूच्या कानावर घातले .

हेमू मनात म्हणाला .. अरे वा .कहाणी मी twist ?

हे तर फारच छान झाले .. उद्या संध्याकाळ पर्यंतचा बहुमोल वेळ आहे आपल्या हातात .

एकट्या मामाचे आजच येणे “हा आपल्यासाठी खूप मोठा शुभ शकून आहे “..असेच हेमुला

राहून राहून वाटत होते ..

आपल्या मनाला अचानक खूप प्रसन्न वाटत आहे , हलके हलके आणि आनंदित वाटते आहे,

असे हेमुला वाटत होते .

तो आतुरतेने ..मामच्या येण्याची वाट पाहू लागला ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी- पुढच्या भागात ..

भाग – ३८ वा लवकरच येतो आहे

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------