Julale premache naate - 80 books and stories free download online pdf in Marathi

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८०।।

आम्ही बोलत असताना आम्हाला राज चे खूप सारे फ्रेंड्स दिसले जे बाहेरून खास त्याच्या बर्थडेसाठी भारतात आले होते.. एका मोठया टेबलावर ते सगळे आणि राज बसला होता. अचानक तो उठुन आमच्याकडे आला आणि आम्हा दोघांना त्याने त्याच्या सोबत बसायला सांगितले.. हो, नाही करत आम्ही सोबत गेलो..

मग आम्ही कोण.., ते कोण असा छोटासा इन्ट्रो झाला. त्यात एक मुलगी होती.. कर्ली शॉर्टहेअर्स, डार्क ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पीस घातलेली. बोलण्यात तरबेत होती....
ती "सोनिया" होती. राजची लहानपणीची अब्रॉडची फ़्रेंड. सर्वांच्या गप्पा चालु होत्या. पण तिची सारखी नजर मात्र निशांतवर येऊन थांबत होती.. हे मी मात्र चांगलंच हेरलं होत.

गप्पा चालू असताना अचानक कोणीतरी माईकवर बोलत होत. तिकडे आम्ही पाहिलं तर ते राजचे डॅड होते..

"माय डिअर फ्रेंड अँड फॅमिली.. थ्यांक यु फॉर कमिंग इन माय सन्स बर्थडे पार्टी. मला माहित आहे सर्वांना कामं असताना तरी ही माझ्या मुलाचा बर्थडे म्हणुन तुम्ही सगळे इथे उपस्थित हातात त्याला शुभेच्छा द्यायला. सो ज्याची सर्वजण वाट पाहत होते ते आपण सेलिब्रेशन करायला सुरुवात करू.."

ते बोलत असताना तिकडच्या मॅनेजरने एक केक आणला. चांगलाच महागडा आणि मोठा होता तो केक... एखाद्या शेफ कडुन करवून घेतल्यासारखा होता. आणि का नसणार एवढे ते श्रीमंत साधा केक कसे खातील ना..!!

त्यानंतर राजच्या डॅड ने त्याला बोलावुन घेतलं. आणि सर्वांनी टाळ्या वाजवत विश केलं. ब्याग्रांउंड ला पियानो वर बर्थडे सॉंग वाजत होत.. केक कापताचं त्याच्या डॅड ने श्यामपीएन ची बॉटल फोडली आणि सेलिब्रेशन सुरू झालं...
त्यानंतर खाण पिन.. जेवण.., मद्यपान.., फ्लोर वर डान्स ही सुरू होता. त्यात आई-बाबा ही कपल डान्स करत होते.

मी आणि निशांत बसलो होतो की राजने बलेबळेच मला डान्ससाठी नेलं.. आम्ही डान्स करत असताना आमच्यासमोर निशांत आणि सोनिया एकत्र डान्स करत होते. त्यांचं एकमेकांच्या कानात काही तरी बोलणं.. मधेच तीचं हसणं... उगाचच निशांतच्या जवळ जाण सार काही मला त्रास देत होत.. मी चांगलेच जेलस होत होते..

"ब्युटीफुल..."

"काही बोललास का.???" मी राज कडे बघून विचारलं...

"अग खुप सुंदर दिसत आहेस.. लुकिंग ब्युटीफुल..." राज च्या वाक्यावर मी त्याला थँक्स म्हटले आणि त्याची ही तारीफ केली.. त्यानंतर मी आणि राज ही डान्स मध्ये रमलो...

हे सर्व आता निशांतला त्रास देत होत. आता तो जेलस होत होता. हे बघून मी मात्र गालातल्या गालात हसत होते.

पार्टी चालू असताना अचानकपणे सॉंग थांबलं.. आणि समोरच्या प्रोजेक्टर वर एक व्हिडिओ सुरू झाला.. एक आलिशान बंगल्याचा. सुरुवात आयफर टॉवर पासून झाली आणि आम्हाला कळलं की तो बंगला प्यारिस मधला आहे..

तो व्हिडिओ संपताच राजच्या डॅड वर फोकस मारण्यात आला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.. बोलताना ते चांगलेच भावुक झाले होते. त्यांच्या पत्नी बद्दल बोलत असताना अचानक त्यांचे डोळे पाणावले आणि राज धावत जाऊन त्याच्या डॅडला बिलागला..

"माय सन.. थिस ब्युटिफुल बंगलो इस युअर बर्थडे गिफ्ट.. मला तू एकदा सांगितलं होतंस तुला प्यारिस मध्ये घर हवंय. आणि त्याचसाठी काही महिने मी तुझ्यापासून दूर राहिलो आणि तुझ्या आवडीचा हा तुझा बंगला मी तुझ्यासाठी बनवून घेतला. हे छोटस गिफ्ट माझ्या मुलासाठी..."

एवढं बोलताच राज ने परत एकदा त्याच्या डॅड ला मिठी मारली. दोघे बाप-लेक एकमेकांना घट्ट मिठी मारून काही वेळ रडत होते. आणि आम्ही सर्वजण टाळ्या वाजवुन त्याच्या डॅड च्या गिफ्टचं कौतुक करत होतो.

त्याच्या डॅडच्या गिफ्ट नंतर.. सर्वजण त्याला काही ना काही गिफ्ट देत होते.. मग मी आणि निशांतने ही त्याला आमचं गिफ्ट दिल.. ते गिफ्ट मात्र राज ने उत्साहाने उघडलं. आतील घड्याळ बघून त्याला ते पाहताच आवडलं..

"आवडलं का गिफ्ट... प्रांजलची चॉईस आहे..." निशांतच्या या वाक्यावर राज चांगलाच खुश झाला. पण मी मात्र गडबडले कारण त्या घड्याळाची चॉईस निशांतची होती.

मी केलेलं चॉईसचं घड्याळ म्हटल्यावर राजने ते हातात घातलं देखील. यावर मी चांगलेच शॉक मध्ये होते. पण निशांत हातातलं कॉल्डड्रिंक शांतपणे पित होता. जस काही झालंच नाही...

"मी आलोच हा.." आपल्या हाताची करंगळी दाखवत निशांत निघून गेला. वॉशरूम वरून यायला त्याला बराच वेळ लागत होता.. काही वेळाने तो आला तेव्हा त्याचा अवतार मात्र जरा विचित्र वाटला... विस्कटलेले केस सावरत तो टेबलावर जेवायला बसला खरा. पण जरा वेगळ्या विचारात वाटला.. आम्ही जेवत असताना अचानक माझी नजर त्याच्या गळ्याजवल गेली..

तिथे लिपस्टिक लागल्यासारखी वाटली. मी हात लावायला गेले तर त्याने लगेच माझा हात ठरला आणि न जेवताच निघून गेला. हे जरा जास्तच विचित्र वाटलं मला.. मग थोडे जेवून मी देखील उठले.

एका ज्युस च्या काउंटर वर तो ज्यूस पीत बसला होता. त्याच वागणं... बोलणं मात्र एखाद्या ड्रिंक केलेल्या माणसा सारखं होत.. मला त्या ज्युस मध्ये काही तरी मिसळल्या सारख वाटलं..

मी ते चेक करण्यासाठी बघतच होते की समोरून सोनिया यायला आणि निशांत उठायला एकच वेळ झाली. आणि निशांत तिच्यावर पडला. दोघेही एकमेकांच्या अंगावर पडले होते. नशेत असल्याने निशांतला काही उठायला जमत नव्हतं. शेवटी राज धावत आला आणि काही वेटर्सनी त्यांना दोघांना उचललं. भर हॉल मध्ये अस विचित्र पद्धतीने अनोखी व्यक्ती आपल्यावर पडल्याने सोनिया चांगलीच रागाने लालबुंद झालेली आणि काही ही विचार न करता तिने सर्वांन समोर निशांतच्या एक कानाखाली लगावली.

हे होताच सगळा हॉल शांत झाला.. ती चांगलीच भडकली होती. अजून काही करणार तितक्यातच राजने तिला सावरलं. आणि मी निशांतला. मला तर काहीच सुचत नव्हतं की निशांत कधीपासून ड्रिंक्स घेऊ लागला.

ती अजून काही करणार हे बघून राजने तिला समजावलं आणि रूममध्ये घेऊन गेला. या सर्वांमुळे पार्टी बऱ्यापैकी खराब होत आहे असं वाटत असतानाच राजच्या डॅड ने सर्व सांभाळून घेतलं आणि आम्हाला जायला सांगितलं.

मी आणि बाबांनी मिळुन राजला त्याच्या रूममध्ये आणलं आणि त्याला बेडवर झोपवलं. मी त्याचे शूज काढले आणि ब्लेझर.. काहीशा धुंदीतच तो काही पुटपुटत होता..

"मी काही नाही केलं.., तिनेच.., सु सुssरवात केली होती.."
मला काही ही कळत नसल्याने मी त्याला शांत केलं आणि झोपायला सांगितलं. थोडा वेळ त्याच्या उशाशी बसून त्याच्या डोक्यावरून हात फिरवला काही वेळाने तो शांतपणे झोपल्याची खात्री करून मी खाली आले..

राज माझीच वाट बघत होता. खरतर त्यानेच मला मघाशी वर निशांतला घेऊन जाताना परत यायला सांगितलं होतं. मी खाली येताच तो माझ्या जवळ आला आणि माझा हात धरून मला बाहेर घेऊन जाऊ लागला.. मी काही बोलणार तेवढ्यात त्याने स्वतःच्या ओठांवर बोट ठेवून मला शांत केलं. आणि डोळ्यांनीच "प्लीज चल ना...!!" एवढंच बोलला.

मग काय निघालो आम्ही बाहेर. रात्रीचे अकरा- साडे अकरा झाले असावेत. आम्ही चालत समुद्राच्या किनाऱ्यावर जायला निघालो. मी घातलेल्या हिल्स मुळे मला चालता काही येत नव्हतं. मग कस तरी चालत आम्ही गेलो..

दहा- बारा मिनिटे चालल्यावर समोर मला एक सजवलेला टेंट दिसला. तो नाही का टीव्ही मध्ये कपल्स साठी असतो. अगदी तसाच होता. आजूबाजूला रोषणाई होती. वेगवेगळ्या फुलांनी तो सजवला होता. एक टेबल आणि समोरा समोर खुर्च्या होत्या. त्यात ते नेटचे बाजुला लावलेले पडदे समुद्राच्या हवेने चांगलेच उडत होते..



To be continued....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED