जुळले प्रेमाचे नाते-भाग-८१।। Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८१।।

चालत आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही जाताच राजने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि मला एका चेअरवर बसवलं. हे सर्व काही माझ्यासाठी नवीन होत. आणि खरतर मी खूपच अस्वस्थ होते. कारण राज हे सगळं का करत होता हे मला काही केल्या कळत नव्हतं. कारण हे आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी करतो हे माहीत होतं. पण राज माझ्यासाठी का करतोय आणि कशासाठी हे मात्र कळत नव्हतं.

त्यानंतर तो ही समोर बसला. आम्ही बसताच एका वेटर ने आमच्यासाठी खायला वाढलं. दोन ग्लासात ऑरेंज ज्यूस ओतला.

"अरे राज माझं जेवण झालं आहे..."

"हो, माहीत आहे. मी पाहिलं ना तू किती जेवलीस ते. निशांतच्या प्रकारामुळे तु नीट काही जेवली नसशील माहीत आहे मला. आणि तस ही प्लीज ना माझ्यासाठी जेव. कारण मी देखील अजून जेवलो नाही आहे.. तुझ्यासोबत जेवेण म्हटलं तर तू आता नाही म्हणत आहेस. ठीक आहे नाही तर नाही जेवत...." एवढं बोलुन राज लहानमुला सारखा रुसला..

"अरे तस काही नाही... बर बाबा जेऊया..." माझ्या अशा बोलण्याने एखाद्या लहान मुलाला चॉकोलेटसाठी होकार द्यावा तसा राज खुश झाला. त्यानंतर आम्ही जेवु लागलो. नाही नाही म्हणता राज वाढत होता आणि मला बलेबळेच खायला लावत होता.

जेवणानंतर आईसस्क्रीम खाऊन आम्ही जेवणाचा शेवट केला.. त्यानंतर आम्ही थोडं चालायचं म्हणुन उठुन फिरू लागलो.. पण मनात निसगांतची काळजी सारखी वाटत होती. की तो उठला तर नसेल ना..?? जेवला ही नाहीये.. हे सगळे विचार डोक्यात चालू असताना..
राजने अचानकपणे मला थांबवल...

"प्रांजल, मला तुला काही सांगायचं होत. खरतर खूप आधी पासून सांगायचं होत. पण पाहिजे तसा वेळच नाही मिळाला." राजच्या वाक्यावर मी थांबले आणि त्याच्याकडे वळुन पाहिलं..

"हो बोल ना... काय बोलायचं होत..??"

"एकसांग जर एखादी मुलगी आपल्याला आवडत असेल. पण जर ती चांगली फ्रेंड असेल. आणि जर आपण तिला प्रपोज केलं., तर त्या दोघांची मैत्री तुटेल का..??" राज च्या प्रश्नावर आधी तर मला हसूच आलं..

"अच्छा बच्चू तो बात प्यार की है।" माझ्या बोलण्यावर राज लगेच लाजला.

"हो... सांग आता.." त्याने तर चक्क हातच जोडले..

"ते तिच्यावर आहे. म्हणजे जर तिला प्रेम नको असेल तर मैत्री ठेवल्याने काहीच प्रॉब्लेम नाही. पण तिला जर प्रेम आणि मैत्री दोन्ही नको असेल ना तर आपण तरी काय बोलणार."

"पण खर सांगु राज. मैत्री हे नात मुळातच वेगळं आहे. सर्वांत श्रेष्ठ आहे. मैत्री सारख निखळ नात कोणतच नाही.. कारण त्यात स्वार्थीपणा नसतो. असते ती समोरच्या व्यक्तीवर निखळ प्रेम करणं. पण ते मैत्रीतलं प्रेम असत हा. वेगळा अर्थ काढु नये.."

"वाह...!! काय मस्त बोलतेस तु प्रांजल. सतत ऐकावस वाटतं. पण एक सांग. तुला जर अस कोणी प्रपोज केलं तर तुझं काय उत्तर असेल..??!"

"जर मला ही ती व्यक्ती आवडत असेल तर मी होकार देईल आणि माझ्या घरच्यांना याबद्दल कळवेल. पण जर ती व्यक्ती माझ्या जवळची आणि आमची मैत्री चांगली असेल पण माझं जर प्रेम नसेल तर त्याला नकार देईल पण मैत्री काही तोडणार नाही. पण तू हे सर्व मला का विचारात आहेस..???"

"अग ते म्हणजे..."

"आणि तुला काही तरी सांगायचं ही होत ना..?? काय सांगायचं होत.??" मी बोलतच पुढे जात होते. जेव्हा मागे पाहिलं तेव्हा... राज खाली बसला होता.

"काय रे काय झालं..?? असा खाली का बसला आहेस.??" मी विचारताच तो गोंधळल्या सारखा वाटला..

"अग ते.. म्हणजे.. अग ते माझ्या शूज ची लेस सुटली होती तीच बांधत आहे..." त्याने कस तरी तूच वाक्य पूर्ण केलं.

मी परत मागे गेले.. तर हा अजून ही खालीच बसुन होता..
"अरे होतंय का...??" माझ्या प्रश्नावर लगेच मान डोलावली आणि उठून माझ्या सोबत चालु लागला.. आम्ही बरेच पुढे आलो होतो त्या टेंटपासुन हवेतला गारवा ही चांगलाच वाढला होता. मला तर चांगलीच थंडी वाजत होती.., म्हणुन मी स्वतःचे हात एकमेकांमध्ये गुंतवले आणि चालू लागले.. चालताना अचानक राजने त्याचा कोट माझ्या अंगावर घातला. तो उबदार कोटामुळे खुप बर वाटलं.

"बोला मग काय बोलायचं होत. आणि कोण आहे ती मुलगी.??" माझ्या प्रश्नावर त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले बघुन मला चांगलंच हसु येत होतं. पण कस तरी कॅट्रोल करून मी त्याला विचारलं..


To be continued...