जुळले प्रेमाचे नाते-भाग-८५।। Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते-भाग-८५।।

आईची सकाळपासुन लगबग चालु होती..

"अग प्राजु उठ ना...!!" अशी ओरडतच ती माझ्या रूममध्ये आली. पण येताच मला तय्यार बघुन खुश ही झाली..

"नशीब माझं तू तरी तय्यार बसली आहेस. तुझे बाबा कधी तय्यार होतील काय माहीत..." अस बोलतच ती माझ्या रूममधून आल्यापावली गेली देखील..

"काय ही आई..!!" तिची उगाचच धावपळ चालू होती. काय आहे ना आज तो दिवस होता.. म्हणजे "होळीचा". तशी "होळी" दर वर्षी येते.., पण यावर्षाची होळी स्पेशिअल होणार होती. कारण आज मी ती निशांत सोबत साजरी करणार होते.

आज होळीला दहन आणि उद्या धुलीवंदन. बस आता धम्माल एवढंच बाकी होत.. मी, आई- बाबा.. आम्ही तय्यार होऊन निशांतच्या घरी जायला निघालो. आज मी एक लाईट येल्लो रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.. त्यावर शोभतील असे पिवळे कानातले.. त्याच सोबत उद्यासाठी एक स्पेशिअल ड्रेस आम्ही ठरवला होता.

जसे सगळे हिरो-हिरोईन घालतात ना...! तसच आम्ही ही सफेद रंगाचे कपडे घालणार होतो. ही आयडिया निशांतची...

होळी भले संध्याकाळी साजरी होणार होती.., पण आम्ही लवकरच जाणार होतो. कारण खुप दिवस आजी-आजोबांना भेटलो नव्हतो ना...!! म्हणुन त्यांच्या सोबत वेळ घालवायचा हा चांगला चान्स होता..

मी स्वतःला आरशात बघत बाहेर निघाले. बाबा सोफ्यावर बसुन कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मी रूममधून बाहेर येताच आई देखील त्यांच्या रूममधून बाहेर आली आणि आम्ही निघालो..

खाली बाबा गाडी घेऊन आले.. तसे आम्ही बसलो आणि निघालो... मी खिडकीवर स्वतःच डोकं लावुन बाहेरच बघत होते... माझ्या मनातला आनंद चेहऱ्यावर पसरला होता.

कधी निशांतला भेटेल अस मला झालं होतं.. माहीत नाही का..?? पण आज जरा जास्तच त्याची आठवण आणि त्याच्यावरच प्रेम वाढलं होत. ते नाही का आवडत्या व्यक्तीची ओढ लागते... तसच काहीस माझं झालेलं..

ट्रॅफिक पार करून पोहोचलो बाबा एकदाचे... बंगल्यात प्रवेश करत आम्ही गाडी पार्क केली. मी धावत जाऊन गार्डनमध्ये बसलेल्या आजोबांचे मागुन जाऊन डोळे पकडे..

"ओळखा पाहु कोण आहे..??" माझ्या आवाजाने आजोबा हसले..

"आमची लाडकी प्राजु...!!
काय ग पोरी आता मिळाली का सवड आजोबांना भेटायची...??" मला ओळखताच मी त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले...

"अस काही नाही ओ आजोबा... पण कामात राहून गेलं म्हणुन बघा आज लवकर आले. आता आपण मस्त गप्पा मारू... मला सांगा कोणती नवीन झाड घेतली आहेत..., आणि मला खुप काही विचारायचं ही आहे हा तुम्हाला..." माझे प्रश्न काही संपत नव्हते.

"हो हो.., सांगतो. सगळं काही सांगतो. पण आधी फ्रेश व्हा. मस्त चहा- नाश्ता करा. मग आपण निवांतपणे बसून बोलूया." आजोबांच्या बोलण्यावर मी मान डोलावत आत गेली.. ते ही बाबांसोबत मागुन आले.

"काय मग प्रसाद... सगळं ठीक चालु आहे ना.???" जॉब काय बोलतोय..??"

"सगळं ठीक चालू आहे बाबा. बाकी तुमची तब्बेत कशी आहे. फोनवर नाही ओ कळत. अस भेटुन कस मस्त वाटत.."

"बरोबर बोललास.. भेटुन माणसाच्या भावना कळतात. आजकालच्या स्मार्टफोनच्या दुनियेत कोणाला वेळ आहे की, जाऊन भेटून येईल. बस एक फोन केला.. तब्बेतीची विचारपूस केली की झालं... ही आताची मुलं करतात..."

"पण एक सांगतो हा.. आमचा नातु मात्र आम्हा दोघांची खुप काळजी घेतो.." आजोबा आनंदाने सांगत होते. यावर मला समाधान वाटत होतं की, आपण अशा मुलावर प्रेम करतो जो सर्वांची काळजी घेतो.

"हो बाबा बरोबर बोललात. पण आपला निशांत आहे कुठे.?? दिसला नाही आल्यापासून.??!"

"बाहेर गेलाय येईल इतक्यातच..." आजोबा आणि बाबा हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते..

मी किचनमध्ये आजीना भेटले. खुप दिवसांनी भेटले ना..!! आजींच्या गप्पा काही संपत नव्हत्या. गप्पा मारता-मारता आजी आणि आईने चहा- पोहे केले. ते सांगायला मी बाहेर आले.

"गरम चहा आणि गरम पोहे खायला चला नाही तर नंतर परत गरम करून मिळणार नाहीत...!! आदेशावरून.." मी आजोबा व बाबांना ओरडुन सांगत होते...

"हो हो.. आलो आम्ही." त्यांनी लगेच आपला मोर्च्या डायनिंग टेबलाकडे वळवला. यासर्वात माझे डोळे निशांतला शोधत होते..

"ज्या मुलासाठी एवढी तय्यार होऊन आले होते, तोच गायब.. काय बोलायचं आता माणसाने.." मी स्वतःशीच बडबडत होते की....!!"

"तसं कोणाची वाट बघणं वाईट नसत... आणि जर ती व्यक्ती हृदयाच्या अगदी जवळची असेल तर त्या वाट बघण्याचं चीज होत...!!" काही शब्द कानांवर पडले तशी मी माझी मान त्या आवाजाच्या दिशेने फिरवली. हो, तो निशांत होता... त्याला बघताच चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली.

"काय रे तू असा... आम्हाला बोलवून स्वतः मात्र गायब. अस कुठे असत..!!" मी लटक्या रागात बोलले आणि फुगून बसले..

"ए फुगाबाई.. अस रागवायचं नाही हा.. कामासाठी गेलो होतो. तसही तू येणार आणि तुला सोडुन मी जावं.. शक्य आहे का ते...???!" निशांत गोडी गुलाबी लावण्याचा प्रयत्न करत होता...

त्यावर स्वतःचं तोंड वाकडं करत मी आत गेले. तो ही मागून आला.
निशांतला बघताच आई-बाबांनी त्याची चौकशी केली..

"काय, निशांत बेटा कसा आहेस..?? आणि तय्यारी कुठं वर आली. काही ही मदत हवी असल्यास मला नक्की सांग हा..!" बाबा पोहे खात बोलले. यावर निशांतने आपली मान हलवुन होकार दिला..

"वाह पोहे....!!" प्लेट चा सुगंध घेत त्याने आपले डोळे बंद केले...

"हो.., ते ही आईच्या हातचे. तुझे आवडते आहेत.." मी एक घास खात बोलले.. त्याने काही ही न बोलता. चहा आणि पोहे खायला सुरुवात ही केली.

चहा-पोहे खाऊन मी आणि निशांत त्याच्या रूममध्ये गेलो.

"निशु कोण कोण येणार आहे आपल्याकडे..?? आणि हो आपण होळी नक्की साजरी कुठे करणार आहोत..?" माझे एक ना अनेक प्रश्न विचारण चालु होत..

"हो ग हनी-बी.. संध्याकाळी कळेल. घाई कशाला." त्याने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि एक स्माईल दिली.

मग इकडच्या तिकडच्या गप्पा चालु झाल्या.. आमच्या गप्पा चालु असताना त्याला एक कॉल आला आणि त्याला जावं लागलं. मग मी ही खाली आले..
खाली आई- आजी गप्पा मारत होत्या. तर बाबा त्यांचं काही काम करत बसले होते. मी गार्डनमध्ये गेले तर आजोबा कोणतं तरी काटेरी झाड लावत होते..

"आजोबा...! कोणता झाडं लावत आहात..??" मी कुतूहलाने विचारलं.

"प्राजु बाळा, कोरफड काही काटेरी झाडं नाहीये. हा त्याला काटे असतात.., पण ती औषधी वनस्पती आहे. तुला तर माहीतच असेल..??!!"

"हो मला कोरफड माहीत आहे. पण एवढं मोठं पहील्यांदाच पाहत आहे. म्हणुन विचारलं." मी त्या झाडाचं निरीक्षण करत बोलले..

"मोकळी जागा.., खत-पाणी. चांगली हवा मिळाली की होतात मोठी. आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे भरपूर जागा मिळाली की मस्त होत हे झाड.. बर इकडे ये तुला नवीन झाडं दाखवतो..." आजोबांनी मला जवळ बोलावून घेतलं.

"ही सफेद आणि गुलाबी सदाफुली... या काळात मस्त बहरते. आणि हो, झेंडूचं रोपटं तर सुंदरच.. अजुन काही मागवणार आहे. बाहेरच्या देशातली. तुला ही देईन हो..!!" आजोबा गोड हसत बोलले. यावर मी ही छान हसले.

आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या की निशांतची बाईक आत आली.. शहाणा जेवण्याच्या वेळेत हजर होता.

तो येताच आम्ही जेवायला आता गेलो. जेवणाचा साधा असा मेनु होता. डाळ- भात, बटाटा भाजी.., पापड.

जेवुन काहीवेळ झोपायचं म्हणुन सगळेच पडले. मी निशांतच्या रूममध्ये गेले.. तर हा गायब..

"अरे आता होता.. जेवून कुठे गेला असेल..??" स्वतःशीच पुटपुटत मी त्याच्या रूममधल्या बेडवर बसले.. बसल्या बसल्याच नजर पूर्ण खोलीभर फिरवली... तर सगळं काही नीट नेटकं.. किती छान वाटत नाही...!!

नीट नेटकेपणा सहसा मुलांच्या रूममध्ये नसतोच.. पण निशांतच वेगळं होत.. मी उठुन बुक स्टँडजवळ गेले. खूप सारी पुस्तकं होती... त्यात एक डायरी देखील होती.. आधी तर मी घेणार नव्हतेच.. कारण डायरी ही वैयक्तिक गोष्टींनी भरलेली असते... ती बघून मी पुढे गेले..

पण न राहुन मी ती घेतलीच.. काय करणार मला ही बघायच होतं की नक्की त्यात काय असेल... मनाने कुतूहल जाग केलं. मी ती डायरी घेतली आणि बेडवर बसले..

आधीची काही पानं लहानपणीच्या आठवणींनी भरलेली होती..

आई-बाबांच्या आठवणी आठवुन आठवुन त्याने त्या पानांवर उतरवलेल्या होत्या. मी एक-एक पान पलटत होते.. तेवढीच त्याच्या हृदयाच्या जवळ पोहोचत होते... त्यातला एक-एक शब्द त्याच्या मनातला होता.. ते वाचुन डोळे पाणवतं होते.

आणि एका पानावर मला कॉलेजमधला किस्सा दिसला..

"ती.. आज सकाळीच घाईमध्ये तिला येताना पाहिलं.. सफेद रंगाचा साधा टॉप.. खाली ब्लू जीन्स.. आणि हवेत उडणारे तिचे ते मुलायम केस.. हात ही न लावता कोणी ही सांगेल असेच होते.. आज जरा उशिरच झाला तिला.. कधीपासून वाट बघत होतो. आणि मॅडम आता आल्यात.."

"उफ हे तिचे केस... हवेमुळे तिचे ते चेहऱ्यावर येणारे केस.. मला अजूनच तिच्याकडे आकर्षित करत होते.

अजून ही आठवतो तो पहिला दिवस.... तिला त्या भर उन्हात लाईनमध्ये उभी असताना पहिल्यांदा पाहिलं होतं.. कॉलेजसाठीचा फॉर्म भरायला आलेली. सोबत आई ही होती.."

"तिचा तो घामाने भिजलेला चेहरा सारखा पुसत उभी होती त्या उन्हात.. गोड वाटत होती. म्हणजे मी कधी मुली पाहिल्या नव्हत्या.. म्हणजे तस नाही काही..., मैत्रिणी होत्या, पण तिला पाहून एक वेगळंच आकर्षण जाणवत होतं. मी लांबुन तिला पाहिलं.. ते ही सहज नजर गेली म्हणुन..

तिला जास्त वेळ न बघता मी कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये गेलो. खाल्लं आणि निघालो तर कोणी तरी समोरून येऊन जोरात धडक मारली...

मी ओरडणारच होतो.. पण ती, "तीच" होती.. धावत वाऱ्यासारखी आली आणि गेली ही... नंतर मित्रांकडून कळलं की, एक मुलगी भर उन्हात चक्कर येऊन पडली म्हणुन तिला पाणी द्यायला मॅडम धावत होत्या..

त्याचक्षणी इम्प्रेस झालेलो.. अशा अनोख्या मुलीला मदत करणारी नक्कीच गोड स्वभावाची असेल..

********

"बापरे..! म्हणजे हा मुलगा किती वाईट आहे... माझ्या नकळत हा मला फॉलो आणि बघत होता.." मी जरा लाजतच पुढचं पान पलटलं.

to be continued...

(काल्पनिक कथा)

©हेमांगी सावंत(कादंबरी)💕