kadambari jivlagaa Part -39 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग - ३९ वा

कादंबरी –जिवलग

भाग – ३९ वा

---------------------------------------------------------------------------

संध्याकाळचे पाच वाजत आलेले होते , दिवसभर फिरून घरी आल्यामुळे ,नेहा आणि

सोनिया दोघीजणी अगदी निवांत बसल्या होत्या ,हातातल्या फोनमध्ये लक्ष होते ,पण,

मन मात्र अजिबात नव्हते .

नेहाच्या मनात एकच विचार ..हेमूने मेसेज तरी दायला हवा , काय चालू आहे, वातावरण

टेंशनचे असले म्हणून फोन करता येणार नाही ,हे समजून घेऊ एक वेळ

..पण,मेसेज करता येतात

या गोष्टीचा हेमुला विसर पडलाय की काय ?

शेवटी न राहवून ..नेहाने हेमुला मेसेज केला ..

त्याचे उत्तर हेमूने दिले तर ठीकच ..

नाही तर,

तिकडे काय चालू असेल ? याच विचारात बसून राहायचे , याशिवाय कारणार तरी काय ?

नेहाच्या सुदैवाने तसे काही करण्याची वेळ आली नाही ..

हेमूने चक्क कॉल केला तिला ..

अधीर मनाने नेहा हेमुचे बोलणे ऐकू लागली ..

नेहा – इकडे तसे सगळे ठीक आहे , पण, ज्या कामासाठी यावे लागले आहे..

ते मात्र उद्या होणार आहे. कार्यक्रमात बदल झाल्यामुळे ..

मामी स्वतहा मुलीला ,तिच्या फैमिलीला

घेऊन उद्या दुपारी येणार आणि लगेच जाणार आहे..

यात एकच गोष्ट आपल्यासाठी चांगली होणार आहे , ती म्हणजे ..

आमच्याकडे मुक्कामी येण्यासाठी मामा एकटा येतो आहे , अर्ध्या तासात पोन्चेल तो ,त्याचा

मेसेज आला आत्ताच तसा.

मामा आल्यावर ..मी बोलणार आहे आपल्याबद्दल , सारे काही सांगणार आहे,

तो नक्की यातून असा काही मार्ग काढील की..

कुणाला न दुखावता ..उद्याच्या संकटातून तो माझी सहीसलामत सुटका करेल.

हे ऐकून नेहाच्या मनातली भीती जरा कमी झाल्यासारखे वाटू लागले ..

ती म्हणाली ..

हेमू, तू अगोदर मामाशी बोलून घे ,आणि मग,रात्रीची जेवणं आटोपली की जेव्हा तुम्ही सगळे

मिळून बोलत बसाल .

.तेव्हा मामालाच सांगू दे आपली स्टोरी ..तुझ्या आई-बाबंना .

तू स्वतहा मोकळेपणाने नाही सांगू शकणार “,असे मला वाटते आहे.

हेमू -

मी किती वाट पाहत होते ..तुझ्या फोनची ,मेसेजची ..पण. तू तुझ्याच परेशानीत असल्यासारखा

वावरतो आहेस ,

अरे .मी तुझ्याशिवाय कुठे वेगळी आहे ? हे लक्षात असे दे नेहमी ..

आणि मेसेज पाठवत राहा ..हातात तर असतो फोन नेहमी ..!

यावर हेमू म्हाणाला -

ओके -नेहामैम – लक्षात ठेवील ,यापुढे तुला असे वाट पहायला लावणार नाही.

ऐक ना .मी काय म्हणतो ते ..

रात्री .इकडे सगळे झोपी गेल्यवर ..आपण व्हिदिओ कॉलवर बोलू या का ?

तुला पाहून खूप खूप दिवस झालेत असे वाटायला लागली ..

तुला पाहून, तुझ्याशी बोलून ..जीवाला बरे वाटेल नेहाराणी..!

करू ना कॉल..?

नेहा म्हणाली – राजा , नाही कशी म्हणू तुला ,

तू तिकडे गेलास आणि माझी झोप उडालीय , जागीच्ग असते ,डोळा कसा तो लागतच नाही,

मी वाट पाहीन ,तू मात्र ऐनवेळी विसरून ढाराढूर झोपी जाशील , तेवढे होणार नाही याची काळजी

घे .

नेहाच्या बोलण्याला उत्तर देत हेमू बोलू लागला ..

नेहा ..तुला रात्री कॉल करयच्या वेळे पर्यंत , मामाशी माझे बोलणे झालेले असेल ,आणि आम्ही

दोघे मिळून .माझ्या आई-बाबांशी काय बोललो , ते काय म्हणाले ?

हे पण सांगेल ना , त्यासाठीच तर कॉल करायची माझी धडपड आहे.

हेमुचें खुलासा ऐकून नेहा म्हणाली –

हो हो , हे तर सगळ्यात महत्वाचे आहे ,कदाचित उद्या होणार्या कार्यक्रमा पेक्षा

आज तू तुझ्या

मामाशी बोलणार, आई-बाबांशी बोलणार ,माझ्या दृष्टीने हे सगळ्यात आवश्यक आणि

महत्वाचे आहे . त्यावरच उद्याचे सगळे अवलंबून आहे.

यस नेहा – तूं म्हणतेस ते अगदी बरोबर आहे.

बरे,ठेवतो मी , मामा येईलच थोड्यावेळात ..

बोलू या रात्री ..जागी रहा ..

नेहा ,लव्ह यु..!

बाय -हेमू – लव्ह यु राजा ..!

नेहाने फोन ऑफ करीत बाजूला ठेवून दिला ..आणि तिचा फोन पुन्हा वाजला ..

रिंग टोन ऐकून तिला ..येणारा कॉल तिच्या घरून आलेला आहे..तिच्या आईचा .हे दिसले

तसा तर घरी रोजच फोन करून बोलायचे

..ही ठरलेली गोष्ट होती..पण वेळ ,रात्रीची अकरा वाजताची .

आज अगदी संध्याकाळी पाच –साडेपाच वाजता कसा काय आला असेल फोन ?

नेहाने फोन कानाला लावला ..

आईचा आवाज ऐकून तिला बरे वाटले ..आई बोलू लागली ..

नेहा ,मी काय सांगते आहे ते नीट ऐकून घे,आणि तसा विचार करण्यास सुरुवात कर..

तुझे आजी आणि आजोबा दोघेही आता खूप थकलेले आहेत, वयोमाननुसार हे आहे ,

आजारपण त्यांचे पासून दूर असले तरी ..वयानुसार काही बारीक-सारीक तक्रारी सुरु झाल्या आहेत.

हल्ली ..दोघेजण आमच्या मागे लागलेत ..

यंदा दिवाळीच्या नंतरच्या लग्न-सिझन मध्ये ..तुझ्या विकासभैयाचे आणि विशेष म्हणे तुझे

शुभमंगल सावधान थाटामाटात उरकून टाकावे . आमच्या डोळ्यासमोर ही दोन कार्य होऊ द्या ,

मग आम्ही आमचे डोळे मिटायला मोकळे ..!

मी रोज तुझ्याशी बोलते ,पण या विषयावर काय बोलायचे .म्हणून सोडून देत होते ,

पण, आताशा दिवसभर तुझे आजोबा .आणि आजी

आम्हा दोघांच्या मागे एकच टुमणे लावून भंडावून सोडत असतात .

तुझ्या विकासभैय्याचे जास्त दिवस लांबवणे बरे नाही , तुझे आधी मग त्याचे ..

तुझी आज्जी आम्हाला सुनावते रोज..

हे बघ सुनबाई – आधी लेक सासरी पाठवावी मग आपली लक्ष्मी घरात आणावी ..

अशी रीतच आहे..तुम्ही आता उशीर नका लावू .

नेहा आमाची एकुलती एक लाडकी नात .. तिच्या मांडवात आम्ही हजर असावे .

आमची ही एकच इच्छा पूर्ण करा

आता तूच सांग नेहा -

मोठ्या माणसांना आम्ही काय बोलणार , आणि कशासाठी थोपवणार ?कारणे दिली तर ती पटायला

हवीत ,

तिचे शिक्षण होऊ द्या ,

, ते झाले ,

तिला नोकरी लागू द्या मग बघू ..

आता नौकरी लागून सहा महिने होऊन गेलेत ,

आता काय हरकत आहे ?

आणि नेहाचे काय ऐकायचे ? तिच्या मनाप्रमाणे तिला बाहेरगावी जाऊ दिले ,

काही गरज नसतांना ..तिच्या मावशीकडे राहू दिले .

सोयर्यांच्या घरी या घरातील लेकीने असे राहणे आम्हाला आवडलेले नाही ,

आणि आता तर म्हणे ..मावशी परदेशात गेल्यवर .नेहा तिच्या मैत्रिणी सोबत राहते आहे ..!

नेहाने हे करू नये “ ! असे आमचे अजिबात म्हणणे नाही

पण तिच्या लग्नाची जबाबदारी तिने घरच्या मोठ्या माणसांना पार पाडू द्यावी “असे आमचे मत आहे.

सगळे निर्णय घेण्य एवढी अजून ती मोठी आणि समझदार झाली आहे “असे आम्हाला वाटत नाही.

नेहा – तुझ्या आजोबांनी आणि आजीने घरातल्या सगळ्यांच्या समोर त्यांचे हे मत स्पष्ट बोलून दाखवले

आहे.

आणि तुला तर माहिती आहे आपल्या घरातील पद्धत ..

आजोबा आणि आज्जी जे सांगतील ..त्यो अंतिम निर्णय असतो ..तो कुणी ही बदलू शकत नाही ,

आणि आज पर्यंत कुणी तसा प्रयत्न केलेला नाही , कुणी कधी उद्धटपणे वागलेले नाही आपल्या घरात.

माझे एव्हढेच सांगणे आहे की -

आता तू दोन दिवस सुट्टी घेऊन इकडे येऊन जा .

सगळ्यांशी या विषयावर बोल , तुझ्या अपेक्षा , तुझे विचार सांग आम्हाला . आपल्या घरात

मोकळेपणाने बोलण्याची परवानगी सगळ्यांना आहे, तशी ती तुला पण आहे.

या गोष्टी आता जास्त दिवस टाळता येणार नाहीत . तू या गोष्टींचा विचार कर आणि आमच्याशी

बोलायला लवकर येऊन जा .

आणि तू टोलवाटोलवीची भाषा करू लागली तर काय होऊ शकेल ?

हे तुला चांगलेच माहती आहे ..

तुझा विकासभैया आणि तुझे बाबा ..तुला इकडे घेऊन येण्यासाठी तिकडे येतील .

हे अशी वेळ तू या आपल्या माणसावर आणू नकोस.

मी आज जे सांगितले .ते पुन्हा पुन्हा सांगणार नाही .हे लक्षात असू दे.

मी तुझी आई आहे, या भूमिकेतून ..समजावून सागितले आहे. हे अगोदर समजून घे..

मी रागवून ,नाराज होऊन बोलण्याचे काहीच कारण नाही . मी अगदी नॉर्मल मूड मध्येच

बोलते आहे .

आपल्या माडीवरच्या खोलीत येऊन ..तुला हा कॉल लावलाय . कारण रोज रात्रीच्या वेळी

तुझा फोन येतो ..तेव्हा लाईन लागलेली असते ..

आजी,आजोबा , तुझे बाबा , तुझा भैया ,त्यावेळी कुणी पाहुणा आलेला असेल तर तो पण

बोलायचे म्हणतो ..आणि मग .शेवटी माझा नंबर ..

तुला गुड नाईट करायचे , काळजी घे म्हणयचे आणि बाय करायचे ..बस.

म्हणून आज मुद्दाम वेळ काढून तुझ्याशी या महत्वाच्या विषयावर बोलले .

चल ,ठेवते , कधी येते आहेस ..तारीख कळव . सगळेजण तुझी खूप वाट पाहत आहेत.

बाय ,काळजी घे नेहा ..!

आईने फोन कट केला . नेहा हातातल्या फोनकडे पाहतच राहिली ..

आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार ..हे दोन्ही दिवस ..

तिची आणि हेमू साठीचे परीक्षा घेणारेच आहेत की काय ?

हेमूच्या गावाकडे काय होतंय ? याची चिंता लागून राहिली आहे,

तर आज आईच्या फोनने मोठाच बॉम्ब टाकलाय आपल्या मनावर .

आपल्या घरी आपल्याबद्दल असे काही चालू असेल “

असा विचार कधीच आला नाही आपल्या मनात .

आणि आईच्या फोन ने अनेक प्रश्न उभे केलेत आपल्यासमोर .

नेहा पुरती हतबल होऊन बसलेली आहे हे पाहून ..इतका वेळ काही न बोलणारी सोनिया

तिच्या जवळ बसत म्हणाली ..

काय ग नेहा ,तुझ्या हातापायातली शक्ती निघून गेल्यासारखी काय बसलीस ?

आताच तुझ्या आईचा फोन होता न ..

मला जरा आश्चर्यच वाटते आहे एका गोष्टीचे ..की ..

आज तू एक ही शब्द न बोलता ..फक्त ऐकत होतीस

नेहा –तुझी आई असे काय बोलली सांगशील का मला

फोन ठेवल्यापासून तुझे लक्षण बिघडले आहे असे मला वाटते आहे.

आणि एक गोष्ट लक्षात ठेव..

तुझा हेमू उद्याच्या प्रोब्लेम मधून सहिसलामत बाहेर पडणार , विश्वास असू दे.

नेहा म्हणाली-

सोनिया ते सगळे ठीक आहे ग

आता मला माझ्या घरी हे सगळे कसे सांगायचे ?याची फिकीर लागली आहे

आणि मला यासाठी गावी जाऊन सगळ्यांच्या समोर बसून सगळ्यांना सगळे सांगावे लागणार आहे

याचेच भयानक टेन्शन आले आहे मला .

आणि नेहाने सोनियाला आई काय म्हणाली हे सानिग्तले ..

ते ऐकून सोनिया म्हणाली ..

नेहा -ये इश्क नही आसान,

सध्या हेमू परीक्षा देतोय , आणि तुला लवकरच तुझ्या परीक्षेत पास होण्याची तयारी करायची आहे.

नेहाबेबी –डरो मत , जब प्यार किया तो अब डरना क्या ?

नेहाने घड्याळात पाहिले ..संध्याकाळचे फक्त साडेसहा वाजले होते ..

हेमूचा कॉल येण्यास अजून खूप वेळ होता ..

तोपर्यंत मनावर प्रश्नांचे ओझे घेऊन बसायचे ..

हेच नेहाच्या हातात होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग -४० वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले-अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED