Tujhach me an majhich tu..13 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १३

तुझाच मी अन माझीच तू...भाग १३

"बर बर...माहितीये तू पण अनोळखी लोकांचीच साईड घेणार!! सगळा मूड खराब झाला. आता खा लवकर.. आणि आज माझे पैसे पण तूच दे.." राजस वैतागून बोलला..

"चालेल.. आणि येस.. आता रोजच दिसणार ती आभाsss...मग अजून काय काय बदलणार राजस साहेबात बघू!! " अमेय हसून बोलला... त्याला जाणवलं आभा मुळेच राजस आज असा विचित्र वागला.. आणि अमेय चा राग पळून गेला. यात त्याला याच्या आवडीचे गिफ्ट देखील मिळाले होते. त्यामुळे अमेय ची स्वारी खुश झाली होती...

"चालेल म्हणजे काय.. द्यायलाच लावणार तुला पैसे.. काय लावलीये रे तुझी फालतूगिरी अमेय?? मला कोणी नाही बदलू शकत!! ठीके म्हणजे मला ती आवडलीये.. पण प्रेम आहे का ते अजून कळायचं आहे सो.. आणि तू माझ डोक उगाच फिरवलस.. आता रोल चेंज झालाय...मला पण राग येतो बर का... आधी तू चिडला होतास..आता मी!!" राजस अमेय ला खुन्नस देत बोलला..

"तू मान्य कर किंवा करू नकोस!! तू बदललास रे राज्या!! अजून बरेच बदल होणारेत तुझ्यात ह्याची मला खात्री आहे... आणि आय थिंक, ती खूप भारी असेल... नाहीतर तू इतका वेडा नाही होणार!!!! खास कोणीतरी असल्याशिवाय तू इतका वेडा होणार नाहीस...भेटायला पाहिजे तुझ्या आभाsss ला..." अमेय राजस ची खेचत बोलला. पण राजस मात्र आता भडकला..

"हो रे... ती डायरेक्ट हृदयाला भिडली... तिच्या बद्दल काही माहिती नाही तरी सुद्धा मी असा काय वागतोय काय माहिती!! काहीतरी आहे तिच्यात.. ज्याकडे मी आकर्षित होतोय.. तिला भेटायची ओढ वाढतीच आहे."

"येतात काही वेळा अशी लोकं आयुष्यात.."

"पण काय राव.. दिवसभर तिच होती रे मनात... आता थोडा बदल हवा म्हणून तुला भेटतोय तर तू पण तेच? आणि माझीच काय खेचतो आहेस? जा तू खड्ड्यात... असे मित्र काय कामाचे रे.. जरा विचार बदल आणि खाण्याचे वांदे होते आज... सो तुला ये म्हणलं तर तू पण गद्दार निघालास...सारखा सारखा तिचा विषय काढून जखमेवर मीठ का चोळतो आहेस? आधीच तिने इगो हर्ट केला, भाव दिला नाही... पण स्वतःत मात्र अडकवून घेतलं.." भडकून राजस बोलला.

"ओह.. दोन्ही कडून तुझी गळचेपी!!"

"हो न.. विचार नाही करायचं असं म्हणल तरी ती येतेच माझ्या विचारात.. काय करू सांग!! माझ्या आयुष्यात असा दिवस येईल असं काही वाटल नव्हत मला.. म्हणजे मला स्वतःबद्दल फारच खात्री होती.. पण एका अनोखी मुलीने मला इतक सैरभैर केलं आहे.."

"उगी उगी राजस!! होईल काहीतरी लवकरच! म्हणजे एक तर ती तुला पटेल किंवा तुला गंडवून दुसऱ्या कोण बरोबर जाईल.. काय होईल सांगता येत नाही...जे होईल ते पाहत राहायचं!!" आपले हसू कंट्रोल करत अमेय बोलला.. पण राजस मात्र भडकलाच..

"तू मार खाणारेस अमेय.. सांत्वन करता येत नसेल तर चूप चाप तरी बस की.. कोणी सांगितलं आहे तुझे उच्च विचार मांडायला?"

"मी खर आहे ते बोललो रे राजस. उगाच माझ्यावर भडकू नकोस!! मी असतो आणि तू जर मला लाईन मारली असतीस तर तुला नक्कीच सोडलं नसत.. पण सगळेच माझ्यासारखे नसतात!!"

"काय? मी तुला लाईन का मरेन? व्हॅव्ह यु लोस्ट इट?"

"मी फक्त उदाहरण दिलं रे..आणि लक्षात ठेव!! असतातच मुली डेंजर!! सगळ लक्ष काढून घेतात.. आपल्याकडून सगळ गेऊन जातात... सुख,चैन!! सो उगाच कोणाच्या नादी लागू नकोस!! अर्थात, मी फक्त सल्ला दिलाय.. पण तिने खरच जादू केली असेल तर तू सुटणार नाहीस तिच्या पाशातून...." अमेय दोन्ही कडून बडबड करत होता आणि राजस एकदमच गोंधळात पडला..

"तू नक्की काय सांगतो आहेस? माझी हेल्प करतो आहेस की मला घाबरवतो आहेस?" राजस विचार करत बोलला.... आणि अमेय मात्र जोरजोरात हसायला लागला..

"आणि चिल रे राजस.. मी मजा करतोय.. उगाच आपला त्रास! आज बऱ्याच दिवसांनी भेटलास.. सो सोचा छळून घेऊ.. आभा कोण कशी मला नाही माहिती... छान असेल तर कर तिला इम्प्रेस!! आणि सॉरी. उगाच तुझा मूड खराब केल.. आता तिला बाजूला ठेऊ.. आपण आपल्या गप्पा मारू.. आपल्याकडे काय विषय कमी आहेत का काय?" अमेय हसत बोलला.

"आय नो... पण तिने अशी काय जादू केलीये ना... आता फक्त तिच असते सतत डोळ्यासमोर!! काहीतरी होईल आमच्यात असं फिलिंग तर आहे पण खर होईल का नाही माहिती.." राजस परत एकदा आभाच्या विचारात हरवून बोलला..

"होईल होईल.. जे योग्य असेल ते होईलच!! आणि तुलाच तिच्यापासून दूर जायचं नाहीये!! "

"येस.. आहेत माझे पण प्लान.. पण ती इतक्या सहज सहजी पटेल असं नाही वाटत अमेय... ती एकदम वेगळीच आहे.. स्वतःच्या गुर्मीत असते नेहमी... आणि लई माज.. पण खर सांगू का, ती माझी व्हायला पाहिजे रे... खर मनापासून! उगाच टाईमपास नाही करायचा तिच्या बरोबर!! मनाला भिडली आहे ती...पण घास पण नाही घालत... तोंडावर उडवते!! आज वर कोणी माझ्याशी इतक्या रूडली वागलं नव्हत..सो जरा इगो दुखावला गेला."

"ओह हो.... राजस, ती आल्या आल्या का गेलास तिच्यापाशी शेण खायला? तुझ काही स्टेटस आहे न ऑफिस मध्ये?"

"आहेच.. सिनिअर लेव्हल ला काम करतो मी..."

"हो ना.. मग का दाखवल तिला की तू फार डेस्पो आहेस? काय तू पण राजस.. आधी तिला ऑफिस मध्ये रुळून तर द्यायचं की...तिला कळल पाहिजे आमचा राजस इज अ जेम ऑफ अ पर्सन.. इतकी कसली घाई झालेली तुला?"

"हो ना यार.. तेच चुकल.. पण आता काही गोष्टी ठरवल्या आहेत.. पण माहिती नाही त्या वर्क होतील का.. आणि खर तर तसं वागण बरोबर असेल का हे पण नाही माहिती.." उसासा टाकत राजस बोलला...

"आता उगाच कसलीही घाई करू नकोस राजस!! तिला वेळ दे.. तू सुद्धा तुझा वेळ घे.. नातं ना.. फुलून द्यायचं!! आपोआप... त्यात कसली सुद्धा घाई नाही करायची... आधी तिचा विश्वास जिंक भावा.. नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो विश्वास!!"

"बरोबर.. तू आहेस म्हणून बर.. वेळो वेळी ज्ञान देत असतोस.. आणि ते गरजेचे आहे माझ्यासाठी!! नाहीतर मी भरकटत गेलो असतो.. थँक्यू अमेय!!"

"दोस्त आहे रे तुझा.... हे तर करणारच ना.. बाकी सांग... काम कसं चालूये?" अमेय हसत बोलला..

"काम मस्त... तुझा काय हाल हवाल?"

"चाललंय बघ निवांत!! ठरलेला दिनक्रम.. सकळी उठायचं.. आवरायचं, ऑफिस गाठायचं.. आता ऑफिस म्हणजेच माझं दुसर घर झालंय.. मग तिथून कधी जिम आणि घरी येऊन स्वयपाकच्या काकूंनी केलेलं खून झोपून जायचं.. बाकी काही आयुष्यच नाहीये रे..."

"ओह.. तुझ लाईफ इतक बोरिंग आहे? मग अॅड सम स्पाईस इन युअर लाईफ अम्या!!" राजस डोळे मिचकावत बोलला

"ह.. कसली स्पाईस.. काय करू सांग!!"

"लग्न कर.." हसत राजस बोलला..

"लग्न?? नको रे बाबा... ते सोडून सांग... कोण करून घेणार विकतचा त्रास? बोअर असल तरी माझ आयुष्य मी माझ्या मर्जीने जगतोय.. ते बास.. मी माझ्या मर्जीचा राजा आहे.. का माझ्या स्वातंत्र्यावर तुझा डोळा?" हातवारे करत अमेय बोलला आणि दोघे हसायला लागले..

"तू नको पण माझ तर ठरलंय.. मला हवीये आभा माझ्या आयुष्यात आणि माझी लाईफ पार्टनर म्हणून!! मी खूप मस्त बॉय फ्रेंड होईल आणि नवरा... अर्थात!!"

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED