स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 13) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 13)

सब कुछ देकर भी
तुने अपना माना नही
जरूर कोई खोट रेह गयी
मुक्कद्दर के आशियाने मे
मै धुंडती रही
तुझं मे भगवान अकसर
तुम तो विविध रंगो से
सजाये पत्थर मिले .

नित्या घरी पोहोचली होती ..तिला आज काय होणार आहे याचं भान नव्हतं ..त्यामुळे बिनधास्त होत काम करू लागली ..इकडे नित्याकडे सासूबाई खूप रागाने पाहत होत्या ..तिलाही ते लक्षात आलं होतं पण हे नेहमीचच असल्याने तिने सासूबाईकडे लक्ष दिलं नव्हतं ..इकडे संध्या झोपेतून उठून रडू लागली होती त्यामुळे नित्याने तिला दूध पाजलं आणि तिला हसवू लागली ..सायंकाळची वेळ असल्याने स्वयंपाक देखील करणे गरजेचे होते त्यामुळे संध्याला सासूबाईकडे सोपवू लागली ..पण सासूबाईने तिला घ्यायला नकार दिला शेवटी बाबांनी स्वतःहून तिला हातात घेतले आणि खेळवू लागले ..नित्या पुन्हा एकदा आपल्या कामात व्यस्त झाली ..तिला तिचा आज खूप जुना मित्र भेटला होता ..त्याच्याशी बोलुन जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या त्यामुळे ती आज खूप खुश होती ..तर त्याने लग्नाचं कार्ड दिल्याने सर्वच जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल या विचाराने नित्या खूपच खुश झाली होती ..आज कधी नव्हे ती गाणे गुणगुणत होती आणि सासूबाई तिच्या आनंदाचा चुकीचा अर्थ काढत होत्या ..खर तर त्यांना राहावंसं वाटत नव्हतं पण मृन्मय सांगून गेल्याने त्या शांत होत्या पण त्यांना तिला कधी बोलते अस झाल होत ...

रात्रीचे 11 वाजले होते ..आज कुणीही जेवायला बसलं नव्हतं ..अगदी सर्व मृन्मयची आतुरतेने वाट पाहत होते तर नित्या आपल्या मुलीसोबत खेळत होती ..तेवढ्यात दारावर मृन्मय आला ..तो खूपच दारू पिऊन आला होता हे सर्वाना लक्षात यायला वेळ लागला नाही ..तो पडणार तेवढ्यात बाबांनी त्याला सावरलं आणि आत घेतलं ..त्याचे डोळे रागाने लाल झाले होते ..ती त्याच्याकडे रागाने पाहत किचनमध्ये जाऊ लागली तेवढ्यात त्याने तिचा मागून हात पकडला ..त्याने हात इतक्या जोराने पकडला होता की तिला सोडता येत नव्हता .तिने पूर्ण आपली ताकद लावून हात सोडविला ..तिच्या हातावर व्रण आले होते हे पाहून ती म्हणाली , " तू राक्षस तर नाहीस ना ? अस कुणी करत का ? बघ हात किती लाल झाला आहे ? "

मृन्मय पुन्हा तिचा हात जोराने दाबत म्हणाला , " मी राक्षस आणि तू कोण सती सावित्री ? ..कुठे कुठे लागे बांधे जोडून ठेवले काय माहिती आणि मला म्हणतेस .."

आता तीही रागात हात सोडवत म्हणाली , " तुला म्हणायच काय ते स्पष्ट बोल ? "

तो तिच्या अगदी चेहऱ्याजवळ जात म्हणाला , " तुला सर्व करून लाज वाटत नाही आणि मला स्पष्ट बोलायला सांगतेस ..बर मग होऊन जाऊंदे आज ..मला सांग , तुला माझ्यासोबत बोलायला फार आवडत नाही आणि आज आपल्या प्रियकरासोबत तर मस्त गप्पा मारत होतीस ना ते पण रोडवर म्हणजे आमच्या इज्जतीचे धिंडवडे काढायचे ठरवले आहेस का ? ..साली नीच लग्न होऊन सुद्धा दुसऱ्या कुणासोबत संबंध ठेवताना तुला काही वाटत नाही का ..की विकली इज्जत स्वतःचीही ? "

आतापर्यंत शांत असलेली नित्या त्याला जोराने ढकलत म्हणली , " मृन्मय आज तू हद्द पार करत आहेस ..माझ्या चारित्र्यावर शंका घेण्याचा अधिकार तुला दिलाच कुणी ? ..तू इतक्या खालच्या थराला जाशील अस कधी वाटलं नव्हतं ..मला नीच म्हणतो साला .."

तिने ढकलून लावलं आणि तो बेडवर जाऊन पडला ..त्याच्या हाताला बरच लागलं होतं आणि त्याने धावतच येऊन तिच्या कानाखाली आवाज काढला ...घरात पूर्ण शांत वातावरण होत आणि संपूर्ण चाळ त्यांचं भांडन एकत होती ..त्याच मन येवढ्यानेच भरलं नाही म्हणून तिच्या केसांना घट्ट पकडून तो म्हणाला , " हो तू आहेस नीच !! तू काय काय करतेस ते आम्हाला माहिती नाही की काय ?..साली फोनवर बोलत असली आणि मी दिसलो की लगेच बंद करते ..बाजारात जाताना सुद्धा हसून खिदळून त्याच्याशी बोलतेस ..तुला लाज वगैरे आहे की नाही ..मी हात लावला तर सालीला काटे टोचतात आणि तो हात लावत असेल तर मस्त वाटत असेल ना तुला .."

तो इतकं बोललाच होता की तिने त्याचा हात सोडवत त्याला बाजूला केले आणि म्हणाली , " खबरदार माझ्या चरित्र्यवर शंका घेतली तर !! ..मुलगी लहान आहे म्हणून हात लावू दिला नाही तर तू इतके घाणेरडे आरोप करशील माझ्यावर ..तू समजून काय ठेवलस मला ..फोनवर बोलतेस हे एकल मग कधी येऊन विचारलं का नाही ..मी सांगितलं असत कुणाशी बोलते तर ..इतक्या दिवसापासून फक्त नि फक्त सहन करत आले तेव्हा मनमोकळं करण्यासाठी अनुशी बोलत होते आणि आज माझा मित्र आला होता त्याच्या लग्नाचं कार्ड घेऊन तर त्याच्याशीच बोलत होते ..हे बघ ते कार्ड "

ती कार्ड आणायला जाणारच तेवढ्यात तो म्हणाला , " नको आम्हाला काहीच ..कळलं तू कशी आहेस ते ..साली बिच ..चल निघ माझ्या घरातून ..तुझ्यासारख्या मुलीसाठी माझ्या घरी कुठलीच जागा नाही .."

नित्या मृन्मयच बोलणं ऐकून शॉकच झाली ..तिला वाटत तो रागात बोलत असेल पण सासूबाई म्हणाल्या , " मला वाटलंच तू अशीच असणार ..आमचं घरच बुडवायला आली होतीस तू ..बर झाला आताच तुझं सत्य बाहेर आल तर नाही तर घरच बरबाद करून सोडलं असतस ..."

सासूबाई तिचा हात पकडून घरातून बाहेर काढू लागल्या ..नित्याने जोराने त्यांच्या हात सोडविला आणि आपल्या मुलीकडे धावत गेली ..संध्याला हातात उचलून बाहेर जाऊ लागली तेव्हा जबरीने मृन्मयने संध्याला तिच्या हातातून सोडवल आणि म्हणाला , " पोरगी आमची आहे ..तुला जिथे तोंड काळ करायचं असेल तिथे कर पुन्हा इथे पाऊल टाकायचं नाही .."

मृन्मयने संध्याला आपल्या आईकडे दिल नि नित्याचा हात पकडून तिला बाहेर फेकले ..बाहेर फेकताच दार आत लावून घेतले ..बाजूला चाळीतले सर्व लोक नित्याकडे पाहत होते ..नित्या वारंवार दार ठोठावत होती पण कुणीही उघडलं नाही ..तिचा जीव संध्यासाठी तुटत होता पण मृन्मयने संध्याला सोबत नेऊ दिलं नव्हतं शेवटी हार मानून नित्या खाली जाऊ लागली ।. तेव्हा रात्रीचे 1 वाजले होते ..नित्याला कुठे जायचं काहीच माहीत नव्हतं तरीही ती चालत होती ..ना हातात पैसे ना अंगावर धड कपडे ..ती फक्त चालत होती ..कधीतरी मागे वळून पाहत होती पण तिच्यासाठी दार कुणीच उघडले नाही ..

ये आशिया है मुसाफिरो का
किस पे किसका जोर
वक्त निकलते ही भूल जाना फितरत इनकी
और ये हमको केहते है कमजोर

नित्या समोर समोर चालू लागली ..बाबांकडे जायचं म्हटलं तर हातात पैसे नव्हते आणि सोबत मोबाइलही नव्हता ..अंगात फक्त गाऊन घालून अनवाणी पायाने ती रस्त्याने चालत होती ..आज ती पहिल्यांदाच अशी एकटी निघाली होती ..त्यातही रात्रीचे दीड वाजत आले होते ..दूरवरून कुठेतरी कुत्र्याचा भूकण्याचा आवाज येऊ लागला होता त्यामुळे ती फारच घाबरली होती ..तर थोड्या अंतरावरच काही माणसे तिला गोळा होऊन दिसली ..बहुतेक त्यांनीही दारू घेतली होती ..तिला ती माणसे दिसली आणि नित्या त्यांच्यापासून दूर पळू लागली ..चालत असताना तिच्या पायांना इजा होऊ लागली होती पण तरीही ती थांबली नाही..भीतीच्या आकांताने ती दूरवर पळू लागली ..ती पळता - पळता खूप समोर निघून आली होती तरीही कुणीतरी आपला पाठलाग करत आहेस अस समजून ती सतत मागे पाहू लागली ..हृदयाची गती अधिकच वाढली होती आणि तिचा चेहराही घामाने भरून निघाला होता ..तिला वाटत होतं की कुठंतरी बसून पाणी प्यावे पण त्या सुनसान स्थळी आपल्याला कुणी काही तरी करेल म्हणून ती चालतच होती ..काही दूर अंतरावर तिला काही लोक गोळा होऊन दिसले आणि क्षणाचाही विलंब न करता ती तिथे पोहोचली ..तिथे पोहोचल्यावर तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की तो रेड लाइट एरिया आहे पण सध्या ती इथेच सेफ राहू शकत होती त्यामुळे एक कोपरा पाहून ती तिथेच बसली ..रात्रीची प्रहर उलटून जात होती ..संपूर्ण जग झोपी जाऊ लागलं होतं तर नित्याचे डोळे आताही उघडेच होते ..ती येणाऱ्या जाणाऱ्या सर्व माणसांकडे निरखून लक्ष देत होती आणि तिच्या मनात आणखीच भीती घर करू लागली ..त्यातही कधीतरी तिचा डोळा लागायचा पण आपल्याकडे कुणी येत आहे असं वाटून ती डोळे उघडे करून पाहू लागायची ..आज प्रत्यक्षात तिने देह बाजार पाहिला होता ..पुरुष तिथे येऊन स्त्रियांना शरीर संबंधासाठी विचारत होते आणि त्याही काही पैशांसाठी आपलं शरीर विकत होत्या ..नित्याला आधीच भूक लागली होती त्यात भीतीने तीच अवसान गळून पडाल होत ..ती समोर पाहतच होती की तिच्याजवळ एक पुरुष येत म्हणाला , " बाई कितना लोगे ? "

त्याच्या प्रश्नाने नित्याचे डोळे पुन्हा एकदा भरून आले होते..तिला स्वतःच्या जगण्याची लाज वाटू लागली ..तो बराच वेळ तिला विचारत होता पण नित्या काहीच बोलत नसल्याने शिवाय तिच्या डोळ्यात अश्रू आल्याने तो इसम समोर जाऊ लागला तर नित्या आपले कपडे नीट करत तिथून पुढे निघाली ..त्यावेळी साधारणपणे 3 वाजले होते ..भुकेने पोटाला खड्डा पडला होता आणि पूढे चालत राहण्याची शक्ती देखील तिच्यात नव्हती ..कुठेतरी थांबन गरजेचं होतं म्हणून तिने थांबायचा निर्णय घेतला ..बाजूला भल मोठं दुकान होत ..त्याच्या एका कोपर्याला जाऊन ती बसून राहिली ..अंगावर काहीच नव्हतं आणि थंडीही वाजू लागली होती ..थंडीने कुळकुळत ती एकटीच बसून होती ..कधीतरी तिचा डोळा लागायचा पण आपल्याला कुणी काहीतरी करेल या भीतीने पुन्हा ती डोळे उघडायची ..झोप न झाल्याने तिचे डोळे लाल झालं होते आणि त्याच डोळ्यात अश्रू होते ..तिला असंख्य वेदना झाल्या होत्या पण ऐकणार कुणी नव्हत ..

ती पहाटेची वेळ होती ..बहुदा पहाटे पहाटे नित्याचा डोळा लागला होता ..तेवढ्यात तिला कुणीतरी आवाज दिला आणि ती खडबडून जागी झाली ..समोर बघितलं तर त्या साफसफाई करणाऱ्या काकू होत्या ..नित्याने भीतीचा आवंढा गिळला आणि तिथून उठू लागली ..अशक्तपनाने तिला उठण होत नव्हतं हे पाहून त्या काकूने तिला सहारा दिला आणि बाजूला बसविले ..नित्याचा गळा पूर्णपणे कोरडा झाला होता त्यामुळे काकू तिला पाणी देऊ लागल्या ..नित्याने घटघट सर्व बॉटल रिकामी केली ..ती आता बरी आहे हे पाहून काकू म्हणाल्या , " बाळा इथे एकटीच का झोपली आहेस ? ..तुला कुणी घरचे नाहीत का ? "

त्यांनी प्रश्न विचाराव आणि नित्याने साठवून ठेवलेले अश्रू बाहेर आले..ती काकूंचा हात पकडून रडत होती ..तर काकूही तिला समजावत होत्या ..काही वेळ रडून झाल्यावर नित्या म्हणाली , " काकू मला माझ्या नवऱ्याने इतक्या रात्री घराबाहेर काढल..हातात पैसे पण नव्हते म्हणून इथेच झोपी गेले .."

काकू विचार करत म्हणाल्या , " बाळ तू कुठे राहतेस ? "

नित्या खिन्न मनाने उत्तरली , " काकू बाबा विरारला राहतात .."

विरार तिथून फार दूर होत ..काकूंनी क्षणात आपल्या पर्समध्ये हात टाकला आणि त्यातून 500 ची नोट तिला देत म्हणाली , " बेटा तुझी अवस्था ठीक नाहीये तर हे पैसे घे आणि लवकर घरी जा ..तुझी सर्व काळजी करत असतील .."

नित्या नाही नाही म्हणत असतानाही काकूंनी एकल नाही आणि नित्याला पैसे घ्यावे लागले ..काकूंचे आभार मानत नित्या समोर जाऊ लागली .नित्या समोर जात असतानाही तिची नजर मागे बसलेल्या काकूंकडे जात होती ..जिथे आपले लोक पार्क्यांसारखं वागतात तिथे काही चांगले लोक आहेत हे बघून तिला समाधान मिळालं होतं आणि डोळ्यात अश्रूही आले होते ..

मोहब्बत सिखी है हमने
अकसर मुसाफिरो से
अपणो तो जिने का
वजूद छिन लिया ..

समोरच बस स्टॉप होत पण भिकार्यासारखी अवस्था झाली असताना तिला बसमधून प्रवास करणे योग्य वाटले नाही म्हणून तिने लगेच ओला बुक केली आणि बाबांच्या घराकडे जाऊ लागली ..

ती टॅक्सी मध्ये एकटीच बसली होती आणि डोक्यात असंख्य विचार होते ..तिला माहीत होतं की मृन्मयने आतापर्यंत बाबाना सर्व कळविल असेल तेव्हा ते सुद्धा आपल्याला चुकीच म्हणतील ..त्यांनीही घरातून बाहेर काढलं म्हणजे ? एक मन तिला सांगत होत आणि दुसर मन म्हणत होत की ते नाही काढणार ..शेवटी ते माझं पण घर आहे ..बघूच कसे बाहेर काढतात ..आजपर्यंत खुप एकल दुसर्याच पण आता स्वतःला हवं तसं करायचं हा विचार पक्का करून ती प्रवास करू लागली..टॅक्सी वाल्याने घर आल म्हटल्यावर ती भानावर आली आणि पैसे देऊन बाहेर आली ..तिला समोरच घर दिसत होतं पण घरात काय तमाशे होतील याची आणखी भीती होती पण मन घट्ट करत ती एक एक पाऊल पुढे टाकू लागली..

क्रमशः ..