Sparsh - 15 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 15 )करती रहे दुनिया हर बार बेआबरु तो क्या
दुनिया की समझसे परे कुछ हमारी समझ है
दे देणा तुम बददुवा हमारी याद मे अगर तेरा दिलं करे
और हम हसकर तेरी दुवा कबूल हो ये ईस्तेकबाल करे


नित्याने पहिल्यांदाच एकटीने स्वतःची वाट ठरवली होती ..कारण त्यात तिला कुणीच साथ दिली नव्हती ..तिच्या वडिलांनी नित्याने जे केलं ते सर्व घरच्याना सांगितलं आणि तिला समजवायला घरात रांगाच रांगा लागू लागल्या ..कधी आजोबा तर कधी आजी तर कधी मामा मावशी प्रत्येक व्यक्ती तिला झालं गेलं विसरून जायला सांगत होता जणू सर्व काही तिनेच चुकीच केलं होतं पण ती योग्य आहे असं म्हणणारा तिला एकही व्यक्ती सापडला नाही ..तिच्या भावना तिच्या सख्या लोकणा सुद्धा समजल्या नव्हत्या ..त्यामुळे ती जास्त दुःखी झाली होती ..तशी ती शांत राहायची पण अलीकडे तिला रागही पटकनच यायचा ..घरच्यांचं रोजच रोज एकच एक एकूण ती कंटाळली की मग सर्वांवर ओरडायचीच नि सर्व लोक मान खाली टाकून घरी परत जायचे ..आजी आजोबांना देखील तिने खडे बोल सुनावले होते ..ती अशी वागते आहे म्हणून तिच्या बाबांनीदेखील तिच्याशी बोलणे टाकून दिले होते ..आई होती पण सावत्र ..जी संपूर्ण चाळीत भांडण करण्यासाठी प्रसिद्ध होती ..सुरुवातीला शांत राहणाऱ्या आईने नंतर नंतर आपलं खर रूप दाखवायला सुरुवात केली ..छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला टोमणे मारन सुरू झालं ..नित्या आधीच मनातून खचली असताना त्यांचे शब्द सरळ तिच्या मनाला जाऊन लागत आणि नित्या दिवसेंदिवस एकटी पडत जाऊ लागली ..काहीच दिवसात नित्याला कळून चुकलं होत की आपण निवडलेली वाट वाटते तितकी सोपी नाही ..विशेष म्हणजे या घरात राहून तरी आपण आपला रस्ता निवडू शकत नाही त्यामुळे ती त्या घरातून बाहेर पडण्याची संधि शोधू लागली ..

दोन - तीन महिने झाले होते .. नित्या नावाड्यासारखं जीवन जगत होती ..प्रवास रोजचाच होता पण जायचंही कुठेच नव्हतं ..ती स्वतातच इतकी हरवली होती की तिला बाकी गोष्टींच भान नव्हतं ..सासूबाईने तिला जितका सासुरवास केला नसेल तितका सासुरवास तिची आई करत होती ..नित्या सुरुवातीला घरात एकटीच बसून राहायची पण नंतर आई ओरडू लागल्याने स्वतःच घरची सर्व कामे करू लागली ..ती त्या घरात तर राहत होती पण जणू ती त्या घराचा भाग नव्हतीच असे तिच्यासोबत सर्व वागत असत ..आईने सर्व काम तिच्यावर सोपवले आणि ती मजेत दिवस घालवत असे ..तिला कामाचीच नि बोल खाण्याची आधीच सवय झाली होती त्यामुळे तीही कुणालाच काही बोलत नव्हती ..उलट सर्व काही सहन करून त्या विश्वातून बाहेर निघण्याची संधी शोधू लागली ..

अशीच एक सायंकाळ ..नित्या दिवसभराचे काम करून थकली आणि झोपी गेली होती ..बराच वेळ झाला ती उठली नाही म्हणून आईने तिच्या नावाने ओरडायला सुरुवात केली ..नित्या आधीच थकली होती शिवाय अंगात थोडी कणकण जाणवू लागली असल्याने ती बराच वेळ झोपली होती ..आईचे शब्द एकूण ती उठली ..तिने डोळे उघडून बघितलं तेव्हा समोर बाबा होते आणि आई बाबाना सर्व काही सांगत होती ..नित्याने डोळ्यावरून पाणी घेतलं आणि आईच्या समोर जाऊन उभी राहिली ..तिला पाहताच आई बाबाना म्हणाली , " बघा कशी घोरत आहे ..काम नाही ना धंदा ..नवरा थोडस बोलला म्हणून इथे येऊन पडून आहे ..तिला सांगा चार गोष्टी ..माझं तर एकतच नाही ही पोरगी ..शेवटी मी सावत्रच आई ना !! तुम्ही तर समजवा आपल्या लेकीला की अस पोरीच्या जातीने माहेरी राहणं बर वाटत नाही ..आपली इज्जत जाते .."

नित्याने बघितलं बाबा काहीच बोलत नव्हते पण आईने अजूनही आपल्या तोंडावर आवर घातला नाही हे पाहून नित्या म्हणाली , " तुला केव्हापासून माझी काळजी व्हायला लागली ग!! जेव्हा मी बाळंतीण होते तेव्हा तर आली नाहीस ..म्हणे पाऊस होता ..आईची माया असती तर धावत आली असतीस एवढ्या पाण्यातही ..मी तर तुलाच आई मानते पण तूच सावत्रपणाचा आव आणतेस..आणि ही खोटी माया तू तर दाखवूच नकोस ..तुला मी आपल्या सासरी का जात नाहीये याचा त्रास होत नाहीये तर मी तुमच्या संपत्तीत हिस्सा मागेन याचा त्रास होतोय ..मी लहान आहे का ? कळत मला सर्व ..लहानपानापासून पाहतच आले आहे सर्व .."

नित्याचे शब्द एकूण तिच्या डोळ्यात पाणी आले ..आई नित्याला बोलत होती तेव्हा बाबा काहीच म्हणाले नव्हते तेव्हा नित्याचे अश्रूही त्यांना दिसले नव्हते पण आईचे अश्रू त्यांना लगेच दिसले आणि नित्यावर ओरडत म्हणाले , " आपल्या आईशी कुणी अस बोलतात का ? तू इतकी निर्लज्ज होशील अस कधी वाटलंच नव्हतं ..आमच्यात घरात राहून आमच्याशि अस वागताना कस काही वाटत नाही तुला .."

बाबा नित्याला बोलल्यामुळे तिच्याही डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली , " तुम्हाला तर आईचेच अश्रू दिसतात ..मी तर कधी तुमच्या आयुष्यात नव्हतेच म्हणून लग्न करून पाठवुन दिल नि आता त्याची चूक आहे हे माहीत असतानाही मला त्यांच्याकडे पाठवायला निघालात .बाप म्हणून तुम्ही कोणतं कर्तव्य पाळल , ते तरी सांगा ...तुम्ही आपलं घर म्हणता ना तर हेही विसरू नका माझंही घर आहे हे ..आणि मी इथून कुठेच जाणार नाही ..तुम्हाला हवं ते करा आणि तुमच्या बायकोला म्हणा खोटी माया दाखवत जाऊ नको ..कुणाला माझी काळजी आहे हे कळत मला .."

तिचे शब्द ऐकताच बाबांनी तिच्या कानावर फाडकन वाजवली ..काही वेळ रूममध्ये जीवघेणी शांतता पसरली ..नित्या रडत रडतच बाहेर पडली ..आज बाबांनी तिच्यावर हात उचलून ती त्यांच्यासाठी काय आहे हे दाखवून दिलं होतं ..ती आपले अश्रू पुसत थोड्या दूर अंतरावर असलेल्या गार्डनला पोहोचली ..आजूबाजूला छोटे मूल , वयोवृद्ध सर्व लोक खेळत होते ..तर नित्या एका बेंचवर येऊन बसली ..तिने रडणं बंद केलं आणि आजूबाजूचा परिसर बघण्यात व्यस्त झाली ..आज जे घडलं त्याचा तिने कधी विचारही केला नव्हता ..त्यामुळे ती गोष्ट तिच्या मनात बसली होती ..तरीही नित्या ती गोष्ट विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती ..छोटे मूल खेळताना ती त्यांना पाहायची त्यामुळे थोडं फार ती विसरायची पण पुढच्याच क्षणी तिला पून्हा बाबांनी मारलेल आठवायच आणि ती उदास व्हायची ..असाच खेळ सुरू असताना एक चिमुकली नित्याचा समोर येऊन उभी राहिली ..ती बहुतेक आपल्या आईपासून लपत होती .आई तिला पकडायला समोर आली की ती मागे लपायची ..आणि आईला आपण भेटत नाही हे पाहून तिला आणखीच मज्जा यायची ..आईपासून लपत - लपत ती नित्याच्या पायाला पकडून बसली ..नित्या तिच्याकडे पाहू लागली आणि तीही खूप गोड हसू घेऊन तिच्याकडे पाहू लागली ..तिला बघुन नित्याचा चेहरा बदलला आणि त्यावर हसू खुलून आलं ..तिने नित्याचे पाय पकडले बघून नित्या तिला म्हणाली , " काय बघते आहेस !! " तर ती मुलगी हसून नकारार्थी मान हलवत होती ..ती छोटीशी मुलगी नित्यच्या मनाचा वेध घेत होती ..नित्याने तिला उचलून बेंचवर बसवले आणि तिच्याकडे पाहू लागली ..काहीच क्षणात तिची आई दम टाकत तिच्याजवळ पोहोचली आणि नित्याच्या बाजूला बसत म्हणाली , " आमची सोनूना फार खोडकर झाली आहे बघा किती सतावते मला पण मस्त आहे हा कुणाला त्रास देत नाही .."

नित्या तिच्याशी कामपूरतच बोलत होती ..तर ती छोटीशी मुलगी नित्याच्या कानातल्या ईअर रिंगसोबत खेळत होती ..तिची आई तिला खाली बसवत गेली की ती पुन्हा उठून तिच्या कानाला हात लावत होती ..आणि तिला आणखीच मज्जा येत असे ..त्या छोट्याशा मुलीच्या हसूने नित्याचा मूडच बद्दलवला ..नित्याही तिला काही करण्यापासून मनाई करत नव्हती ..बराच वेळ बोलल्यानंतर ती मुलगी जाऊ लागली ..तर नित्या तिच्याकडे पाहू लागली ..काही वेळ तीच लक्ष नव्हतं पण थोड्या दूर गेल्यावर त्या मुलीने आपल्या कोमल हाताने बाय बाय चा इशारा केला आणि नित्याही हात हलवू लागली ..ती आली आणि तशी गेली पण नित्याचा मूड मात्र छान झाला ..नित्या पार्कमध्ये येऊन बराच वेळ झाला होता त्यामुळे सर्व काही विसरून ती पुन्हा घरी परतली...

नित्या घरी आली आणि सरळ आतल्या खोलीत जाऊन बसली ..घरच्याना नित्यावर राग आला असल्याने त्यांनी तिला जेवायला बोलावले नाही व नित्याही जाणूनच जेवायला गेली नाही ..आज त्या छोट्या मुलीला पार्क मध्ये बघितल्यापासून नित्याला संध्याची फारच आठवण येत होती ..जेव्हापासून ती घरातून बाहेर पडली होती तेव्हापासून एक क्षण देखील ती आपल्या मुलीला विसरु शकली नव्हती ..तिला वाटलं होतं की कमीत कमी मृन्मय तरी आपल्याला एकदा कॉल करून तिच्याशी बोलू देईल पण मृन्मय रागावून गेल्यापासून त्याने एकदाही तिला कॉल केला नव्हता ..तिला त्यांचं काही घेणं देणं नव्हतं पण संध्या तिचा जीव की प्राण होती त्यामुळे तिची आठवण नित्याला सदैव सतावत असे ..संध्याला नित्यपासून तोडून त्यांनी तिला आणखीच दुःख दिलं होत ..मागील काही दिवसात तिला सर्व चुकीच बोलले होते पण तिची अवस्था कुणीही समजून घेतली नव्हती ..संध्याचा विचार करून नित्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू येत असत पण आज तिला सावरण खूपच कठीण झालं होतं ।.संध्याचा फक्त एकदा आवाज एकता यावा म्हणून ती आसुसली होती ..तीच एक मन म्हणत होत की काहीही होऊ दे पण एकदा त्याला कॉल कर तर दुसर मन म्हणत होत की कॉल नको करू ..कारण तू कॉल केलास तर तू मृन्मयसमोर हरली आहेस अस वाटेल ..तरीही तिने मन घट्ट करून कॉल करायचं ठरवलं ..तिचे बोट कीपॅड वर पोहोचलेच होते की त्याचे ते क्रूर शब्द आठवले..तिने हात मागे खेचून घेतला आणि मोबाइल बाजूला फेकून दिला ..तरीही तीच मन काही शांत झाल नव्हतं ..संध्याचा आठवणीत ती आज ती आज खूपच एकट फील करू लागली होती ..रात्रभर फक्त आपल्या लेकीचे विचार तिच्या मनात घर करत होते ..ती कधी या बाजूला वळत जाई तर कधी त्या बाजूला पण आज तिला काही झोप येत नव्हती ..आपली मुलगी काय करत असेल , ती आपल्याविना कशी जगत असेल या विचारांनी तिला हैरान करून सोडलं होत ..तिला आपली मुलगी हवी होती पण ते शक्य नसल्याच तिला जाणवू लागल होत ..बऱ्याचदा तिने विचार केला होता की बाबा आपल्याला साथ देतील तर तिला आणता येईल पण त्याना नित्याच नकोशी झालेली असताना संध्याला परत आणण्याचा विचार केवळ विचारच बनून राहिला होता ....रात्रभर विचारांती तिला पहाटे पहाटे झोप लागली ..


क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED