स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 20 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 20 )

कोई आरजु नही तुझसे बडी


नो कोई अरमान है
तलाश है ऊस पल की मुझे
जीससे जुडे दिलं के तार है

नित्याला बाबांचं घर सोडून सात वर्षे झाली होती ..या सात वर्षात बरच काही बदललं होत ..तिने फक्त जून घरच सोडलं नव्हतं तर जुनी माणसे देखील सोडली होती आणि नव्याने प्रवासाला लागली ..खर तर बाबांच्या मरणाच गिल्ट मनातून काढणं शक्य नव्हतं सुरुवातीला तिला त्याचा त्रास व्हायचा पण शुभमने तिला साथ दिल्यामुळे ती यातून बाहेर निघू शकली होती ..शुभमच्या मित्रांसोबत राहता राहता ती जून सर्व काही विसरू लागली ..पण कधीतरी त्यातल सर्व आठवायच आणि ती हैराण व्हायची त्यामुळे जास्तीत जास्त व्यस्त कस राहता येईल याचा तिने विचार केला ..इकडे मृन्मयने जणू तिची साथ सोडलीच होती ..फक्त दोनदा तो तिच्याकडे आला होता ..एकदा जेव्हा त्याची आई मरण पावली तेव्हा नाईलाज म्हणून आणि दुसऱ्यांदा तो कुठंतरी बाहेर जाणार असल्याने संध्याला तिच्याकडे सोडून गेला होता ..तो क्षण नित्याच्या आयुष्यातला फार सुंदर क्षण होता पण एका गोष्टीच वाईट देखील वाटलं होतं की ज्या मुलीला आपण जन्म दिला तीच मुलगी आपल्याला अनोळखी असल्याची जाणीव करून देते आणि तिला सांभाळण्यासाठी एखादी खेळण तिच्या हातात द्यावं लागतं ..हे दोन क्षण सोडले तर मृन्मयने तिच्याशी कधीही बोलण्याचा प्रयत्न केला नाही ..

जरी ती मावशीच्या घरी राहत असे तरी तिने स्वतःच ओझं त्यांना होऊ दिल नव्हतं ..ती मुलांच्या ट्युशन मधून येणारे पैसे त्यांना देत होती शिवाय घरचे सर्व काम करत होती ..मागचे सात वर्षे हा काळ तिच्यासाठी खूप महत्त्वाचा होता ..अस म्हणतात प्रत्येक दुःखावर इलाज वेळच असते ..वेळ जसजसा जातो तसतशा त्या जखमांच्या वेदना कमी होऊ लागतात आणि नित्याही ते सर्व विसरण्याचा प्रयत्न करत होती ..शुभमने तिचा कॉन्फिडन्स वाढवला होता त्यामुळे ती आता स्वतःसाठी जगत होती ..तिचेही अस्तित्त्व या जगात आहे हे तिला पटले होते म्हणून सर्वांच्या दूर राहून तिने आपलं एक नवीन आयुष्य उभं केलं ..नित्या घरकाम करून लहान मुलांचे ट्युशन घेऊ लागली होती ..तेव्हढच तीच मन करमत असे ..हा वेळ जाऊन सुद्धा तिला रात्री एकट एकट वाटत असे त्यातून बाहेर निघता यावं म्हणून तिने वाचनाचा छंद जोपासला ..हे वाचनच होत जे तिला ह्यातून बाहेर काढत होत आणि तिचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत होता ..अलीकडे तिने नवीन अँड्रॉइड मोबाइल घेतला होता ..त्यातही शब्दधन ( काल्पनिक ) नावाच्या अँप वर तीला साहित्य फ्री मध्ये वाचायला मिळायचं आणि तिचा वाचनात कसा दिवस निघून जायचा हे तिलाही कळायचं नाही ..तीच हे वाचनप्रेमच तिला नवीन आयुष्य देणार होत ह्यापासून ती अनभिज्ञ होती ..

नित्याने आज दुपारचे सर्व काम आवरलं आणि बेडवर येऊन पडली ..साधारणतः दुपारी घरात शांतता असे कारण सर्व आपापल्या कामात व्यस्त होती त्यामुळे नित्याने मोबाइल ओपन केला आणि आपल्या आवडीचे साहित्य शोधू लागली ..तिने बरेच प्रयत्न केले पण तिला त्यातलं काहीच आवडत नव्हतं ..सोना , पिल्लू म्हणणारे लेखक तिने बरेच वाचले होते , आता त्यात तीच मनदेखील रमत नव्हतं , तिला वाचताना कंटाळा यायचा म्हणून आज ती काहीतरी नवीन शोधत होती ..शोधता शोधता तीच लक्ष एका शिर्षकाकडे गेलं .." शब्द माझे गीत तुझे .."

नित्याला शीर्षक फार आवडल तेव्हा कुतूहल म्हणून तीने त्याची एक कविता ओपन केली ..कविता समोर होती आणि नित्या एक एक शब्द वाचू लागली ..

मै कौन हू..??
मै नूर हू, कोहिनूर हू..
मै वो हू जो तुम्हे दुनिया मे लाती हू...
कभी माँ, कभी बेटी
कभी बिवी, कभी बहन बन जाती हू..
मै वो हू जो हर रिश्ता पुरे दिलसे निभाती हू..
रिश्ते निभाते निभाते कभी खुद को भी भुल जाती हू..
मै दोस्ती हु, मै प्यार हू..
जिसकी चाहत हर भेद से परे है
मै तेरा वो यार हू...
मै सादगी हू , मै कहर हू
जो रोज़ किनारो से टकराती है
मै वो लहर हू...
तुम ढुंडोंगे मुझे कहा कहा
मै तो हरघडी हर पहर हू...
मै साया हू तेरा, तु भूल तो नही गया?
नही भुला तो फिर,क्यू मुझे छोड गया?
मै तूम्हारे वजूद का हिस्सा हू
जो कभी भूला ना पाओ़गे, मै वो किस्सा हू...
मुझसे है तुम्हारा वजूद
तूम मुझे ठुकराओगे कैसे?
चलो मान लिया ठुकरा दिया तुमने
फिर सोचा है कभी कि
इस दुनिया मे आओगे कैसे???
आज पुछती हु तूमसे,
क्या कसूर है मेरा??
कि मै इक नारी हू..???
हर रूप मे तुझे पूरा करती हू...
तेरे लिए जिती हू, तेरे लिए मरती हू...
अपनी हर सांस मे तुझे बसाती हू...
खुद रोती हू पलपल,फिर भी तुझे हसाती हू...
तेरे लिए इस जमाने से भी लढ़ जाती हू...
रोज उगती हू सूरज की तरहा
फिर उसी की तरहा ढल जाती हू...
गर हाँ.. तो सून ले तू भी...
आज से मै खुद के लिए जिना सिखूंगी..
तूझे पुरा करने से पहले, खुद को पुरा करुंगी...
सूरज की तरहा ढलना छोड
वक्त की तरहा आगे बढना जानुंगी..
तूम चाहे लढो़ ना लढो़
मै खूद के लिए लढना चाहूंगी...
हर बुलंदी को छू जाऊंगी..
हर मंजी़ल अपने कदमों मे लाऊंगी...
फिर पूछेगा तू मुझसे,
तूम कौन हो..??
मै नारी हूँ..
मै आज भी खूद को नारी कहती हू..
मै कल भी खुद को नारी कहलाना चाहूंगी..
मै हमेशा इक नारी ही कहलाऊंगी..
नारी ही कहलाऊंगी....

एक एक शब्द वाचताना ती कवितेत केव्हा हरवली ते तिलाच कळले नाही ..जणू तिच्या वेदना त्या प्रत्येक ओळीत साठवून ठेवल्या होत्या ..कविता वाचूनही तीच मन भरलं नव्हतं त्यामुळे तीच कविता तिने पुन्हा दोनदा वाचून काढली ..आज खूप दिवसांनी तिला एखाद साहित्य वाचून समाधान मिळालं होतं आणि तिच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली की ही कविता इतकी सुंदर असेल तर बाकीच्या किती सुंदर असतील ..एखादी कवी / कवयित्री इतक्या सुंदर पद्धतीने मनातले भाव समोर मांडते आणि आपण वाचनात तल्लीन होतो अस पहिल्यांदाच तिच्यासोबत घडत होतं म्हणून की काय तिला त्या लेखकाचे साहित्य वाचण्याचा मोह आवरत नव्हता आणि तिने त्याची प्रोफाइल चेक केली त्यावर सत्तर - ऐंशी लेख आणि तेवढ्याच कविता होत्या ..इतक्या सर्व कविता बघून ती थोडी गोंधळलीच ..ती सर्व कविता वाचणारच तेवढ्यात शुभम आतमध्ये आला आणि नित्याला जेवण वाढण्यासाठी उठाव लागलं ..त्यानंतर बाहेरून मावशी आणि शुभमचा लहान भाऊही आला आणि घरात गोंधळ वाढला त्या नादात तीच साहित्य वाचायचं राहूनच गेलं ..सायंकाळचे काम करताना तर ते तिच्या डोक्यातून निघून गेल ..शेवटी सर्वांची जेवण झाली आणि नित्या एकटीच आपल्या रूम मध्ये येऊन बसली ..मावशी बाजूला झोपी गेली होती आणि नित्याने मोबाइल ओपन केला ..तिने तिच कविता ओपन केली तेव्हा जाणवलं की कवितेवर भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत ..कितीतरी तरी मुलींनि कवितेवर मन मोकळं केलं होतं ..ती प्रतिक्रिया वाचण्यात गुंग होती आणि त्यात लेखकाचे उत्तर येत होते ..अगदी समर्पक भाषेत तो प्रत्येक उत्तर देत होता ..नित्यालाही त्याला काहीतरी विचारायचं होत पण तिची हिम्मत झाली नाही ..पण त्याचे लिखाण वाचण्याचा मोह मात्र तिला आवरता आला नाही ..त्याने कमेंट केल्या होत्या त्यावरून तिला कळलं होतं की तो पुरुष आहे आणि पुरुष इतक्या सुंदर पद्धतिने एक मुलीच्या भावना समजून घेतो याकडेच जणू ती आकर्षिल्या गेली होती ..

त्या रात्रीपासून नित्याने त्याच सर्व साहित्य वाचायला घेतल ..एकशे एक दर्जेदार कविता आणि त्याही अगदी सोप्या भाषेत ..वाचताना अंगावर काटा यायचा आणि कधी डोळयातून पाणी यायचं ते सुद्धा कळत नव्हतं..

सिर्फ अल्फाज पढकरही
गुम हो गये है तुझमे
जरूर कुछ तो था
तेरे मेरे दरमिया

तर कधी कधी रडताना अचानक ओठांवर हसू आणणाऱ्या त्याच्या कविता वाचून ती वेगळ्याच जगात हरवली जायचीं ..काहीतरी जादू होती त्याच्या शब्दात की नित्याला वाचताना भानच राहत नसे ..खर प्रेम काय असत हे तो आपल्या कवितांतून उत्तम रीतीने मांडत होता ।.अगदी काहीसे सारखेच विचार नित्याचे असल्याने तीही त्याच्या कवितांची फॅन झाली होती तर इकडे त्याचे लेखन तिच्या मनाला सुखावून जाई ..तो फार तर लेख लिहायचा किंवा मग कविता पण त्याने कथा लिहिल्या नव्हता .नित्याने त्याच्या पूर्ण कविता वाचून काढल्या आणि लेख वाचायला हाती घेतले ..तरुण पिढीवर आणि विशेषतः आजच्या सामाजिक जीवनावर भाष्य करणारे त्याचे लेख तिच्या मनाला सुखावून जायचे कारण तिने सतत स्त्रीची अवहेलना करणारे पुरुषच पाहिले होते तेव्हा असा एक पुरुष इतक्या सुंदर पद्धतीने जीवन मांडतो याबद्दल तिला अभिमान वाटू लागला ..तिने सुमारे महिनाभरात त्यांच संपूर्ण साहित्य वाचून काढलं होत ..साहित्य जरी पूर्ण वाचलं तरी तिने प्रतिक्रिया मात्र कधीच दिली नव्हती ..त्याचे सर्व साहित्य वाचून झाले होते तरीही त्याच खूप दिवसापासून कुठलेही साहित्य आले नव्हते ..ती त्याच साहित्य वाचायला उत्सुक होती पण ते येत नव्हतं ..त्यामुळे तिला त्याचा राग येऊ लागला ..मग फावल्या वेळात तिने त्याच्या सर्व साहित्यांवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली ..प्रतिक्रिया दिल्या तरीही त्याचे उत्तर येत नाही म्हणून तिने त्याचे साहित्य वाचनेच बंद केले आणि नेहमीप्रमाणे इतर कथा वाचण्यात व्यस्त झाली ।. अशाच एका दिवशी तिने मोबाइल ओपन केला तर तिच्या प्रतिक्रियेवर त्याने परत कमेंट केल्या होत्या . त्याने प्रत्येक कमेंटमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितली होती की आजपर्यंतच्या सर्वात सुंदर प्रतिक्रिया तिनेच त्याला दिल्या आहेत ..ती एक एक प्रतिक्रिया वाचत होती आणि त्यात तेच उत्तर सापडत होत ..ती त्याचे उत्तर वाचून स्वतावरच हसू लागली पण जाणूनच तिने त्याचे उत्तर देणे टाळले होते ..पण हे खर होत की त्याने केलेल्या कमेंट्स वारंवार वाचू लागली होती ..नित्यासोबत हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिलाही ते आनंद देऊन जात होतं ...

अस करत असताना तिला स्वतःवरच हसू यायचं . आपल्याला कुणी इतकं सुंदर लिहितेस हे म्हटलंय एकूण तिला फार मज्जा यायची त्यातही त्या व्यक्तीने ज्याच सर्वात जास्त लिखाण तिला आवडत होत ..त्यामुळे त्या प्रतिक्रिया परत परत वाचण्याची मज्जाच वेगळी होती ..ती रोज तेच करायची आजही दुपारी तिने कविता वाचायला मोबाइल हाती घेतला ..तर तिला जाणवलं की आपल्याला एक मॅसेज आला आहे ..तिने मॅसेज बॉक्स ओपन करून पाहिला नि शॉकच झाली ..वर लिहून होत " शब्द माझे गीत तुझे .." तिने लगेचच मॅसेज ओपन करून पाहिला आणि त्यात फक्त एक शब्द होता

📱हाय ..

आपल्या आवडत्या लेखकाने आपल्याला मॅसेज केलाय हे बघून तिलाच फार आनंद झाला होता पण तिने त्याला काही उत्तर दिले नाही ..सुमारे पंधरा मिनिटं ती त्या मॅसेजकडे पाहत जाई आणि पुन्हा कविता वाचायला घेत जाई ..शेवटी तिला राहवलं आणि तिनेही , " हाय " म्हणून रिप्लाय पाठवला ..तिने विचारच केला नाही आणि क्षणात समोरून रिप्लाय आला

📱मिस नित्या आम्ही केव्हाची वाट पाहतोय तुम्ही कमेंटवर उत्तर देण्याची पण तुम्ही काही उत्तर देईना म्हणून म्हटलं चला आज आपणच मॅसेज करून पहावं .."

त्याचा मॅसेज पाहून नित्याला गंमतच वाटली आणि त्याची खेचायला तिने मॅसेज केला

📱 इतक्या मोठ्या लेखकाला कमेंट करायला शब्द सापडत नव्हते हो!! म्हणून उत्तर दिलं नाही ..तुमच्यासमोर आम्ही बोलावं तरी काय !! ..

समोरून उत्तर देत तो म्हणाला ,

📱अच्छा म्हणजे आज तुम्ही माझी खेचायच्या मूड मध्ये आहात तर ? "

नित्याला त्याच बोलणं गंमतशीर वाटत होतं आणि त्यांचे शब्द वाचून तिच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू पसरल..तरीही त्याला वाईट वाटू नये म्हणून तिने मॅसेज केला

📱 सॉरी हा मिस्टर !!! गंमत करत होते

आणि तो गमतीच्या स्वरात म्हणाला ,

📱 बडे बडे देशो मे छोटी छोटी बाते होती रेहती है सेनोरीटा ..उस्के लिये किसी पे गुस्सा क्यू होणा ?

ती त्याचा मॅसेज पाहून आणखीच हसू लागली ..त्याचे मॅसेज पाहून ती मनातच म्हणाली , " किती फिल्मी आहेस ..म्हणूनच तुझ्यावर मुली लट्टू होत असतील बघ ""..मनात विचार करून तिचा चेहरा आणखीच प्रफुल्लित झाला होता ..हसून हसून तीच पोट दुखायला लागलं होतं ..तेव्हा तिने स्वतःला आवरत पून्हा म्हटले

📱शोभता हा लेखक महाशय !!..खूप छान गंडवता तुम्ही आम्हाला ..तेव्हाच तर इतक्या सर्व फिमेल फॅन्स आहेत तुमच्या !!

तोही गमतीच्या मूड मध्ये होता ..तो लगेच म्हणाला ,

📱आता लोकच गंडतात तर त्यात आम्ही काय करू !!.आवडत त्यांना हे काल्पनिक जग म्हणून तर त्यांना आमचं हे सर्व आवडत आणि राहिला मुलींचा प्रश्न.. त्यांना बोलत करणं खरच खूप कठीण असत त्यामुळे जर त्या गंडत असतील तर नक्कीच काहीतरी आपल्या लिखाणात आहे ..ते तुम्हाला नाही कळणार नित्याजी!!

आज कितीतरी दिवसांनी ती इतकी खळखळून हसत होती ..हसू आवरत नाही की तो पुन्हा अस काही गमतीशीर बोलायचा की आपसूकच तिचा चेहरा खुलून यायचा ..त्याच बोलणं तिला आवडत होत पण त्याला आपण एक खडूस मुलगी आहोत हे भासवत ती म्हणाली ,

📱बाय द वे तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू मिस्टर

समोरून तो मॅसेज करत म्हणाला ,

📱 कॉल मी सारांश ..हो विचार न त्यात काय!! .."

आणि नित्या दबकतच विचारून गेली ..

📱तुम्ही जे लेख लिहिता ते विषय कुठून सापडतात तुम्हाला आणि इतकं अभ्यासपूर्ण लेखन जमत तरी कसं तुम्हाला .."

आणि तोही गंभीर होत म्हणाला

📱सोपं आहे ग शोधलं की सापडत फक्त शोधण्याची मनात इच्छा असायला हवी ..विषय वाचकच शेअर करतात त्यांच्या प्रतिक्रियामधून फक्त त्यांच्या नकळत ते मी चोरून घेतो..आणि अभ्यासाच म्हणशील तर तो फार जास्त नाहीये ..विषय समाजातच सापडतात फक्त लोकांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला इच्छा नसते तर मी देतो बस एवढा फरक ..लिखाण करण्यामागचा हेतू देखील एकच आहे , जर ह्या लेखनाने कुणा एका व्यक्तीच्या आयुष्यात जरी फरक आला तरी स्वतःला समाधान मिळेल ..

नित्याही लगेच त्याला म्हणाली ,

📱इतकं सोपं असत का रे मूव्ह करणं ?."

आणि तो हसण्याच सिम्बॉल सेंड करत म्हणाला

📱सोपं काहीच नसते बालिके पण ते कितपत अवघड करून ठेवायचं हे आपल्यावरच असत ..बाय द वे मिस नित्या तुम्ही माझं पूर्ण साहित्य वाचलं फक्त स्टेटस सोडून .. ते एकदा वाचून बघा..त्यात तुझं उत्तर आहे .वाच मिळेल उत्तर ...चल मी आवरतो बोलू नंतर ..

बाय म्हणत तो ऑफलाइन गेला ..

तर नित्या त्यांच स्टेटस वाचू लागली ..त्यात लिहिलं होतं .." माणूस जीवनात फारच अपेक्षा करतो आणि त्या पूर्ण झाल्या नाही की मग दुःख करतो ..तेव्हा अपेक्षा करू नये ..जेव्हा आपण कुठलीही अपेक्षा करत नाही तेव्हा मात्र आपल्याला अस काही मिळत की ज्याचा आपण विचारही केलेला नसतो ..तेच जीवन असत .गॉड इज ग्रेट ..तो भक्ती करून मिळेल की नाही माहीत नाही पण शुद्ध अंतकरणाने कुणासाठी जगल की तो नक्कीच पावतो "

कुठेतरी त्याचे शब्द तिच्या मनाला लागले होते कारण ते खरच होत तिनेही कुठेतरी अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून त्रासही झाला होता ..पण मागील सात वर्षात तिने अपेक्षा केली नाही आणि तिला त्यापेक्षा जास्त मिळाल होत ..तीही मनात म्हणून गेली , " व्हा सारांश किती सोप्या पद्धतीने समजावून सांगितलंस तू ..आता तर मी खरच तुझी फॅन झाले आहे .."

तिनेही बाय म्हणून फोन बाजूला ठेवला ..रात्रीचे काम आवरत तिने पून्हा एकदा मोबाइल हातात धरला तेव्हा सारांशचा मॅसेज येऊन दिसला आणि त्यात त्याने लिहिलं होतं

📱 नित्या बघ तू म्हणालीस की तुला कधीच वाटलं नाही मी तुला मॅसेज करेन पण तस झालं ..म्हणून आपण आपल्या वाट्याला येत ते जगायच उगाच ही गोष्ट पूर्ण होत नाही म्हणून त्यात का अडकून रहायच ..होउ शकत आपल्याही आयुष्यात काहीतरी विशेष होणार असेल ..का अडकून रहायच त्यात ज्याने आपल्याला कमजोर केलं .जीवन म्हणजे फक्त काही क्षण नसतात जे खराब गेले म्हणून आयुष्य संपलं उलट जीवन म्हणजे शोध..जितकं जास्त शोधशील तितकीच जीवनाबद्दल जिज्ञासा वाढत जाईल आणि म्हणशील मूव्ह ऑन करण्याचं .तर फक्त हा विचार कर ..ज्यांच्यासोबत तू मागे काही क्षण जगलीस ते तुझ्यासाठी थांबून आहेत का ? थांबून नसतील तर तुझं उत्तर तुझ्याकडे आहे बस समजणे की देर है ..तू ते गीत एकल का

दिलं है छोटासा छोटीसी आशा
मस्ती भरे मन की भोलिसी आशा
चांद तारो को छुनेकी आशा
आसमानो मे उडणे की आशा
दिलं है छोटासा छोटीशी आशा

आयुष्यात ना नेहमी लहान बनून जगावं ..जेव्हा वाटायला लागेल ना की आपल्याच आयुष्यात दुःख आहे तेव्हा अशा एखादा व्यक्तीकडे निरखून पाहायचं ज्याला आपल्यापेक्षा जास्त त्रास आहे .त्यामुळे आपले प्रॉब्लेम क्लिअर तर होणार नाही पण आपल्याला जगायची इच्छा मात्र निर्माण होते आणि आपण सहज मूव्ह ऑन करू शकतो

तिने त्याचा मॅसेज वाचला आणि रिप्लाय न देताच मोबाइल बंद केला ..बेडवर पडून ती स्वतःलाच म्हणत होती .." खरच सारांश तू म्हणतोस तेच खर आहे ..का जगण्याचा इतका विचार करायचा ? काही व्यक्ती म्हणजे आयुष्य तर नाही ना फक्त ते भाग आहेत जीवनाचा मग त्यांच्यात स्वतःला का गुंतवून ठेवायचं ..आता हेच बघ ना ..मी कधी कुणाला मॅसेज सुद्धा केला नाही पुरुष या शब्दावरून माझा विश्वासच उडाला होता पण तू पुरुष असूनही मी मॅसेज स्वीकारला शिवाय आपण सतत 3 तास बोलत होतो .या तीन तासात मी कुणी अनोळखी व्यक्तीशी बोलतोय असा क्षणभरदेखील विचार माझ्या मनात आला नाही ...गेले सात वर्षे मी या प्रश्नाचं उत्तर शोधत होते आणि त्याच क्षणात जणू कुठेतरी हरवून बसायचे पण तू इतक्या सहजपणे उत्तर समजावून जाशील अस वाटलं नव्हतं ..खरच तुझ्या शब्दात जादू आहे रे !! फक्त लिखानातच नाही तर सत्यात पण तू तसाच आहेस ..मान गये बॉस तुमको ..तू आधीस का आला नाही रे आयुष्यात कदाचित मी कुठेतरी दूर निघाले असते या सर्वातून पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये ..थॅंक्यु सारांश मला माझ्याच बंधनातून मुक्त करण्यासाठी"

आज कितीतरी दिवसाने ती एका व्यक्तीचा विचार करत होती ..असा व्यक्ती जीचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता पण का उगाच तिला तो आपला वाटला होता..तिच्याबद्दल काहीही माहीत नसताना त्याने नकळत सर्व उत्तर दिली होती आणि त्यानेच तिला जगण्याचा एक मंत्र दिला होता ..कोण होता सारांश एक वाटसरू जो तिला जगायला शिकवून निघून जाणार होता की असा एक व्यक्ती जो तिला तीच अस्तित्त्व मिळवून देणार होता

क्रमशः...