धाडसी सुरज Na Sa Yeotikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

धाडसी सुरज


प्रजासत्ताक दिनी महागाव येथील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या सुरजचा दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचा त्या सर्व गावकऱ्यांना आणि शाळेतील मुलासह मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा झाला होता. सुरज महागावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या वर्गात शिकत होता. शाळेत तसा तो हुशार नव्हता पण शिक्षकांनी सांगितलेले सर्व काम पूर्ण करीत होता. शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी होता कारण तो कोणाशी भांडण करीत नव्हता, सर्वांशी प्रेमाने राहत होता. त्याचे वडील तो पाच सहा वर्षाचा असताना वारले होते, त्यामुळे तो आई सोबत राहत होता. आईचा तो एकुलता एक मुलगा होता. आई शेतात मोलमजुरी करून आपला आणि आपल्या मुलाचे पोटभरीत होती. सुरजने केलेल्या धाडसी कामामुळे त्याच्या आईला देखील त्याचा अभिमान वाटत होता.
नुकतेच दिवाळीच्या सुट्या लागल्या होत्या. सुरजला मामाच्या गावी जावे असे वाटत होते. पण घरातील दिवाळीसोडून कसे जावे ? म्हणून ती सुरजला समजावून सांगू लागली. पण सुरज आपला हट्ट सोडेना. शेवटी दिवाळी करून सायंकाळी मामाच्या गावाला जाण्याचा वचन घेऊन सुरज आनंदात खेळायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाडवा होता. सकाळी अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी झाली. घरात असलेले छोटे फटाके लावून सुरज दुसऱ्याच्या फटाके फोडताना पाहून उड्या मारत होता. हळूहळू दिवस संपू लागला होता तसे सुरजला मामाच्या गावाची प्रकर्षाने आठवण येऊ लागली होती. अखेर सायंकाळी 08 वाजण्याच्या सुमारास असलेल्या एक्स्प्रेस गाडीने गावी जाण्यासाठी आई आणि तो घराबाहेर पडले. दोन तासाच्या प्रवासानंतर तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मामाच्या गावी पोहोचणार होते. रात्री आठ ला येणारी गाडी देखील लवकर आली नाही. सुरज गाडी येण्याच्या दिशेने सतत बघत होता. शेवटी एकदाची गाडी आली. एक्स्प्रेस असल्यामुळे गाडीमध्ये कुठेच जागा नव्हती. गाडीत प्रचंड गर्दी होती. शेवटी त्यांनी रिसर्वेशनच्या डब्यात ते दोघे ही शिरले. रात्रीचे नऊ वाजले होते त्यामुळे सर्व प्रवाशी जवळपास झोपेत होते. दोघे जण दरवाजाजवळ बसले. आईला झोप येऊ लागली, तिचा डोळा लागला. सुरज मात्र झोपला नव्हता. त्याने हळूच त्या डब्यात सर्वत्र नजर फिरविली असता त्याला एक माणूस त्या डब्यात फिरताना दिसत होता. त्याच्या हातात एक पिशवी होती. तो आत घुसत होता आणि बाहेर निघतानात्या पिशवीत काही तरी टाकत होता. सुरजला काही क्षण कळालेच नाही. जवळच्या सीटवर झोपलेल्या माणसाला जगविण्याचा प्रयत्न केला असता तो काही केल्या उठत नव्हता. बेशुद्ध अवस्थेत झोपला होता. कायकरावं ? हे सुरजला सुचत नव्हतं. त्याने पुस्तकात धाडसी हाली धडा वाचला होता. आपण काही धाडस केलो तरच आपण वाचू शकतो अन्यथा तो चोर होय तो चोरच होता. डब्यातील सर्वाना त्याने देवाचा प्रसाद म्हणून काही तरी खायला दिला होता. त्यामुळे सर्व जण बेशुद्ध झाले होते. सुरजने लगेच आपल्या सोबत असलेल्या पिशवीत पाहिलं काय काय सामान आहे ? याची चाचपणी केली. त्या पिशवीत त्याला लाल मिरची दिसून आली. भावाला गावरान मिरची खूप आवडते म्हणून आईने पिशवीत दोन शेर मिरची सोबत घेतली होती. सुराजच्या डोक्यात क्षणात एक कल्पना सुचली. तो चोर सर्वांचे साहित्य घेत घेत सुरजच्या जवळच्या माणसाजवळ आला. आई पूर्ण झोपेत होती. सुरजने झोपेचे सोंग घेतले. जसे त्या चोराने त्या माणसाच्या गळ्यातील सोन्याच्या चैनवर हात टाकणार तसे सुरजने चोराला काही कळायच्या आत खालून मिरचीची पूड त्याच्या डोळ्यात टाकून दिली. तो चोर डोळे चोळत मोठ्याने आरडाओरडा करू लागला. त्याला अत्यंत वेदना होत होते. सुरजनेलगेच त्याच्या हातातील पिशवी हिसकावून घेतली आणि आपल्या आईला जागा केला. प्रचंड गोंधळ आणि आरडाओरडामुळेइतर डब्यातील माणसे त्या डब्यात आली. सुरजने सर्वाना घडलेली सारी हकीकत सांगितली. प्रवाशांनी त्या चोराची बेदम धुलाई केली. पुढच्या स्टेशनला त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडी त्या स्थानकावर काही वेळ थांबली, ज्यांचे त्यांना वस्तू परत करण्यात आले. सर्वांनी सुरजचे खूप खूप आभार मानले. चोराला रेल्वे पोलिसांनीअटक केले आणि गाडी पुढे सुटली. मामाचे गाव येईपर्यंत त्या डब्यातील प्रवाशी सुरजची स्तुती करण्यात मग्न होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी सर्वाना कळाली. सर्व पेपरवाले ही बातमी पहिल्या पानावर लावली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी धाडसी सुरजची कहाणी रेल्वे मंत्री पर्यंत पोहोचविली. रेल्वे मंत्र्यांनी ही बाब पंतप्रधानामार्फत राष्ट्रपती पर्यंत पोहोचविली आणि प्रजासत्ताक दिनी त्याचा गौरव करण्यात आला. सुरजने काही क्षणात आपले डोके चालविले म्हणून अनेक प्रवाश्याचे दागदागिने आणि पैसे चोरी होण्यापासून वाचले होते.

- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
- मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
- 9423625769