Tujhach me an majhich tu..17 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १७

तुझाच मी अन माझीच तू...भाग १७

आभा काही वेळापूर्वीच कँटीन मध्ये आली होती. पण राजस नेहा शी बोलतांना इतका गुंगून गेला होता की त्याला आभा त्याच्या कडे पहातीये हे कळलं सुद्धा नव्हत. पण आभा ला मात्र हळू हळू राजस बद्दल गोष्टी समजायला लागल्या होत्या. राजस फक्त दिसायला नाही तर वागायला सुद्धा तितक्याच आकर्षक आहे हे आभा ला जाणवलं होत. तिला राजस शी ह्या विषयी बोलायचे होते पण अजून एखादी चांगली गोष्ट राजस करतो का ह्या विचाराने तिने राजस शी लगेच बोलणे टाळले होते..म्हणजे तिला राजस ला पूर्ण पणे जाणून घ्यायची इच्छा दिवसेंदिवस वाढत होते. आणि त्यात ती इतक्या पटकन कोणाची वागण्याने हुरळून जायची नाही... ती लगेच कोणाच्या नादी सुद्धा लागायची नाही.. पूर्ण विचार करून ती तिचे निणर्य घायची.. सो तिला अजून थोड थांबव असं खूप शो ऑफ करून थोडी मदत करणार तिने खूप पाहिले होते पण राजस वेगळाच होता. त्याने आपल्या सहज वागण्याने कँटीन मधल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणले होते. आभा मनोमन खूप खुश झाली होती. तिला राजस च्या स्वभावाच्ये २ उत्तम गुण कळले होते. पहिला म्हणजे तो चूक मान्य करतो.. आणि राजस स्वार्थी नाही हे आभा ला जाणवले होते. राजस ने कॉफी घेतली आणि ती काम करायला निघून गेली.. तिने उगाच कोणाशी बोण्यात वेळ घालवला नाही... आता तिचं काम चालू होणार होते.. सो टाईम पास करायला तिला जास्ती वेळ मिळणार नव्हता. आणि आभा ला सुद्धा कामाकडे लक्ष केंद्रित करायचे होतेच.. तिची स्वप्न मोठी होती आणि स्वप्न पूर्ती साठी तिला कष्ट घ्यावेच लागणार होते. सक्सेस ला कोणताही शोर्ट कट नसतो ही गोष्ट तिला चांगलीच माहिती होती.. पण आज तिच्या दिवसाची सुरवात राजस च्या वॉर्म वागण्यामुळे आभा च्या चेहऱ्यावरचे हसू कमी होत नव्हते. हल्ली कोणाबद्दल इतका विचार करणारे स्वचीत तिच्या पाहण्यात यायचे.. आणि राजस च्या वागण्यातली सहजता आभा च्या मनाला स्पर्शून गेली होती. राजस कॉफी पिऊन कॅन्टीन बाहेर आला आणि त्याच्या डेस्क कडे जाता जात त्याच्या आणि आभा ची नजर नजर झाली.. आभा ला पाहून राजस च्या चेहऱ्यावरचे हाव भाव बदलले.. पण आभा मात्र त्याच्या कडे पाहून छान हसली. पण राजस ला मात्र वाटले होते की आभा ने त्याने ठेवलेली चिट्ठी वाचली असेल आणि आभाकाहीतरी प्रतिक्रिया नकीच देईल.. पण आभा

राजस चे वागणे पाहून आभा ला का माहिती नाही पण अजूनच फ्रेश वाटायला लागल होते. कधी कधी काही प्रश्नाची उत्तरे मिळत नाहीत तसच आभा ला आपल्याला छान का वाटतंय हे समजत नव्हते. पण आहे ते छान हा विचार करून तिने समोरच्या गणपती च्या मूर्ती ला नमस्कार करून तिने लॅपटॉप चालू केला.. राजस ने लिहिलेल्या चीत्ठीकडे तिच लक्ष गेल नाही.. आभा चा मूड आणि विचार वेगळ्या ट्रॅक वर जात होते.. त्यामुळे तिच्या नजरेसमोरच असलेल्या कागदाच्या चिठोऱ्या कडे तिच लक्ष गेलच नाही.. तिने तिचा मेल बॉक्स उघडला आणि मेल मध्ये बरीच मेल्स आली होती म्हणजे आता तिच्या कामाचा श्री गणेशा आज होणार होता.. त्यामुळे सुद्धा आभा खश होती.. आता नवीन शिकायला मिळणार, नवीन काम करायला मिळणार ह्या गोष्टीचा विचार करून तिने मात पण रेडी केला. आणि काम चालू केले.. तिने जरा वेळ काम केलं पण मग तिला एकदम कंटाळा आला.. एकदम इतक्या वेळ एका जागी बसण्याची तिची सवय गेली होती.. पण तिला एकदम फुलांचा सुगंध आला.. इतक्या वेळ ती विचारात मग्न असल्यामुळे तिला आपल्या डेस्क वर काहीतरी वेगळ आहे हे जाणवलं नव्हतच.. तिची नजर समोरच ठेवलेल्या फुलांच्या गुछावर गेली आणि आता मात्र ती इतकी खुश झाली.. तिच्या तोंडातून नकळत 'वॉव' बाहेर पडले.. ह्या आधी तिच्या आयुष्यात तिच्या साठी इतक कोणीच कधी काहीही केले नव्हते.. तिने तो गुच्छ उचलला आणि फुलांचा वास घेतला.. तितक्यात तिची नजर गणपती च्या खाली असलेल्या चिठ्ठी वर गेली. तिने जरा वेळ विचार केला. पण तिने अशी चिट्ठी ठेवल्याच तिला आठवत नव्हत.. तिने उत्सुकतेने ती चिट्ठी उचलली आणि उघडून वाचायला लागली. तिला ती चिट्ठी कोणी लिहिली आहे आणि चिट्ठी मध्ये काय लिहील आहे जे जाणून घायची उत्कंठा वाढत होती. तिच्या साठी हा प्रकार नवीन होता आणि त्यामुळे तिने लगबगीने ती चिट्ठी वाचायला चालू केलं,

"हे आभा... कालचा दिवस ऑफिस मधला तुझा पहिलाच दिवस होता आणि तो माझ्यामुळे कदाचित अविस्मरणीय झाला असेल. त्यासाठी सॉरी.. खर तर तू कशी हे मला माहिती सुद्धा नव्हत तरी विनाकारण मी विचित्र वागलो.. पण आता मी माझी चूक सुधारणार आहे.. आयुष्य मस्त असत... एखाद्या नदीच्या प्रवाहासारख.. उगाच त्या प्रवाहात आपण अडथळे आणायचे नाहीत.. सो तू जा तुझ्या वाटेनी आणि मी जातो माझ्या वाटेने..आपण मित्र होणार असू तर नक्की होऊ.. पण तुला वाटल नाही तर मात्र काहीही बळजुबरी नाही..

अर्थात,ह्याचा अर्थ असा नाही की मी काही मदत करणार नाही... तुला काहीही मदत लागली तर निसंकोच विचार.. पण माझ्याकडून तुला काही त्रास होणार नाही ह्याची खात्री मात्र ठेव.

तुझा मित्र, राजस..."

आभा ने त्या चिट्ठी मधला मजकूर वाचला आणि ती जराशी अस्वस्थ झाली.. त्यावर तुझा मित्र ह्या वर राजस ने काट मारली होती.. ती राजस बद्दल विचार करत असतांना राजस चे असे वागणे तिच्यासाठी धक्का देणारे होते. पण असो, ती हसली आणि तिने ती चिट्ठी तिच्या पर्स मध्ये नीट घडी करून ठेवली आणि तिने फुलाचा गुच्छ परत नीट ठेवला. तिने एकदा राजस च्या डेस्क कडे नजर टाकली पण राजस तिथे नव्हता.. ठीके असा विचार करून तिने कामाला सुरवात केली.

आभा कामात अगदी चोख होती. आणि एका दिवसाच्या भेटीने तिच्या आत काहीतरी हलले होते पण आभा इतकीही वाहवत जाणारी नव्हती त्यामुळे ती लगेच नॉर्मल झाली आणि कामाला लागली सुद्धा..

तितक्यात समोरून राजस आणि नेहा गप्पा मारत येत होते. त्याच्या बडबडीमुळे आभा च लक्ष विचलित झालं. तिने वैतागून वर पाहिलं आणि राजस ला पाहून तिचा मूड बदलला. ती त्याच्या कडे पाहून हसली आणि तो सुद्धा... पण राजस काहीही बोलणार नव्हता कारण उगाच कोणाला त्रास देणे त्याला पटत नव्हते.. त्याला आभा बद्दल ओढ होतीच पण आपल्यामुळे कोणाला त्रास व्हावा हे त्याला पटत नव्हते. तो लगबगीने आभा च्या डेस्क समोरून निघून गेला.. पण नेहा मात्र आभा च्या टेबल पाशी जरा रेंगाळली,

"हेलो आभा.. कॉफी घेतलीस?"

"हो अग... आत्ताच!! आज जरा काम आहे सो विचार केला लगेच करायला लागू काम.."

"ग्रेट.. मी पण पळते.. आपण गप्पा मारू जेवायच्या वेळी... तू जेवायला जाशील तेव्हा मला एक कॉल कर.."

"चालेल.."

"एन्जॉय युअर वर्क.. " नेहा हसली आणि तिच्या डेस्क कडे गेली. नेहा ने हाय केल आणि राजस ने नाही हे गोष्ट आभा ला आवडली नवती. आभा ला मात्र राजस चे वागणे विचित्र वाटले होते. तिला राजस शी फुलांबद्दल आणि चिट्ठी बद्दल बोलायचे होते आणि आता नाही तर जेवायच्या वेळी तर ती ह्या बद्दल राजस शी बोलणार होतीच..

क्रमशः..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED