wadhadivasachi bhet books and stories free download online pdf in Marathi

वाढदिवसाची भेट

आज पुनम फारच अस्वस्थ होती. घरात तिच्या येरझाऱ्या वाढल्या होत्या. ऑफिसची वेळ संपून दोन तासाचा कालावधी संपला होता. वैभव एवढ्या वेळात घरी यायला हवा होता. पण अजुन आला नाही म्हणून तिला वैभव ची जरा जास्त काळजी वाटू लागली होती. तिची काळजी वाढण्याचे अजुन एक कारण म्हणजे त्याचा मोबाईल देखील लागत नव्हता. फोन लावले की, आपण डायल केलेला क्रमांक स्विच ऑफ आहे, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असे उत्तर मिळत होते त्यामुळे तिची अजुन काळजी वाढू लागली. सातचे आठ वाजले, आठचे नऊ वाजले आणि नऊचे अखेर रात्रीचे दहा वाजले होते. तिला आत्ता अजुन ज्यास्त काळजी वाटू लागली. काय झाले असेल ? फोन का लागत नाही ? तो अजुन घरी का आला नाही? असे अनेक शंका आणि प्रश्न तिच्या मनात घर करीत होते. सात वाजता केलेला स्वयंपाक तर गार होऊन गेले होते. तिची भूक मरून गेली होती. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. एवढ्यात दारावरची बेल वाजली तशी तीने दार उघडली. दार उघडल्याबरोबर तिला डोळ्यासमोर वैभव दिसल्याक्षणी ती त्याच्या गळ्याला पडून ओक्साबोक्सी रडू लागली. एकमेकांवरील अतूट प्रेम कसे व्यक्त होते याची प्रचिती अश्या कठीण प्रसंगात दिसून येते. थोड्या वेळानंतर तीने त्याच्या शरीराकडे पाहिले तर अंगवारील कपडे पूर्ण फाटलेले आणि रक्ताने माखलेले होते. हातापायाला बरेच खरचटले होते. वैभवला बराच मार लागला होता. तीने काय झाले म्हणून त्याला विचारणा केली. तेंव्हा तो म्हणाला, मी नेहमीसारखे ऑफिसमधून सायंकाळी 5 च्या वेळेला बाहेर पडलो. पाच-दहा मिनीटाचा प्रवास झाल्यानंतर माझ्या गाडीला मागून एका वाहनाने जोराची धडक दिली आणि काही कळायच्या आत माझी गाडी रस्त्यावरून घसरली. मी खाली पडलो. रस्त्यावर मी जोरात आपटलो. हातापायाला मार लागले पण डोक्याला हेल्मेट होते म्हणून डोक्याला मार लागला नाही, बरे झाले, मी वाचलो. अन्यथा काय झाले असते काहीच कळले नसते. माझ्या खिशातील मोबाईल जमिनीवर पडून खराब झाले आणि ते बंद पडले. तेथील आजूबाजूच्या लोकांनी मला तात्काळ दवाखान्यात ऍडमिट केले. तेथे माझ्या जखमेवर मलमपट्टी झाली. हे पोलिस केस असल्यामुळे पोलिस येईपर्यंत मला तिथेच दवाखान्यात रहावे लागले. आज डोक्यावर हेल्मेटमुळे मी वाचलो आणि त्यावेळी तुझी खुप आठवण आली. असे सांगताच तिला एक महिन्यापूर्वी तो प्रसंग आठवला. त्यादिवशी वैभवचा वाढदिवस होता. तेंव्हा वाढदिवसाला काय भेट द्यावे हे तिला सुचत नव्हते. दिवसभर खुप विचार केली. तिच्या समोर भेटवस्तू देण्याची एक भली मोठी यादी होती पण कोणती वस्तू द्यावे हे तिला काही सुचत नव्हते. ती बसल्या ठिकाणी सहज पेपर वाचू लागली होती. तिची नजर एका बातमीवर जाऊन थांबली होती. दोन वाहनांचा समोरासमोर धडक, रस्त्यावर झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू, डोक्याला हेल्मेट राहिला असता तर कदाचित जीव वाचू शकले असते. ही बातमी वाचताच लगेच तिच्या डोक्यात प्रकाश पडला. वैभव आपल्या ऑफिसला रोज बाईकने जातो. कित्येक वेळा त्याला हेल्मेट घेण्याची विनंती केली पण त्याकडे तो साफ दुर्लक्ष करत होता. बाईक चालविताना डोक्यावर हेल्मेट असेल तर अनेक गोष्टींचा फायदा होतो. एक तर आपला चेहरा सुरक्षित राहतो, ऊन, थंडी, वारा, पाऊस यापासून देखील संरक्षण होते, गाडीचा अपघात झाल्यास आपल्या डोक्याला मार लागू नये इतर कुठलेही मार माणूस सहन करू शकतो मात्र डोक्याला मार लागणे सहन करू शकत नाही. सर सलामत तो सबकुछ सलामत असे ती वैभवला वारंवार सांगायची पण तो ऐकतच नसे. म्हणून तिने ठरविले आणि सायंकाळी तिने वैभवला एक हेल्मेट वाढदिवसाची भेट म्हणून त्याला दिली. त्याच हेल्मेटमुळे आज वैभवला पुनर्जन्म मिळाल्यामुळे तिला मनोमन खुप बरे वाटले.

नागोराव सा. येवतीकर
मु. येवती ता. धर्माबाद
9423625769

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED