kadambari Jivalaga Part 46 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग-४६ वा

कादंबरी – जिवलगा

भाग- ४६ वा

-----------------------------------------------------------------------------------

शनिवारची सकाळ ..नेहा ,सोनिया आणि अनिता ..तिघींचा सुटीचा आणि आळशीपणाचा

दिवस ,सगळा टाईमटेबल अगदी संथपणाने चालणारा . घाई नाही..गडबड नाही...

पण आजचा शनिवार वेगळा होता.. नेहमी सारखा सुट्टीचा दिवस म्हणून कसे ही वागून

चालणारे नव्हते .

सोनियाचे पाहुणे ..दोन वडीलधारी माणसे घरात आहेत ..त्यांच्या समोर हे असले वागणे बरे दिसत

नाही..चला उठा ..!

असे म्हणत ..नेहाने ..सोनिया आणि अनिता दोघींना नेहमीपेक्षा खूप लौकर उठवले ..आणि

घर आवरून ठेवायला ,नीटनेटके ठेवायला मदत करा असे सांगत कामाला लावले.

मुकाट्याने दोघी उठल्या .. या वेळी मनात नेहाचा कितीही राग आला तरी त्याचा उपयोग नव्हता .

मधुरिमादीदी आणि हेमूच्या मैत्रीखातर हे सगळे नाटक छान पैकी करणे भाग होते.

नेहाने सकाळच्या खमंग पोहे केले ते खाऊनच सारे खुश होऊन गेले .मग चहा झाला .

सोनिया म्हणाली-

अनिता ,उद्यापासून बाहेरचा नाश्ता खाणे बंद करू या , नेहाच्या हातचे पदार्थ खाऊन ,बघ न

पुन्हा बाहेर जाऊन काही खावे “अशी इछाच होणार नाही.

हे ऐकून – हेमूची आई म्हणाली-

सोनिया – काल आल्यापासून मी पाहते आहे ..या नव्या पोरीला ..तिचे कौतुक तर वाटते आहे , त्या

पेक्षा आश्चर्य जास्त वाटते आहे..

हिच्या एव्हढ्या आजकालच्या पोरी किचन मध्ये फिरकत नाही ..आई किती ओरडा करू दे ..!

यांना काही फरक पडत नाही .हातातला मोबिल डोळ्या समोर असला की बोलायलाच नको .

सगळीकडे सारखेच आहे म्हणा – घरोघरी . सगळ्या गोष्टी आयत्या पाहिजे असतात आजकाल पोरींना आणि पोरांना सुद्धा .

यावर नेहा म्हणाली- अहो -सोनियाच्या मामी ..

खरे सांगू का , मला जरा जास्तच आवड आहे या सगळ्या गोष्टींची ..आणि आमच्या घरात

सगळ्या स्त्रियांना आणि मुलींना किचनमध्ये येवून सगळे शिकून घेतलेच पाहिजे “ अशी सवय

आणि शिस्त लावली जाते .

मी एकच केले ..याचा शिस्तीचा बाऊ न करता ..मी मनापासून सगळ्या गोष्टी शिकल्या ,

आजी आणि आईला अजून ही मी स्वयंपाकात मदत करते . त्यामुळे ..त्यांच्या इतका छान जमत नसला तरी ..

बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक मला जमतो. असे मी मानते ..त्याचे कारण..

ज्या अर्थी खाणारे लोक नावे न ठेवता खातात “ म्हणजे मी ओके ओके करते “असा अर्थ घेते .

हेमुची आई म्हणली –

मोठ्यांचे संस्कार वाया जात नसतात , फक्त तुमच्या पिढीने ते समजून घेतले तर त्यातले अर्थ

आणि त्याचे महत्व कळेल .मग, तुम्हीच म्हणाल ..अरेच्या !

हे इतके चांगले आहे, हे आता समजले आम्हाला .

नेहा – तू खूप नशीबवान आहेस..तुला शिकवणारी माणसे आहेत ..आणि तू शिकणारी आहेस..

हे त्यापेक्षा जास्त छान .

हे ऐकून अनिता मध्येच म्हणाली..

अहो मामी- इतके कौतुक नका करू एका मुलीचे ..हरबरयाच्या झाडावर जाऊन बसली तर ,

उतरायची नाही खाली ,मग, आपल्याला राहावे लागेल उपाशी.

हेमुचे बाबा म्हणाले..

सोनिया आणि अनिता एक लक्षात ठेवा ..

चांगल्या गोष्टींचे कौतुक मोकळ्या मनाने करावे ..त्यात कंजुषी कशाला करायची. ?

पुष्कळसे लोक असे म्हणतात की – तोंडा समोर कुणाची स्तुती करू नये , असे म्हणतात ..ते

माघारी सुद्धा कधी कुणाचे कौतुक करीत नाहीत “, असे काही बरोबर नाही.

आता उदाहरण तुमच्या तिघींचे घेऊ या ..

आम्ही तुमचे पाहूणे म्हणून आलोत ..आणि तुम्ही तिघी मिळून किती प्रेमाने आमच्यासाठी

खूप काही करीत आहात “

समजा आम्ही काही बोललो नाही तर ?

तर तुम्हाला वाटेल ..चार चांगले शब्द बोलायला काय गेले असते ?

आता तुम्हीच सांगा मुलींनो ..

आम्ही तुम्हा दोघींचे ,या नेहाचे कौतुक केलेच पाहिजे .

तिघींना हेमूच्या बाबांचे हे धोरण मनोमन पटले .

दुपारच्या वेळेत घरीच आराम करीत होते सगळे ..

हेमूच्या आई-बाबांना सोनिया आणि अनिताची थोडी फार माहिती होती , पण, ही तिसरी मुलगी त्यांच्यासाठी अगदी नवी आणि अनोळखी होती.

या दोघींच्या ऑफिसमध्ये आहे ,म्हणूनच यांच्या सोबत राहते आहे ..हे तर ठीकच आहे . पण..हिचे

रहाणीमान , वागणे आणि बोलणे ..या दोघींपेक्षा खूपच वेगळे आहे. वयाने लहान असून ती समझदार वाटते आहे

म्हणूनच की काय आपल्या सारख्या जुन्या – माणसांना तिचे वागणे आवडणारे असेच आहे “

न बोलता ..किती सफाईदारपणाने घरभर वावरते आहे ..काही ना काही कामे करतांना दिसते आहे .

आजकालच्या मुली ..घरची जबाबदारी पूर्ण सांभाळून ,नोकरी करतात ..पण याचे प्रमाण तसे कमीच आहे

असे ऐकण्यात येते , आणि मग ..नोकरी की घर ? या पैकी एक ..यावरच घरात वाद होतात “

याबद्दलच जास्त सांगितले जाते “ .

आपल्याला ही या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. हेमू नोकरीच्या निमित्ताने इथेच रहाणार ,

कदाचित परदेशी जाण्याची इच्छा त्याच्याही मनात असणार . तो आपल्या गावात येईल असे अपेक्षा

करणे चुकीचे ठरेल . आणि तोही आपल्या सारखाच “आहे ती नोकरी “सोडून समाजसेवा करायची म्हणून

दुर्गम भागात कशाला येईल.?

आपण केलं ते केलं ..आपल्या मुलाने तसेच केले पाहिजे “अशी अपेक्षा करणे बरोबर ठरणार नाही.

आता हेमूच्या लग्नाचे पहावे लागणार आहे..गेल्या वेळी हेमूच्या मामा-मामीने गोंधळ घातला ,

तसे पुन्हा व्हायला नको.

काळजी घेतच हेमुसाठी ,आपल्या घरासाठी योग्य अशी मुलगी शोधणे हे करावे लागणार आहे आपल्याला .

बघू या ..काय होते ते ....!

*******

२...

नेहाच्या गावी ..वाड्यात ..रात्रीची वेळ झालेली ..तरीपण सगळे जागे होते ..

कधी नव्हे तो सगळे एकत्र बसून ..उद्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलत बसले होते ..

कारण ..वकीलसाहेबांच्या चिरंजीवांसाठी .. मुलगी पाहायला जाण्याचा पहिलाच कार्यक्रम

ठरला होता . त्यामुळे सगळे खूपच उत्सुक झालेले होते ..

नेहाची आई म्हणाली ..

भूषण ..अरे नेहाला फोन करून सांगू या . उद्याच्या कार्यक्रमाबद्दल ..छान वाटेल तिला .

मोठे वकीलसाहेब म्हणाले .. नेहाच्या आई , जरूर सांगा , फक्त फोटो नका दाखवू .आज..

उद्या संध्याकाळी आपण सगळे प्रत्यक्ष मुलीला पाहुया , बोलू या ..मगच ..फोटो पाठवू नेहाला .

आता फक्त मोघम सांगा ..की उद्या मुलगी पहायला आम्ही जाणार आहोत.

आजोबा म्हणाले –

भूषणसाठीची मोहीम तर आपण सुरु केली आहे ..आता नेहासाठी पण “वर –संशोधन “मोहीम

सुरु करण्याचे घ्या मनावर .

बाहेरगावी जाऊन, राहून नोकरी करण्याची तिची हौस आणि इच्छा आपण पूर्ण केली ..आणि

नेहाच्या मावशीदेखील आता परदेशी गेल्या आहेत , तेव्हा नेहाला ..नोकरीचा राजीनामा देऊन इकडे

परत यायला सांगा .

तिच्या लग्नाचे जमेपर्यंत ..तिचा थोडाफार सहवास लाभू द्या आम्हाला .

नेहा ..लग्न झाल्यावर पुन्हा नोकरी करू शकते ..

आजोबांचे बोलणे ऐकून नेहाच्या आजी म्हणाल्या ..

अगदी माझ्या मनातलं बोललात हो .

.पोरीला घ्या बोलावून ..काय मेलं ते नोकरी नोकरी करीत घरापासून दूर राहण्याची हौस आहे या नेहाला .

आता पुरे कर ,आणि ये म्हणावे .आमच्यासाठी.

भूषणदादू म्हणाला ..आजी ,आजोबा ..

अशी घाई करू नका एकदम .. तुम्ही म्हणता तसेच करू या आपण. मी बघती ते सगळ.

नेहाला पटेल अशा पद्धतीने करू म्हणजे सगळ्या गोष्टी गोडी गोडीत होतील.

मोठेवकील साहेब ..आजोबांना म्हणाले ..

बापूसाहेब ..बघा ..तुमचा नातू ..तुमच्यावरच गेलाय ..

एखाद्या गोष्टीला “ नाही “म्हणायची तुमची पद्धत जशीच्या तशी घेतली , तुम्हाला हो” म्हणतांना

त्यानी नेहाला “नोकरी करयची नाही” हे कसे सांगायचे ते ठरवून सुद्धा टाकले.

नेहाची आई खुश होऊन म्हणाली ..

माझी दोन्ही लेकरं खूप गुणाची आहेत बरे का ..!

आजोबा म्हणाले ..अरे या विषयावर वेळ नका घालवू आता ..

उद्या देसाईसाहेबांच्या मुलीला कोण कोण ..काय विचारणार ? हे तर ठरवा ..

उगीच सगळ्यांनी .तेच ते गुळगुळीत प्रश्न मुलीला विचारणे बरे नाही.

आजी म्हणाल्या ..मी एक सुचवते ..यावर विचार करा ..

आपल्याच घरातल्या .भाऊसाहेबांची सुनबाई ..अलका ..ती सुधा कोलेजात लेक्चरर आहे ..

तिला आपली फैमिली मेंबर म्हणून आपल्या सोबत घेऊन जाऊ या.

आपण सगळेच मोठे मेम्बर आहोत . भूषणसोबत त्याची ही समवयस्क वाहिनी सोबत आलेली

बरे दिसेल .

देसाई –साहेबांच्या मुलीला तिच्याशी बोलायला मोकळे वाटेल.

आजीबाईंनी शेजारी आवाज देत अलकाला बोलवून घेतले ..

इतक्या रात्री कशाला बोलावले असेल बरे ? या प्रश्नाच्या काळजीने ..

नेहाचे भाऊसाहेब काका ,काकू , योगेशदादा आणि त्याची बायको अलका सगळेच आले .

घरात सगळेच छान मूड मध्ये गप्पा चालू आहेत हे पाहून ..

भाऊसाहेबकाका ..आजोबांना म्हणाले ..

अहो ..बापूसाहेब ..इतक्या उशिरा सूनबाईला-अलकाला कशासाठी आवाज दिलात ? घाबरून गेलो न

आम्ही , म्हणून सगळेच आलो..काय झाले असेल ? या काळजीने ..

आजोबा म्हणाले ..

भाऊसाहेब ..काळजीचे काही कारण नाही..असो. आता आलाच आहात तर सांगतो तुम्हाला ..

उद्या संध्याकाळी चार वाजता ..भूषणसाठी ..बँक मेनेजर –देसाई साहेबांची मुलगी पाहायला

जायचे असा कार्यक्रम ठरला आहे. आमची अशी इच्छा आहे की ..

भूषणसोबत ..त्याच्या योगेश दादाने आणि अलका वाहिनीने आमच्या सोबत यावे.

कारण..आम्ही चौघे सिनियर मेंबर , कुणी बरोबरीचे हवे न .

आजोबांचे ऐकून ..सुनाबाई –अलका भूषणला म्हणाली ..

..आपल्या फैमिलीसाठी ..देसाईसाहेबांची ही कन्या –भारती ..अगदी योग्य आहे .

आजोबा –आजी , काका –काकु – ही भारती ..माझ्या छान परिचयाची आहे, आम्ही मैत्रिणी

आहोत . त्यामुळे मी सांगते ..भूषणला ही मुलगी अगदी अनुरूप आहे ....

आणि आजी,आणि आपल्या काकुंचा वारसा पुढे नेणारी ही मुलगी ..हिला आपण डोळे झाकून

होकार “द्यावा असे मी म्हणेन.

आजोबा म्हणाले – आहो अलकाबाई ..तुमची मैत्रीण आहे इज ओके .पण.आपण डोळे झाकून ..

होकार द्यायचा म्हणजे ..त्या आधी एकदा पाहायला पाहिजे की नको ?

अलका –आनंदाच्या स्वरात म्हणाली –

अहो आजोबा – देसाईसाहेब त्यांच्या मुलीसाठी .आपल्या भूषणचा विचार करतील “असे मला वाटलेच

नाही. कारण ही बदलीवाली माणसे ..गाव सोडले की परदेसी होऊन जातात .

खूप खूप छान आहे हे स्थळ ,देसाई परिवार ..आणि मुख्य म्हणजे ..मुलगी ..भारती..

भूषण ..तू मला थांक्यू म्हणशील ..इतकी छान मुलीच्या बद्दल छान सांगितले म्हणून.

आजोबा म्हणाले – चलो ..मिटिंग बरखास्त ..

ठरले ..अलका आणि योगेस ..तुम्ही आलात की आपण निघायचे .

ओके आजोबा ..आम्ही येतो वेळेवर .

नेहाची आई म्हणाली ..

मी नेहाला बोलून घेते .. बोलायला फार उशीर व्हायला नको.

नेहाची कामं आटोपली होती .सोनियाचे पाहूणे-मामा –मामी दोघे झोपले होते.

सोनिया आणि अनिता आपापल्या फोनमध्ये रंगून गेल्या होत्या ..

नेहाचा फोन वाजला ..आईचा नंबर स्क्रीनवर दिसताच नेहा म्हणाली ..

आज बराच लवकर आलाय आईसाहेबांचा फोन..

नेहाने कॉल घेत म्हटले –

हं-बोल आई , कसे आहात सगळे ?

आई म्हणाली –अग नेहा ऐक ना ..

एक खूप मस्त खबर आहे..

तुझ्या भूषणदादू साठी ..उद्या मुलगी पाहायला जाणार आहोत आम्ही सगळे ..

म्हणजे ..आजी-आजोबा ,आम्ही दोघे आणि –भूषण ,

आणि दादुला सोबत म्हणून योगेशदादा आणितुझी अलकावाहिनी .

आणि ही मुलगी आणि तुझ्या वाहिनी छान मैत्रिणी आहेत.

वाव ..ग्रेट ..नेहा आनंदाच्या स्वरात म्हणाली..पण.मुलगी कोण ?आपल्या गावातली ?

मला माहिती असणारी आहे का ?

आई म्हणाली –

सध्या आपल्या गावात असणारी आहे असे म्हणू या ..

देसाई बँक मेनेजर आहेत ना ..त्यांची मुलगी ..भारती ..

लेक्चरर आहे..टेम्पररी बेसिसवर ..

देसाईसाहेब आणि मिसेस देसाई ..दोघे अचानक आले आणि म्हणाले मुलीचे स्थळ घेऊन आलोय ,

तुझा भूषणदादू त्यांच्या बँकेचा वकील आहेना ...त्यांनी ठरवले असेल याला पाहून.

नेहा म्हणाली – अग आई , फोटो पाठवायचा ,

नुसते काय सांगतेस ..!

आई म्हणाली ..सगळ्यांचे म्हणणे असे पडले की –

उद्या समक्ष मुलीला पाहून, बोलून घेऊ मग..ठरवू .म्हणून नाही शेअर केला आत्ता लगेच.

नेहा म्हणाली ..बेस्ट, जाऊन या .आणि

अलका वहिनीची मैत्रीण आहे म्हटल्यावर .शंकाच नाही,मुलगी बेस्ट असणार.

नेहाची आई म्हणाली-

नेहा , आजोबा-आजीनी पुन्हा बोलून दाखवले आहे..

आता नेहाचे नोकरी करणे पुरे झाले, हौस झाली न ,ये आता .

.तुझे लग्न जमवे पर्यंत तू त्यांच्या सोबत असावीस अशी त्यांची इच्छा आहे.

आणि भूषणदादू ने त्यांना शब्द दिलाय ..नेहा इकडे परत येईल..काळजी नका करू..

नेहा ..फार फार तर आणखी एक-दोन महिने .नंतर मात्र तुला इकडे यायचे आहे

ते चुकणार नाही हे लक्षात असू दे. उद्या करते संध्याकाळी फोन.

नेहाच्या मनात एकाच वेळी .आनंद होता ,आणि हेमू पासून दूर जाणार याचे दुखः

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-बाकी पुढच्या भागात

भाग -४७ वा लवकरच येतो आहे.

-------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जिवलग

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED