स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 34 शेवट ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 34 शेवट )





ना पाया तुमहें जिंदगी मे
तो भी क्या गम है
आखरी सासे हो तेरी बाहो मे
बस यही मेरी हसरत है ...

नित्या खाली पडली ..सारांश घसरत घसरत तिच्याजवळ गेला आणि सारांशने तिला कुशीत घेतले ..ती त्याच्या मांडीवर डोकं टेकवून झोपली होती ..तिची नजर त्याच्याकडे होती आणि एक हात चाकूवर होता ..तो तिला या अवस्थेत बघून घाबरला होता ..डोळ्यात अश्रू होते नि त्याला काय करू नि काय नको झालं होतं ..इकडे नित्याला चाकू लागताच मृन्मय फरार झाला होता तर 8 वर्षाची संध्या हे सर्व दृश्य जवळून पाहत होती ..तिला घरात काय घडत आहे नि काय नाही हे कळत नव्हतं म्हणून घराच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती हे सर्व पाहत होती ..तर नित्या सारांशच्या हातात अशी जखमी पडून असल्याने तो फारच घाबरला होता ..ती डोळे मिटत होती हे पाहून तो हुंदके देत म्हणाला , " नित्या काळजी नको करू मी तुला काहीच होऊ देणार नाही !!..तू संध्या नि मला सोडून जाणार नाहीस अस वचन दिले आहेस ना मग आता आपलं वचन पाळायच समजलं ना ? तुझ्याविना मी जगण्याची कल्पना पण नाहीं करु शकत ..प्लिज नित्या उठ ना !! "

त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते ..कधी तो अश्रू पुसत होता तर कधी अडखळत अडखळत तिच्याशी बोलत होता तरीही ती काहीच बोलत नव्हती .उलट ती मिटणार्या पापण्यातून ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत होती .तिलाही त्याचे अश्रू नको होते पण ते अश्रू पुसण्याची हिम्मतही आज तिच्यात नव्हती ।...तो फारच भावनिक झाला होता आणि म्हणूनच तिच्या बाजूला बसून फक्त रडत होता ..त्याच तिच्या रक्तबंबाळ शरिराकडे लक्ष गेल आणि त्याने आपले डोळे पुसून घेतले ..धीर करून हळूच त्याने चाकू तिच्या शरीरापासून वेगळा केला आणि तो अडखळतच उठला ....नित्याला त्याने बाहुत उचलून घेतले ..तो समोर जाणारच तेवढ्यात बाजूला संध्या दिसली..त्याने एक नजर तिच्याकडे टाकली आणि म्हणाला, " संध्या ममाची तब्येत ठीक नाही आहे ..आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ ..तू चालणार ना आमच्यासोबत? "

संध्याने एक शांत नजर त्याच्याकडे टाकली ..त्याचे डोळे भरून होते आणि त्या अश्रूवर तिला लगेच विश्वास बसला आणि ती त्यांच्या मागे मागे येऊ लागली ..ते समोर चालू लागले ..लिफ्ट मधून खाली जात ते ग्राउंड फ्लोअरवर पोहोचले ..सारांश नित्याला हातात धरून रडत होता आणि त्याला बघून सर्व गोळा झाले ..व्हॉचमनने परिस्थिती लक्षात घेत पोलिसांना फोन केला आणि बाहेरून टॅक्सीला बोलावून घेतले ..टॅक्सी येताच त्याने तिला आतमध्ये ठेवले आणि संध्याला समोरच्या सीटवर बसवुन जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरवले ..त्यालाही हॉस्पिटलबद्दल फारस माहीत नव्हतं त्यामुळे व्हॉचमनकडून जवळच्या हॉस्पिटलबद्दल माहिती विचारली आणि तो टॅक्सीसोबत निघून गेला ..रस्त्यात जाताना देखील तो नित्याला उठविण्याचा प्रयत्न करत होता पण तिची तब्येत बिघडत जात असल्याने ती डोळे मिटु लागली होती .पण जोपर्यंत तिचे डोळे मिटले नव्हते तोपर्यंत फक्त तीच त्याच्याकडेच लक्ष होत ...इकडे नित्याच्या शरीरातून रक्त थांबायचं नाव घेत नव्हतं ..तर सारांशच्या डोळ्यातून फक्त अश्रू धाव घेत होते ..संध्याच्याही डोळ्यात अश्रू होते पण ती व्यक्त होऊ शकत नव्हती ..वेळेची दखल घेत चालकही टॅक्सी लवकर चालवत होता ..सुमारे पंधराच मिनिटात त्याने जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पोहोचवले ..सारांशला नीट चालता येत नसल्याने नित्याला आतमध्ये न्यायला चालकाने मदत केली ..ते आत पोहोचत नाहीच की सारांश , " डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडू लागला होता .." रक्तबंबाळ मुलीला घेऊन एक पुरुष उभा आहे हे पाहताच रिसेप्शनिस्टने डॉक्टरांना बोलावून घेतले आणि डॉक्टरही क्षणात बाहेर आले ..थोड्या अंतरावरच स्ट्रेचर होते त्या स्ट्रेचरवर नित्याला ठेवत तो म्हणाला , " डॉक्टर प्लिज माझ्या नित्याला वाचवा !! ..तीच खूप रक्त गेलं आहे ..प्लिज वाचवा नाही तर ती मरून जाईल .."

तर डॉक्टर विचार करत म्हणाले , " हो पण ही पोलिस केस आहे तेव्हा आम्ही त्यांना इंफॉर्म केल्याशिवाय काहीच करु शकत नाही ।."

सारांश रडवेल्या स्थितीत म्हणाला , " सर मी आधीच त्याना सांगितलं आहे काहीच वेळात ते येतील फक्त तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा .नाही तर माझ्या नित्याचा जीव जायचा ..तुम्ही पैशाची पण फिकीर करू नका ..जेवढेही लागतील तेव्हढे मी पुरवेन फक्त माझ्या नित्याला काही होऊ देऊ नका ..."

पोलीस येणार आहेत हे ऐकून त्यांनी तिला ऑपरेशन थेटर मध्ये न्यायला सांगितले ..तसेच व्हॉडबॉयने तिला ऑपरेशन थेटर मध्ये हलविले ..नित्याची स्थिती बघून डॉक्टरांचा चेहरा जरा कोमेजला होता त्यामुळे ते पटापट नर्सला काही सूचना करत होते ..तर नर्सही ते शांतपणे ऐकत होती .. डॉक्टर समोर तर त्यांच्या मागे सारांश जाऊ लागला होता ..तो ऑपरेशन थेटरकडे येतोय हे पाहून डॉक्टरांनी त्याला थांबविले आणि बाजूला असलेल्या नर्सला म्हणाला , " नर्स कुणाला तरी सांगून आधी ह्यांना पट्टीकरून घ्या ..ह्यांनाही फार लागलं आहे .त्यानंतर मी जे जे सांगितलं त्याची तयारी करून घ्या ..आपल्याकडे वेळ कमी आहे तेव्हा लवकरात लवकर तयारी व्हायला हवी ..."

जस तिला आतमध्ये नेण्यात आले तसाच त्याचा हात तिच्या हातामधून सुटला आणि क्षणभर त्याच्या मनात धडकी भरली ..ऑपरेशन थेटरच दार बंद झालं आणि तो त्या दाराकडे पाहू लागला ..तो उभाच होता की बाजूला एका नर्सने त्याला पट्टी करायला येण्यासाठी सांगितले ..त्याची अजिबात इच्छा नव्हती पण नित्याला वाचवायचे असेल तर त्याला शरीराने सुदृढ राहावे लागणार होते म्हणून तो तयार झाला आणि तो नर्ससोबत जाऊ लागला तर छोटी संध्या त्याचा हात पकडून त्याच्या मागे जात होती ..त्या छोट्या जीवाला तर काय चालल आहे तेसुद्धा कळत नव्हते ..तिचा तो नाजूक चेहरा पाहून सारांश फारच हळवा झाला होता म्हणून त्याने क्षणभरही तिचा हात सोडला नाही ....नर्स त्याला तर डॉक्टर तिला घेऊन गेले ..नर्स त्याला पट्टी करू लागली होती पण त्याच मन पूर्णपणे नित्याकडेच होत ..काहीच क्षणात नर्सने त्याची पट्टी केली आणि एकही क्षण न हरवता तो ऑपरेशन थेटरकडे आला ..त्याने पाहिलं की डॉक्टर कुणाशी तरी काही बोलतोय हे पाहून तो डॉक्टरांना म्हणाला , " डॉक्टर माझी नित्या वाचेल ना ? ..काही प्रॉब्लेम तर होणार नाही ? ।."

डॉक्टर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले , " बघा !! मी तुम्हाला आताच काही सांगू शकत नाही ..तीच खूप रक्त गेलं आहे ..तेव्हा जर रक्त लवकर मिळालं तर ती वाचू शकते नाही तर ? "

नाही तर हा शब्द ऐकताच तो जरा घाबरला .त्याचे हात पाय गळाले ...त्याच डोकं बधिर झालं होतं ..डॉक्टर म्हणाले की तिला रक्त हवंय तरच ती वाचू शकते पण त्याच या शहरात कुणीच ओळखीच नव्हतं त्यामुळे कुणाला बोलवावं हा विचार त्याच्या मनात येऊ लागला ..पण त्याला काहीच सुचत नव्हतं ..विचार करून करून त्याचा जीव रडकुंडीला आला होता ..तो इकडून तिकडे चकरा मारत होता पण काहीच सुचत नव्हतं त्यामुळे तो स्वतःवरच रागावत होता .रागात त्याने आपला हात भिंतीला आपटला पण बाजूला संध्या असल्याने त्याने स्वतःला सावरून घेतलं ..एक एक क्षण जात होता नि तो हतबल होऊ लागला ..चकरा मारता - मारता बाजूला बेंचवर बसलेल्या संध्याकडे त्याच लक्ष गेलं आणि तो तिच्या जवळ जात म्हणाला , " संध्या तुला शुभमचा नंबर पाठ आहे ..आता खूप गरज आहे त्याची ग !!..ममाला वाचविण्यासाठी आता तोच मदत करु शकतो ..नाही तर ममा नाही वाचणार ..तुला माहिती आहे ना त्याचा नंबर ? "

ती काहीच बोलली नाही पण तिने मान हलविली आणि एक एक आकडा सांगत तिने नंबर पूर्ण केला ..तिने नंबर देताच सारांशने त्याला लगेच फोन केला पण समोरून कुणीच फोन उचलला नाही .त्यामुळे पुन्हा तो खजील झालां तरीही हार न मानता पुन्हा त्याने फोन लावला आणि यावेळी फोन उचलल्या गेल्या आणि समोरून कुणाला काहीच न बोलू देता तो म्हणाला , " शुभम तू मला ओळखत नाहीस पण मी तुला ओळखतो ..नित्याचा अपघात झाला आहे त्यामुळे तीच खूप रक्त वाहून गेले आहे ..माझ या शहरात कुणीच ओळखीच नाही ..तेव्हा तूच काहीतरी करू शकतो ..नाही तर नित्या वाचणार नाही ..प्लिज काहीतरी कर .."

शुभमला हे सर्व एकून शॉकच बसला होता पण त्याने भानावर येत म्हटले , " ठीक आहे मी माझ्या काही मित्रांना पाठवतो तू फक्त मला पत्ता सेंड कर मी करतो मॅनेज आणि मीही निघतो पुण्याहून ..तू काळजी घे तिची ..काहीही लागलं तर सांग आठवणीने ..काळजी करू नको मी पाठवतो लवकर मित्रांना.."

त्याने फोन ठेवला आणि तो वाट पाहू लागला ..वाट पाहण्याव्यतिरिक्त तो आणखी काहीच करु शकत नव्हता ..संध्याला त्याने एका बेंचवर बसवून ठेवले होते ..आणि इकडून तिकडे चकरा मारू लागला ..काहीच क्षणात नर्सने त्याला औषध आणायला सांगितले आणि तो धावतच मेडिकलमध्ये गेला ...औषध आणताच ट्रीटमेंट सुरू झाली पण अजूनही वाट होती ती रक्ताची ..त्याची नजर फक्त हॉस्पिटलच्या गेटकडे होती आणि तो घड्याळावर नजर टाकत गेटकडे पाहू लागला ..जोपर्यंत कुणी येणार नाही तोपर्यंत त्यांना चैन पडणार नव्हतं ..रक्त द्यायला कुणी आलं नव्हतं पण तेवढ्यात पोलिसांनी येऊन त्याचे स्टेटमेंट घेतले होते तर नित्याची अवस्था नीट नसल्याने ते स्टेटमेंट घेऊच शकत नव्हते ..वेळ जाऊ लागला आणि नित्याची तब्येत खराब होऊ लागली ..तासभर झाला होता ..तो इकडून तिकडे चकरा मारतच होता तेवढ्यात संध्या जोराने ओरडली , " आजी "
आणि त्याचे लक्ष गेटकडे गेले ..बहुतेक ती शुभमची आई आहे हे त्याच्या लक्षात आलं तर सोबतच त्यांच्या काही मुलं होते आणि त्यांनी सरळ सारांशला गाठले ..नित्याला नेहमी रक्ताची गरज पडायची म्हणून शुभमला तिचे रक्तगट माहीत होते म्हणूनच त्याने कदाचित त्याच रक्तगटाच्या मित्रांना पाठवले होते ..त्याला एकही क्षण हरवायचा नव्हता ..म्हणून सरळ त्याने डॉक्टरांना गाठले आणि डॉक्टरांनी एकही क्षण न हरवता त्यांचे रक्त घेण्याच्या प्रोसेसला सुरुवात केली ..आता एक - एक क्षण महत्त्वाचा होता आणि हेच क्षण नित्याच्या जीवन - मरणात अडून बसले होते ..जरी रक्ताची सोय झाली होती तरी सारांश मात्र शांत बसला नव्हता ..तो अजूनही तितकाच घाबरून होता ..

ऑपरेशन सुरू झालं ..रात्रीचे 12 वाजले होते ..छोटीशी संध्या आजीसोबत बसून होती ..तर सारांश आताही बेचैन होता ..शुभमची आई त्याला बरेच प्रश्न विचारत होती पण तो इतका घाबरला होता की त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर येत नव्हता ..मुलांना जाऊनही 2 - 3 तास झाले होते पण डॉक्टर आतून आले नव्हते त्यामुळे सर्वच घाबरले होते तर त्याच वेळी शुभम बाहेरून धावत आला ..त्याला नित्याची तब्येत जाणून घ्यायची होती पण डॉक्टरच आतमध्ये असताना तोही काहीच करु शकत नव्हता ..त्याने येताच सारांशला सर्व विचारलं पण तो काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता म्हणून तो शांत झाला होता तर रडणाऱ्या संध्याला त्याने हातात घेऊन शांत केले होते ..वेळ जाऊ लागला होता आणि सर्वच घाबरले होते ..एव्हाना ही बातमी सर्वांकडे वाऱ्यासारखी पसरली होती ..आणि काही लोक तिथे आले होते ..ते सर्व जीव मुठीत घेऊन ऑपरेशन थेटरच्या बाहेर वाटच पाहत होते की डॉक्टर बाहेर आले ..सारांश धावत त्यांच्याकडे जाऊ लागला पण मधातच त्याचे पाय थबकले कारण धावत शुभम आधीच तिथे पोहोचला आणि त्याने विचारले , " सर ती कशी आहे आता ? ..काही प्रॉब्लेम तर नाही ना ? "

डॉक्टरांनी चेहऱ्यावरून मास्क काढला आणि नम्र स्वरात म्हणाले , " बघा !! ऑपरेशन नीट झालंय ..तिला योग्य वेळी रक्त पण दिलं गेलं आहे पण ती स्टेबल नाहीये अजून ..24 तास आय.सी.यु. मध्ये ठेवावं लागेल ..या 24 तासात सर्व काही ठीक झालं तर बरं नाही तर ? ......
देवाकडे प्रार्थना करा की तिला काहीच होणार नाही ."

डॉक्टर एवढं बोलून निघून गेले पण हे ऐकून सर्व मात्र घाबरले होते ..रात्र सरत होती पण कुणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता ..त्याने आईला फोन करून सांगितले होते की त्याला काही दिवस येणे जमणार नाही ..कदाचित त्याला तिच्यासोबत तो प्रत्येक क्षण घालवायचा होता ..हळूहळू क्षण जाऊ लागले आणि दिवस उगवला ..तिचे आजोबा , मामा सकाळी आले पण कुणीच तिला भेटू शकत नव्हते ..तिची स्थिती अजूनही तशीच होती ..रात्रभर सर्वच जागल्याने शुभम आणि सारांश चहा घेऊन आले आणि सर्वानाही दिला ..सर्व अजूनही नित्या होशमध्ये येण्याची वाट पाहत होते ..ती आता उठेल म्हणून प्रत्येक व्यक्ती आय.सी.यु.कडे नजर ठेवून होता पण अजूनही तिने काहीच हालचाल केली नव्हती ...तेवढ्यात डॉक्टर सकाळी पुन्हा तिला पाहायला आले आणि त्यांनी सांगितलं की तिच्या स्थितीत अजूनही काहीच फरक झाला नाहींये म्हणून सारांश आणखीच घाबरला होता पण सर्वांसमोर त्याला अश्रू गाळने देखील जमले नव्हते ..एक - एक तास जाऊ लागला आणि सर्वांचे चेहरे कोमेजू लागले .जवळपास ती आता या जगात नसेल ह्या विचाराने सर्वांचे चेहरे कोमजले होते ..मावशी तर संध्याच कस होईल या विचाराने तिला जवळ करून रडत होत्या ..तिची स्थिती शुभमचीही होती .. जवळपास 24 तास होण्याचा मार्गावर आले होते ..डॉक्टरांनी शेवटची व्हिजिट दिली आणि सांगितले की तीने 2 तासात डोळे उघडले नाही तर कदाचित ती या जगात नसेन .." हे शब्द ऐकताच जणू सर्वच कोसळले ..सारांश तर पडणारच होता पण कसातरी भिंतीला आसरा घेत तो उभा राहिला ..सारांशला त्याक्षणी तिला भेटायचं होत पण तो तेही करू शकत नव्हता ..तो आज परिस्थितीसमोर हतबल होता इतकंच काय़ हक्काने अश्रू सुद्धा गाळू शकत नव्हता पण त्याला राहवलं नाही आणि तो आपले अश्रू बाहेर काढायला हॉस्पिटलबाहेर निघाला ..हॉस्पिटलमध्ये एका कोपर्याला त्याला जागा मिळाली ..आणि त्याने मन भरून रडून घेतले ..तो तिच्याशी बोलू शकत नव्हता पण तिचा रक्तबंबाळ चेहरा आठवून तो म्हणाला , " नित्या तू मला अस एकट सोडून जाणार ?..मान्य की आपण ठरवलं अपेक्षा करू नये एकमेकांकडून पण तू मला एकट सोडून जाऊन इतकी मोठी शिक्षा देणार आहेस? .तू नाही मिळालीस ना मला तरी मान्य पण अशी जग सोडून नको जाऊ ग !! ..तू समोर असलीस ना तरी आगुष्यभर मी प्रेम करायला तयार आहे पण मला अस एकट सोडून जाऊ नको ..तुझ्याविना मी नाही राहू शकत ..आजपर्यंत कुणाकडूनच काहीच मागितलं नाही पण आज मागतोय नित्या .प्लिज परत ये !!.तुला वाटत ना मी इकडे आलो तर मला कुणी जिवंत सोडणार नाही ..तुला काळजी वाटते ना माझी सो मी शब्द देतो तुला पुन्हा कधीच भेटणार नाही पण प्लिज परत ये ..आजपासून तू म्हणशील ते करेन पण नको जाऊ ग तुझ्याविना मी जगण्याचा विचार पण कर शकत नाही मग का मला एकट सोडून जात आहेस ? ..तुझ्या काळजीने इथपर्यत आलो होतो पण बघ ना काय होऊन बसल ? ..तू सोबत असण्यापेक्षा तू जिवंत असणं जास्त महत्त्वाचं आहे नित्या ..प्लिज ये ना परत ..तू वचन दिलंस मला की तू सोडून नाही जाणार कधीच आणि तू जर वचन मोडलल ना तर मीही नाही जगणार ..तेव्हा तू ठरव की तुला काय हवं , आता तुझा हट्ट महत्त्वाचा की माझा जीव ते तूच ठरव ? "

तिच्या आठवणीत त्याने मनभरून रडून घेतले आणि पुन्हा आत आला ..तासभर झाला असेल ..नर्स आतमधून धावतच डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टर धावत आय .सी. यु. मध्ये गेले ..आतमध्ये काय चालल होत कुणाला काहीच माहीत नव्हतं पण सर्व घाबरुन उभे झाले होते आणि त्यांची बाहेर येण्याची वाट पाहू लागले ..डॉक्टर आत जाऊन 10 मिनिटे झाले होते पण ते बाहेर आले नव्हते त्यामुळे सर्वांचं मन बेचैन झालं होतं तेवढ्यात दार खुलण्याचा आवाज आला आणि सर्वांच्या नजरा तिकडे वळाल्या ..सारांशचे तर हातपाय थरथर कापू लागले होते ..नित्याचे काका समोर होते तर सारांश सर्वात मागे ..डॉक्टर बाहेर येताच काकांनी विचारलं , " काय झालं डॉक्टर आमची नित्या बरी तर आहे ना ? "

डॉक्टराणी क्षणभर लांब श्वास घेतला आणि चेहऱ्यावर हसू आणत म्हणाले , " इट्स अ मीरॅकल !! टू बी होणेंस्ट मला खरच वाटलं नव्हतं ती वाचेल पण बहुतेक मुलीची दांडगी इच्छा आहे जीवन जगण्याची ..म्हणून ती यातून सहज बाहेर आली ..काहीही टेन्शन घेण्याच कारण नाही ..ती आता ठीक आहे ..आम्ही उद्या सकाळी तिला नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करू मग तुम्ही तिला भेटू शकता .."

डॉक्टरांचे शब्द ऐकताच सर्वांच्या जीवात जीव आला आणि सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले...बातमी एकताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि त्याने देवाला धन्यवाद केले ..

नित्याला होश आला आणि सर्वच खुश झाले पण तिच्याशी भेटण्यासाठी सर्वाना मात्र सकाळची वाट पहावी लागणार होती आणि आनंदाने सर्वच सकाळ होण्याची वाट पाहू लागले ..

दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली ..नित्याला नॉर्मल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं . शिफ्ट केल्यावर एक एक व्यक्ती तिला भेटून परत येत होता पण सारांश तिला पाहायला गेला नव्हता ....सारांशने विचारपूस करता , शुभमने त्याला सांगितलं होतं की ती होशमध्ये जरी आली असली तरी ती फार कमजोर आहे त्यामुळे फार कुणाशी बोलत नाहीये ..तरीही जवळपास सर्वच नातेवाईक तिच्याकडे जात होते ..नित्याला होश आल्यापासून संध्या तिच्या बाजूलाच जाऊन बसली होती आणि एका क्षणांसाठीही तिने नित्याला दूर केलं नव्हतं ..नित्यानेही तिला घट्ट धरून ठेवलं होत पण त्या सर्व गर्दीत नित्याची नजर केवळ सारांशला शोधत होती ..तर सारांश तिला केवळ बाहेरूनच पाहत होता ..जर तिच्या घरच्यांना मी कोण आहे हे कळलं तर तिला पुन्हा त्रास होईल म्हणून तो तिला पाहायला आत गेला नव्हता ..तो तिला दुरूनच पाहत होता ..ती बरी असल्याची शुभमकडून खात्री त्याने केली आणि जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये त्याने रूम घेतली ..त्याच्याही अंगावर रक्ताचा वास येत होता त्यामुळे त्याने शुभमला सांगून दुकानातून कपडे मागवून घेतले होते आणि हॉटेलवर जाऊन फ्रेश झाला होता ..खर सांगायचं तर त्याच मन तिला एकदा जवळून पाहायला बेचैन झालं होतं पण त्याने स्वतःला कमजोर पडू दिल नव्हतं ..नित्याही त्याची आतुरतेने वाट पाहत होती ..आता ती घटना घडून चार दिवस झाले होते ..नित्या त्याची वाट पाहत होती आणि सारांश तिला मनभरून बाहेरूनच पाहून घ्यायचा ..पण भेटत नव्हता ..सर्वाना ही गोष्ट कळाली होती की मृन्मयने तिला चाकू मारला पण अजूनही सारांश कोण आहे याबद्दल त्यांना काहीच कळलं नव्हतं ..आणि ते लपविण्यासाठीच तो जास्त वेळ तिथे राहत नसे ..कुणी नसल की तो नित्याला मनभरून पाहत जाई आणि पून्हा हॉटेल वर निघून जाई ..याच काळात नित्याने स्टेटमेंट दिलं होतं पण तिने सारांशबद्दल पोलिसांना काहीच सांगितलं नाही ..तर इकडे मृन्मय फरार झाला होता ..त्याचा पोलीस आताही शोध घेत होते पण त्याचा काहीच पत्ता नव्हता ..या चार दिवसात नित्याचे सर्व नातेवाईक तिला पाहुन गेले होते पण सारांश तिला पाहायला आला नव्हता शिवाय हॉस्पिटलमध्ये काही नेमकेच लोक रहायच सांगितल्याने तिथे फक्त मावशी आणि काहीच लोक राहत असे ..पुन्हा दोन दिवस गेले ..नित्याला सुट्टी देण्याची परवानगी हॉस्पिटलमधून मिळाली होती ..तिला शेवटच पाहता यावं म्हणून तोही बाहेर होता आणि आज तिचे मामा , आजोबा , काका , मावशी , शुभम असे सर्व लोक बाहेर होते ..नित्या आतमध्यें एकटीच बसली होती ..शुभम तिला निघण्यासाठी सांगत होता तेवढ्यात नित्या त्याला म्हणाली , " शुभम सारांश बाहेर असेल तर त्याला बोलवून आणशील का ? आणि जर असेल तर फक्त त्यालाच पाठव , कुणाला आतमध्ये येऊ देऊ नको ..प्लिज एवढं करशील का माझ्यासाठी ? "

शुभमने तीच बोलणं एकल नि तो सारांशला बोलवायला बाहेर गेला ..नित्याने त्याला एकट्यालाच बोलावलं आहे हे ऐकून त्याला बर वाटल होत तरीही तिच्याशी नजर मिळविण्याची त्याची हिम्मत नव्हतीं पण आज शेवटची भेट म्हणूनच तो आतमध्ये जाऊ लागला ..त्याने दार उघडलेच होते की नित्या म्हणाली , " सारांश जरा दार लावून घे आत येताना !! "

सारांशने दार लावले आणि तिच्यासमोर जाऊन उभा राहिला ..तिला जवळून पाहताना त्याला फार आनंद होत होता आणि हृदयात होते अश्रू फक्त त्याने ते डोळ्यात येऊ दिले नव्हते ...मन भरून आलं होतं तरीही स्वतःला सावरत म्हणाला , " कशी आहेस नित्या ? त्रास तर होत नाही आहे ना जास्त ? "

ती थोडी रागावत म्हणाली , " ठीक आहे !! ते सोड इतके दिवस बाहेर आहेस तर भेटावंस वाटलं नाही का तुला येऊन ? "

आणि तो चेहऱ्यावर स्मित आणत म्हणाला , " इथे सर्व तुझे लोक होते मग कोणत्या हक्काने येऊ हा विचार मनात आला तेव्हा आतमध्ये नाही येऊ शकलो म्हणून तुला बाहेरूनच पाहत होतो !! "

आणि ती त्याच्यावर चढत म्हणाली , " मग कोणत्या हक्काने मला मृन्मयकडून स्वतःकडे न्यायला आला होतास ? "

तिच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं म्हणून तो गप्पच राहिला ..नित्या पुन्हा त्याच्यावर भडकत म्हणाली , " तुला खरच नाही वाटलं मला एकदा भेटायला यावं , मी किती वाट पाहतेय तुझी ? तुला किती लागलं असेल या चिंतेने मन थार्यावर नव्हतं आणि तू फक्त बाहेरून पाहत होतास !! काहीच कस नाही वाटत रे तुला ? "

" इच्छा तर खूप होती पण नाही येऊ शकलो ..खरं सांगू विचार केला असता तर तुला नक्कीच भेटलो असतो पण जेव्हा तू मरण्याच्या दारावर होतीस तेव्हा मी स्वतःलाच वचन दिले की तू फक्त जिवंत राहा मग मला काहीच नको ..मी सोडून जाईल तुला कायमसाठी..तेव्हा भीती वाटली की मी जर वचन मोडल तर कदाचित तुझ्यावर काही परिणाम तर नाही होणार ना म्हणून नाही येऊ शकलो .आता तू सुखरूप आहेस हे पाहुनच मन शांत झालंय ..आणखी काही नको मला ..आणि निघून जाईल कायमसाठी तुझ्या आयुष्यातून .."

ती आता इमोशनल झाली होती आणि म्हणाली , " हो निघूनच जा कायमस्वरूपी !! मला एकटीला सोडून ..माज्यासोबत असच व्हायला पाहिजे ..शेवटी कमनशिबी ना मी !! ( ती रडत रडत ) ..सारांश मी तुला जेव्हा म्हणत होते की नको येऊस तेव्हा तू हट्ट करून माझ्याजवळ राहिलास आणि मला जेव्हा वाटत आहे की तू सोबत राहावं तर दूर पळत आहेस ..तुला माझ्या भावना कळत नाहीये का रे !! .."

सारांश हळुवारपणे म्हणाला , " तस नाहीये ग पण भीती वाटते मी वचन मोडल नि तुला काही झालं तर ? ..मी तुला भेटणं महत्त्वाचं नाहीये पण तू आजही कुठेतरी आहेस हे ऐकून मी जिवंत राहू शकेल ..हा विचार आला की दूर राहण क्षणभर योग्य वाटत .."

आणि ती रडत म्हणाली , " मूर्खां !! तुला कळत कस नाहीये जर तू वचन मोडल तर कदाचित मला काहीही होऊ शकत पण जर यावेळी तू सोडून गेलास तर मी नक्कीच मरेन..सारांश प्लिज मला घेऊन चल इथून ..आज स्वतःसाठी तुला काहीतरी मागते आहे ..मग तुझ्या आईचा तिरस्कार सर्व सर्व सहन करेन पण मला नाही रहायच इथे ...आज खूप हिंमत करून म्हणतेय सारांश चल आपणही एक नवीन दुनिया बनवू जिथे फक्त तू आणि मी असू ..नवीन स्वप्न बघू आणि ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करू !! आता नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय वाटल्यास दासी बनून राहील तुझ्या घरी पण मला या स्वार्थी जगातुन घेऊन चल नाही तर मी ? "

ती समोर काही बोलणार तेवढ्यातच त्याने तिला घट्ट मिठी मारली ..आणि दोन जीव शांत झाले ..कितीतरी दिवसांनी नित्याने हिंमत करून समाजाच्या बंधनातून स्वतःला मुक्त केले होते आणि त्यानेही तिला स्वीकारून प्रेमाची ताकद नक्की काय असत हे दाखवून दिलं ..दोघे एकमेकांच्या अश्रुत हरवलेच होते की कुणीतरी दार उघडले आणि ते समोर आलिंगन देताना दिसले ..ते तिचे मामा होते ..त्यांना बघून सारांशचे हात पाय थरथर कापत होते पण त्याक्षणीही नित्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत होते ..सारांशला आता काही अघटित घडेल याची भीती होती ..आधीच तिला रक्तबंबाळ बघून तो घाबरला होता त्यामुळे तो पुन्हा थरथर कापू लागला होता..काही क्षण गेले नि नित्याचे मामा , काका , आजोबा , मावशी , शुभम सर्व समोर येऊन उभे झाले ..त्यांच्या चेहऱ्यावर राग होता आणि त्या रागात मामा म्हणाले , " नित्या हा कोण आहे आम्हाला कळेल का ? "

नित्या विश्वासाने उत्तरली , " माझं प्रेम ..मी प्रेम करते ह्याच्यावर !! "

तीच उत्तर एकूण रूममध्ये शांतता पसरली ..मामांचा राग आणखीच वाढला आणि ते म्हणाले , " मान्य की मृन्मय चुकला पण तू अशा कुठल्याही परपुरुषांबरोबर निघून जाण आम्हाला आवडणार नाही ..लोक काय म्हणतील आम्हाला ? शेण घालतील आमच्या तोंडात !! आयुष्यभर कमावलेली इज्जत फक्त तुझ्यामुळे घालवायची नाही आम्हाला ..याआधी पण तू मृन्मय ला सोडून आली तेव्हा लोक काय काय बोलले आमचं आम्हाला माहिती ? तेव्हा ह्याच्यासोबत जाण्याचा विचारदेखील करू नकोस .. "

नित्याच्या डोळ्यात क्रोध दिसून येत होता आणि ती त्यांच्यावर ओरडत म्हणाली , " हा परपुरुष आणि तुम्ही कोण ? ..कधी मानलं तुम्ही मला स्वतःच ? ..सतत राग करत आला आहात ..इतका राग कशासाठी ? ..कुठे चुकले मी ? ..मुलीचा जन्म झाला म्हणून की आईचा आसरा लहान असतानाच हरवला म्हणून !!..सर्व काही तर केलं तुमच्या इज्जतीसाठी ..आणि तुम्ही काय केलं माझ्यासाठी ? सतत तिरस्कार करत आला आहात !!..एवढंच काय मला पोलीस जेल मध्ये नेत होते तेव्हाही तुम्ही काहीच बोलले नाही मग तुम्ही मला खरच आपलं मानता हे कसं म्हणू शकता ..इज्जत फक्त तुम्हालाच आहे का ? एखादा पुरुष एका स्त्रीचा मनाविरुद्ध उपयोग करून घेतो तेव्हा त्या स्त्रीची इज्जत आहे हे तुम्हाला दिसत नाही पण त्या स्त्रीने स्वतःसाठी जगायचा निर्णय घेतला की तुमची इज्जत जाते ..कोणत्या समाजाने हे नियम बनविले जे फक्त मुलींवर बंधने घालतात .. ह्याला परपुरुष म्हणता ना पण कायम ह्यानेच मला समजून घेतलं आणि ज्यांना मी आपलं मानत होते त्यांनी कायम मला ओझं समजलं ..तेव्हा आता माझ्यावर हक्क गाजवण्याचा विचारच करू नका ..तस केलंत तर मी विसरून जाईल तुम्ही माझे कोण आहात ते ? आज स्वतःसाठी निर्णय घेत आहे ..तुम्हाला चुकीच वाटत असेल तर समजा पण आज मी कुणाचं ऐकणार नाही . तस पण तुमची इज्जत जाणार नाही मी स्वतःच आता तुमच्याशी संबंध ठेवणार नाहीये ..निघून जाणार आहे याचं परपुरुषासोबत ..मग बघू कोण अडवत मला ? "

" नित्या मी शेवटचं सांगतोय तुला ..हट्ट सोडून दे नाही तर इथून ह्याला जिवंत जाउ देणार नाही ..मग समोर काहीही होऊदे " , मामा म्हणाले

आणि नित्या उत्तरली , " हिम्मत तर करून बघा मग दाखवते तुम्हाला ...एक - एकाचा हात तोडून दुसऱ्या हातात नाही दिला तर नाव सांगणार नाही ..."

तीच बोलणं त्यांच्या मनाला लागलं आणि मामा सारांशला मारायला समोर जाऊ लागले ..सारांशला ते मारणारच तेवढ्यात शांत असलेला शुभम मामांचा हात पकडत म्हणाला , " मामा जर त्याच्यावर हात उगारला न जे काही होईल त्याला जबाबदार तुम्ही राहाल !! ..काय चुकीच बोलली ती ??..आपले म्हणवता ना मग जेव्हा तिला गरज होती तेव्हा कुठे गेला होतात .तिने स्वतःचा विचार केला तर इज्जत गेली तुमची नि तुमच्यासाठी कायम नरक यातना भोगत होती तेव्हा तुमची इज्जत वाचून होती ..थु अशा इज्जतीवर .. सतत तिला तिची जागा दाखवली तुम्ही ..एवढंच काय तिची काय अवस्था आहे हे सुद्धा जाणून घेतले नाही ..उलट वडील मरण पावले तेव्हाही एक मुलगी आपल्या वडिलांच्या मरणाचा विचार करू शकते का हा विचार केला नाहीत तुम्ही आणि आज इज्जत आठवते तुम्हाला ..कधी तरी मीही चुकलो होतो दिदीला त्याच्याकडे पाठवून पण आता तीच चूक करणार नाही ..दिदी जा तुला हवं ते कर ..मी पाठीशी आहे आणि मामा जर कुणी काही केलं ह्यांना तर तुम्हाला माहीतच आहे मी कसा आहे ते ? इथेच लाशा पडतील .."

शुभमचा राग पाहून मामांचा हात खाली आला आणि त्या सर्वांसमोर नित्या त्याचा हात पकडून जाऊ लागली..समोर कोपऱ्यात मावशी जवळ संध्या होती ..नित्या तिच्याजवळ जाऊन खाली बसली आणि म्हणाली , " संध्या तू येणार ना बाळा माझ्यासोबत की तू पण सोडून जाशील मला ?.."

नित्याचे पाणावलेले डोळे पाहून संध्याने तिला मिठी मारली आणि नित्याला तीच उत्तर मिळालं ..नित्याने तिचा हात पकडला आणि नि तिघेही चालु लागले ..रिसेप्शनवर जाऊन सारांशने बिल पेड केले आणि एकमेकांचा हात धरून निघाले ते नवीन प्रवासासाठी........

सारांशने थोड्या दूरवर जाऊन टॅक्सी आणली ..टॅक्सी दारावर आली नि सारांश त्यांना आत जायला सांगू लागला ..ती आतमध्ये जाणार तेवढ्यात तिने मागे पलटून पाहिले ..शुभम आणि त्याचे मित्र तिला बाय बाय करत होते ..नित्या आणि संध्याने सर्वाना बाय केले आणि भरलेल्या डोळ्याने सर्वांचा निरोप घेतला ..सारांशने मात्र टॅक्सीमध्ये बसण्याऐवजी सरळ शुभमला जाऊन मिठी मारली होती आणि नंतरच जाऊन टॅक्सी मध्ये बसला ..हळूहळू टॅक्सी समोर जाऊ लागली आणि मागे राहिले ते हलणारे हात ..आणि काही कटू आठवणी ..आणि अस विश्व ज्यात तिला पुन्हा कधीच परत यायचं नव्हतं ..

जमाणे से लढकर आज
पाया है मैने तुझे
मोहब्बत वही तो रिषता है
जो हर हद पार कर जाये ..

काहीच वेळात ते एअरपोर्ट वर पोहोचले ..तासाभराने त्यांची फ्लाइट होती ..सारांशने चेक केले तेव्हा फ्लाइटची तिकीट अवेलेबल होती त्यामुळे त्यांना परत जायला काहीच त्रास होणार नव्हता ..छोटीशी संध्याही आईसोबत खुश होती ..सारांशने तिला भरपूर खायला घेऊन दिले होते त्यामुळे ती त्याच्यासोबत लगेच जुळली होती ..काही क्षणात फ्लाइटचा पुकारा झाला आणि ते त्यात बसून दूरवर निघून गेले ..सारांश मूळचा नागपूरचा ..त्यात एका छोट्याश्या खेड्यात तो राहत असे ..फ्लाइट नागपूरला आली आणि बसने त्यांचा प्रवास सुरु झाला ..प्रवासांत संध्या झोपी गेली होती तर नित्या त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून होती आणि तिने त्याला विचारले , " सारांश आपण निर्णय तर घेतला पण आईला मान्य असेल का हा निर्णय आणि तिने नकार दिला तर ? "

तो तिच्या चेहऱ्यावरून हात फेरत म्हणाला , " काळजी नको करू मी समजावेन आईला ..मान्य की मी तिला आधी सांगितलं नाही म्हणून रागावेल पण आईच आहे काहि दिवसात समजून घेईल आणि ती जरी काहीही म्हणाली तरी मी तुला सोडणार नाही ...मी करेल सर्व नीट ..माझ्यावर विश्वास आहे ना तुझा ? "

नित्याने फक्त मान हलवली ..आणि ते पुडच्या प्रवासाला लागले ..सारांशच्या गाव फक्त 30 मिनिटांवर असल्याने बस केव्हा पोहोचली ते त्यांनाच कळलं नाही ..गाव येताच नित्याने संध्याला उठविले आणि तिघेही खाली उतरले ..जरी तिने हिम्मत केली होती तरीही ती पुढे काय होईल म्हणून मनातून घाबरली होती पण सारांश सोबती असताना तिने ती भीती मनातून काढुन टाकायचे ठरवले ..आणि तोच विश्वास सोबत घेऊन ती त्याच्या मागे मागे जाऊ लागली ..तिने चालायला सुरुवात केलीच होती की आजूबाजूचे लोक तिच्याकडे पाहत असल्याच तिला जाणवू लागल..तिला ते पाहुन कसतरीच झालं होतं बहुदा ते त्याच्या लक्षात आलं नि त्याने आपला हात तिच्या हाताला घट्ट पकडून घेतला ..त्याचा हात येताच ती थोडी शांत झाली नि चेहऱ्यावर आनंद पसरला ..अगदी दोन मिनिटं ते चाललेच होत की सारांश एका घरासमोर जाऊन थांबला ..घराचं दार उघड होत पण आतमध्ये कुणीच दिसत नव्हतं म्हणून सारांशने आवाज दिला .. , " आई कुठे आहेस बाहेर तरी ये ? बघ मी आलोय !!"

आई आतमधून येइपर्यंत तो नित्याला म्हणाला , " नित्या बघ आपलं छोटस घर !! आता ह्यावर तुझाच अधिकार आहे ..चल आतमध्ये !! .फ्रेश हो आणि पड जरा ..सारांशने जसे घरात पाऊल टाकले अगदी त्याच क्षणी तिने आपले पाऊल घरात टाकून जणू त्या घराशी नात स्वीकारलं ..ती आत पोहोचलीच होती की आई बाहेर येत म्हणाल्या , " कुठे होतास इतके दिवस ? किती काळजी वाटत होती मला ? " ती बोलून गेली नंतर जाणवलं की घरात आणखी कुणीतरी आहे ..आई जाग्यावर उभ्याच होत्या की सारांश म्हणाला , " आई जा पाणी घेऊन ये आणि मस्त चहा टाक बाकी सर्व नंतर सांगतो ." .त्याच बोलणं ऐकून आईने पाणी आणून त्यांना दिले ...नित्या तोपर्यंत बेडवर जाऊन बसली होती तर संध्या इकडच्या तिकडच्या वस्तूला हात लावत होती ..नित्या नीट बसलीच होती की आई म्हणाली , " सारांश जरा इकडे ये .."

त्याच वेळी नित्याने सारांशकडे बघितले ..आणि सारांशनेही नजरेने सर्व काही नीट होईल असं सांगितलं ..ती तिथेच बसून राहिली...नित्याने आपला एक हात हातावर ठेवला आणि घर न्याहाळू लागली ..आईने बोलावताच तो आतमध्ये गेला आणि त्याला अगदी जवळ घेत आई हळुवार आवाजात म्हणाल्या , " सारांश ह्या कोण आहेत आणि तू ह्यांना इथे का घेऊन आला आहेस ? "

तो लांब श्वास घेत म्हणाला , " आई सांगतो सर्व पण आधी पूर्ण एकूण घे माझं मगच काय ते बोल.."

तिने केवळ मान हलवली आणि तो म्हणाला , " ही नित्या आणि तिची मुलगी आजपासून आपल्या सोबतच राहणार आहेत कायम.."

आई गोंधळून म्हणाल्या , " कायम म्हणजे ? "

आणि तो उत्तरला , " कायम म्हणजे कायम !!तुझी सून म्हणून ..तीच या जगात आता कुणीच नाही मी सोडून ..आणि माझं प्रेम आहे तिच्यावर सो ती आता इथेच राहील .."

आणि ती थोडी रागावत म्हणाली , " तू हे काय बोलतो आहेस सारांश!! ..दुसरी मुलगी मिळाली नाही का तुला ? लग्न झालेली घेऊन आला आहेस ? "

आईच्या चेहऱ्यावर नापसंदी दिसत होती म्हणून त्याने तिला घडलेल सर्व काही सांगायला सुरुवात केली ..काहीच क्षणात त्याने घडलेल सर्व काही सांगितलं ..ते ऐकून आधी शंकेच्या नजरेने बघणाऱ्या आईच्या डोळ्यात केव्हा अश्रू आले ते कळलंच नाही ..सर्व काही सांगून झाल्यावर तो म्हणाला , " आई मान्य की मला यापेक्षाही चांगली मुलगी मिळेल पण मी ते नात जर मनाने स्वीकारू शकलो नाही तर कदाचित त्या मुलीच आणि माझं आयुष्य खराब होऊन जाईल ..त्याउलट माझं नित्यावर प्रेम आहे मग तीच लग्न झालेल असेल तरीही आणि मी तिच्यासोबत कायम खुश राहीन .मुलगी लग्न झालेली असली तरीही तिला मन असत ..नात्यात समजूतदारपना असला की सर्व निभावून घेता येत हे तूच शिकवलं मला !! आणि एका स्त्रीचा आदर करून तीच मन जपन हे तुझेच विचार आहेत !! आई आज ती माझ्यावर विश्वास टाकून आली आहे पण मीही तिला सोडलं तर ती स्वतःच जिवंत राहणार नाही ..आणि फक्त आपण तिला स्वीकारलं नाही म्हणून दोन जीव या जगातून जातील ..माझं प्रेम आहे तिच्यावर ..स्वीकार ना तिला !! "

आई त्याच्या केसांवरून हात फेरीत म्हणाल्या , " मी त्यांना स्वीकारलं तरीही बाळा लोक काय म्हणतील ? "

आणि सारांश उत्तरला , " आई तूच माझं जग आहेस त्यामुळे तू काय विचार करतेस ह्याने मला फरक पडतो जग काय म्हणत त्याने नाही ..मला एकट्याने मोठं केलंस तू या जगाने नाही ..जेव्हा जेव्हा मला गरज होती तेव्हा ती तू पूर्ण केलीस या जगाने नाही मग त्या जगाच का ऐकू ? .तसही तूच आहेस माझं जग ..तुला विश्वास आहे ना माझ्यावर ?? मग दे ना मला एक संधी !!..मला नाही वाटत मी काही चुकीच केलं पण हेही खरं की तुझ्या सहमतीशिवाय मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही ..प्लिज स्वीकार ना तिला !! फक्त माझ्यासाठी !!..ती सर्व सोडून आली आहे ग माझ्यासाठी ..तिला नाही सोडू शकत मी ..तू मला कायम समजून घेत आली आहेस आणि आज जर तू साथ दिली नाहीस तर मी एकटा पडेन आणि मला तुझ्या मताशिवाय कुठलाच निर्णय घ्यायचा नाही ..प्लिज स्वीकार ना एकदा !!"

आणि ती डोळ्यात अश्रूं आणत म्हणाली , " हो हे खरं आहे की तुझ्याविना माझं कुणीच नाही आणि तुझ्यावर माझा विश्वासही आहे ..आणि माझा विश्वास म्हणतो की माझा मुलगा कधीच चुकीच वागणार नाही ..मला मान्य आहे बाळा पण एक नक्किच सांगते या सर्वात तिलाच जास्त त्रास होईल लोकांचे बोलणे ऐकताना .."

तो हसत म्हणाला , " तू सोबत आहेस ना मग बाकी सर्व सांभाळून घेईन शेवटी तूच माझं जग आहेस आणि तू काय विचार करतेस त्याने मला फरक पडतो ..लोक काय म्हणतात त्याने नाही .."

त्याच उत्तर एकूण आईच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण झालं होतं ..आपल्या मुलाचे विचार एकूण आज एक माता धन्य झाली होती आणि तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याच कौतूक केलं ...बराच वेळ झाला तरीही ते बाहेर आले नव्हते ..नित्याला कळून चुकलं होत की दोघात काहीतरी बोलणं सुरू आहे म्हणून ती थोडी घाबरली होती ..ती विचार करतच होती की आई बाहेर आल्या आणि नित्या भानावर आली ..त्यांनी तिला चहाचा कप हाती दिला ..तर नित्या कप हातात घेऊन त्यांच्याकडे पाहू लागली ..आईना नित्याच्या भावना अलगद कळाल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फेरत आई म्हणाल्या , " सर्व काही नीट होईल बाळा !! आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत !! आणि आता जरा लवकर बर व्हा !! म्हणजे मला माझ्या सुनेचा थोडा सासुरवास करता येईल ..काय सुनबाई करायचा ना सासुरवास ? "

नित्याला काही क्षण कळलंच नाही की आई गंमत करत आहे ..तिचा चेहरा कोमेजला हे पाहून आई आणि तो दोघेही हसू लागले ..त्यांचं हसन बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले आणि ते दिसताच सारांश म्हणाला , " आई तुझं बोलणं एकूणच ही रडायला लागली ..मला नाही वाटत तुझा सासुरवास ही सहन करेल "

रूममध्ये हसण्याचे आवाज पसरू लागले आणि पहिल्याच भेटीत नित्याची भीती नाहीशी झाली ..आईने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली , " रडू नको बाळा आता सर्व ठीक होईल ..माझा मुलगा आहे ना सोबत ..तो कायम माझी जबाबदारी संभाळत आला आहे आता तुझीही सांभाळनार हे विश्वासाने सांगते ..लवकर बरी हो आता आणि ह्या घराला स्वतःच बनवून घे आणि माझी कामातून सुटका कर , घेशील ना बनवून आम्हाला स्वतःच ??"

नित्याने चहाचा कप खाली ठेवला आणि त्यांना घट्ट मिठी मारत म्हणाली , " आई माझ्यासाठी आता हेच माझं जग तेव्हा या जगाला सुंदर बनवण माझी जबाबदारी !! फक्त कायम तुम्ही सोबत राहा !! "

आई पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरून हात फेरत होती आणि त्याच वेळी सारांशने तिला डोळा मारला ..आणि तिचा चेहरा खुलून निघाला..ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघून पुन्हा एकदा हरवली ..त्याला बघून तिला कळलं होतं की इच्छा असेल तर खरच नात निभावता येत आणि नसेल तर हजार कारण आहेत नात तोडायला ...

माँ तेरी आंखो मे
देखी है मैने आज जन्नत
तूझे पाया तो जाना है
तुही तो है प्यार की इक मुरत ..

---------

( मृन्मय सध्या लॉकअप मध्ये आहे आणि त्याच्यावर कोर्टात केस सुरू आहे ..सुरुवातीला त्याने तिला घटस्फोट द्यायला नकार दिला होता पण शेवटी नित्या , शुभम , त्याच्या आईने सतत त्याच्यावर प्रेशर आल्याने तो घाबरला आणि त्याने तिला घटस्फोट दिला ..)

.................दीड वर्षानंतर


पुन्हा गोवा ....तीच सायंकाळ ..बुडतीला आलेला सूर्य आणि आजूबाजूला पसरलेल्या केशरी छटा ..शांत असलेला समुद्र ..तर हळुवार स्पर्श करणारा वारा ..या क्षणात जणू कुणीही हरवून जावे ..आज दोघांनाही कळलं होतं की ईथेच लोक फिरायला का येतात ? ..त्यांना आज इथे आल्यावर जाणवलं होत की हे सर्व वातावरण दोन व्यक्तींना मनातून जोडण्याच काम करत ..नित्याला समुद्र म्हणजे जीव की प्राण आणि आज सोबती होता तिचा श्वास ...सारांश !!..आज दिवसभर त्यांनी गोव्याच्या विविध स्थळांना भेट दिली आणि शेवटी आले त्या शांत समुद्रासमये हितगुज करण्यासाठी ..तो नजारा बघताच पुन्हा एकदा गोव्याला येण्याच सार्थक झालं होतं ..ते एकमेकांचा हातात हात घेऊन थंडगार वाळूवरून शतपावली करत होते ..तो वाऱ्याचा , शीतल वाळूचा आणि शांत समुद्राच्या स्पर्श त्यांना हवाहवासा होऊ लागला होता ..त्यांनी सोबतीने काही पाऊले समोर टाकलीच होती की सारांश हळुवार आवाजात काही बोल गुनगूनू लागला ..नित्याला ते आवडलं आणि त्याच्याकडे प्रेमळ नजर टाकत ती म्हणाली , " सारांश थोडं जोराने म्हण ना प्लिज ..मलाही ऐकू दे !! "

तीच बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर सुंदर भाव निर्माण झाले आणि तो आता तिला ऐकू जाईल इतक्या आवाजात गीत गुणगुनू लागला ..

मौन नात्यातले बोल सारखे
शब्द माझेच आता मला पारखे
हो ...अंतरंगातले रंग हे शोधण्या
भेटलो एकमेकां मनासारखे

हो ..हो ...

रोज दारावरी सांज ओथंबते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते ..

विरघळे बंध हळव्या मनाचा
रिते अंबर मिठीतुन झरता
तूच हृदयातही ..तूच श्वासातह्या

जिवलगा ..जिवलगा ..जिवलगा ..जिवलगा

आज ही ती जुनी हाक येते मला ..

जिवलगा ..जिवलगा ..जिवलगा ..जिवलगा

त्याचा हात तिच्या हातात होता आणि ती स्वतःच डोकं त्याच्या खांद्यावर टेकवत म्हणाली , " किती सुंदर क्षण आहेत ना हे ! वाटत संपूच नये ...कैद व्हावं या क्षणात ..ना जगाचे बोल ना कसली चिंता ...फक्त तू आणि मी आणि हा बोलका समुद्र!! "

ती बोलत होती पण त्याच लक्ष मात्र तिच्या त्या शांत देहाकडे होत ..तिने केस बांधून घेतले होते तरीही काही केसांनी आपली सोडवणूक करून वाऱ्यासोबत वाहण्याचे सौभाग्य स्वतःच्या नावी केले होते ..तिचे डोळे हळूहळू उघडझाप करत होते ।.त्या डोळ्यातली नशा त्याला तिच्याकडे आकर्षित करीत होती ..चेहरा शांत होता पण तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद तो वाचू शकत होता ।.तो काहीच उत्तर देत नाहीये म्हणून तिने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले आणि त्याची नि तिची नजरानजर झाली ..तिची नजर त्याच्या नजरेला भिडावी आणि त्याच्या काळजात धसकन झालं ..ती डोळ्यात डोळे टाकून बोलायला तयार होती पण सारांशच काळीज फारच जोराने धडधड करत होत म्हणून त्याने आपली नजर खाली करून घेतली आणि म्हणाला , " नित्या तुला आठवतंय ही तीच जागा जिथे आपण आपली शेवटची भेट गाठली होती ..मग याही वेळी इथेच बसून काही सुंदर आठवणी ताज्या करूया !! "

ती काहीच बोलली नाही पण तिचा हसरा चेहरा बरच काही बोलत होता ..त्यांनी बुडत्या सूर्याकडे तोंड केले आणि खाली बसले ..ते काहीच बोलत नव्हते उलट शांत राहून समोरचा नजारा बघू लागले ..सूर्य आता बुडाला होता आणि त्या केशरी छटाही कुठेतरी हरवल्या ..आणि त्याची जागा अंधाराने घेतली ..ती काही वेळ काहीच बोलली नाही आणि अचानक म्हणाली , " बघ ना सारांश !! आतापर्यंत किती सुंदर वातावरण होत पण एकाच वेळी सर्व बदलल ..काय खेळ आहे ना प्रकृतीचा ..जो कुणाच्याच लक्षात येत नाही .."

तो मंद स्मित करीत म्हणाला , " हो नाहीच कळत खेळ कुणाला ..पण नित्या तुला सांगू ..हाच सूर्य पुन्हा उद्या नवीन उमेद घेऊन आपल्या भेटीला येईल ..हा अंधार दूर होईल आणि पुन्हा उजेड होईल ..अंधार फक्त क्षणभर असतो ग .."

आणि ती त्याच्याकडे पाहत म्हणाली , " जसा माझ्या आयुष्यात होता !!."

सारांश तिच्याकडे पाहून मंद स्मित करीत होता ...तिला त्याच्याशी नजर मिळविणे कठीण झाले होते आणि तो तिला पाहण्याची संधी सोडत नव्हता ..कितीतरी वेळ तो तिच्याकडेच पाहतोय हे जाणवल्यावर ती म्हणाली , " सारांश नको ना रे बघू अस !! मनात फुलपाखरू उडू लागतात बघ !!.अंगावर शहारे येतात आणि मी हरवून जाते तुझ्यात ..! "

जणू तीच बोलणं त्याला एकूच गेलं नाही अस तो वागत होता ..त्याने अजूनही तिच्यावरून नजर हटवली नाही ..तीच लक्ष खाली होत हे बघून त्याने हळूच तिचा गालावर पप्पी दिली ..त्याच अस वागणं तिला अपेक्षित नव्हतं त्यामुळे ती इकडे - तिकडे पाहू लागली आणि स्वतःच स्वतावर हसू लागली ..काही क्षण कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं तरीही तिथे आवाज होता दोन मनांचा ..ज्यांना शब्दातून नाही तर मनातून बोलायच होत ..ती खूपच लाजत होती पण तिने स्वतःला सावरलं आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली , " थॅंक्यु सो मच सारांश माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि हवेहवेसे क्षण देण्यासाठी ..तू नसता आलास तर आज मी कुठे असते आणि कशी असते याचा विचारही करवत नाही ..थॅंक्यु जगाची पर्वा न करता मला त्या नरकातून सोडविण्यासाठी ..तूच दिलंस मला नविन आयुष्य आणि आता तुझाच हक्क आहे यावर . कधी कधी विचार करते तेव्हा वाटत की प्रत्येकाच्या आयुष्यात असा सारांश नक्कीच असावा "

सारांश क्षणभर शांत होता ..त्याने दुसरा हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाला , " माझी वेडाबाई !! खर सांगू तर मी तुला कधीच सोडवल नाही ..तू सुटलीस स्वतः हिम्मत केल्यामुळे ..पहिल्यांदा हिम्मत केलीस जेव्हा मृन्मय मला मारत होता तेव्हा मला वाचविण्यासाठी त्याला अडवलं तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा तू माझ्यासोबत यायला घरच्यांसोबत भांडलीस तेव्हा !! नित्या मला अस वाटत की कुठलीही नित्या जी इतकं सर्व सहन करते तिला कुठल्याही सारांशची गरज नाही ..कारण ती स्वतःच लढाकू आहे फक्त प्रश्न आहे हिमतीचा ..जी तू दाखवलीस ..तू त्यावेळी जर ती हिम्मत दाखवली नसती ना तर कदाचित आपण भेटलो नसतो ..सारांश म्हणजे प्रियकर असणेच गरजेचे नाही उलट तो आधार असायला हवा तिला समजून घेणारा !! मग तो कधी मित्रात , कधी घरच्यात तर कधी अनोळखी व्यक्तीतही सापडतो ..फक्त फरक आहे हिमतीचा ..ती जर हिम्मत तिने केली नाही तर कदाचित कितीही सारांश आले तरी ती सुटणार नाही आणि तिने हिम्मत करायची ठरवली तर कुठल्याही सारांशची तिला गरज पडणार नाही ..हेच बघ ना !! तू आजारी असली तर तुला डॉक्टरकडे जावं लागेल ..तू नाही गेलीस तर कुणीतरी येऊन घेऊन जाईल पण समजा कुणीच सोबत यायला तयार नसेल तर तू मरणाची वाट पाहणार नाहीस उलट जितकी ताकद आहे तेवढी काढून स्वतः डॉक्टरकडे जाशील आणि स्वतःचे प्राण वाचवशील आणि तब्येत खराब झाली असताना आपण तो येईल तरच मी जाईल हा विचार म्हणजे मुर्खपणाच !!..जर आजार मला आहे तर दुसरा त्याला बरा कसा करू शकेल ? ..मान्य की कुणीतरी सोबत असल्याने आधार मिळतो पण कुणी नसेलच तर शांत बसून सर्व सहन करणे कधीच योग्य नसंत ..विचार कर जर तुला तुझ्याच जीवाची पर्वा नसेल तर दुसरे काय करणार ? ..जीवन असच आहे आजार आपला आहे तर त्यावर इलाज पण आपल्यालाच करावा लागेल ..मग कुणी सोबत असो वा नसो ..कुणी म्हणेल की ते सोपं नसत पण जीवपेक्षाही आणखी काही महत्त्वाचं आहे असं नाही वाटत मला ..नित्या आयुष्य जन्म देऊन आपल्याला जगण्याची एक संधी देत ..आयुष्यात एक निर्णय चुकला म्हणून पूर्ण आयुष्य चुकत नाही उलट आपल्याला एक संधी द्यायची असते आयुष्याला ..ती संधी आपण दिली की आपल्याला एक वेगळी वाट मिळणार असते नवीन सुरुवात करण्याची..मान्य की स्त्रिया या सहनशील आहेत ..पण ती सहनशीलता कुठपर्यंत असावी हे तिनेच ठरवाव ..ती आयुष्यभर सहन करत राहिली तरी फार काही फरक पडणार नाही कारण पिढ्यानपिढ्या तेच घडत आलं आहे पण त्यातल्या एका स्त्रीने जरी लढा दिला तर त्या कुटुंबात पुन्हा नित्या कधीच जन्माला येणार नाही हे खात्रीने सांगू शकतो ..पण त्यासाठी कुठून तरी सुरुवात व्हावि लागेलच .नित्या एक घटना सांगतो ..लिखाण करताना एका मुलीने मला विचारले की स्त्रियांनाच सर्व सहन का करावं लागतं ? पुरुष स्वतःहून का बदलू शकत नाही ..तिला मी उत्तर तर दिलं नाही पण त्यादिवशी मी स्वतःवरच हसलो ..कारण पुरुषांना बदलायच असत तर एका पुरुषाला इतर पुरुषांविरोधात जाऊन लिखाण करायची गरज नसती .पुरुषांना परंपरेनुसार मिळलेला तो विशेषाधिकार आहे ..जो चुकीचा असला तरी त्यांना सोडायचा नाही पण तरीही बदलत्या काळानुसार काही पुरुषांनी त्याच पुरुषांना विरोध करून थोडे फार बदल करायला सुरुवात केली आहे ..त्यालाही ते करणं सोपं नव्हतं पण त्याने प्रयत्न केला ..तेव्हा मला अस वाटत की स्त्रियांवर अन्याय होतोय तर त्यावर आवाज उठविण्याची सुरुवात तिलाच करावी लागेल ..हळूहळू एक एक स्त्री जरी ते करु शकली तरी पुढची पिढी सेफ होत जाईल ..भरपूर स्त्रिया अशा आहेत ज्यांना वाटत की मूल झाल्यावर सर्व नीट होईल पण खरं सांगू तेच मूल झाल्यावर खर बंधन निर्माण होत ज्यातून ती कधीच बाहेर पडू शकत नाही ..बाळाचे पाय पाळण्यात दिसतात !! अगदी हेही तसच माणसाचा मूड स्वभाव कधीच बदलत नाही तेव्हा मूल झालं काय नि नाही काय तो तसाच वागणार तेव्हा योग्य वेळी निर्णय घेणं गरजेचं असत ..जर ती व्यक्ती सर्व सहन करत असेल नि नवरा चाळीशी पार झाल्यावर तिला हाकलून लावत असेल तर त्यावेळी ती काहींची करू शकणार नाही ..मग उरत ते भकासपन आणि नको असलेल वृद्धाश्रम ..असतो तो पश्चाताप आयुष्यभर सहन करण्याचा अशा लोकांसाठी ज्यांच्यासाठी तिने संपूर्ण समर्पण दिलं ..तेव्हा योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे असते ..वेळ गेल्यावर हातात काहीच उरत नाही मग कितीही इच्छा असली तरीही .तू मुक्त झालीस कारण तू तो निर्णय घेतलास म्हणून !! .."

त्याच उत्तर एकूण ती थोडी शांत झाली होती ..पून्हा एक लांब श्वास घेत म्हणाली , " अगदी योग्य आहे तुझ !! ..पण सारांश जेव्हा एक स्त्री आपलं संपूर्ण समर्पण पुरुषाला करते तेव्हा तो फक्त स्पर्शातच का बांधून ठेवतो तिला ..त्याच जग फक्त त्या स्पर्शाच्या अवतीभोवती का फिरत ? आणि मग ती ताकद संपल्यावर काय करणार तो ? ..फेकून देईल आयुष्यातून त्या स्त्रीला कारण त्याची अटॅचमेंट तर फक्त शरीराशी होती ..मलाही सुरुवातीला वाटायचं की त्याने मला आधी खुलवाव मग मीच दिलं असत त्याला हवं ते पण त्याने मला ती संधीच दिली नाही ..त्याच्यासाठी स्पर्श म्हणजे फक्त काही वेळ माझ्या शरीरासोबत खेळ खेळन होत ..मागे एकदा त्याच्या घरी जाण्यापूर्वी त्याला भेटले होते तेव्हा तो म्हणाला होता की मी तुझ्या व्यतिरिक्त कुठल्याही मुलीला पाहत नाही ..त्याच कुठल्याही मुलींकिडे न पाहणं म्हणजे प्रेम आहे का ? की ज्या मुलीसाठी तो इतका होणेंस्ट आहे त्या मुलीच्या भावना जपून तीच तन मन खुलवन म्हणजे प्रेम .. "

नित्या सारांशकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होती आणि तो तिच्यावर हसत म्हणाला , " तू म्हणतेस ते योग्य आहे ..कुठलीही नवीन व्यक्ती आयुष्यात येते तेव्हा तिला समोरच्या व्यक्तीवर विश्वास होऊ देणे जास्त गरजेचे असते पण पुरुष ती संधी तिला देत नाहीत नि पहिल्याच दिवशी शरीराने तिच्यावर ताबा मिळवितो ..हे कुठेतरी चुकीच वाटत मला ..नात्यात प्रामाणिक असणं खूप गरजेचं पण नित्या जर त्याने स्त्रीच्या भावना जपल्या नाहीत तर तो तिला कायम हरवून बसण्याची शक्यता असते ..मग तो कितीही प्रामाणिक असला तरीही त्याचा काहीच फायदा होणार नाही ..नात्यात प्रामाणिकपणा तेव्हाच कारीगर सिद्ध होतो जेव्हा एकमेकांना ते हवेसे असतात ..पण जिथे व्यक्तीच त्यांची नाही तिथे तिच्याबद्दल प्रामाणिकपणा ठेवूनही काहीच मिळत नाही ..फक्त तो स्वतःला समजावून सांगतो की मी तिच्याबद्दल प्रामाणिक आहे म्हणजे माझं तिच्यावर प्रेम आहे ..हा त्याचा गोड गैरसमज आहे ..तो कुणाकडे पाहत नाही म्हणजे तो उत्तम आहे असे नाही उलट तो सर्वांकडे पाहूनही त्या प्रत्येक व्यक्तीच्या भावनांचा आदर करतो म्हणजे तो उत्तम आहे ..आणि भावना जपून जर तो फक्त तिचाच विचार करत असेल तरच ते प्रेम खुलत, नाही तर फक्त जगाला दाखवायला ते नात आदर्श असत पण प्रत्यक्षात त्या नात्याचं अस्तित्व फक्त जगासाठी असत आणि तिच्यासाठी तर ती फक्त अडजस्टमेंट होत जाते .."

ती पुन्हा गंभीर होत म्हणाली , " हममम ...आज जेव्हा मृन्मयबद्दल विचार येतो ना तेव्हा तो नक्की माणूसच आहे की नाही यावर शंका येते !!..त्याने माझ्यासाठी स्पर्श काय आहे हे कधीच समजून घेतले नाही उलट त्याच्यासाठी स्पर्श काय आहे हे सांगून माझं शरीर मिळवित राहिला ।.पण स्पर्शाचा खरा अर्थ मला तुझ्याकडे आल्यावर कळला !! तू कधी कधी नकळतपणे खूप जवळ येतोस ना तेव्हा माझं हृदय धडधड करू लागत आणि शरीर साथ देऊ लागत..तो आहे माझ्यासाठी स्पर्श !!..कधी कधी तू फक्त रोमँटिक बोलतोस नि ते शब्द मी जगू लागते ..अचानक अंगावर शहारे येतात तो आहे माझ्यासाठी स्पर्श !! तर कधी कधी तू काहीच बोलत नाही आणि तुझी फक्त नजर बोलते तेव्हाही मनात चलबिचल सुरू होते आणि मन कुठेतरी दूर रानात हरवत जाते तो आहे माझ्यासाठी स्पर्श ..जो मला सतत हवा हवासा वाटतो .."

तिचा मूड त्यांच्या आठवणी आठवून जरा ठीक झाला होता आणि सारांश म्हणाला , " माझ्यासाठी स्पर्श म्हणजे काय माहिती आहे ? "

ती प्रश्नार्थक मुद्रेने , " काय बर ? "

तो तीच्या गालावर टिचकी मारत म्हणाला , " तू अंघोळ करून आल्यावर जेव्हा केसांच ओल पाणी माझ्या चेहऱ्यावर जाणून मारतेस ना तेव्हा दिलं गार्डन गार्डन वाटत ..तो म्हणजे स्पर्श !!..कधी कधी जाणून रुसतेस ..तुझा रुसवा दिवसभर सहन करण आणि शेवटी तुला मनवन म्हणजे स्पर्श !! ..तुझ्या केवळ पैंजनाच्या आवाजाने तुझा मूड कसा आहे हे ओळखण म्हणजे स्पर्श !! ..तू कधी रागात असलीस की एक शब्दही न बोलता तुझं सर्व एकूण घेणं म्हणजे स्पर्श !! ..तुझं , हसन , रडणं , सजन सर्व काही स्पर्श .."

तो बसलेला असताना तिच्या कुशीत झोपत म्हणाला , " तुझ्या कुशीत झोपून स्वतःला सुरक्षित समजन म्हणजेही स्पर्शच !!."

तिने लाडाने त्याचे केस हलविले आणि तो म्हणाला , " न बोलताही तू व्यक्त होणं म्हणजे माझ्यासाठी स्पर्श !! ."

ती खूपच लाजली होती आणि तो म्हणाला, " तुझं लाजनही स्पर्शच उलट हाच क्षण अनुभवण्यासाठी मी तुझ्या भेटीची सतत वाट पाहत असतो .."

तो जे काहो बोलत होता ते ऐकून तिला छान वाटत होतं पण स्पर्शाचा ह्यांच्याशी काय संबंध आहे हे तिलां समजलं नाही म्हणून प्रश्नार्थक मुद्रेने ती त्याचाकडे पाहू लागली आणि तो म्हणाला , " बुद्धू !! शरीराचा स्पर्श निर्माण होण्यासाठी आधी दोन मनांमध्ये आकर्षण निर्माण होणे गरजेचे असते ..मनामधील आकर्षण निर्माण होत छोट्या छोट्या क्षणात जे मी तुला सांगितले ..आणि ते आकर्षणच असत जे दोन शरीराना कायम जुळवून ठेवण्यास मदत करत आणि मग दोन्हीही शरीर निसर्ग नियमानुसार बहरू लागतात..ज्यात त्रास नसतो असते ती ओढ कायम..जशी ओढ तुझ्या नि माझ्यात कायम असते .."

त्याच बोलणं ऐकून तिने लाजुन डोळे घट्ट मिटुन घेतले आणि तो हळुवार स्पर्शाने तिचे हात डोळ्यावरून काढत म्हणाला , " मैं तो मर जावा !! आता तर काही खरच नाही माझं .."

आणि ती त्याच्यावर हसत म्हणाली , " पुरे हा !! खुप झाली थट्टा !! इतकं गोड बोलतोस की कधी कधी जगाबद्दल भानच राहत नाही ..माझी गोड जिलेबी !!..पण ना , आता मला विश्वास झाला आहे की तुझ्याकडे नक्किक कोणतं तरी पुस्तक आहे ज्यातून तू मला सर्व सांगतोस ..घरी गेल्यावर बघतेच ते पुस्तक ..काय माहीत कुठे लपवुन ठेवले आहेस ते ? "

आणि तो हसत म्हणाला , " तुला नाही मिळणार ते पुस्तक कारण ते तृप्ती कडे आहे .."

आणि ती थोडी चिडत म्हणाली , " वा !! लग्न माझ्याशी आणि पुस्तक तिच्याकडे ..मग लग्नही तिच्याशीच करायचं होतं ना ? "

आणि तो तिची खेचत म्हणाला , " केलंही असत पण आता ते शक्य नाही ना ? ..तुझ्याशी जे केलं लग्न ..तुझी परवानगी असेल तर करतो तिच्याशी लग्न ? "

ती चिडून त्याच्या कधी डोक्यावर तर कधी हातावर मारत होती आणि तो म्हणाला , " नित्या मारू नको ना तुझा हात भारी आहे ग खूप लागतो .."

पण तिने काही मारन थांबवल नव्हतं ..आणि चिडून म्हणाली , " तुला मला राग आणायला आवडत ना मग घे खा मार आता "

ती मारत होती आणि तो तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करून पळू लागला ..मागून नित्याही त्याला मारायला पळू लागली ..सारांश धावता धावत समोर निघून गेला आणि नित्या दमल्याने मधातच बसली ..ती दम टाकत होती ..तर ते त्याने दुरूनच पाहिलं आणि तिच्याकडे पळत आला ..ती खाली बसून होती ..तिच्याकडे स्वतःचा हात समोर करत म्हणाला ,

कोई धुंडता रहे मोहब्बत
हमसफर के जिस्म मे
मुझे तो तेरी रुसवाई मेभी
हर बार प्यार नजर आता है ...

त्याची शायरी ऐकताच तिने त्याला हात दिला आणि तोच हात हातात टाकून ते रूमकडे परतू लागले ..ते एकमेकांसोबत खूप आनंदी होते ..चालता - चालता तो म्हणाला , " नित्या पुरुष पण एक विचित्र कोड आहे ? जेव्हा तो प्रियकर असतो ना तेव्हा जगाचा विचार न करताही तिच्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करतो एवढंच काय तिला गरज असेल तर सर्वांसमोर मिठी मारन की किस करन असो करतो पण लग्न झालं की एक टिपिकल माणूस बनतो ..जो कधीतरी समाजाला घाबरत नव्हता तो आज समाजाच्या भीतीने बायकोचा हात पकडायला घाबरतो ..हसू येत ना एकाच माणसाला दोन रुपात बघून !! ..मे बी त्याला वाटत असेल की लोक आपल्याला बायकोचा गुलाम म्हणतील पण बायकोच्या इच्छा पूर्ण करणे , तिचा हातात हात घेऊन मी सुख दुःखाच्या क्षणी तुझ्यासोबत आहे आहे हे सांगणे जर गुलाम असेल तर मग बायको तर त्याची केव्हाच गुलाम झाली आहे ..त्याच्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारायला ती तयार होते मग तिला आवडत नसेल तरीही ..ज्यादिवशी ही गोष्ट आम्हा पुरुषांना कळेल ना तेव्हा त्यांना समजेल की बायकोचा हात पकडणं म्हणजे तिला साथ देन होय ना की गुलाम बनन ..

( तो तिच्या हातावर किस करत )

असू दे हाती हाती तुझा
अन क्षणभर घे कवेत
मोडून नियम ह्या जगाचे
हरवूया एकमेकात
का पर्वा व्हावी मज
बोलणाऱ्या तोंडाची
पसरून दवबिंदू गवतावर
सजवूया नाती मनांची
का उगाच कुणा घाबरून
मी हात तुझा सोडावा
चला प्रथा मोडून समाजाच्या
घेऊ हात हाती एकमेकांचा......

नित्या खर तर प्रेम ही जगाला दाखवायची गोष्ट नाही ..ती गोष्ट आहे एकमेकांसाठी जगण्याची ..जगाला जरी कळलं नाही की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे तरी चालेल पण तिला नक्की कळू द्यावं की तिच्यावर तुमचं किती प्रेम आहे ..जेव्हा दोन मन जुळू लागतात ना तेव्हा एकमेकांप्रति आकर्षण निर्माण होत आणि तेच आकर्षण तुम्हाला कायम शरीराशी जुळवून ठेवत आणि मग तो स्पर्शही हवाहवासा वाटतो ..किती सोपं कोड आहे ना स्पर्श ? आणि आपण त्यांना उगाच क्लिष्ट करून ठेवतो..तो स्पर्श कुठल्या कामाचा ज्यात समोरच्या व्यक्तीच्या भावनाच नसतील ..स्पर्श म्हणजे वरदान , दोन व्यक्ती कायम एकत्र राहण्याच..जे दोन व्यक्तींना वेगळं होऊ देत नाही पण त्यासाठी गरज आहे स्पर्श या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेण्याची ..तो मिळाला तर स्वर्ग नाही तर पिढ्यानपिढ्या एक नित्या नक्की जन्माला येईल हे खात्रीने सांगू शकतो ..."

ती त्याच्याकडे मनभरून पाहत होती आणि तो आत्मविश्वासाने समोर चालू लागला होता ..त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता आणि मनात भरलं होत प्रेम ।...कदाचित हे आता कधीच सुटणार नाहीत..

नित्याने आता सारांशचा हात कायमस्वरूपी हातात घेतला आहे ..तिला परवा नाहीये जगाच्या बोलण्याची ..फक्त ओढ आहे त्याच्या जवळ येण्याची ..ती ओढ , तो स्पर्श जो मनाने सुरू होतो नि शरीराला जाऊन पूर्ण होतो..पण त्यात आनंद आहे ना की वासना ...असा हा स्पर्श, सृष्टीने दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट !!

दोघेही एकमेकांचा हात पकडून रूमकडे जाऊ लागले आणि उरलेल्या गीताच्या ओळी नित्याने पूर्ण करत गुणगुनू लागली ..

जग सारे इथे थांबले वाटते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्मबंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते ...

हो ...ओघळे थेंब गाली सुखाचा
मिटे अंतर लपेटून घेता
तू माझा ....मीच तुझी सख्या
जिवलगा ....जिवलगा .....जिवलगा ...जिवलगा

ऐल ही तूच अन पैल ही तू सख्या ..

जिवलगा ...जिवलगा ....जिवलगा ...जिवलगा ..


--------------------------- समाप्त -----------------------------------