kadambari Jivlagaa Part 50 Antim Bhaag books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग-५० वा -अंतिम भाग

कादंबरी – जिवलगा

भाग- ५० वा

अंतिम भाग

--------------------------------------------------------

आजकालच्या ट्रेन आपापल्या वेळेनुसार धावत असतात ,त्यामुळे ..ट्रेन लेट झाल्यामुळे होणारा

मन:स्ताप खूपच कमी झाला आहे. हेमुचे आई-बाबा ..रेल्वे आणि बस असा संयुक्त प्रवास करून

घरी सुखरूप पोंचले. आणि यावेळचा प्रवास अनेक अर्थाने सफल –संपूर्ण झाला आहे असेच दोघांना वाटत होते.

दुपारपर्यंत त्यांचे रुटीन सुरु झाले . हेमूच्या बाबांनी ऑफिस मध्ये जाऊन .. स्टाफला

सत्कार समारंभात मिळालेले गौरव चिन्ह ,सन्मानपत्र , शाल-श्रीफळ दाखवले ,खूप छान कार्यक्रम

झाल्याचे ऐकून सगळ्यांना आनंद झाला ..हेमूच्या बाबांचे सर्वांनी अभिनंदन केले .

शाळेतील शिक्षकांची आणि मुलांची भेट उद्या सकाळी घेऊ या .असे ठरवून हेमुचे बाबा घरी आले,

संध्याकाळच्या वेळी दोघे ही अंगणात बसून बोलत बोलत चहा घेऊ लागले .

.तेव्हा हेमूच्या आई म्हणाल्या तुम्ही मी काय सांगते .ते ऐकून हसू नका बरे का .

.पण,मला राहवत नाहीये म्हणून आठवण करून देते ..

ते तुम्ही म्हणालात की – नेहाच्या घरी फोन करून बोलू या , लावता का तिच्या बाबांना फोन ..

हेमूच्या बाबांना खरोखरच हसू आवरले नाहीये ..ते म्हणाले ..

आपली गत अशी झालीय न .की तू मला हास आणि मी तुला हसतो .

मला सुद्धा वाटते आहे की आता नेहाच्या बाबांना फोन करावा आणि बोलून सगळ सांगावे ..

हे ऐकून हेमुची आई म्हणाली ..

अगोदर फोन करा , जुन्या ओळखीची आठवण करू द्या ..मग ,ते काय बोलतात ते ऐकून

आपण ठरवू काय करायचे ते ..

हेमूच्या बाबांनी लगेच फोन लावला ..

पलीकडून ..आलेला आवाज आज खूप वर्ष नंतर कानावर पडला ..हा आवाज नेहाच्या बाबाचा आहे हे

हेमूच्या बाबांना ओळखू आले .

त्यांनी ..अगोदर जुने संदर्भ दिले..आठवणी सांगितल्या ..

हेमूच्या बाबांच्या अपेक्षेप्रमाणे ..

नेहाच्या बाबांना आश्चर्य वाटले ..खूप आनंद झाला हे जाणवत होते .

हेमुचे बाबा म्हणाले ..वकीलसाहेब , बापूसाहेबांशी बोलायची इच्छा आहे ..बोलता येईल का ?

नेहाचे बाबा म्हणाले – जरूर बोला की ..त्यांना तर खूप आनंद होईल .ते अजून ही रोज यांच्या

जुन्या मित्रांची आठवण करीत असतात .त्यात तुमचे चुलते .चंद्रकांत पांडे ..हे तर जिगरी दोस्त .

घ्या बोला बाबांशी ..

हेमुचे बाबा म्हणाले ..प्रणाम बापुसाहेब ..

मी शामकांत पांडे , तुमचे जुने मित्र ..चंद्रकांत पांडे ..वकीलसाहेब्नाचा पुतण्या शामकांत पांडे .

तिकडून नेहाचे आजोबा ..दुप्पट आनंदच्या आवाजात बोलत म्हणाले ..

अरे ,शामकांत ..तुझ्या काकाला ..माझ्या जिगरी दोस्ताला विसरूच शकत नाही मी..

वीस –पंचीवेस वर्षापूर्वी पर्यंत ..तू आणि तुझा काका ..किती तरी वेळा माझ्याकडे आलेला आहेत ,

पुढे सगळे गुरफटून गेले ..मग कसची भेट ..

मला आठवते -तू आणि आमचा दिनकर ..दोघे शाळेच्या सुटीच्या दिवसात ..

हैद्राबादला आमच्या रूम वर येऊन मस्त सुट्टी घालवायचे ...

तुम्ही दोघे आमच्या पावलावर पाउल टाकून पुढे वकील झाले ..याचा खूप आनंद वाटला.

हेमुचे बाबा म्हणाले .. बापूसाहेब ..आमच्या काकांच्या बरोबर ..तुमच्या घरी ..तुमच्या गुरूंच्या

वार्षिक उत्सवाला ..अनेक वर्षे आल्याचे मला अजून आठवते .

तुमच्या दिनकर सोबत मी कितीदा उत्सवातल्या पंगती वाढत मांडवात मिरवलो आहे. .

त्या चविष्ट प्रसादाची चव अजून जिभेवर आहे .

बापूसाहेब म्हणाले ..

अरे शामकांत ..तुला जणू आमच्या गुरुजींनी बोलावले आहे असे समज..

येत्या रविवारी उत्सव आहे ..पंगत आहे आणि तुझ्या आठवणीतला प्रसाद आहे..

तू आणि तुझी बायको –, दोघे शनिवारीच दिवसा पोन्चाल अशा बेताने मुकामाला आमच्या घरी यावे .

नक्की या . आम्ही वाट पाहू तुमची .

येशील ना रे शामकांत ?

बापूसाहेबांच्या आवाजातील प्रेम जिव्हाळा ..जाणवून हेमूच्या बाबांच्या डोळ्यात पाणीच आले ..

ते म्हणाले ..बापूसाहेब ..तुमचे बरोबर आहे ..तुमच्या गुरूंची इछाच आहे..

आम्ही तिकडे यावे ..म्हणूनच आजची भेट झाली बघा आपली.

आम्ही उभयता शनिवारी येत आहोत .सांगा दिनुभाऊना .

फोन ठेवून देत हेमुचे बाबा म्हणाले -

..बघा हेमूच्या आई..याला म्हणतात परमेश्वरी इच्छा आणि चमत्कार ..आपण येऊ का ?

असे विचारायच्या आधीच ..त्यांनीच आपल्याला या शनिवारी –बोलावले आहे ..

रविवारच्या उत्सवात सहभागासाठी .

हेमूच्या आई म्हणाल्या ..मला कल्पना नव्हती ..तुम्ही या फ्यामिलीशी इतके क्लोज असाल ,

हेमुचे बाबा म्हणाले ..मला तरी कुठे माहिती होते ..

ही नेहा म्हणजे .बापूसाहेबांची नात, आणि दिनकरराव वकील्साहेबांची मुलगी आहे..

जेव्हा तिने आपल्याला निघतांना त्यांचे नावे सांगितले .गाव सांगितले ..फोन नंबर दिले ..

तेव्हा माझी खात्री ..अरेच्या ..ही गोष्ट म्हणजे ..काखेत कळसा आणि गावाला वळसा “असे झाले आहे .

हेमूच्या आई - आता एक करा दोन –तीन दिवसात सगळी छान तयारी करा .रितीरिवाजा प्रमाणे

कपडे आहेर ‘असे सगळे साग्रसंगीत समान सोबत असुद्या .

आणि या वेळी आपण बस ने नाही ..कार ने जायचे ,इथून बसले की ..थेट वकीलवाड्या समोरच नेऊन गाडी उभी करणार .

हे ऐकून हेमुची आई म्हणाली - बाप रे .आश्चर्यच आहे ही

..तुम्हाला .अजून लक्षात आहे..गावातील रस्ते ,वकील साहेबांच्या घराचा रस्ता ?

हेमुचे बाबा म्हणाले ..बिलकुल ..!

हेमूच्या घरातली ही दोन माणसे आनंदाने तयारीला लागली ..

*************

२.

मंगळवारी सकाळी अनिता आली ..आल्यवर तिला सोनिया आणि शैलेश बद्दल कळाले ,या अपघाताने

पुन्हा दोघे एकत्र आले आहेत ..हे माहिती झाल्यावर अनिता खुश झाली ..सोनियाने अजून पंधरा दिवस

रजा वाढवली , दोन –चार दिवसात शैलेश आणि वीरुला डिस्चार्ज मिळणार ,त्यानंतर सोनिया इकडे रूमवर

न येता सरळ शैलेशच्या घरी जाणार , आणि तिथे सेटल झाल की .एखाद्या दिवशी येऊन सामान घेऊन

स्वतःच्या घरात हक्काने पुन्हा राहायला सुरुवात करणार .

अनिता म्हणाली – नेहा , सोनियाचे मामा-मामी , त्यांचा कार्यक्रम ,मुक्काम व्यवस्थित पार पडला ,

तो केवळ तुझ्यामुळे , खरेच खूप ग्रेट आहेस तू .

सोनियासाठी दोनवेळा डबा तयार करणे , मामा-मामी साठी वेळेवर चहापाणी करणे ..

आणि तुझे ऑफिस ...मला तर हे जमलेच नसते .

नेहा म्हणाली .अनिता ..वेळ आली की .अंगात बळ येत असते आपोआप . जमते, होऊन जाते अशावेळी .

फक्त आपल्या मनावर कंट्रोल ठेवता आला पाहिजे ..शांतपणे पार पडतात गोष्टी.

अनिताने नेहाला हात जोडीत म्हटले ..मैया –नेहा ..तू ग्रेट आहेस .

हे बघ नेहा ..मी आता इथे कमीत कमी असणार , सोनियापण शैलेश सोबत रहाणार ..

आता तू तुझ्या घरच्यांना कल्पना देऊन टाक ..तुझ्या आणि हेमूच्या नात्यबद्दल.

आता पुरे झाले लपवणे .कधीतरी धाडस करून ,न घाबरता हे तुला सांगावे लागणार आहेच.

हे ऐकून नेहा म्हणाली .. हो अनिता .

मी आणि हेमुनी ठरवलंय ..या मंथ एन्डला आपापल्या गावी जाऊन .सर्वांना सांगायचे.की

आम्ही लग्न करणार आहोत ..त्यासाठी परवानगी द्यावी आम्हाला .

अनिताने आनंदाने ..नेहाला मिठी मारीत म्हटले ..

ओ हो ..इतना डेअरिंग ..क्या बात है नेहाराणी .. सच है –प्यार किया तो डरना क्या

***********

३.

गुरुवारची संध्याकाळ ..ऑफिस सुटण्याची वेळ ..कधी नव्हे तो आज हेमू आणि नेहा एकाचवेळी

सोबत बाहेर पडत होते. त्यांच्या मजल्यावर लिफ्ट आली ..तळ मजल्यावर उतरायचे आणि समोरच्या

गेट ने बाहेर पडले की बाजूच्या हॉटेल मध्ये कोफी घेऊन रूमवर जायचे .

खूप दिवसांनी अशी संध्याकाळ आली याचा दोघांना आनंद झाला होता.

लिफ्ट थांबली ..दरवाजा उघडला तसे दोघे बाहेर पडले ..त्याच वेळी तळमजला साफ सफाईचे काम सुरु

होते ..याकडे नेहा-हेमुचे लक्ष नव्हते . काम करणारा माणूस मोठ्याने ओरडून सांगू लागला ..

ओ मैदाम .खाली पाहून चला ..पाणी आहे ..निसटेल पाय ..

हेमू पुढे आणि नेहा त्याच्या थोडे मागे होती .आणि तिचा पाय सटकला ..

तशात ही तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला ..पण..झोक जाऊन ती समोर पडली आणि

तिचा उजवा हात आणि पाय जोरात आदळला , दोन्हीवर तिच्या शरीराचा भार पडला ..

हेमूने दचकून मागे पाहिले ..नेहा उठून उभी राहण्याचा प्रयत्न करीत होती ..पण.तिला ते शक्य

नव्हते .. मजूर बायका पळत आलेल्या होत्या ..त्यांनी नेहाला उठवले ..

हेमूने तिला एका हाताला धरीत हळू हळू पुढे पाउल टाकण्यास सांगितले ..

पण..तिच्याच्याने पाउल टाकवत नव्हते ..होत असलेल्या वेदना ती सहन करीत उभी राहिली.

हेमूने सोनिया ज्या हॉस्पिटल मध्ये शैलेश सोबत होती ..तिथे फोन करून सांगितले ..

सोनिया म्हणाली ..घाबरू नको ..तू ये तिला घेऊन ..मी डॉक्टरला सांगून ठेवते आहे .

हॉस्पिटलमध्ये गेल्यवर ..नेहाचा चेकअप झाला ..

डॉक्टर म्हणाले .. उजवा हात आणि कोपरा जास्त दुखावला आहे..बारीक फ्रेकचर झाले आहे ..तीन आठवडे

प्लास्टर असेल , उजव्व्या गुढग्याला मुका मार आहे , सूज आली आहे ती यामुळेच.

उद्या संध्याकाळी ही घरी जाऊ शकते .ऑफिस मात्र कम्पल्सरी रजा .

सोनिया म्हणाली ..हिला हिच्या गावी कार मध्ये घेऊन जाता येईल का ?

कारण इथे कुणीच नाही . रूमवर आम्ही असतो ,पण आता ही एकटीच असेल. कसे होईल हिचे .

डॉक्टर म्हणाले ..स्पेशल कार करून .शनिवारी सकाळी निघाला तर चालेल ..रात्रीचा प्रवास

नका करू . आणि सोबत असणारच न हिच्या कुणी , वाटल्यास तुम्ही एक केअरटेकर .नर्स नेऊ शकता .

तिला परतीच्या प्रवासाचे पैसे आणि दोन दिवसाचा भत्ता दिला की तुमचे काम होईल.

सोनिया म्हणाली..

यस डॉक्टर ..हे हेमकांत पांडे ..आमचे फमिली मेंबर ..हिला हिच्या गावी घरी पोन्च्व्तील ,

तुमची नर्स ..नेहाच्या सोबत मागच्या सीटवर तिला सपोर्ट म्हणून असेल .

डॉक्टर गेल्यवर सोनियाने .हेमुला असे करण्यास सांगितले .. नेहाला काही सुधरत नव्हते ..

उद्या कदाचित पेन कमी झाला तर तिला थोडे बरे वाटेल.

डॉक्टरच्या परवानगीने ..सोनियाने ..नेहासाठी स्पेशल बेड ..शैलेश आणि वीरूच्या रूम मध्ये

adjest केली. थोड्याच वेळात ..अनिता पण धावत आली हॉस्पिटल मध्ये ..

सोनियाच्या रूम मध्ये नेहा असणार आहे हे पाहून तिला बरे वाटले . आता हेमू त्यच्या रूमवर जाऊ शकणार होता .

**********

शनिवारी सकाळी ..सोनियाने ..नेहाच्या घरी फोन केला ..आणि तिच्या बाबंना घडलेला प्रकार

सांगत म्हटले ..तुमच्या सगळ्यांची काळजी कमी करावी या हेतू ने ..

आज सकाळी दहा वाजता ..स्पेशल कार ने मी नेहाला घरी पाठवते आहे..सोबत हॉस्पिटलची नर्स

आहे ..आणि नेहाचे बॉस पण आहेत ..वेळेवर त्यांनी खूप मदत केली , हॉस्पिटल मध्ये तिला स्वतहा

घेऊन आले ..सगळी प्रोसिजर होई पर्यंत ..रात्री उशिरा पर्यंत ते थांबून होते ,

तिने एकटीने प्रवस करू नये ..अशी त्यांची इच्छा आहे ..म्हणून ड्रायव्हर ..आणि नर्स दोघांवर सगळी

जिम्मेदारी नको म्हणून नेहाचे बॉस स्वतः तिच्या सोबत येत आहेत . रविवारी रात्री परततील ते.

******

इकडे हेमूच्या घरी ..गेट समोर कार येऊन थांबली होती ...हेमुचे आई-बाबा .नेहाच्या गावी जाण्यासाठी

निघाले होते . हेमूच्या आईने खूप सामान सोबत घेतले होते .गाडी भरून गेली होती ..

दुपारच्या जेवणाच्या वेळी पोन्चावे असा नेहाच्या बाबांनी काल पुन्हा एकदा फोन करून सांगितले होते.

दोन अडीच वाजणार हते नेहाच्या गावी पोन्च्यास .

ही गोष्ट हेमुला कळू द्याची नव्हती .म्हणून त्याला मेसेज पण केला नव्हता .

उपरवाले की इच्छा देखो ..

दोन वेगळ्या ठिकाणाहून ..निघालेले ..एकाच घरी एकमेकांना भेटणार होते ..

*******

ठरल्या प्रमाणे ..हेमुचे आई-बाबा नेहाच्या गावी पोंचले ..त्यांची कार बरोबर नेहाच्या घरासमोर थांबली .

नेहाचे बाबा लगेच बाहेर आले ..इतक्या वर्षा नंतर होणारी भेट ..पण..अंतरमनातली ओळख तशीच कायम

होती . सगळे आत गेले . वरच्या ओसरीवर मोठी सतरंजी , बिछायत टाकून ठेवलेली होती.

हेमूच्या आईला ..नेहाच्या आईने आतल्या खोलीत नेले ..

आज्जी बसलेल्या होत्या त्या खोलीत हेमूच्या आईला नेहाच्या आईने नेले ..

आजोबा म्हणाले .आता जेवणाची वेळ झाली आहे ..पाहुणे पण आलेत ..बसून घ्या जेवायला .

सगळ्यांची जेवणे झाली .. जेवतांना जुन्या आठवणी निघाल्या .. ननतर बायकांची जेवणे झाली .

आजी म्हणाल्या ..आपण सगळे इथेच या सगळ्यांच्या सोबत बसू या .काही इकडे काही तिकडे

असे मला पटत नाही. आणि हे पाहुणे जुने पुराने कुठले , हे आपले घरचेच आहेत की.

बोलतांना ..नेहाच्या बाबांनी हेमूच्या बाबांना सांगतांना म्हटले ..

काल तिकडे ..आमच्या नेहाला छोटसा अपघात झालाय , हाताला ,पायाला मार लागलाय ,

डॉक्टरांनी तिला इकडे घेऊन येण्याची परवानगी दिली आहे .

सकाळी नेहा निघाली आहे .. कार मध्ये नर्स आहे ..आणि सोबत तिचे बॉस येत आहेत म्हणे .

असे नेहाच्या रूम मध्ये राहणाऱ्या सोनिया नावाच्या मुलीने फोन करून सांगितले .

आजी म्हणाल्या ..सकाळपासून जीवाला नुसता घोर लागलाय .कधी एकदा माझ्या नेहाला पाहीन

असे झाले आहे.

हे सगळ ऐकून हेमुचे आई-बाबा परेशान झाले ..नेमके कसे व्यक्त व्हावे त्यांना कळेना ..

पण..त्यांचे अंतर्मन सांगू लागले ..हीच वेळ योग्य आहे.सांगून टाका सगळं

हेमुचे बाबा म्हणाले ..बापूसाहेब .आजची सकाळची घडलेली अनपेक्षित घटना ..श्री गुरूंची लीला

आहे अशी माझी भावना आहे.. आता मी जे सांगणार आहे..ते तुम्ही सर्व ऐकावे .आणि मग व्यक्त

व्हावे ..

हेमूच्या बाबांनी ..अगदी मोकळेपणाने ,आडपडदा न ठेवता .हेमू आणि नेहा बद्दल सांगितले ..

आणि त्यांच्या हेमुसाठी ..नेहाला मागणी घालण्यासाठीच उत्सवाच्या प्रसादाचे निमित्त करून आलो आहोत.

हेमुचे बाबा ..हात जोडून आजोबांच्या समोर बसत म्हणाले ..

आमच्या भावना आणि इच्छा समजून घ्याव्या ..आणि तुमच्या नेहाला आमच्या घरची सुनबाई होण्यास

संमती द्यावी.

नेहाच्या घरातील सगळ्यांना ..ही मागणी ही इच्छा अनपेक्षित होती.

आजोबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळू लागले ..गुरूंच्या फोटोकडे पहात ते म्हणाले ..

गुरुराया ..तुमची इच्छा ..आणि कृपा आहे ही.

नेहाच्या आजी आणि आईने हेमूच्या आईचा हातात ..मोठ्या प्रेमाने हातात घेत म्हटले ..

आम्ही सगळे भाग्यवान आहोत ..आमच्या लेकीला तुम्ही तुमची गृहलक्ष्मी म्हणून स्वीकारीत आहात.

आजोबांनी भूषणच्या बाबांना म्हटले ..मोठे वकील साहेब ..तुमच्या होणार्या व्याही साहेबांना .

.फोन करून करून सांगा ..बापूसाहेबांनी अर्जंट बोलावले आहे देसाई साहेबांना. लगेच या म्हणवे .

आजोबांच्या निरोपा प्रमाणे देसाई साहेब आले ..आत आलावर त्यांना नवीन पाहुणे दिसले .

यात आपल्याला बोलावण्याचे काय कारण असावे ?

आजोबा म्हणाले .. देसाईसाहेब .. उद्या उत्सव आहे ..पंगती संध्याकाळी चार वाजेपासून सुरु होतील .

माझी अशी इच्छा आहे..तुम्ही उद्या अकरा वाजता ..सहकुटुंब ..इकडे यावे ..

भूषण आणि भारतीच्या साखरपुड्याच्या .-एंगेजमेंट च्या तयारी ने ..हा साखरपुडा झाला की

लगेच ..इथे दुसरा साखरपुडा होईल ....हे पाहुणे आले आहेत ना शामकांत पांडे .

आपले जुने पारिवारिक स्नेही ..यांच्या चीरांजीवाशी ..हेमकांत पांडे यांच्याशी नेहाचा साखरपुडा .

काय रे शामकांत ..आहे ना तयारी ?

हेमुचे बाबा म्हणाले ..बापूसाहेब ..तुम्ही सांगायचे .आम्ही तसे करायचे ..जुनी सवय कायम आहे.

देसाईसाहेब म्हणाले ..बापूसाहेब ..पण..दुसरी जोडी ..इथे आहे कुठे ?

आजोबा म्हणाले ..ते सकाळीच निघालेत ..येतील रात्री .अकरा –बारा वाजेपर्यंत.

मग मंडळी .ठरला न उद्याचा कार्यक्रम ?

सगळ्यांनी आनंदात .एका आवाजात हो हो ..असे म्हटले.

*********

रात्री जवळपास एक वाजला आणि बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला ..तसे नेहाचे आई-बाबा ,भूषण

दादू बाहेर आले . आईने कारचा दरवाजा उघडला .. नर्सच्या मदतीने नेहा बाहेर आली ..

आईला वाटले तेवढी नेहा फार जखमी वगेरे नव्हती . हे पाहून तिला बरे वाटले .बाबा आणि भूषण

दादू दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला .

समोरच्या दरवाजातून हेमकांत उतरला . नेहाच्या घरचे पहिल्यांदा त्याला पहात होते. उंचापुरा ,प्रसन्न

व्यक्तिमत्वाचा हेमू पाहता क्षणी सर्वांना आवडला .

हळू हळू पायर्या चढून नेहा वरच्या ओसरीवर आली. नर्सने तिला खुर्चीवर बसवले.

आजोबा आले , आजी आल्या ..सगळ्यांना नेहा सुखरूप आलेली पाहून बरे वाटले.

माडीवरून खाली येत असलेल्या ..आपल्या आई-बाबांना इथे पाहून ..हेमुला आश्चर्याचा धक्काच

बसला , नेहाला कळेना ..सोनियाचे मामा –मामी आपल्या घरी कसे काय आले ?

आता सकाळ पर्यंत तिची उत्सुकता ताणणे नको..आजी म्हणाल्या ..

अहो .आजोबा .आता तुम्हीच सांगा ..इथे काय काय घडणार आहे आता ..

आजोबांनी नेहाला ..सगळे सविस्तर सांगितले ..आणि म्हणाले ..

इथे तर सगळेच एकमेकांशी लपा -छपीचा खेळ खेळत होते ..आता या सगळ्या गोष्टी stop

उद्या सकाळी ठीक अकरा वाजता ..या वकीलवाड्यात

नेहा आणि हेमकांत , आणि भूषण –भारती या दोन जोड्यांचे साखरपुडे संपन्न होत आहेत.

सर्वांनी यावे .आणि दुपारी श्री सद्गुरूंच्या उत्सवाचा प्रसाद घ्यावा .

************

पुढे सगळे यथासांग पार पडले ..हे तुम्ही ओळखले असेलच ..

जीवाचा जिवलग ..भेटायला नशीबच लागते .

*************

रसिक वाचक हो .आपले अभिप्राय जरूर द्यावे.

कादंबरी – जिवलगा .

भाग – ५० वा .. अंतिम भाग .

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED