लिव इन... भाग - 5 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिव इन... भाग - 5

अमन ला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वास च होईना .ही, आपली रावी आहे, आणि, तिच्या बरोबर तो मुलगा कोण आहे .आणि तिचा आणि त्यचा काय सम्भंध? आणि ती त्याच्या मागे का फिरते .अमन ला खूप प्रश्न पडत होते . रावीला पाहतच तो तिच्याकडे जायला निघाला, पण ऐत्क्यात तिथे सर आले . आणि येताच त्यानी लेक्चर ला सुरवात केली .म्हणून अमन ला तिच्याशी काही बोलता आले नाही .... क्लास मधे ऐत्क्या दिवसाची सुट्टी वरून सगळी जण आल्यामुळे त्यांना लेक्चर थोड बोर च वाटत होत . काही मूल तर अक्षरशः झौपय्ला च आली होती .पण, रावी मात्र लेक्चर काळजीपूर्वक ऐकत होती . अमन ला रावी थोडी वेगळीच वाटली . ऐत्क्यात लेक्चर संपले, आणि सगळे जण क्लास च्या बाहेर पडले . अमन ला तर त्याच्या डोळ्यावर काही केल्या विश्वास पटेना? ऐत्क्यात अमन ची सगळी गँग त्याच्या जवळ आली ....निखिल घाबरत च अमन ला म्हणला, अमन पहिल्स, अरे ही रावी? कसली भारी दिसते ......त्याच्या ह्या वाक्याने अमन ला थोडेसे वाईट वाटले ... पण ती रावी च होती, ह्या वाक्यावर त्याचा विश्वास पटला . लगेच चेतन बोलला, पण, ही अशी काय? ऐत्के दिवस ना फोन, ना मेसेज ....मला वाटल हिने कॉलेज सोडून दिल ...पण, ही आली आणि ते पण अशी..... आणि आपल्या कडे तिने एक नजर सुध्दा टाकली नाही ...अस, का केले असेल तिने ?......सगळे विचारात पडले .... अमन मधेच बोलला, मी तिच्याशी बोलून बघू? ...लगेच रीधीमा बोलली, अरे पण ती ऐकेल का तुज? तिने एक नजर सूध्हा नाही टाकली तुझ्याक्डे ...त्यात तो मुलगा कोण आहे? काय माहीत? तिचा बॉयफ्रेंड तर नसेल ना? रीधीमा ची शंका ऐकून, अमन म्हणला, नाही? अस काही नसेल? तो मुलगा कोण आहे? हे तीच आपल्याला सांगेल, मी विचारतो तिला ...अमन परत बोलला. पण, त्याला तस करण्या पासून सगळ्यानी अडवले.
आता सगळे कँटीन मधे आले, तिथे वेगळीच चर्चा चालू होती, फ्रेशेर पार्टी ची चर्चा तिथे चालू होती. पार्टी ऐकून सगळ्याना फार आनंद जाहला . सगळे जण पार्टी कशी असेल, पार्टी त काय धमाल करायची, कोणी कसे कपडे घालायचे, सगळे जण ठरवत होते, पण अमन ला मात्र राहून राहून तो मुलगा आणि रावी च समोर दिसत होती, पार्टी चा ड्रेस कोट रेड अँड ब्लेक होता .मुलीनं साठी रेड आणि मुलांसाठी ब्लेक .....रीधीमा च लक्ष अमन कडे गेले .....तो कोणत्या तरी विचारत दिसत होता . रीधीमा ने सगळ्या गँग ला जाऊ दिले .आणि ती अमन कडे गेली ...अमन ला तिने हाताने हलवले, अमन ......तिने आवाज ही दिला ....तिच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली.... एवढा कसला विचार करतोस? रीधीमा ने अमन ला विचरले . तिच्या कडे बघत अमन म्हणला, काही ...नाही? यावर रीधीमा बोलू लागली .....मला, माहीत आहे ....तू काय विचार करतोस? हे मला माहीत आहे ....तू रावी चा विचार करतोस ना ......मला माहीत आहे ...आता अमन ला ते नाकारणे शक्य नव्हत . त्याने ही ते कबूल केल .मग रीधीमा ने थोड थांबून पुन्हा अमन ला विचरले, अमन एक विचारू? .....अमन ने ही तिच्याकडे पाहत विचार की, अस म्हणला? रीधीमा ही थोडी रेलय्क्स होऊनच बोलू लागली, अमन, तू रावीला खूप मिस करतोस ना? ......खूप म्हणजे खूप ....मिस करतोस ना? गेल्या वर्षी आपल्या सगळ्याचा ग्रूप होता .पण, तू रावी च्या ऐत्के जवळ होतास .....म्हणजे रावी च आणि तूझ ऐत्के पटायच की, तुला आजूबाजूला कोणी आहे की नाही ह्यांची तुला काहीच खबर नसायची. त्यामुळे तुला आता तिच्याशिवाय करमत नाही ......पण, आता तू थोडस मान्य कर, की तू रावी वर प्रेम करायला लागला होतास .....पण, अचानक रावी च वागण च बदलले ....तो मुलगा ..आणि ती ...शिवाय ती आता आपली रावी राहिली नाही ....तस असत तर ती आपल्याला भेटायला एथे नक्कीच आली असती . हे तू मान्य कर ...अस म्हणाया पेक्षा नीट डोळे उघडून ते पहा ....अस म्हणेल .... रीधीमा च बोलण ऐकून, अमन ळा थोड आश्चर्य च वाटल कारण ,रीधीमा जे बोलत होती, ते खरं होत ... गेली वर्ष जाहाले, ते एकमेकाचे मित्र होते, पण अमन आणि रीधीमा कधीच एकमेकांशी एवढे मन मोकळे पानांनी बोलले नव्हते ... पण, खरंच मी रावी च्या प्रेमात पडलो होतो ..... का? नाही ....मी कोणाच्या ही प्रेमात पडू शकत नाही ...त्याला अचानक बाबाच म्हण आठवल ...तो फक्त एथे शिकण्या साठी आलय ...प्रेमात पडण्यासाठी नाही . त्याने मनोमन काहीतरी विचार केला ...आणि तो म्हणला ....आज पासून मी रावी चा कधी ही विचार नाही करणार ......रावी चाच काय कोणत्याही मुलीचा विचार मी करणार नाही . ...आता फक्त आपल्या शिक्षणाचा विचार करायचा .
अमन विचर केला आणि त्याने तो अमलात आणयला सुरवात सूध्हा केली .त्याने तडक लब्ररी गाठली .तिथे येऊन त्याला जरा बरं वाटल . तिथे येऊन त्याच्या डोक्यात ले अनेक विचार ही गेले . तो बराच वेळ तिथे बसून होता ....त्याला खूप छान वाटत होते . थोड्या वेळाने लायब्ररी बंद होण्याची वेळ आली . अमन होस्टेल वर जायला निघाला .होस्टेल कॉलेज च्या जवळ असल्यामुळे अमन ला तिथे जायला फारसा वेळ लागणार नव्हता .तो होस्टेल वर आला .पाहतो तर काय , सगळ्यांची पार्टी ला जायची तयारी चालू होती . त्यांची तयारी बघून अमन गालातल्या गालात हसला . त्याला ही पार्टी ला जायचे होते .त्याला त्याच्या गँग चा सारखा सारखा फोन येत होता .अमन ने ही आवरायला घेतले .त्याने कपाटातला ब्लेक कलर चा सूट काढला .आणि घातला .हा सूट त्याला रावी ने गिफ्ट केला होता . ती नेहमी त्याला तो सूट घालण्यासाठी आग्रह करायची .पण, तसा ओक्केश्ण नसल्यामुळे त्याला तो सूट घालता आला नाही . पण आज तो सूट घालण्याची संधी होती .त्याने तो सूट घातला . कानात ब्लेक कलर चे च स्टड घातले. जेल लावून केस डोक्यावर उभे केले . त्यावर मचिँग शूज घातले . अमन खूप सुंदर दिसत होता .अगदी कोणत्याही मुलीने त्याच्या प्रेमात पडावे, आणि लग्नासाठी विचारून लगेच होकार द्यावा . अमन ने आरशात पहिले त्याला स्वताला एक आत्मविश्वास आला . एवढ्यात त्याला निखिल चा फोन आला .त्याने तो उचला ....सगळे जण त्याची कॉलेज मधे वाट पाहत होते . अमन ने फोन ठेवला आणि तो लगेच कॉलेज वर जायला निघाला . काही वेळात च तो कॉलेज वर पोहचला . तिथे सगळे जण त्याची वाट पाहात थांबले च होते . अमन चा ब्लेक सूट मधला लुक पाहून सगळे जण आश्चर्यचकित च जाहाले . लगेच रीधीमा ने त्याला कॉम्प्लीमेंट दिली . अमन खूप छान दिसतोस .हा ब्लेक कलर तुला खूप उठून दिसतोय . यावर सगळे गालातल्या गालात हसू लागले .सगळ्यांना माहीत होते .रीधीमा ला अमन खूप आवडतो .गेली वर्ष जाहले ,ती त्याच्या मगे फिरते .पण अमन च तिच्याकडे लक्ष नव्हते .