Prem mhanje prem ast..12 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम म्हणजे प्रेम असत- १२

प्रेम म्हणजे प्रेम असत- १२

रितू ने तिचे विचार स्पष्टपणे जय ला सांगितले होते आणि जय ने सुद्धा रितू चे विचार शांतपणे ऐकून त्यावर नीट विचार करून त्याची मते मांडली होती.. रितू च्या विचारांना नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. दोघांचा संसार फक्त एका गोष्टी भोवती फिरणारा नव्हता.. यांच्या संसारात दोघांच्या मतांना किंमत होती.. त्यामुळे अगदी भांडण जरी झाले तरी कोणीतरी एक पायरी खाली यायचा आणि हेच दोघांच्या सुखी संसाराचे गमक होते. नी जय ने रितू ला एकदम उत्तम रित्या समजून घेतले होते.. रितू ची मते चुकीची अजिबातच नव्हती.. जर मातृत्व झेपणार नसेल तर ते रितू च्या मनाविरुद्ध लादणार नव्हता जय.. आणि रितू ने मातृत्वाची जबाबदारी घेतली नाही तरी काही हरकत नाही ह्या मताला जय ने सुद्धा होकार दिला.. त्यामुळे रितू खुश तर होतीच पण ती त्या प्रसंगानंतर मोकळी सुद्धा झाली. ती आता मनमोकळेपणाने आयुष्य जगायला लागली होती.

पाहता पाहता लग्नाला एक वर्ष व्हायला आलं होतं...जय ने रितू चे मन जपण्यासाठी परत बाळांचा विषय काढला नाही. जय ला सुद्धा रितू चे विचार पटले होते... आणि जय त्याचे विचार रितू वर लादणार नव्हता. आत्ता नाही तर कधीच नाही.. त्याला सगळ्यात जास्ती महत्वाच होती ती रितू..... जय तसा भावनाप्रधान तर होताच पण तो समजूतदार सुद्धा होता. फक्त स्वतःपुरता विचार जय ने कधीच केला नव्हता. आणि इतका सुयोग्य जोडोदार मिळाला म्हणून रितू खुश होती. रितू ने तर अश्या आयुष्याची कधी स्वप्न सुद्धा पाहिली नव्हती.

रितू पेपर चाळत बसली होती. तितक्यात हॉल मध्ये जय आला.. आणि त्याने रितू ला मागून मिठी मारली.. रितू तिच्याच मूड मध्ये होती आणि जय चे हे वागणे तिच्यासाठी हे अनपेक्षित होते..ती एकदम दचकलीच..

"लांब हो..नको येऊस जवळ..." रितू ओरडलीच..

"हे रितू, मी आहे ग.. घाबरलीस का?" जय हसू आवरत बोलला. जय चे बोलणे ऐकून रितू जरा अस्वस्थ झाली..

"हसू नकोस रे.." रितू एक क्षण हरवल्या सारखी झाली..तिने जय ला दूर सारले. रितू चे हे वागणे जय ला विचित्रच वाटले..रितू च्या अश्या वागण्याने तो जरा गोंधळूनच गेला.. त्याला रितू ची अशी प्रतिक्रिया नवीनच होती..."काय झालं? दूर का केलं मला? आपण हग तर नेहमीच करतो एकमेकांना.. आज तुला नाही आवडलं आज तुला हग केलं ते? इतकी अस्वस्थ का झालीस? " जय ने रितू ला अनेक प्रश्न केले.. जय चे बोलणे ऐकून रितू जरा भानावर आली..

"आय नो जय..सॉरी! मला आवडत तुझ्या मिठीत पण मागून हग नको करत जाऊस.."

"खर तर तुझी अशी प्रतिक्रिया माझ्यासाठी नवीन आहे.. ह्या आधी तू अशी वागली नव्हतीस.. आणि तुला माहिती आहे.. की मीच आहे तरी का नको म्हणालीस?? आणि इतकी का दचकलीस?" जय ला रितू च्या अश्या वागण्याच कारण जाणून घ्यायचे होते.

"बस इथे.."

"ह?"

"तू बस रे...मी तुला म्हणले होते, माझा भूतकाळ आहे.. सांगते आज..."

"ओह..भूतकाळाशी निगडीत असेल तर विसरून जा.. आपल्याला भूतकाळा मध्ये जगायचं नाहीये.. मी तुला सांगितलं आहे. आपण वर्तमान काळात जगायचं आहे.. हे आधीच ठरलं होतं ना.. तरी परत परत तेच का??" जय रितू चा हात हातात घेत बोलला..

"नो नो जय.. तू बस.. आणि माझ्या भूतकाळाबद्दल काही गोष्टी तुला माहिती हव्यात...मी आता भूतकाळातून बऱ्यापैकी बाहेर पडली आहे... पण तुझ्याशी सगळ बोलले की मी पूर्ण बाहेर पडेन भूतकाळामधून.. सो आज प्लीज ऐक...आज नाही म्हणू नकोस!!" रितू आर्जवीच्या सुरात बोलली.. पण जय त्याच्या मताशी ठाम होता.. त्याला रितू बरोबर नव्याने आयुष्य जगायचे होते आणि रितू च्या भूतकाळात त्याला काडीचाही रस नव्हता..

"नो नो नो रितू!! मी तुला आधी सुद्धा सांगितलं आहे, आपण आता नव्याने आपल आयुष्य चालू केलंय.. मग सारखा सारखा नको आणूस तुझा भूतकाळ आपल्या मध्ये.. आणि तू पूर्ण बाहेर येणार.. आली आहेसच म्हणजे..नकोय काही माहिती तुझ्या भूतकाळाशी निगडीत असेल्या गोष्टींची... मला काही फरक नाही पडत तुझ्या भूतकाळाने.. आणि मला कळलंच आहे.. मागून हग केलं म्हणून तू एकदम भूतकाळात गेलीस... म्हणजे मला माहिती नव्हते असं काही असेल..... आता कळल आहे मे बी तुझ्या काही आठवणी आहेत काही...मी सॉरी.. तुला मागून हग केलेली आवडत नसेल तर ह्यापुढे मी तसं कधी करणार नाही.. कोणत्याही गोष्टी वरून उदास व्हायचं नाहीचे..कळल ना? "

"बर.. पण एक सांगते.. माझ्या आयुष्यात कोणी होतं... त्याने अर्थात मला खूप दुखवलं आणि तो माझ्या आयुष्यातून निघून गेला..आणि तो मला नेहमीच मागून हग करायचा.. तेव्हा मला त्याची अचानक केलेली हग आवडायची पण आता मला या गोष्टीने चीड येते.. आणि वाईट सुद्धा वाटत.. भूतकाळ माझ्या नजरेसमोर उभा ठाकतो..."

"ऐक रितू.. भूतकाळ गेलेला असतो ग.. भूतकाळात चिकटून राहलीस तर आज आणि आत्ता कशी जगणार ना.. सो आता फ्रेश हो.... मला माझी रितू हवीये.. एकदम फ्रेश, बबली आणि खूप खंबीर!! अशी घाबरट रितू मला ह्यापुढे चालणार नाहीये.. आणि आता कसली काळजी करतेस..?? आता तू एकटी नाहीस सो जे काय असेल ते आता आपण दोघे फेस करू...ह आणि ते आज मध्ये राहून.."

"आय लव्ह यु जय... आयुष्यात हेच तर हवं.. इतका प्रेमळ आणि काळजी घेणारा नवरा असेल तर आता या पुढे भूतकाळ येणारच नाही... चलो आता.. कामाला लागते... आज नवरोबा च्या आवडीचे पदार्थ करून त्याला खुश करते.. आणि जय.. आता ह्यापुढे माझा भूतकाळ आपल्यात कधीच येणार नाही ह्याची मी काळजी घेईन.." डोळे मिचकावत रितू बोलली...आणि नकळत जय ला बिलगली.

जय ने सुद्धा तिला मिठीत सामाऊन घेतले.. आणि तिच्या कपाळावर एक छोटी किस दिली.. आणि परत एक घट्ट मिठी मारली.. रितू च्या डोळ्यातून नकळत पाणी आले.. आणि ते जय च्या खांद्यावर पडले..

"नो नो रितू... का रडतेस? आणि काय ग.." जय थोडा उदास झाला.. "मी तुझ्यासाठी इतक करतो ते सगळ का? मला तू नेहमी आनंदी हवी आहेस ग..तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही हे सांगितलं होतं मी.. तरी तू रडतेस.. मीच चुकतो का ग?" थोडा उदास होऊन जय बोलला...

"अरे वेड्या..." जय च्या केसातून हात फिरवत रितू बोलली.."हे आनंदअश्रू आहेत... मी कित्ती लकी आहे रे.. माझ बेरंग आयुष्य तुझ्यामुळे रंगेबिरंगी झालंय.. सो जरा सेंटी झाले..आणि हे अश्रू डायरेक्ट हृदयातून आलेत बघ..."

"ओह हो..मग गुड!! आयुष्य ह्याक्षणी थांबाव असं वाटतंय.."

"हे क्षण आठवून ठेवायचे आहेत?"

"येस.."

"मग एक मिनिट..." इतक बोलून रितू उठली आणि आतल्या खोलीत जाऊन कॅमेरा घेऊन आली.. "हा घ्या साहेब कॅमेरा... साठवून ठेव आपले सुंदर क्षण ह्या कॅमेरा मध्ये... जय रितू चे बोलणे ऐकून खुश झाला.. त्याने लगेच कॅमेरा हातात घेतला.. आणि सगळ्यात आधी रितू चा मस्त फोटो काढला.. मग दोघांनी एकमेकांचे आणि एकमेकांबरोबर बरेच फोटो काढले.. दोघेही पुन्हा एकदा खुश झाले.. आणि ह्यापुढेही दोघे खुशच राहणार होते.. आता रितू च्या आयुष्यातले सगळे काळे ढग दूर झाले होते आणि तिचे आयुष्य निरभ्र आकाशा सारखे झाले होते... आणि रितू च्या आयुष्याच्या कॅनव्हास वर रंगाची उधळण करणार होता.. आणि त्या रंगामध्ये रितू हरखून जाणार होती.. तिच्यासाठी खुश अनपेक्षित सरप्राईजेस येणार होती.. आणि अर्थात हे सगळ फक्त आणि फक्त जय तिच्या रितू साठी करणार होता.

क्रमशः..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED