तुझाच मी अन माझीच तू...भाग २२ Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझाच मी अन माझीच तू...भाग २२

तुझाच मी अन माझीच तू...भाग २२

आभा च्या वागण्याने राजस अस्वस्थ होत होता... आणि त्याची खात्री मात्र झाली होती, आभा रायन च्या जवळ जाण्याचे मुख्य कारण तो स्वतः आहे... ही गोष्ट राजस च्या मनाला खात होती. पण आपण आपली चूक कशी सुधारायची हा मुख्य प्रश्न होता. राजस ने इतक सांगून सुद्धा आभा रायन ची बोलयला गेली होती.. म्हणजे ह्यापुढे अजून काहीही घडू शकत अशी भीती राजस ला वाटून गेली. आणि रायन चांगला वागला असल्यामुळे आभा चा राजस वरचा विश्वास थोडा कमी झाला होता.. राजस उगाच लोकांबद्दल काहीही खोट पसरवतो आहे अशी जणू खात्री आभा ला झाली होती.. आता आभा ला काय आणि कश्या प्रकारे मदत करू शकतो ह्याचा विचार राजस करायला लागला.. बाकी सगळे विचार राजस च्या मनातून गेले होते.. त्याला वाटलेले आभा बद्दल चे आकर्षण कमी झाले होते. आणि आता त्या आकर्षणाची जागा काळजीने घेती होती. आपण ठरवलेलं आपल्यावरच कसे बुमरँग झाले हा विचार राजस ला अस्वस्थ करत होता. आता काय होणार ह्याचा अंदाज राजस ला येत नव्हता पण लवकरच आभा, राजस आणि रायन च्या आयुष्यात खूप काही होणार होते.. आता आभा आणि राजस च्या आयुष्यात रायन सुद्धा आला होता. आणि रायन दोघांच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका बजावणार होता..

आभा आणि रायन ने बराच वेळ कॅफेटेरिया मध्ये घालवला होता... पण राजस ला नेहा ने काहीच सांगितले नव्हते तरीही राजस अस्वस्थ होत होता. इथे राजस अस्वस्थ होत होता पण आभा मात्र रायन शी गप्पा मारून एकदम खुश झाली होती. तिला राजस पेक्षा रायन जास्ती इंटरेस्टिंग वाटला होता. आणि तिला एकदम राजस बद्दल वाटलेले आकर्षण कमी झाले होते. मे बी ती फक्त आभा च्या आयुष्यातली फेज होती. त्यामुळे जे होतंय ते आकर्षण कितपत खर आहे हे नक्की आभा ला सुद्धा कळत नव्हते. आभा चे वागणे थोडे चेंज झाले होते पण ते ज्या गोष्टी होतात त्या होऊ द्या ह्या मताची आभा होती.

खर तर आभा च्या मनात काय चालूये हे कोणलाच कळणार नव्हते कारण आभा तिच्या मनातलं तिच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात कधीच दाखवायची नाही. त्यामुळे समोरच्याला तिच्या वागण्याचा अंदाज कधीच यायचा नाही. त्यात राजस आभा ला नीट ओळखत नव्हता.. त्यामुळे त्याला आभा चे वागणे अजिबात समजत नव्हते. पण त्याचे टेन्शन मात्र वाढत होते.. त्याला रायन बद्दल खात्री नव्हती. तो आता सुधारला होता असं वाटत होत पण तो खरच सुधारला आहे का ह्याबद्दल कोणालाच खात्री नव्हती. बाकी कोणाला रायन आणि आभा बद्दल काहीच पडलं नव्हत पण राजस साठी मात्र आभा ची सेक्युरिटी महत्वाची होती... पण त्याला अंदाज येत होता की राजन आभा ला इम्प्रेस करण्यात यशस्वी होत होता.. त्यामुळे राजस चे बर्डन अजूनच वाढले होते.. पण आता काही काळ शांत राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पण आता राजस चे काम वाढले होते.. त्याला आभा वर लक्ष ठेवण्याची गरज वाटायला लागली होती..

जरा वेळात नेहा सुद्धा कॉफी पिऊन परत आली आणि तिच्या डेस्क वर जातांना तिने राजस च्या डेस्क पाशी येऊन थांबली..

"नेहा..ऑल गुड?"

"हो हो... नथिंग टू वरी.. ऑल गुड!!" नेहा इतक बोलली.. आणि ती राजस कडे पाहून हसली.. दोघे एकमेकांशी कोणाला काही कळणार नाही अश्या भाषेत बोलत होते. राजस ने थंब्स अप ची खुण नेहा ला दाखवली आणि तो जरा रीलॅक्स झाला. नेहा जाता जाता त्याला बोलली,

"मेल करते करा वेळात..." नेहा चे बोलणे ऐकून राजस ने मान डोलावली.. आणि त्याने आपले तोंड परत लॅपटॉप मध्ये घुसवले... आणि काम करण्यात मग्न झाला.. खर तर राजस ला आभा चा विचार पूर्ण पणे बंद करायचा होता पण राहून न राहवून ती पॉप अप होतंच होती. आता आभा भेटली की राजस तिच्याशी स्पष्ट पणे बोलणार होता. पण आभा शी बोलण्या आधी त्याला त्याच काम पूर्ण करायचं होत आणि त्याला आभा शी एकट असतांना बोलायचे होते. आभा ला एकटीला गाठणे जरा अवघड होते.. म्हणजे आजची दिवशी तरी ते त्याला शक्य वाटत नव्हत. त्याच्या समोर कामाचा डोंगर होता आणि काम पूर्ण केल्याशिवाय त्याला कुठेही हलता येणार नव्हत.त्यातच त्यानी नेहा ला तिचं काम पूर्ण करण्याच आश्वासन सुद्धा दिलं होत.. त्यामुळे आजचा त्याचा दिवस फारच बिझी जाणार होता.. त्याने मनात एक शिवी हासडली.. तो जरा वैतागला नी त्याच्या कपाळावर आठ्या आल्या पण राजस ला काम करण्या शिवाय दुसरा काही पर्याय सुद्धा नव्हता.

राजस गप गुमान काम करायला लागला.. पण राजस कुठेतरी हरवला होता.. तो आज पहिल्यांदीच असं झालं होत की राजस मनापासून काम करता नव्हता. त्याचे लक्ष आणि त्याचे विचार सारखे सारखे भरकटत होते. भरकटलेले विचार जबरदस्तीने त्याला रुळावर आणावे लागत होते. नेहमी कामात एकदम चोख असणारा राजस आज मात्र फारच अनइझी झाला होता.. त्याला वाटत होत आज काम संपवून पटकन जाऊन आभा शी मनातल सगळ बोलून टाकाव... पण काम सोडून त्याला कुठेही जाता येणार नव्हत सो धुसपुसत पण राजस कामच करत होता.. त्याने कसे बसे काम आवरले.. मग लॅपटॉप त्याने बंद केला आणि जरा २ मिनटे डोळे मिटून शांत बसून राहिला. त्याने डोळे मिटले. आधी तो शांत होता पण त्याला आभा चा चेहरा डोळ्यासमोर दिसला आणि त्याने खाडकन डोळे उघडले.. आता आभा विषयी काहीतरी केलच पाहिजे ही जाणीव त्याला झाली.. पण विचार करून करून राजसचे डोके भणभणायला लागले होते.. आता त्याला एक स्ट्रॉंग कॉफी हवी होती. तो पटकन उठला आणि कोणाशीही काहीही न बोलता कॅफेटेरीया मध्ये जायला निघाला.. तितक्यात त्याला समोर नेहा तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारतांना दिसली.. राजस तिच्या जवळ गेला आणि तिला हाक मारली..

"नेहा..." नेहा ने मागे वळून पाहिले आणि राजस आहे हे पाहून तिने तिच्या मैत्रिणीशी बोलणे उरकले.. आणि मग ती राजस शी बोलायला लागली,

"झालं काम?" नेहा ने हसत राजस ला प्रश्न केला..

"येस.. आत्तापुरत तरी उरकलं आहे काम.." राजस बोलला खरा पण आज त्याचा आवाज नेहा ला नेहमीसारखा वाटत नव्हता. ते नेहा ने हेरले आणि तिने तिच्या भुवया उंचावून राजस ला प्रश्न केला,

"ह.. आज राजस साहेब असे का बोलतायत? आणि आज काम उरकलं असं का बोलतोयस? नेहमी तर तू किती आनंदाने काम करत असतोस.."

"हो ग..पण आजचा दिवस वेगळा आहे.. वैतागलोय.."

"का उगाच वैतागतो आहेस रे राजस.. डोंट टेल मी आभा मुळे तुझं डोकं ठीक नाहीये."

"तिच तिच आहे कारण.. तुला वेळ आहे का? वेळ असेल तर भेटू आपल्या नेहमीच्या ठिकाणी.. बोलायचं आहे तुझ्याशी.."

"हो हो.. मला वेळ आहे.. काम झालाय म्हणुनच टाईम पास करत होते. तुझ्याशी बोलायचं होत पण तू काम करत होतास सो निशा शी बोलायला लागले... भेटू आपली ठरलेल्या ठिकाणी.. मी येते १० मिनिटात.."

"ओके.. मी पण आधी कॉफी प्यायला जातोय.. डोकं जाम चढलं आहे.." डोक्याला हात लावत राजस बोलला.. आणि नेहा ला मात्र हसू आवरेना.. आणि ती मनसोक्त हसली सुद्धा..नेहा नेहमीच मोकळी हसायची..राजस समोर तर ती स्वतःच्या भावना कधी लपवायची नाही..

क्रमशः...