Tujhach me an majhich tu..23 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग २३

तुझाच मी अन माझीच तू...भाग २३

"हसू नकोस ग नेहा.... खर दुखतंय डोकं.."

"मग घरी जा.. रोज करतोस की नीट काम... एखाद्या दिवशी लवकर गेलास तर कोणी काही बोलणार नाही.." नेहा परत हसून बोलली.

"तू जरा शांत बस ग.. मी येतो कॉफी पिऊन.. आणि तू ये १० मिनिटात.. मला फोन करायला लाऊ नकोस आणि माझं डोकं फिरवू नकोस..."

"हो ह साहेब... आणि मी काय केलंय.. तू तुझ डोकं फिरवून घेतोस. कोणामुळे आपण डोकं का फिरवून घ्यायचं हे तुझेच शब्द होते... मला लेक्चर द्यायचास.. आणि आता स्वतःच स्वतः चे शब्द विसरलास?" राजस ला एक फटका मारत नेहा बोलली..

"तू जा ग जा... उगाच फलतू बडबड करू नकोस.."

"जातेच आहे. आणि डोकं होईल कमी.. तुला विक्स अॅक्शन ची गोळी देऊ? आहे माझ्याकडे.."

"नको नको. आणि थँक्यू ग नेहा.. तू नेहमीच घेतेस माझी काळजी.. आणि डोकं होईल कमी कॉफी पिल्यावर.. कमी झालं नाही तर घेतो तुझ्याकडून गोळी... तू प्लीज ये.. मला जरा बोलायचं आहे महत्वाच.."

"हो हो राजस.. येते मी नक्की! तू कॉफी पी.. मी आले असते पण कॅफेटेरीया मध्ये आले की उगाच काहीतरी खाल्लं जात.. आणि मग डाएट ची वाट लागते.." नेहा स्वतः कडे पाहून बोलली आणि तिने सुस्कारा टाकला.. तिचे बोलणे ऐकून राजस ला हसू आले.. त्याने नेहा ला बाय केले आणि कॅफेटेरीया मध्ये शिरला. पण त्याच्या मनातले काहूर मात्र शांत होत नव्हते.

राजस नेहा ला बाय करून निघाला खरा पण त्याची मनातले विचार काही केल्या शांत होत नव्हते. राजस कॅफेटेरीया मध्ये शिरला पण २ मिनिटे त्याला काहीच कळले नाही.. तो त्याच्या विचारात चालत होता आणि एका टेबल ला धडकला. त्याच्या पायाला थोड लागल होत..

"आऊच..." तो पाय हाताने धरत बोलला.. "आभा ने पूर्ण आयुष्य बदलून टाकलं माझं.. नेहमी निवांत असणारा मी इतका का विचार कारायला लागलोय? एका मुलीमुळे आयुष्यात इतके बदल होतील असं कधी वाटलंच नव्हत." राजस मनात बोलला.. आणि त्याला हसू आले. कारण ह्या सगळ्या मध्ये काळजी आहे आणि कोणत्याही नात्यात काळजी किती महत्वाचा रोल करते ह्याची जाणीव राजस ला झाली.. त्याला हे जाणवलं की त्याला फक्त आभा बद्दल आकर्षण वाटत नाही तर त्याचबरोबर इतरांनी फिलिंग उदयास येत होती.. "चलो बेटा..जे आधी कधी वाटले नाही ते आत्ता वाटतंय..प्रगती आहे..नाऊ आय केअर फॉर आभा.. पुढे काय होईल ते होईल.. पण मला आभा ची मनापासून काळजी वाटते. आधी कधी कोणाबद्दल इतकी काळजी कधीच वाटली नव्हती. सो आत्ता जे वाटतंय त्याबरोबर जाऊ.."

राजस ने स्वतः शी संवाद आवरता घेतला आणि त्याने कॉफी ची ऑर्डर केली,

"भय्या.. थोडी स्ट्रॉंग बनाना कॉफी..."

"ह ठीक हे.."

आणि मग एका रिकाम्या टेबल पाशी येऊन राजस शांत बसून राहिला.. आता त्याच्या मनात काहीच विचार नव्हते कारण बाकी काही नाही पण त्याला हे माहिती होते की आभा ची काळजी सगळ्यात महत्वाची! आणि राजस जिम मध्ये जाऊन एकदम कणखर तर झाला होतास.. म्हणजे अगदीच वेळ पडली तर तो कोणत्याही पद्धतीने आभा च प्रोटेक्शन करू शकणार होता.. कॉफी येईपर्यंत त्याने सहजच आपले बायसेप्स पाहिले.. आणि तो भलताच खुश झाला.."नाईस.." आणि तो स्वतःशीच हसला.. तितक्यात त्याची कॉफी आली.. आणि एक मित्र सुद्धा आला..

"बसू का राजस साहेब?"

"नो नो...जा र जा जय.. आत्ता मूड नाहीये... नंतर बोलतो तुझ्याशी.." त्याने अक्षरशः जय ला त्याच्या कलीग ला कटवलं.. राजस इतका रूड कधीच नसायचा पण आज राजस वेगळ्याच मूड मध्ये होता. राजस ह्या आधी असा कधीच वागला नव्हता त्यामुळे जय ला राजस चे वागणे जरा विचित्र वाटले. आणि अर्थात त्याला राजस कसा आहे हे चांगलाच माहिती होत त्यामुळे जय तिथे न थांबता निघून गेला..

राजस शांतपणे कॉफी पीत होता तितक्यात त्याला समोर रायन गप्पा मारतांना दिसला.. त्याक्षणी त्याचं डोक फिरलंच.. त्याला लगेच रायन ला गाठून दम द्यायची इच्छा झाली. पण त्याच्याकडे डायरेक्ट जाऊन दम देण्यासाठी त्याच्याकडे काहीच कारण नव्हते. त्याने स्वतःचा राग शांत करायचा प्रयत्न केला.... मनात आकडे मोजले.. पण तरी त्याचा उपयोग होत नव्हता. त्याने अजून एक कॉफी पिली. आणि विचार डायव्हर्ट केले.. जरा वेळात तो थोडा फार शांत झाला.. आणि आता तो काहीही करून आभा ला गाठून सगळ सांगणार होता. पण त्याला आभा ला एकटीला कसे गाठायचे हेच कळत नव्हत.

राजस विचार करत होता की काय केल्यानी आभा रायन पासून लांब जाईल. किंवा तिला रायन विषयी चीड निर्माण होईल...त्याला आभा आणि रायन ची जवळीक पहाववत नव्हती. काहीही करून त्याला आभा ला रायन पासून दूर करायचे होते. त्याला आता हा चाप्टर संपवून टाकायचा होता.. त्याला वाटत होते त्याने आभा ला सगळ सांगितलं की ती आपसूकच रायन पासून लांब जाईल. हा विचार आल्याने राजस स्वतःवर एकदमच खुश झाला.. "वा वा.. आभा ला रायन विरुद्ध भडकावल की आपल काम झाल.. मग मेन काम होईल.. आणि ती कदाचित माझ्यावर इम्प्रेस सुद्धा होईल.." राजस च्या मनात एका मागे एक विचार चालू होते. शेवटच्या विचारांनंतर राजस विकेड हसला.. पण तो एकदम भानावर आला.. आपल्याला कोणी असं हसतांना पाहिले नाही ह्याची त्याने खात्री केली. आणि त्याचा जीव भांड्यात पडला.. आणि त्याने कॉफी चा मग तोंडाला लावला.. पण कॉफी थंड झाली होती.. राजस नी डोक्याला हात मारून घेतला. "ह्या आभा मुळे आज थंड कॉफी प्यावी लागतीये.." हे बोलून हसला कारण आभा चा विचार करतांना त्याला छान वाटत होते. आपण एक चांगल काम करतो आहोत ह्याची जाणीव त्याल राहून न राहून होत होती. आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू स्थिरावत होते.

राजस ने कॉफी संपवली.. आणि तो कॅफेटेरीया मधून निघाला.. तितक्यात त्याला रायन आडवा आला.. आणि रायन राजस कडे पाहून खोटा हसला..

"निघ रे निघ रायन.. उगाच डोक फिरवू नकोस प्लीज... आज मूड नाहीये.. " राजस रायन ला पाहून वैतागला होता.. त्यात रायन चे वागणे त्याच्या डोक्यातच गेले..रायन क्षणाचाही वेळ न दवडता बोलायला लागला,

"ओह हो.. आज राजस साहेबांचा मूड नाहीये.." मित्राला टाळी देत रायन बोलला.. मग रायन आणि त्याचे मित्र जोरजोरात हसायला लागले.. आता मात्र राजस चे डोके फिरलेच.. त्याने त्याची मुठ आवळून घेतली आणि रायन ला पंच मारण्यासाठी हात उचलला.. राजस रायन ला पंच मारणार तितक्यात समोरून आभा आली... आभा ने आधीचे काहीच पाहिले नव्हते.. यामुळे तिला अस वाटून गेल की राजसचीच सगळी चूक आहे.. तिने राजस चा आवेश पाहिला आणि तिने राजस कडे रागाने पाहिले

"राजस... काय चालूये? ऑफिस मध्ये आहोत आपण.. यु नीड टू बी सोफीस्टीकेटेड.. हे काय चालूये?" आभा राजस वर गुरकावली.. आभा चे हे बोलणे पाहून राजस चे सगळे अवसानच गळून पडले.. त्याने रायन ला पंच मारण्यासाठी उचललेला हात आपसूकच खाली आला.. त्याला एकदमच लो वाटल.. जिच्यासाठी राजस रायन शी भांडणार होता तिनेच राजस ला सुनावले होते.. राजस चा सगळा मूड ऑफ झाला.. ह्या प्रकारानंतर राजस काहीच न बोलता कॅफेटेरीया मधून निघून गेला.. जातांना त्याने आभा कडे पाहिले सुद्धा नाही पण त्याने रायन ला डोळ्यातून दम मात्र दिला.. रायन ने त्याला फक्त खोट हसून उत्तर दिले..

आभा ला राजस चे वागणे अजिबातच आवडते नव्हते. ऑफिस चे काही नियम असतात आणि ते नियम पाळले पाहिजेत ह्या मताची ती होती. आणि तिने मनोमन राजस चे वागणे चुकले असा समज करून घेतला.. जरा वेळ शांततेत गेला मग रायन आभा शी बोलायला लागला,

"बस ना.. तुला कॉफी?"

"ह हो.. चालेल कॉफी.. हे असं काही पाहून मला तर धक्काच बसलाय.." आभा बोलली..मग रायन ने त्याच्या मित्रांना कॉफी ची ऑर्डर द्यायला सांगितले आणि तिथून हाकलवून लावले.. मग रायन बोलायला लागला,

"राजस अति चिडका आहे. सारखी खुन्नस काढत असतो माझ्यावर.." मस्त पैकी आगीत तेल ओतायचे काम रायन करत होता.. आणि ह्यावर आभा काय प्रतिसाद देते हे त्याला पहायचे होते..

क्रमशः..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED