Live in Part - 13 books and stories free download online pdf in Marathi

लिव ईन भाग - 13

बाबाच बोलण ऐकून अमन चा स्वतःच्या कानावर विश्वास च बसेना .....तो शांत च होता .काहीच बोलत नाही . त्याचे बाबा बोलत होते .अमन अह्म्ल माहीत आहे, की तुला हे सगळ करताना खूप त्रस्स होईल, पण थोडा विचार कर ना . तू जर अस जाती विरुध्द गेलास, तर गावातील लोक आपल्याला वाळीत टाकतील .काय ऐज्जत राहील, आपल्या घराची .आपण गरीब लोक आहोत, ऐज्जत शिवाय आपल्याकडे काही नाही . शिवाय तू अस लग्न केल्यावर तूझ्या बहिणीच कस होईल .तीच अजून लग्न व्हायचंय. तू अस लग्न केल्यावर, तिच्याशी कोण लग्न लागणार? तीच अजून शिक्षण आहे ...कस होणार हे सगळ? शिवाय ती मुलगी आपल्या ह्या घरात राहील .आपल्या कुटुंबाला तीच कुटुंब म्हणून मानेल. आपण ब्राह्मण, ती पंजाबी ....तीच राहणीमान वेगळ आपल राहणीमान वेगळ ....आपण मास मच्छी खात नाही .त्या लोकांना तर तेच लागत ...ती आपल्यासाठी, ह्या कुटुंबासाठी सोडेल मास मच्छी खायचे.शिवाय तिला हेरॉईन बनायचं आहे .आपल्या घरात हे चालत नाही . बरं ठीक आहे, तिला जरी काम करायची परवानगी दिली .तरी ती घर आणि तीच काम दोन्ही व्यव्सतीथ सांभाळू शकेल . तूझ्या आई ने तुम्हाला आणि ह्या घराला सांभाळण्यासाठी सगळ आयुष्य खरच केल ...तस करू शकेल ...ती मुलगी ...तू नीट विचार कर ... ...ह्या घरचा, आमचा ....आमच्या ऐज्जत चा .....शेवटी निर्णय तूझा ...संध्याकाळ पर्यंत निर्णय सांग मला ....मी तूझ्या निर्णयाची वाट बघतोय . तू घेतलेला निर्णय आपल्या ह्या घराचा आणि कुटुंबाचा विचार करून घेशील ...अशी आशा करतो . आई आणि बाबांचे बोलणे ऐकून अमन च्या आनंदावर विरजण च पडल . त्याला वाटल ते दोघे जण रावीच्या आणि त्याच्या लग्नाला परवानगी देतील .पण, त्यानी तर ... त्याच्या पुढे पेच च टाकला .
हे सगळ होणार हे अमित ने ग्राह्य धरलेच होते . आई बाबा असच बोलणार हे ही त्याला माहीत होते .पण, त्याच खूप प्रेम होते रावी वर......बायको म्हणून तिने त्याच्या आयुष्यात यावे .एवढीच त्याची ऐछा होती . का नाही? ती मझी बायको? ह्या घराची सून बनू शकत ? काय फरक आहे, ती थोडी वेगळी आहे .ती पंजाबी आहे ....बिनधास्त आहे , जगाची परवा करत नाही .तिला जे हवे, ते ती मील्वतेच ....फिल्म मधे काम करते ....म्हणून काय ती घर सांभाळू शकत नाही ........ती सगळ करू शकते . हो मला तिचा अभिमान आहे .आणि मझ्या लग्नामुळे कोणाचीही ऐज्जत जाणार नाही .आणि लोक काय बोलायलाच असतात .आणि राहिली, गोष्ट .... निशा ची तर असा कोणीतरी मुलगा असेल ना जो, तिच्यावर प्रेम करून तिला लग्न करून घेऊन जयील .ना ....की, तिच्या घरच्या गोष्टी मुळे तिला नकारेल..,... आणि जरी रावीला विसरून मी, एका ब्राह्मण मुलीशी लग्न केल तरी ते लग्न किती टिकेल, ह्याची गारंटी कोणीच देऊ शकत नाही .अमन थोडा वेळ शांत बसला .कसला तरी विचार त्याच्या डोक्यात चालू होता . बाबांना काय निर्णय द्यावा, त्याच त्यालाच कळत नव्हते . पण, निर्णय तर घ्यावाच लागणार होता .त्याने डोळे मिटले .पाच मिनिट तो शांत बसला .त्याने मनाशी एक निश्चय केला . आणि त्याने त्याचा निर्णय घेतला .त्याचा निर्णय झाला होता .फक्त त्याच्या ह्या निर्णयावर आई बाबा कसे रिक्शन देतात, ते महत्वाचे होते .
संध्याकाळ जाहाली, अमनने दिवसभर विचार केला .... आणि मग तो त्याचा निर्णय सांगायला, आई बाबा जवळ आला . ते ही कदचित त्याच्या निर्णयाची च वाट पाहत असतील . अमन ; आई बाबा जवळ आला, आणि बोलू लागला ....बाबा .....मी निर्णय घेतलाय ..... माझ ठरलंय..... मी प्रेम एकीबरोबर आणि लग्न एकीबरोबर नाही करू शकत .तस केल तर मी नाही सुखी राहू शकत ....आणि राहिली गोष्ट जगाची तर ते तस पण ....नाव च ठेवतात. मग ....आता तुम्ही ठरवायचे की, तुम्हाला मुलगा हवा की जग...... अमन एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होता, की त्याच्या आई वडिलांना त्याला काय बोलताच आले नाही . ते गप्प बसून नुसते ऐकत होते ...मुल मोठी झल्यावर आई वडिलांकडे त्याच ऐकून घेण्या व्यतिरिक्त उरत तरी काय? .अमन ची दोन दिवसाची सुट्टी असल्यामुळे तो परत जायला निघाला. पण, ह्या वेळी घरातील वातावरण काही वेगळेच होते .आई आसवे गाळात होती, पण हे सगळ अमन ला दिसून देत नव्हती .बाबांनी तर अबौलाच धरला होता .आणि त्याची बहीण तर आधीच मैत्रिणी कडे गेली होती ....त्यामुळे अमन ला प्रेमाचा असा निरोप देणारे कोणीच नव्हते .अमन नीही मन घट्ट केले आणि परतीचा रस्ता धरला .ह्या वेळी त्याला स्टेशन वर सोडायला कोणीच आले नाही .तो स्टेशनवर एकटाच आला, बँग घेऊन .....थोड्यावेळाने गाडी आली ...तो गाडीत बसला आणि निघाला ..... जातांना त्याला खूप रडू आले .....आई बाबा चे मन आपण दुखावले ....ह्याचे त्याला खूप वाईट वाटत होते . पण रावी वर ही त्याच खूप प्रेम होत ....तिला ही तो सोडू शकत नव्हता .
अमन दमून भागून घरी आला .तर घराला कुलूप नव्हते .म्हणजे रावी घरी आली असेल ...म्हणून, त्याने बेल बजावली . तर रावी ने दरवाजा उघडला ...आत मधे येऊन बघतो तो काय? रावी ने त्याच्यासाठी सर्प्राइज़ प्लान केल होते ... तिने मस्त घर सजवले होते ..रात्री चे जेवण स्व्तहाच्या हाताने बनवले होते ....ते सगळ पाहून अमन ला खूप बरं वाटल ...आपण योग्य निर्णय घेतला ....अस त्याला वाटू लागले .... अमन त्याच आवरून जेवायला बसला ....दोघांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या ....मधेच रावीने त्याला विचरले ....कस ....वाटल।घरी जाऊन ....घरचे खूप खुश जाहाले असतील ना? ...मला तर वाटल तू आठ दिवस राहूनच येशील ....पण, तू तर दोन दिवसातच परत आला .....रावी बोलत च होती ....अमन नी तिला मधेच थांबवले .....रावी मला तुला कहितरि सांगायचंय ......तू प्लीज नीट ऐक .....अमन च बोलण ऐकून रावी ही थोडी ...हैराण जाहाली, पण तस न दाखवता ....त्याला तिने बोलू दिले ....अमन सांगू लागला .... रावी मी घरी पुण्याला कामानिमित गेलो होतो .काम म्हणजे .......तूझ्या...... आणि .....मझ्या विषयी सांगायला गेल्तौ .....आपल्या लग्ना विषयी बोलायला गेल्तौ ......अमन च बोलण ऐकून त्याला मधेच थांबवत रावी म्हणली, कोणाच लग्न .....तूझ आणि माझ.... लग्न ......हे कोणी ठरवल? अरे, तुला माहीत आहे ना? मला ह्या सगळ्यात नाही पडायचे ....मला मस्त मोकळे आयुष्य जगायचे आहे .मला मोठी हेरॉईन बनायचे आहे .खूप पैसा कमवायचा आहे .मझी सगळी स्वप्ने पूर्ण करायची आहेत .आणि अशी मुलगी चालेल तूझ्या आई वडिलांना सून म्हणून ....तूझ्या च काय कोणाच्या च आई वडिलांना ही गोष्ट नाही आवडणार ....लग्न म्हंटले की जबाबदारी आली ....मग, मझ्या बायको ने हे केल पहिजे ..मझ्या सुने ने हे केल पहिजे ....मझ्या वहिनीने हे केल पहिजे ......आणखी बरच काही ....आणि ह्या सगळ्याच करता करता आपण आपल्याला काय पहिजे? तेच विसरून जातो .....आपण हळू हळू स्वतःला च विसरून जातो .... मग आपण सगळ्याची आई होतो ....आणि आपल्याला काय पहिजे? आपली स्वप्न सगळ सगळ विसरून जातो .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED