लिव इन भाग - 17 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लिव इन भाग - 17

रावी आता बऱ्या पैकी चांगली हेरॉईन जाहली होती . तिला बड्या बण्य्र्चे दोन-तीन पिक्चर मिळाले होते .त्यात ती लीड हेरॉईन होती .पिक्चर खूप बोल्ड होते .त्यामुळे तिला असे सीन दयावे लागत होते .खरंतर त्या सीन मुळेच तिचे पिक्चर साठी सिलेक्शन जाहाले होते . त्यामुळे तसे सीन देणे तिला गरजेचे होते . आता रावी ने मुंबईत स्वतहाचे घर घेतले होते .कितीतरी तिचे फार्म हाऊस होते .बँकेत खूप सारा बँक बेलेन्स होता .घरात सगळ्या चैनीच्या वस्तू होत्या ...त्या वस्तू वापरण्यासाठी नोकर चाकर होते .नवनवीन फिल्म्स तिला मिळत होत्या ..बड्या बंय्र्चे निर्मात्या ना तिच्या बरोबर काम करायचे होते . हा .....फक्त त्याच म्हण एवढच होत हिने नूड सीन दयावे .
रावीच्या अयुषात अगदी तिला जे पहिजे, ते घडत होते . तिला खूप पैसा कमवायचा होता .जो की तिने कमावला होता .तिला मोठी हेरॉईन व्हायच होत .ती आता ते जाहली होती .तिला जे जे पहिजे होत ...ते बऱ्या पैकी तिने मिळवले होते . पण, तरीही तीच मन तिला तीच मन खात होत .अमन ला सोडून ती एका प्रडुसेर सोबत लिव्ह इन मधे राहू लागली . तो काही फार मोठा प्र्डुसेर नव्हता .पण, त्याच्या मुळे आपल्याला काही मोठ काम मिळेल अस, तिला वाटल होत .तो पहिजे तसा तिचा वापर करत होता .तिला घरातले काम करयला लावयचा , तिला सेट वर ही जावे लागायचे .आणि दमून भागून घरी आल्यावर ....तो वाटेल तसा तिच्या शरीराशी खेळायचा .....तिच्या गुप्त अंगावर सिगरेट चे चटके दयचा. सुरवातीला रावी हे सगळ सहन करत असताना खूप रडली . पण तिने नंतर स्वता चे मन घट्ट केले .रोज मुकाट्याने ती हे सगळ सहन करायची . मग ,तिच्यावर थोडीशी दया दाखवून, त्याने तिला .....दुसऱ्या एका प्रडुसेर ला भेट्व्ले . तिथून तिला थोड मोठ काम मिळायला सुरवात जाहाली .हो .....त्यासाठी ही तिला वेगळी किंमत मोजायला लागली .त्या प्रडुसेर सोबत .....मग हळु हळु तिला मोठ काम मिळायला लागल्यावर खूप पैसा ही मिळू लागला .मग तिने पहिले स्वतःचे घर घेतले .आणि त्या प्रडुस्र हा हाकलून बाहेर काढले .मग मात्र तिने कधी माघे वळून पहिलेच नाही .एका मागून एक शिडी चढत गेली . रात्र न दिवस फक्त काम .....त्यातून तिला व्यसन लागले ....सिगरेट, दारू ......ती रातोरात स्टार जाहाली . स्टार झल्यावर ....यश तिच्या डोक्यावर बसून नाचायला लागले ...तिच्या वागण्या बोलण्यात अहंकार येऊ लागला .... प्रेमाच कोण्ही माणूस जवळ नाही ...ही खंत ही तिला जगू देत नव्हती .पण रडायचं नाही .आपल दुख कोणालाच दाखवायचे नाही .ह्या बंद खोलीतील भिँतिना ही नाही .मग दुःख लपवण्यासाठी पुन्हा ड्रिंक ......आणि मग शरीराची गरज भागवण्यासाठी कोणीही चलायचा . आणि ह्या बाहेरच्या जगात लचके ओढायला सगळे तयार असतात .....
दुसऱ्या दिवशी पुन्हा लाइट .....कमेरा ....आक्शन.... आणि सीन जो रात्री बंद खोलीत, मंद प्रकाशात कपडे काढून केला तोच ....
कधी कधी रावीला असल्या वागण्याचा गिलट यायचा .पण, ती लगेच मनाला झट्कुन टाकायची .मला असच आयुष्य हवं होत .बिनधास्त, मनमोकळं .....कोणाचीही लुडबुड नको होती मला मझ्या आयुष्यात ....मला स्वातंत्र्य हवं होत .मग, हे आयुष्य मिळवताना झल्या मझ्याक्डुन काही चूक्या ....रावी त्याला चूक्या ही म्हणत नव्हती ....कारण तिने जर तस नसत केल, तर ती आज एवढी मोठी हेरॉईन नसती जाहाली .तिने त्या सठि मनाला फेमिली ला मधे नव्हते आणले . फेमिली ला सोडल्यावर, तिने खूप धक्के खाल्ले होते .पैशाचे प्रॉब्लेम होते . तरीही तिने कधीही फेमिली समोर हात पसरले नाही ....बारा बारा तास काम केले .अमन ...अमन वर तीच किती जीव होता .प्रेम होत का नाही? ते नव्हते माहीत तिला ....पण, खरच खूप जीव होता तिचा . पण, त्याला गुँथुवुन ठेवून ही काही उपयोग नव्हता .दोघांच्या ही वाटा वेगवेगळ्या होत्या .........आणि एकमेकांच्या वाटा स्वीकारून कोणीच खुश राहिले नसते .त्यामुळे त्यांच्यावरचा हक्क काढून त्याला त्याच्या वाटेने जाऊन देणे च योग्य होते . पण, त्याला जर हे प्रेमाने संगितले असते ...तरीही त्याने ते कधीच मानले नसते ....तो माणूसच वेगळा होता .....प्रेमासाठी धावणारा ...एकदा का कोणचा हात धरला ...तर काहीही जाहाले, तरी तो काय तो हात सोडत नसे . अमन चा हा स्वभाव रावीला चांगलाच माहीत होता . त्यामुळे रावीला अमन ला तिच्यापासून दूर करण्यासाठी असच वागण गरजेचे होते .
रावी ला खूप एकट वाटत होत .ती एकटी च पडली होती .आणि, ह्या फिल्मी दुनीयात कुठला मित्र? आणि कुठली मैत्रीण . जे आहे ते ते सगळ फसवा फसवी च .... गरजे ला कोणीच उभ नाही . तिला घरची आठवण येत होती .घरच्यांची आठवण येत होते .अमन ची आठवण येत होती . त्याच्याकडे ती जाऊ शकत नव्हती .कारण तिनेच ते रस्ते बंद केले होते . पण, तिच्या मनात आले ....घरी जाव का? घरचे स्वीकारतील का आपल्याला? नको ....त्या पेक्षा आपण दुरूनच पाहू त्यना ....आज किती वर्ष निघून गेली .त्यांना पाहिलेली .त्याच्या सोबत जग्लेली ....त्यानी संबंध तोडून दिला ....तो कायमचा . त्यानंतर ते ना ....भेटायला आले ....ना ....त्याचा फोन ....आई चा यायचा अधून मधून .....पण, मी बोल्ड सीन द्याला लागले ......त्या बातम्या वर्तमान पत्रातून दिसू लागल्या ...टी वी वर दाखवू लागल्या . तिने खूप समजावले मला ....अस नको करू ....पण, मी योग्यच केल ...चुकीचे काहीच केले नाही ...म्हणून मी थांबले नाही ....पण, आई थांबली फोन करायची .
पण, जाऊदे .....जे जाहाले ते जाहले ....आपण जायचे पंजाब ला घरी .लांबून का होईना सगळ्यां पाहता येईल .आई ची तर खूप आठवण येते . काय होईल ते होईल तिने ठरवले .आणि ती निघाली .तिने लगेच तिच्या पी ए ला फोन करून सगळी तयारी करयला सांगितली .आणि समान घेऊन ती निघाली . रावी ला कधी एकदा पंजाब ला पौह्च्ते असे जाहले होते . पण, हे ही रावी च्या अयुषत होणे तितके सोपे नव्हते . त्या सठि तिला ही तेवढीच कठीण परीक्षा द्यावी लागणार होती . पण, रावी कोणत्या ही परीक्षे साठी नेहमीच तयार असते .रावी तिच्या ड्राइवर सोबत पंजाब पर्यंत आली .पण, तिथे ती एका हॉटेल मधे थांबली .पंजाब मधे येताच तिला खूप बरे वाटले . पण,हॉटेल मधे जाताच तिने तिथे तिला कोण्ही ओळखणार नाही ह्याची खबरदारी घेतली .ती घेणे ही तिठ्केच गरजेचे होते .कारण जर ही खबर मीडीया पर्यंत गेली ....तर तिच्यासाठी ते योग्य नव्हते .शिवाय तिच्या आई वडिलांपर्यंत सूध्हा ही गोष्ट पोहचू शकत होती . त्यामुळे हॉटेल मधे वावरताना ती स्कर्फ गुंडाळून वावरत असे .
रावी सोबत तिची पी ए गंगा सूध्हा होती .ती ने तिच्या घरची महिती काढली होती ....तिच्या लहान भावाचे दोन दिवसानी लग्न होते .त्यामुळे त्याच्या घरात पाहुण्यांची खूप गर्दी होती . त्यामुळे त्या गर्दीत घरात शिरणे फार सोपे होते .तिच्या पी ए ने प्लान आखला .रावी ला आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला .ह्याचे कवतुक वाटले .