जोडी तुझी माझी - भाग 14 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 14

आणि ते दोघेही घरी परत जायला निघतात.


दोघेही सोबत घरी पोचतात, रात्रीच्या जेवणाची वेळ झाली असते त्यामुळे दोघांनाही भुकेची जाणीव होते.

गौरवी - विवेक 15 मिनीट दे फक्त मी लगेच गरम पोळ्या करते आणि मग जेवायला वाढते.

विवेक - मी मदत करू का काही? म्हणजे अग 15 मिनिटांमध्ये कसा काय स्वयंपाक होणार?

गौरवी - आपण बाहेर जायच्या आधीच मी सगळी तयारी केली होती बस भाजी फोडणी घातली आणि पोळ्या केल्या की झालं... आणि हो बरा झाला ना की मग करशील मदत आता जरा आराम कर..

विवेक - जशी आज्ञा राणीसाहेब...

गौरावीला विवेकच्या अश्या बोलण्याचं हसूच येतं...

गौरवी - काहीतरीच हा आता हे ... जा आराम कर झालं किं देते मी आवाज....

आज दोघांनाही खूप मोकळं वाटत असतं.... गौरावीला आज विवेकशी मनमोकळं बोलून मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं, इतकं दिवस लपवून ठेवलेलं आज सांगितल्यामुळे तिला आज हलकं वाटत होतं तर विवेकलाही गौरवीच्या मनात आपल्याबद्दल कसलीच आढी नाही म्हणून चांगलं वाटतं, इतक्या दिवसांपासून जस तो गौरवीशी वागला होता त्यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली अपराधीपणाची भावना त्याला बोचत होती... पण आज ती सल थोडी कमी झाली होती.. पण तरीही विवेकला आता आयशाची आठवण आली आणि त्याच्याही नकळत तो आयशा आणि गौरवीची तुलना करू लागला... गौरवी आयशा पेक्षा किती सरस आणि समजदार आहे हे त्याच्या मनानेच आज त्याला पटवून दिले होतं...

दोघांनीही अगदी आनंदाने हसत खेळत डिनर केलं.. आज खूप दिवसांनी गौरवी विवेकला इतकं खुश पाहत होती.. आणखी तिला काय पाहिजे होतं.. कधी नवे तो आज स्वतःहून तिने बनवलेल्या स्वयंपाकाची भरभरून स्तुती करत होता आणि सोबत तिची पण.. गौरावीला तर अगदी उंच आभाळात पंख लावून उडल्यासारखं भासत होतं.

जेवण झालं सगळं आवरून ती विवेक कडे गेली.. तेव्हा विवेक खिडकीजवळ उभं राहून खिडकीच्या बाहेर एकटक बघत होता.. तो त्याच्याच विचारांमध्ये गुंतला होता. त्याच मन अजूनही त्याला अपराधी असल्याची भावना देत होतं कारण त्याला आज गौरवीशी बोलून अस वाटलं होत की 'आपण हिची खूप मोठी फसवणूक केलीय, गौरावीच्या प्रेमाचा आणि विश्वासच फायदा घेतला आणि घातही केला आहे . आयशाच्या नादात गौरवीशी नेहमी खोटं बोलत गेलो. आज गौरवी आणि मी या नात्याला नवा रंग द्यायच्या आधी जुने सगळे जे झाले ते गौरावीला सांगावे का? आयशा आणि माझ्याबद्दल गौरावीला सांगू का? तिला कळल्यावर ती समजून घेईल का? आजपर्यंत समजून घेतलय तर नक्कीच समजून घेईल पण यावेळी नाही समजून घेतलं तर... काय करू? ती जर सोडून गेली तर मला नाही सहन होणार.... पण नाही सांगितलं तर माझं मन मला त्रास देत राहील आणि मी तिच्याशी मोकळं नाही वागू शकणार... काय करू? कस सांगू???? ' असा विचार त्याच्या मनात चालू होता. तेवढयात गौरवी आली आणि तिने त्याला खिडीजवळ उभं बघितलं आणि त्याला जरा ओरडतच बोलली...

गौरवी - विवेकsss .... अरे असा उभा का आहेस तुला आराम कर सांगितलं ना रे मी. तू असाच वागत राहिला ना तर मला तुझी तक्रार नोंदवावी लागेल सुप्रीम कोर्टात.

विवेक - अग चिढू नकोस, नुसतं पडून पडून पण पाठ दुखायला लागली ग म्हणून थोडं उभं राहिलो.. आणि सुप्रीम कोर्टात तक्रार म्हणजे कुठे?

गौरवी - आई बाबांकडे.. आतापर्यंत तर त्यांना काही सांगितलं नाहीये पण माझं जर ऐकणारच नसशील तर मात्र मी नक्कीच सांगेल हं..

विवेक - नको नको मी ऐकतो आहे ना तुझं.. आणि पटकन जाऊन बेडवर झोपून जातो..

त्याच्या अश्या वागण्याचं गौरविला फार हसू येतं... ती बेडवरच्या त्याच्याबाजूला येऊन बसते.. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणते..

गौरावी- विवेक आज मला खूप खूप मोकळं आणि चांगलं वाटतंय रे.. मला एक प्रॉमिस करशील का? तू असाच राहा प्लीज कधी बदलू नकोस.. बोलता बोलत तिच्या डोळ्यात पाणी तरळत

विवेक -( तिचा हात हातात घेत,) चूक झाली ग माझी तुला ओळखण्यात पण आता परत तस नाही होणार मी प्रॉमिस करतो तुला आता तुला हवं तसच राहील मी.

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात, आज दिघांच्याही डोळ्यात एकमेकांना प्रेम दिसत असत, अगदी भारावून ते स्वतःला एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात... तेवढ्यात गौरवीचा फोन वाजतो.. विवेकच्या आई बाबांचा फोन असतो, त्यांनी मुलांना बघायला विडिओ कॉल केला असतो.. गौरवी फोन घेते.. आणि थोडंफार जुजबी बोलून आणि विवेक झोपलय सांगून फोन ठेवते.

आज पर्यंत गौरवी विवेकच्या बाबतीत त्यांना बहानेच देत आली होती आणि आजही परत पुन्हा एक खोटं.. पण काय करणार विवेकच्या अकॅसिडेंटबद्दल तिला त्यांना माहिती होऊ द्यायचं नव्हतं.. फोन संपल्यावर गौरवी विवेक कडे बघते तर तो खरच झोपलेला असतो, गोळ्यांमुळे त्याला झोप येते. त्याच्या माथ्यावर हलकासा किस देऊन तीही झोपी जाते.

दुसऱ्या दिवशी मंदिरातले ओळखीचे काका विवेकला भेटायला घरी येतात.. विवेकच्या हातात बुके देत ते त्याच्या तब्येतीची चौकशी करतात.. आणि बोलता बोलता त्यांच्या गप्पा रंगतात, विवेक सुद्धा त्यांच्याशी छान गप्पा करतो ,त्याला इतकं निखळ बोलताना बघून गौरावीला ही खूप छान वाटतं.. गौरवीची आग्रह खातीर ते जेवण करूनच जातात.



----------------------------------------
क्रमशः...