Pair Your Mine - Part 15 books and stories free download online pdf in Marathi

जोडी तुझी माझी - भाग 15


गौरवी किचन आवरत असते तेवढ्यात विवेक चोर पावलांनी येऊन तिच्या मागे उभा राहतो.. ती तिच्या कामात मग्न असते आणि घरातही शांतता असते. तो हळूच तिच्या कान जवळ आपलं चेहरा नेतो आणि हलक्या आवाजात "गौरवीss " म्हणतो पण ती मात्र घाबरून जोरात ओरडते आणि वळायला जाते, त्याचा धक्का लागून पडणार तोच तो तिला सावरतो आणि घाबरल्यामुळे गौरवी पटकन त्याच्या मिठीत शिरते... 2 मिनिट तिला काही सुचतच नाही ती तशीच विवेकच्या मिठीत असते पण भानावर आल्यानंतर मात्र त्याला जोरात लांब लोटते आणि त्याला ओरडते....

गौरवी - अस कुणी करतं का? मी किती घाबरले माहिती आहे...

विवेक - हो माहिती आहे तू मिठी मारली तेव्हा तुझ्या हृदयाची धडधड जाणवली ना मला...

विवेक तिच्या नजरेत नजर रोखून तिच्याकडे बघतच बोलतो... गौरावीला मात्र आता फार लाजल्यासारखं होतं ती लगेच नजर वळवुन आणि त्याच्याकडे पाठ करत..

गौरवी - चल काहीतरीच असतं तुझं आपलं...

विवेक - अरे वाह... काय मस्त लाजतेयस तू... बघ मी अस नसत केलं तर तू अशी मिठीत आली असतीस का? तुला इतकं छान लाजता येतं मला कधी कळलं असतं का?
तो तिच्या जवळ जात म्हणतो...

ती त्याला दूर लोटत ...
गौरवी - मि. रोमॅंटिक आधी ठणठणीत बरे व्हा, मग बघुयात पुढचं...

विवेक - अग मी बराच आहे उगाच मला घरात डांबून ठेवलंय...

गौरवी - हो का!! आता तूच तर डॉक्टर आहेस ना तुला समजतं सगळं... त्याची खेचत म्हणते..

विवेक - अग खरच मी बरा झालोय, थोडासा अशक्तपणा आहे फक्त बस... अन तुझ्यासारखी बायको असताना त्याची मजाल कि तो टिकेल...

गौरवीला विवेकच्या अश्या बोलण्यावर हसू येत...

विवेक - बर ऐक ना गौरवी... आपण कुठेतरी फिरायला जाऊ का ग??

गौरवी - हो नक्कीच जाऊयात ना पण तू ठणठणीत झाल्यानंतर...

विवेक - गौरवी मला तुला काही सांगायचं होत गं, छान मोकळ्या हवेत निसर्गरम्य ठिकाणी जाऊयात फिरायला कधीतरी...

गौरवी - अरे वाह खूपच मस्त प्लॅन आहे नक्की जाऊयात ... तू बरा होतो तोपर्यंत मी काही ठिकाणांची यादी करून ठेवते आणि माहिती मिळवते ठीक आहे? मग जाऊयात आपण...

विवेक - हो चालेल... बर मी म्हणत होतो की तू पण नोकरी बघ ना म्हणजे तुला घरात बसायची गरज नाही.. तुझा resume update कर आणि मला पाठव, तुझ्या ओळखीत कुणी असेल त्यांनाही पाठवून ठेव...

गौरवी त्याच्याकडे वळत आणि अतिशय आनंदाने त्याचा हात हातात घेत...

गौरवी - विवेक खरच का? बापरे मला विश्वासच बसत नाहीये.. मी आजच update करते resume माझा...थँक्स विवेक, थँक यु सो much...

विवेक - हम्मम ... नुसतं थँक्स नि काम नाही होणार हं...

गौरवी - मग काय पाहिजे? बोल तू म्हणशील ते देईल मी...

विवेक - बघ हा, म्हणजे नंतर नाही म्हणायचं नाही...

गौरवी - नाही म्हणणार तू सांग तर...तुला शिरा आवडतो ना उद्या शिरा बनून देऊ का ? की आणखी काही वेगळी फर्माईश आहे..

विवेक - उम्म्मम्म ... वेगळी आहे, पण तू देशील अस वाटत नाही मला

गौरवी - तू आधी सांग तर...

विवेक - त्यादिवशी मी झोपल्यावर जसं किस केलं होतस ना मला तसा गोड किस हवाय...

गौरवी - लाजून नजर वळवत, काहीतरीच काय विवेक... आणि त्यादिवशी मी किस केलंय तुला कसं कळलं?? म्हणजे तू जागी होता??

विवेक - हम्म जागी नव्हतो पण तुझ्या गोड किस नि थोडी झोप उघडली होती.. आणि काहीतरीच थोडं मागत आहे बायकोला किस मागतोय बस्स.. आणि झोपल्यावर देऊ शकते तर जागी असताना का नाही..

गौरवी - बस बस ... बर बाबा ठीक आहे.. झोपायच्या वेळेला देईल.. जा आता आराम कर..

विवेक - नको आराम करायला गेलो आणि झोप लागून गेली तर... ते काही नाही मला आताच हवाय...

गौरवी - अस काय लहान बाळासारखं करतोय...

विवेक - तू मला भरकटवू नको हा.. मला आताच हवयं...

गौरावीला त्याच्या अश्या वागण्याचं थोडं हसूच येतं.. त्याच्याजवळ जात त्याच डोकं आपल्या दोन्ही हातात धरून ती त्याला माथ्यावर हलकासा गोड किस देते...

विवेक - ये हुई ना बात आता .. आणि लगेच गाल पुढे करत आता इथे ...

गौरवी हसतच हलकेच त्याच्या गालावर चापट मारत त्याला बाजूला करते.... आणि त्याला आराम करायला सांगते... घरातलं आवरून तीही मग झोपायला जाते...

आणखी एक आठवडा घरातच उलटून जातो आणि विवेकला आता कामावर जाण्याची परवानगी मिळते..

आज परत कामावर जायचं आहे या विचाराने विवेक आनंदी असतो कारण घरात बसून कंटाळा आला होता त्याला पण गौरावीला घरात आज ऐकटं सोडून जायची त्याची इच्छाच होत नाही.. गौरावीला त्याची इतक्या दिवसांची सवय झाली असल्यामुळे ति ही जरा अस्वस्थच असते पण जावं तर लागणारच ना, आणि विवेक निघून जातो..

आज विवेकच ऑफिसमध्ये अजिबात मन लागत नाही, राहून राहून त्याला गौरवी आठवते आणि तो तिला कॉल करतो पण गौरवी उचलत नाही, मंदिरात गेली असेल थोडावेळणी करू असा विचार करून तो पुन्हा काम करत बसतो.. तो मनात ठरवतो की याच रविवारी फिरायला जायचं आणि तेच त्याला गौरावीला पण सांगायचं असतं...

थोडावेळाणी विवेक पुन्हा गौरावीला फोन लावून बघतो पण तरीही फोन उचलत नाही, तो पुन्हा फोन लावतो फोन उचलला जातो पण फोनवर गौरवी नसते......

----------------------------------------------------------------
क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED