जोडी तुझी माझी - भाग 17 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 17

आयशा - अरे तुला भेटायला, कितीही नाही म्हंटलं तरी मी गर्लफ्रेंड आहे तुझी, तुझी काळजी वाटणारच ना...

विवेक - गर्लफ्रेंड आहे नाही होती, 4 महिन्या आधी तूच मला सोडून गेली होतीस, आणि एवढी काळजी वाटते तुला माझी तर तेव्हा का नाही केली काळजी हं? का सोडून गेली मला? पण बरच झालं तू सोडून गेली निदान तुझं खर रूप तर समोर आलं किती लालची आणि स्वार्थी आहेत तू ते... आणि गौरवी ती बिचारी तुझ्यामुळे किती त्रास तिला सहन करावा लागला तरी ती किती समजदार तिनी मला समजून घ्यायचाच प्रयत्न केला नेहमी... आज ती आहे म्हणून मी आहे नाहीतर माहिती नाही माझं काय झालं असतं.. चालती हो इथून आत्ताच्या आत्ता... आणि परत तुझं तोंड दाखवु नकोस मला...

विवेक रागाच्या भरात बोलून गेला पण गौरवी ऐकतेय हे त्याच्या लक्षातच आलं नाही..

आयशा - wait wait wait, माझं काम तू का करतोयस? आणि अचानक बायकोचा इतका पुळका यायला लागला तुला? तिला त्रास माझ्यामुळे नाही झाला तू दिलास, मी तुला सोडून गेले म्हणून तुझा पुरुषी अहंकार दुखावला असावा म्हणून तू माझा राग तिच्यावर काढला यात माझा दोष नाही.. आणि एक विवाहित माणसाबरोबर मी किती दिवस राहणार होते? माझ्या करियरला चांगली सुरुवात मिळाली होती तुझ्या सारख्या मूर्खाच्या नादी लागून मला माझं भविष्य खराब करायचं नव्हतं...

विवेक - तुला अचानक जाणवलं का की तू एक विवाहित पुरुषाबरोबर संबंध ठेवतेय ते? आणि मी तर तुझ्याशीच लग्न करायचं म्हणत होतो ना ग, पण तू लग्नाला तयार नव्हती, तुझ्याच सांगण्यावरून मी गौरवीशी लग्न केलं.. विसरली का तू? बरंच झालं की मी तुझ्याशी लग्न नाही केल...वाचलो मी... आणि काय म्हंटलीस तू!!.. मी मूर्ख ना मग कशाला आली इथे? निघ इथून.. जा आणि तुझं करियर च बनव...

एवढं ऐकून गौरावीला भोवळ आली आणि ती तिथेच पडली.. पन विवेक आणि आयशाच तिच्याकडे लक्षच नव्हतं ते अजूनही भांडतच होते..

आयेशा - निघणार मी नाही तू आहेस.. तू, तुझं समान आणि तुझी बायको घेऊन... get out from this house...

विवेक - व्हॉट??? माझ्या घरी येऊन मलाच बाहेर काढू बघणारी तू कोण ग?

आयेशा - कसा रे विवेक तू भोळा!!! विसरलास का या घरात तुला मीच घेऊन आले होते.. तुला हे घर माझ्यामुळे मिळालं..

विवेक - हो पण त्याच काय?? मी रेंट भरतो या घराचं दर महिन्याला, आणि तुझं नाहीय हे की तू मला बाहेर काढशील.. समजलं??

आयेशा - माझच आहे विवेक हे घर... आताच एक महिन्यांपूर्वी मी माझ्या नावावर केलीय ही प्रॉपर्टी...

विवेक - काय? कस शक्य आहे हे? काय पुरावा आहे???

आयशा - पुरावा आहे ना मला माहीतच होत तू विचारशील म्हणून, त्याशिवाय काय तू ऐकणार होतास!! आणि हो आता हे घर माझं आहे तर मला दोन दिवसांत हे घर रिकाम करून पाहिजे आहे.. काय आहे ना... मी आकारलेलं भाडं तुला परवडणार नाही आणि मला तुझ्या हिशोबाने भाडं ठरवून माझं नुकसान करायचं नाही.. सो 2 दिवसांत घर सोडायचं..

अस म्हणत आयशा त्याला प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवते... ते बघून विवेक गोंधळतो, त्याला काहीच कळत नसतं, आता मी गौरावीला काय सांगू तिला कुठे घेऊन जाऊ.. असे सगळे विचार एकाचवेळी त्याच्या डोक्यात येतात.. आणि तेवढ्यात त्याला गौरवीची आठवण येते की ती कुठे दिसत नाहीय म्हणून तो इकडे तिकडे बघतो तर गौरवी खोलीच्या दारात पडलेली असते... तिला तस बघून विवेक धावतच तिच्याकडे जातो.. आणि तीच डोकं त्याच्या मांडीवर घेतो.. तो तिच्या गालाला हात लावून तिला उठवण्याचा प्रयत्न करतो पण ती काहीच प्रतिसाद देत नाही तो ना राहून आयशा ला पाणी आणायला सांगतो.. ते बघून आयशा ही आढे वेढे ना घेता पाणी आणून देते.. तो तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो .. तसाच तिला शुद्ध येते... तो तिला उचलून बेडवर झोपवतो.. पण ती अजून पूर्ण शुद्धीत आलेली नसते..

तोच आयशा त्याला पुन्हा घर सोडायची आठवण करून निघून जाते...

इकडे हळूहळू गौरावीला शुद्ध येते.. आणि तिला विवेक आणि आयशाच संभाषण आठवते... ती रागातच उठते आणि बॅग भरायला घेते... विवेक किचन मध्ये तिच्यासाठी लिंबू पाणी बनवत असतो.. अचानक झालेल्या आवाजाने तो पळतच खोलीत येतो आणि बघतो तर गौरवी आपले समान बॅग मध्ये भरत आहे..

विवेक - अग... अग... गौरवी काय करतेय हे? बॅग का भरत आहेस?

गौरावीला त्याच्याशी बोलायचं नसत पण त्याला कारण सांगणं गरजेचं असतं...

गौरवी - तू जो माझा विश्वासघात केला आहेस त्यानंतर मी तुझ्यासोबत राहील असा वाटलं का तुला? मी समजत होते तुला कामाचा ताण आहे पण नाही तुला तर तुझ्या गर्लफ्रेंड नि सोडून गेल्याच दुःख होतं आणि तो राग मी सहन केला.. मीच मूर्ख आहे विवेक मला तुला आधीच ओळखायला पाहिजे होतं... त्यादिवशी झालेला समज माझा खोटा नव्हता पण तू इतकं छान समजावलं मला की मला वाटलं मीच चुकीची आहे आणि त्यानंतर तुझ्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही असं मनाशी निश्चय केला पण मी चुकीची होती मला नाहीच ओळखता आलं तुला... माझा जीव गुदमरतोय आता इथे मला एक क्षणही इथे थांबायचं नाही..

रागात गौरवी बोलत होती...

विवेक - अग पण ऐकून तर घे ना माझं ...

गौरवी - काय ऐकून घेऊ विवेक? पुन्हा तू मला मागच्या वेळसारखं तुझ्या बोलण्यात फसवणार आहे का? मला यावेळी तुझं काहिच ऐकायचं नाहीय.. आणि तुला माझी काय गरज? तुझी गर्लफ्रेंड आली ना परत तुझ्याकडे.. आज ना उद्या माफ करशीलच तू तिला.. बस विवेक मला आणखी वाद घालायचाच नाहीय ...

तीची बॅग भरून झाली होती आणि शेेवटच वाक्य म्हणत ती निघत होती..

--------------------------------------------------------------
क्रमशः...