जोडी तुझी माझी - भाग 18 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 18


तीची बॅग भरून झाली होती आणि शेेवटच वाक्य म्हणत ती निघत होती..

विवेक - ती परत नाही आलीय ग... आणि मी तिला परत कधी येऊ पण देणार नाहीय आता... तू प्लीज एकदा माझं ऐकून घे.. मला एक चान्स तर दे ना स्वतःला व्यक्त करायचा..

तो तिला अडवत तिच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसून आणि हात जोडत तिला विनवणी करत होता.. हे बघून गौरावीला वाईट वाटलं पण राग इतका जास्त होता की तिने त्याच काही एक ऐकलं नाही.. आणि सरळ निघून गेली.. तो गेला तिच्या मागे तिला समजवायला पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.. ती टॅक्सी घेऊन निघून गेली होती..

टॅक्सी घेऊन निघाली तर खरं पण जाणार कुठे हा प्रश्न तिला पडला.. आणि नंतर तिला तिच्या मंदिरातल्या काकांची आठवण झाली, तिने त्यांना फोन केला आणि "1-2 दिवसांसाठी मी तुमच्याकडे राहू शकते का?" विचारलं... त्यांनीही हो म्हणटंल आणि गौरवी तिकडे गेली..
इकडे विवेकला काय करू काहीच कळत नव्हते.. त्याने तिला फोन करून बघितला पण तिने त्याला ब्लॉक करून टाकलं होतं..

रडून रडून त्याचेही डोळेे सुजले होते... झोप तर नाहीच ..
कुठे गेली असेल आता एवढ्या रात्री गौरवी कुठे राहील? हाच विचार त्याच्या डोक्यात फिरत होता... त्याला तिचि काळजी वाटत होती.... मला तिला शोधायला पाहिजे... .पण कुठे शोधू? त्याच डोकं सुन्न झालं होतं..

गौरवी काकांच्या घरी पोचली... स्वतःला सांभाळत हसतच ती आत शिरली.. जेवण वगैरे झाले.. आणि काकूंनी विचारलं की काय झालं गौरवी सगळं ठीक आहे ना? तिनेही दुःख लपवत हसून फक्त " हो काकू" एवढच म्हंटल.. गौरवी खूप थकल्यासारखी दिसत होती म्हणून काकूंनी तिच्याशी नंतर बोलायचं ठरवलं.. आणि "झोप हा शांत काळजी करू नको काही लागलं तर निसंकोच पने सांग" एवढं बोलून त्या झोपायला गेल्या..

"आपण अस अचानक काका काकुंकडे राहायला आलो आहे त्यांना नक्कीच काहीतरी सांगावं लागणार ना अस अचानक का आली ते आणि खर पण सांगू शकत नाही" ती विचार करत असते आणि तिला कारण सुचते..

झोप तर येत नाहीच तिला आणि जे झालाय ते आठवल्यामुळे डोळे पण सतत अश्रू गाळत असतात.. ती मोबाइलमध्ये तिच्या लग्नाचे फोटो बघत असते आणि तिला पुन्हा भरून येतं.. खूप उशीरा तिला झोप लागते आणि सकाळी पण लवकरच जाग येते..

काका काकू हसून तिला सुप्रभात म्हणतात तीही त्यांना प्रतिसाद देते.. आणि काकू तिला चहा देतात.. तिघंही जण चहा घेत असतात तेव्हा काका तिला पुन्हा विचारतात..

काका - गौरवी सगळं ठीक आहे ना बाळा, नाहीं म्हंणजे अशी अचानक आली म्हणून, तस तू कधीही येऊ शकते कारण तू मुलींसारखीच आहे आमच्या पण..

गौरवी - हो काका सगळं ठीक आहे, ते काल घरमालकाने घर सोडायला सांगितलं आता इतक्या लवकर दुसरं घर कुठून शोधणार ना म्हणून मग मी इकडे आले..

काका - अग मग विवेक कुठे आहे त्याला पण घेऊन यायचं ना.. आणि नवीन घर भेटेपर्यंत इथेच राहिले असते दोघे पण..

गौरवी - काका तो त्याच्या एक मित्राकडे राहायला गेला आहे .. आणि मला घरची फार आठवण येतेय तर मी पण काही दिवसांसाठी इंडिया जायचा विचार करतेय... मला आजच तिकीट बुक करायचे आहेत..

काका - बर बर तुला काही मदत लागली तर सांग...

गौरवी लगेच दुसऱ्या दिवशीच तिकिट बुक करते आणि विवेकला न सांगता भारतात निघून येते..

इकडे विवेक खूप तानात असतो एकतर गौरवी सोडून गेली आणि दुसरं म्हणजे घर सोडायचं तर राहायचं कुठे?? दोन दिवसानी आयशा परत येते.. आणि विवेकला सामानसकट घराबाहेर चक्क हाकलून लावते...

पुढे तो 2 - 3 फोन करतो त्यातला एक जण त्याच्याच ऑफिसमधे त्याच्यासोबत काम करणारा विवेकला ठेवायला तयार होतो आणि विवेक तिकडे राहायला जातो..

अनेक प्रश्न विवेकला सतावत असतात की आयशा ला ही प्रॉपर्टी मिळाली कशी? आणि हीच का घेतली असेल तिने? मला त्रास द्यायला? मी काय वाईट केलं तीच? का माझ्या आयुष्यात मी आयशा सारख्या मुलीवर प्रेम केलं? गौरवी तू मला आधी का नाही ग भेटली? पण आता मला खरच तुझ्याबद्दल काहीतरी वाटायला लागलं होतं आणि तुही मला सोडून गेली? तुझी काही चुकी नाहीच आहे म्हणा, पण तरी इतकं समजून घेतलं नेहमी, यावेळी नुसतं एकदा ऐकून तर घ्यायचं होत ना ग... कुठं निघून गेली आहे रागाच्या भरात? कुठे शोधू तुला? तो त्याच विचारात असतो... आणि मनाशी काही तरी ठरवून झोपी जातो..

गौरवी भारतात येते खरं... पण इथे आल्यावर तिच्या लक्षात येतं की ती घरच्यांना काहीच सांगू शकणार नाही.. न सांगता घरी आली म्हणून बरेच प्रश्न असतील आई बाबांचे आणि विवेकशी बोलणं झाल्यावर त्याला कळेल की ती इकडे आली आहे ते... "मला घरी जाता येणार नाही त्यांना उत्तर देणे मला जमणार नाहीत. पण मग जाऊ कुठे?" विचार करत ऐरपोर्टवरच कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसली असते..

---------------------------------------------------------
क्रमशः...