जोडी तुझी माझी - भाग 21 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 21


दुसऱ्या दिवशी तो ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तो जुन्या घरी जातो आणि समोरच बघून अवाक होतो..

ते घर आयशाने आपल्या नावावर कस केलं आणि का हे त्याला तेव्हा समजतं.. घरात हॉल मधेच आयशा आणि त्याचा जुन्या घराचा घरमालक रोमान्स करताना दिसतात.... घराचं दार उघडच असतं त्यामुळे विवेकला दोघही स्पष्ट ओळखू येतात.. त्या दोघांना बघून विवेकच्या पार चढतो तो टाळ्या वाजवतच घरात शिरतो..

विवेक - वाह वाह आयशा वाह... आता मला कळलं तुला हे घर कस मिळालं ते.. तरी म्हंटलं तुझी इतकी ऐपत कशी झाली की तू ही प्रॉपर्टी खरेदी केली.. तू प्रॉपर्टी खरेदी नाही केली तर प्रॉपर्टी मालकाकडे स्वतःलाच विकलं..

आयशा- (रागातच उभी होत) तोंड सांभाळून बोल विवेक..

विवेक - आणि तू काय सांभाळाला हवं आयशा? मी विचार करतच होतो की असा कोण अमिरजादा हिला भेटला जो या प्रॉपर्टीच एवढं भाडं भरायला तयार आहे जे मी ही देऊ शकणार नाही.. आता लक्षात आलं की तू मला भाडं वाढीची मागणी न करता घरातून हाकलून का लावलं ते.. म्हणजे तुम्हा दोघांना private जागा पाहिजे असेल ना अस काही करण्यासाठी.. आणि एक मिनिट हा तर विवाहित आहे ना.. आता हा चालतो का तुला? खूप खूप स्वार्थी आहेत तू आयेशा पैशासाठी कुणालाही फसवू शकतेस तू.. तुला तर फुकटातच मिळाली असेल ही प्रॉपर्टी हो ना...

घर मालक इंग्लिश आणि पंजाबी या दोनच भाषा समजत होता त्याला विवेक आणि आयेशाचं बोलणं कळत नव्हतं.. पण हे दोघे भांडताहेत हे मात्र त्याला कळलं..

त्या दोघांच्या मधात पडत..

घर मालक - हे कूल डाउन विवेक.. आय अम सॉरी दॅट यु हॅव टू लिव्ह धिस होम इन सच वे.. अ.. अ.. डु यु वॉन्ट एनीथिंग हिअर?

विवेक - येस mr. jutla.. आय फॉरगोट माय मेडिकल फाईल हिअर..

आयेशा - तुझं इथे काहीही सामान नाहीय, कुठली फाईल वगैरे काहीच नाहीय मी पूर्ण घर क्लीन करून घेतलय आणि जे काही होत ते कचारापेटीत फेकून दिलंय, सो तू जाऊ शकतोस..

विवेक - काssय? अग मला गरज आहे त्याची.. तुझ्या सारख्या नीच मुलीकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो म्हणा... तुला काय पडलाय कुणाच्या वस्तूंचं तू तर माणसांना पण गीनत नाही...

आयशा - तुझ्यापेक्षा श्रीमंत माणूस माझ्या आयुष्यात आला म्हणून वाईट वाटतंय, जळफळाट होतोय का तुझा ...अहाहा मी समजू शकते तुझा राग.... पण याचा आता काही उपयोग नाही हं..

विवेक - मी कशाला जळू, मी तर पच्छताप करतोय की मी माझ्या आयुष्याचे कितीतरी दिवस तुझ्यासारख्या नीच मुली मागे वाया घालवलेत.. असो चालू दे तुझं...

आणि तो तिथून निघून जातो, आयशाला त्याच्या 'नीच' शब्द बोलण्याचं जिव्हारी लागतं.. तिचा पूर्ण मूड गेला असतो आणि ती रागाने तापली होती.. mr. jutla तिला विचारतात की तो काय म्हणत होता पण खोटं सांगून ती मोकळी होते.. तिचा मूड गेलेला पाहून mr. jutla पण तिथून निघून जातात..

इकडे विवेक घरी येतो खूप distrub असतो, राहुल त्याला विचारतो पण तो सांगायचं टाळतो..
मग राहुल त्याला मोकळं करण्यासाठी, divert करण्यासाठी आणि आणखी एक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी बोलतो

राहुल - विवेक उद्या शनिवार आहे आपल्याला सुटी असते तू उद्या जाणार आहेत का मंदिरात?

विवेक - हो राहुल मी आणखी वाट नाही बघू शकत.. उद्या तिला भेटणारच आहे मी..

राहुल - पण ती नक्की त्या काकंकडेच असेल कशावरून? आणखी कुठे गेली असेल तर?

विवेक - नाही ती तिथेच असावी आणि कुठे दुसरीकडे असली तरी काकांकडून मला काहीतरी सुगावा मिळेलच..

राहुल - चला तुझं डोकं चालायला लागलं म्हणजे बर मला सांग समज गौरवी तुला भेटली तर ती तुला माफ करेल? आणि जरी समजा ती मानली तिने तुला माफ केले आणि तुझ्यासोबत राहायला तयार झाली तर तू तिला ठेवणार कुठे आहे? माझ्या रूमवर? ती तयार होईल का? ते तिला बरोबर वाटेल?

विवेक - अरे हा.. हा तर मी विचारच नाही केला? आता? आधी मला घर शोधायला पाहिजे मग तर...

राहुल - मला वाटलंच होत की तुझ्या लक्षात नसेल आलं.. अ.. तुझी काही हरकत नसेल तर मी एका व्यक्तीशी बोललो आहे, तू म्हणशील तर आपण घर बघून यायचं का? तुला आवडलं तर तू गौरावीला घेऊन तिथे राहा...

विवेक - अरे वाह राहुल ... thank u रे तू खरच खूप करतोय माझ्यासाठी.. किती सांभाळून घेतोय मला.. चल बघून तर येऊ..

राहुल - हो चल... आणि ते दोघेही नवीन घर बघायला जातात...

इकडे गौरवी पुन्हा नोकरी शोधायचा प्रयत्न करत असते, घरात बसून तिला कंटाळा येतो.. रुपलीच्याच कंपनीमध्ये एक जागा असते ती तिथे अँप्लिकेशन टाकते आणि सोमवारी तिचा interview असतो.. ती त्यासाठी खूप चांगली तयारी करत असते... असाच अभ्यास करताना तिचा फोन वाजतो, विवेकच्या आई बाबांचा फोन असतो...

-–-------------------–---------------- -----
क्रमशः...