जोडी तुझी माझी - भाग 22 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 22


गौरवीला वेकच्या आईचा फोन येत असतो...ते पाहून ती घाबरते, आता काय सांगू तिला सुचत नाही, पण उचलला नाही तर ताण घेतील म्हणून ती उचलते... आणि सगळं नॉर्मल असल्यासारखं बोलत असते, विवेक बद्दल विचारल्यावर तो बाहेर गेला आहे सामान आणायला अस सांगून मोकळी होती आणि थोडं बोलून फोन ठेऊन देते.. तिला खूप वाईट वाटत की तिला नेहमी खोटं बोलावं लागतं त्यांच्याशी पण त्यांना दुखावन्यापेक्षा ठीक आहे असा विचार ती करते...

फोन ठेवल्यावर तिला विवेकची खूप आठवण येते पण अजूनही तिचा राग गेलेला नसतो.. ती फोन मध्ये त्याचे फोटो बघत असते... तेवढ्यात रुपाली ऑफिसमधून येते, आणि गौरवी लगेच तोंड फिरवून तिचे डोळे पुसते, रुपालीच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही पण ती तिला विचारत नाही..

गौरवी -( डोळे पुसत )अरे वाह रुपाली आली तू, तू फ्रेश हो मी आपल्या दोघींसाठी कॉफी करते..

रुपाली - हो चालेल...

दोघीही गॅलरीत बसून कॉफी घेत असतात...

रुपाली - गौरवी, मी काय म्हणते चुकीचं समजू नको, पण शांततेने ऐकून घे..

गौरवी - अग बोल रूप..

रुपाली - गौरवी, तू मला माझ्या घरी आहे म्हणून आनंदच आहे मला तुझी सोबत मिळाली आहे, पण अग अस किती दिवस राहशील घरच्यांना काहीही न सांगता ? तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना आणि भारतात येऊन तू त्यांच्यापासून लांब आहेस नको विवेकच्या घरी पण तुझ्या आईबाबांना तर सांग...

गौरवी - अग त्यांना सांगायचं असत तर मी सरळ तिकडेच नसते का गेले रूप, तुझ्याकडे कशाला ली असती.. अग त्यांना ताण येईल ग.. आणि बाबांचं तर माहिती आहे ना, काहिही विचार न करता ते सरळ विवेकच्या घरच्यांना बोलायचे, पण खर सांगू माझे सासू सासरे माझी इतकी काळजी करतात ग त्यांना त्यांच्या मुलाबद्दल काहीच माहिती नाहीये, आता थोडावेळापूर्वी त्यांचा फोन येऊन गेला... काळजीने विचारतात ते मला नेहमी, त्यांना अपमानित नाही होऊ द्यायचं मला.

रुपाली - हो ते बरोबर आहे पण कधी न कधी तुला सांगावच लागेल ना, तू नाही सांगितलं म्हणून लपून राहील असा वाटत का तुला? आणि तेव्हा तू ना सांगीतल्याच जास्त वाईट वाटलं त्यांना.. आणि तू आता जॉब शोधत आहे म्हणजे बाहेर वावरणारच झालं चुकून त्यांनी तुला कधी कुठे बघितलं तर? तेव्हा काय उत्तर देशील..

गौरवी - तुझं सगळं बरोबर आहे रूप पण, थोडा वेळ दे मला आता सद्धे लगेच नाही जमणार मला त्यांना सांगायला.. आणि आधी मी विवेकच्या घरीच सांगेल मग माझ्या घरी.. मी अजून सावरली नाहीय ग या धक्क्यातून आणि त्यांना धक्का देणं मला जमणार नाही...

रुपाली - गौर मला वाटत तू एकदा विवेकशी बोलावं, एकदा त्याच ऐकून तर घे.. मान्य आहे त्याची खूप मोठी चूक आहे पण अग नंतरचे दिवस आठव ना म्हणजे तुमचं नात सुधारत होत ना ग, होऊ शकते आता त्याला त्याची चूक कळली असेल आणि तो आयशा कडे परत नसेल गेला..

गौरवी - हो मला वाटत ग त्याच्याशी बोलावं पण मग आणखी राग येतो की त्याने ही गोष्ट लपवून का ठेवली, मी नेहमी त्याला समजूनच घेतला ना ग तरी विश्वास नाही ठेवता आला का त्याला तेवढा..

रुपाली - हो कदाचित तो सांगणार असेल त्याला वेळ हवा असेल थोडा.. मी त्याची बाजू घेऊन बोलतेय अस नाही पण तुझी जी द्विधा मनस्थिती आहे ती सोडवायचा प्रयत्न करतेय.. तू प्रेम करतेस अजूनही त्याच्यावर.. तुझं त्याच्या आठवणीत एकांतात रडणं सगळं सांगत ग..

गौरवी - हो ग रूप, त्याच्याशिवाय मला नाहीच जगता येणार पण मी स्वतःला थोडा वेळ देत आहे...

रुपाली - ठीक आहे जस तुला योग्य वाटेल तस कर, आणि मी नेहमीच सोबत आहे तुझ्या विसरू नको..

इकडे विवेकला घर खूप आवडतं आणि तो राहुलला म्हणतो की गौरवी माझ्यासोबत राहायला तयार झाली की मी हचे घर भाड्याने घेईल..

राहुल - चल तुला आवडलं ना, आता उद्यापाऊन 2दिवस मिशन गौरवी...

विवेक - हो... 😊, राहुल मला तुला एक सांगायचं होत.. आयशाने हे सगळं का केलं ते मला कळलंय,

राहुल - काsssय?? का केलं तिने?

आणि विवेक राहुलला त्याने जुन्या घरी गेल्यावर जे झालं ते सगळं विवेकला सांगितलं...

राहुल - बापरे किती game प्लेअर आहे ही मुलगी... बर झालं विवेक तू सुटला तीच्या तावडीतून...

विवेक - हो ना.. पण गौरवी ला वाटत की मी परत तिच्याकडे जाईल... मी कधीच नाही जाणार रे तिच्याकडे कस सांगू मी तिला...

राहुल - होईल सगळं नीट... काळजी नको करू सकारात्मक रहा..

विवेक - हो... चल आपण घरी निघूयात...

-----------------------------------