जोडी तुझी माझी - भाग 29 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

जोडी तुझी माझी - भाग 29


तेवढ्यात विवेक आत येतो, रुपलीला आत बघून

विवेक - अरे वाह तू आलीस, तू आणलं का मी सांगितलं होतं ते?

रुपाली - हो जीजू, हे घ्या... रुपाली डबा समोर पकडत त्याच्या हातात देते..

डॉक्टरशी बोलून झाल्यावर त्याने रुपलीला कॉल करून रुपलीला गौरवीच्या आवडीचं आणि तब्येतीला सोयीस्कर असं भरली भेंडी च जेवण बनवून आणायला सांगितलं होतं..

विवेक - अरे वाह , ग्रेट... चल गौरवी थोडं खाऊन घे तुला बरं वाटेल... डॉक्टरांनी काही पतथ्य सांगितली आहेत आणि औषधी पण घ्यायची आहे तर थोडं खाऊन घे...

तो तिच्यासमोर टेबल लावतच तिच्या कडे न बघता बोलत असतो... रुपाली हळूच गौरवीच्या आईला हाताच्या इशाऱ्याने खुणावत बाहेर जाऊयात अस म्हणते, आणि त्या दोघी निघून ही जातात...

विवेक तिच्या बाजूने बसतो, डबा टेबलवर ठेवतो, आणि पटकन एक घास घेऊन तिला भरवायला जातो, ती फक्त त्याच्याकडे बघत असते..

विवेक - अग तोंड उघड पटकन चल खाऊन घे...

तीही काहीच न बोलता खाऊन घेते.. तो अखंड बडबड करत असतो आणि ही ऐकत असते...तीही त्याला टोकत नाही आणि तोही काही थांबत नाही...

इकडे रुपाली "मी गौरवीची काळजी घ्यायला आहे इथे आणि भेटण्याची वेळ सोडून आपल्याला दवाखान्यात जास्त वेळ थांबता येणार नाही" म्हणून सगळ्यांना घरी पाठवते फ्रेश होऊन आरामात या असं समजवते... गौरवीची बाबा जायला तयार होत नसतात पण रुपाली आणि गौरवीची आई कसंबसं त्याना समजावून घरी पाठवतात.. काही लागला तर लगेच फोन कर अस सांगून सगळे निघून जातात...

इकडे गौरवीच जेवण आटोपते आणि विवेक तिला औषधी द्यायला उठणार तोच गौरवी त्याचा हात पकडते आणि त्याला पुन्हा स्वतःजवळ बसवते...

गौरवी- मला बोलायचं आहे तुझ्याशी? बसतोस का जरा....

विवेक - गौरवी बोलूयात ना पण आधी औषधी घेऊन घे.. मग बोलूयात..

गौरवी - औषधी घेतल्यावर मला झोप येईल नीट बोलता येणार नाही, आणि तेव्हा तूच म्हणत होता ना बोल म्हणून..

विवेक - गौरवी पण आता नको ना, अग तुला सद्धे आराम जास्त गरजेचा आहे, डॉक्टरांनी जास्तीत जास्त आराम सांगितलंय तुला... तेव्हाच तू लवकर बरी होशील..

गौरवी - आणि काय करू लवकर बरी होऊन? आणि तसही जर बोलले नाही तर तेच ते डोक्यात फिरत राहील त्यापेक्षा मला बोलून मोकळं व्हायचंय..

विवेक - "काय करू" काय ग? आम्हला तुला या परिस्थितीत नाही बघवत, म्हणून लवकर बरी हो... बर बोल...

"मी तर तुझ्याशी बोलायलच आलोय ना ग इकडे पण हे काय होऊन बसले अस वाटत बोलून तुला आणखी ताण देणं बरोबर नाही म्हणून शांत आहे मी.. मनातून किती झुरतोय मी तुला कस सांगू... " विवेक मनातच बोलून गेला..

गौरवी - तू इकडे कधी आला? आणि कशाला? आणि आई बाबांना काय सांगितलंस तू?

विवेक - हळूहळू एकेक विचार ना एवढे सगळे एकाच वेळेसच... मी 2 दिवसांपूर्वीच आलोय इकडे.. तुझ्याशी बोलायला आलो होतो..

गौरवी - माझ्याशी बोलायला!!! तुला कुणी सांगितलं मी इकडे आलीय ते?

विवेक मंदिरात काकांना भेटल्यापासून पुढचं सगळं तिला सांगतो...

गौरवी - म्हणजे रुपलीला माहिती होत तू आलाय ते... आणि ती मला काहीच बोलली नाही...

विवेक - ती ऑफिसमधून घरी गेल्यावर तुझ्याशी बोलणारच होती त्यादिवशीच तुझा अकॅसिडेंन्ट झाला.. तिलाही त्याच दिवशी माहिती झालं होतं मी आलोय...

गौरवी - कशाला आला? आणखी काय बाकी राहिलंय? किती विश्वास केला होता मी तुझ्यावर... आणि तू असा घात केलास, कदाचित मी एवढं रिऍक्ट नसते झाले जर मला तू आधीच सांगितलं असत तुझ्या भूतकाळाबद्दल, मी समजू शकते आजच्या काळात लव्ह अफेअर्स खूप कॉमन आहे पण तू मला अंधारात ठेऊन जे वागलास विवेक खूप दुखावल्या गेले रे मी.. माझी निष्ठा माझं प्रेम सगळं काही फोल ठरलं.. मी तुला म्हंटल होत एकदा माझ्याशी मैत्रीण म्हणून बोलून बघशील, पण तरी तुला नाही बोलावसं वाटलं आणि आता काय बोलायचं तुला? मी तुला स्पष्टच सांगते विवेक मी आपलं नातं संपवण्याचा विचार केलाय...

गौरवीचे एवढे कठोर बोल ऐकून विवेकच्या डोळ्यात टचकन पाणी येतं.. तो 2 मिनिटं तसाच तिच्याकडे बघत असतो, गौरवीच शेवटचं वाक्य ऐकून तर त्याला धक्काच बसतो... एवढं कठोर गौरवी कधीच वागली नव्हती... म्हणूनही विवेकच फावलं होतं... पण आता त्याला गौरवीशिवाय राहणं अवघड होतं... डोळ्यातलं पाणी पापण्यांमध्येच लपवत आणि तिला शांत करत... आणि विषय टाळत...

विवेक - तू म्हणशील तस करू पण आता प्लीज हा विषय सोड, जास्त विचार नको करुस, ( गोळी तिच्यासमोर करून) ही औषधी घे आणि आराम कर.. आपण नंतर बोलूयात ना हे सगळं प्लीज...

मी एवढं टोकाचं बोलल्यावर पण हा एवढा शांत कसा काय ? गौरवी ला आश्चर्य च वाटतं, ती पण पुढे काही बोलत नाही औषधी घेऊन आराम करते... विवेक रुपलीला आत पाठवतो आणि स्वतः बाहेर निघून जातो..

गौरवीचे तीक्ष्ण बोल ऐकून त्याला खूप वाईट वाटत असतं... त्याला आता कुणाचा तरी आधार हवा असतो... पण आताही तो एकटाच असतो संदीप घरी गेलेला असतो... तो राहुलला फोन करतो.. तसही आता गौरवीच्या अकॅसिडेंन्ट नंतर 4 दिवसांत परत जायला जमणार नव्हतच म्ह्णून ऑफिस मध्ये रजा आणखी हवीय म्हणून त्याला सांगायचंच असतं...

राहुल - हॅलो, बोल विवेक, कसा आहे? निघाला का? गौरवीशी बोलला का ? काय म्हणाली ती?

विवेक - तिला आमचं नात संपवायचंय म्हणाली... आणि पुढे त्याला काहीच बोलताच आलं नाही त्याचे डोळे अखंड गळत होते...

राहुल - एक मिनिट एक मिनिट, अस कस? तू मला सविस्तर सांगतो का काय झालं?

विवेक त्याला तो इथे आल्यापासून तर आताच्या गौरवीच्या बोलण्यापर्यंत सगळं सांगतो..

राहुल - बापरे😱 .. अकॅसिडेंन्ट च ऐकून खूप वाईट वाटलं रे... होईल सगळं व्यवस्थित तू नको काळजी करू.. आणि अरे याला बोलणं म्हणतात का!! अजूनही ती रागात आहे म्हणून तशी बोलली.. तू शांत हो रडू नको , तिला बर वाटलं की सविस्तर आणि व्यवस्थित बोल, ठीक आहे... आणि आता काळजी घे तिची...

विवेक - हो .. बरं ऐक ना मला आता लगेच येता येणार नाही आणि माझी रजा 4 दिवसंचीच होती.. तर तू उद्या ऑफिस मध्ये जाऊन थोडं बॉसला सांगशील का?

राहुल - हो मी सांगतो, तू इथली काळजी करू नको वहिनीची काळजी घे नीट.. आणि हो सगळं सुरळीत करूनच परत ये.. आणि रडू नको असा, शांत हो..

विवेक - हो , थँक्स राहुल... चल बाय बोलतो नंतर...

------------------------------------------------------------------