लिव इन भाग - 18 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

लिव इन भाग - 18

ईकडे रावी पंजाब ला पोहचली होती . तिने आणि तिच्या पी ए नी मोलकरीण चा वेष घेतला .त्यासाठी रावी ने तिच्या खास मेकअप आर्टिस्ट ला बोलवले होते . तिने त्या दोघींचा एवढा सुंदर मेकअप केला होता .की, कोण्ही मह्नूच शकत नव्हते, की ती मोठी हेरॉईन रावी आणि तिची पी ए आहे म्हणून . ह्या ही रूपात रावीचा चेहरा तिठ्काच तेजस्वी दिसत होता . रावी आणि तिची पी ए दोघी निघाले तिच्या भावाच्या लग्नात मोलकरीण म्हणून काम करायला ....
दोघीही कमानी जवळ येऊन थांबल्या .....ऐखद्या, राजकुमाराचे लग्न असावे, तसे घर आणि घराजवळ चा परिसर सजवला होता .... खूप लोक तिथे कामाला होते ....पाहुण्यांची ही नुसती रीघ लागली होती .त्यामुळे कामाला नोकर माणसे ही खूप लागणार होती. आजूबाजूच्या गावातून खूप माणसे कामांसाठी आली होती .रावी आणि तिची पी ए ही त्या झुन्डित शिरल्या ..... रावी ला आणि तिच्या पी ए ला रूम साफ करण्याचे काम मिळाले होते . दोघे ही कामाला लागल्या होत्या .रावी आणि तिची पी ए ........ दोघे ही झाडु घेऊन रूम साफ करत होत्या . त्याचे काम चालूच होते .पण रावीचे लक्ष घरातील कोण दिसते का? ह्याच्या कडे होते .पण काही जाहाले, तरी कोण्ही दिसेना ....
अचानक कोणीतरी ओरडलेला आवाज कानावर पडला . रावी ने पुढे जाऊन पहिले ....तर तिचे बाबा ....त्याना पाहताच तिच्या डोळ्यातून घळ घळ अश्रू वाहू लागले . त्याना पुढे जाऊन आवज द्यावा .त्यांना मिठी मारावी ....अस, तिला खूप वाटत होते .पण, .....ते काही शक्य नव्हते ..... ती तशीच पाणावले डोळ्यानी उभी होती .आपण ध्येयाने ऐत्के वेडी जाहलो होतो, की किती मौल्यवान गोष्ट गमावली आहे .हे तिला समजले .ऐत्क्यात रावी च्या बाबांना बोलता बोलता खोकल्याची उबळ आली .आणि ते मट्क्न खाली बसले . रावी च लक्ष जाताच ती पुढे त्याना धरण्यासाठी सरसावली .पण, तेवढ्यात तिची आई आणि भाऊ दोघे तिथे आले . आणि त्यानी तिच्या वडिलांना सांभाळले .पण, त्यांना अस अचानक काय जाहाले? ते रावीला काही समजेना .... आणि आई आणि तिचा भाऊ ही फार काही जाहाले नाही .अस, च त्यांच्याशी वागत होता . रावी ला ते जरा खटकले . रावी ला माहीत होते ,की तिच्या आई चे आणि बाबाचा प्रेमविवाह जाहला आहे . त्यामुळे त्याच्यात कितीही भांडणे जाहली तरी, प्रेम मात्र खूप होते . आई त्याची किती काळजी घ्याची ते रावीने डोळ्याने पहिले होते .....त्यामुळे आता बाबाच्या खोकल्या वर त्याचे मटकन खाली बसणे ही, आई ने सहज घेतले .रावीला हे काही पटले नाही .... आई अस वागली, त्याला काही मोठे कारण तर नाही ना ...... अस रावीला वाटू लागल .तिच्या अस मनात येताच, तिने लगेच आई चा आणि भावाचा पाठलाग केला . त्याच्या बोलण्यावरून तिला समजले, की बाबा आता काही दिवसाचे च सोबती आहे . त्यांना केन्सर जाहला आहे . रावी च्या तर पायाखालची जमीन च सरकली . बाबा .....ना ......आणि ...... केन्सर .....रावी पटकन मट्क्न खाली बसली .तिच्या पी ए ने तिला सावरले . तिने जेव्हा आई चे पुढचे बोलणे ऐकले, तेव्हा तर तिला अजूनच मोठा धक्का बसला . की, तिच्या बाबांकडे आता जास्त दिवस नाहीत . ते ऐकल्या वर रावी ला अस वाटले, चुकून जरी आता आपण एथे येण्याचा निर्णय नसता घेतला तर, आपल्याला शेवटचे सूध्हा बाबांना पाहता आले नसते .
आपण, त्याना किती वाईट समजत होतो .ते आपल्याशी वाईट वागले अस आपल्याला वाटत होते . त्यांना आपल्यासाठी कधीच वेळ नव्हता, ते आपल्याला आपल्या स्वप्ना समजून घेत नाही, अस वाटत होत .पण, आज आपण तरी काय केल? ते जसे वागले, त्याची परत फेड च केली . आज त्यांना आपली गरज आहे ....आणि आपण काय करतो? अस लपून बसलोय . नाही ....आपण हे घर सोडून जाणे, हा आपलाच निर्णय होता .त्यानी आपल्याला नकरल्या वर आपण तरी कुठे परत घरी येऊन त्याची माफी मागितली .उलट आपण एकावर एक चुकी करतच राहिलो . एवढे कस आपण बेफिकीर वागलो. पण, आता आपण केलेल्या चुकी मुळे शेवट चे सूध्हा बाबा आपल्याशी बोलणार नाही . का ....आपण ह्या क्षणी त्याची काळजी घेऊ शकत नाही . किती स्वार्थी वागलो आपण .....आपल्या वेड्या धेयय्च्या मागे पळत होतो . बेधुंद .....भरधाव..... रावी ला आपण केलेल्या चुकीची जाणीव होत होती .पण, आता त्याचा काही उपयोग नव्हता. कारण असच खरं रूप घेऊन त्याच्या समोर जाणे ......रावीला शक्य वाटत नव्हते .तिला भीती वाटत होती .... आई ची बाबांची ....नातेवाईकांची .....बाहेर च्या जगात बिनधास्त पणे वावरणारी रावी आपल्याच माणसांना घाबरत होती .ती धाय मोकलून रडत होती .तिला एवढे रडताना कोणीच कधीच पहिले नव्हते . तिची पी ए तिला समजवत होती .पण, रावी मात्र काहीच ऐकत नव्हती . ऐत्क्या दिवसा पासून जे मनात साचले होते, जे दुःख तिने भोगले होते ते आता तिच्या अश्रू च्या रुपांतून बाहेर पडत होती . ऐत्क्यात तिच्या रडण्याचा आवाज बाहेर गेला ,त्यामुळे ...की काय ....कोणीतरी त्याच्या कडे येताय असा रावीला आणि तिच्या पी ए ला भास झाला . तो खोटा ही नव्हता .खरच तिथे कोणीतरी येत होते ....दुसरे तिसरे कोणी नसून, ती रावी ची आई होती . ह्या भरल्या घरात एवढे धाय मोकलून कोण रड्तय? म्हणून ती पहायला आली होती . एवढ्या गडबडीत आणि एवढ्या पाहुण्यात ही तीच घरातील कोपऱ्या कोपऱ्यात लक्ष होत . रावी ची आई मूळची महाराष्ट्रीन .....पण, तिचे बाबा पंजाब चे .....एत्की वर्ष तिच्या बाबा सोबत राहिल्यामुळे तिच्या वागण्यात ही पंजाबी छबी होतीच . ती पुढे पुढे येत होती .तिची चाहूल लागताच रावी आणि तिची पी ए दोघी लपून बसल्या . पण ......आई ने त्यांना पहिलंच. आणि तिला धक्का बसला . रूप कोणते ही असले, तरी आई आपल्या बाळाला ओळखते .
रावी ला त्या मेकअप मधे कोणी ओळखले नाही .पण, तिच्या आई ला ओळखायला एक मिनिट सूध्हा लागला नाही . रावी ला तिथे बघताच तिच्या आई ला फार मोठा धक्का बसला . ही एथे काय करते? आणि ऐत्क्या दिवसानी कश्या सठि आली . तिला पाहताच ....तिला छातीशी काव्तलाव..... अस तिला खूप वाटत होत . पण, ती जे वागली .....ते काही योग्य पण नव्हते . ती चुकीची वागली होती .......तिला ह्याची जाणीव करून देणे ...फार गरजेचे होते . म्हणून आई ने तिच्या आतल्या आई ला आवर घातला . आणि रावीशी ती कठोरतेने बोलणार ....एवढ्यात आई ला बघताच रावीला रडू च आवरेना .....ऐत्क्या वर्षा नी ती आईला भेटली होती .ती आई दिसताच आई च्या गळात पडली .मग, आई ही त्या भेटीत राग, लोभ सगळ विसरली .तिच्या डोळ्यातून ही अश्रू वाहू लागले . किती तरी वेळ दोघी एकसारख्या एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होत्या . आणि त्या दोघांची ही गळाभेट रावी ची पी ए बघत उभी होती .