तुझाच मी अन माझीच तू...भाग २७ Anuja Kulkarni द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझाच मी अन माझीच तू...भाग २७

तुझाच मी अन माझीच तू...भाग २७

आभा ऑफिस मधून गेली होती.. रायनला संध्याकाळी आभा ला भेटायचे होतेच पण असे काही होणार नव्हते... त्याला काहीच सुचत नव्हते. आभा तर ऑफिस मधून कधी गेली हे सुद्धा ला हातात आलेला चान्स जाताना दिसत होता आणि त्याच डोक अधिकाधिक फिरत होत. त्याला आभा ला अजून जाणून घ्यायचं होत..आता आभा आणि आभा.. सध्या तरी अजून कोणीच मुलगी तिची जागा घेणार नव्हती.

"आभा बाय करून गेली आणि मी काही न बोलता तिला जाऊन कसं दिलं? उसलेस ऑफ मी.." रायन स्वतःवर एकदमच चिडला.. पण चिडून काहीच उपयोग नव्हता ही गोष्ट रायन च्या लक्षात आली.. आणि तो थोडा शांत झाला पण त्याच्या डोक्यात विचारांचे चक्र मात्र चालू होतेच.. तो त्याच्या डेस्क पाशी गेला आणि तेव्हाच समोरून राजस त्याला येतांना दिसला. रायन च्या मनात विचर आला, "राजस कडे आभा चा नंबर असेल.. त्याच्याकडे मागू का?" रायन ने राजस कड पाहिलं पण राजस ने त्याला एक चिडलेला लुक दिला.. आणि त्यामुळे त्यांना राजस शी बोलायचं टाळलच.. राजस नेहमीच रायन कडे खुन्नस ने पहायचा.. ह्यवेळी सुद्धा तसेच झाल्यामुळे रायन ने त्याच्यशी बोलायचे असून सुद्धा ते टाळले... राजस रायन कडेच पाहत होता... त्याच्या कपाळावर आठ्या सुद्धा आल्या होत्या..... राजस बोटे सुद्धा मोडत होता म्हणजे राजस नक्की मदत करणार नाही ह्याची खात्री रायन ला झाली होती. तिथे राजस मनात रायन ला त्याला माहिती होत्या त्या सगळ्या शिव्या घालत होता.. दोघांची खुन्नस तशी नवीन नव्हती पण आता आभा मुळे दोघांमध्ये अधिकच ताण निर्माण होणार होते...आधी दोघांची जनरल खुन्नस होती पण आता खरी गम्मत होणार होती..आता दोघांचा क्रेंद बिंदू होती ती आभा.. आणि आभा ने दोघांपैकी कोणलाही फार भाव दिलेला नव्हता,,पण आभा ने भाव नाही दिला म्हणून राय आणि राजस ने प्रयत्न सोडले नव्हते. रायन आणि राजस दोघे आभाच्याच मागे होते पण आभा कोणाशी मैत्री करणार आणि कोणाला आभा च्या आयुष्यात जागा मिळणार हा मोठा प्रश्न दोघांच्या समोर होता.

रायन ने राजस ला इग्नोर केले.. खर तर दोघांनी एकमेकांना इग्नोर केले होते.. आणि दोघे एकमेकांसामोरून निघून गेले... पण रायन चा प्रश्न अजूनही तसाच होता... अजूनही त्याला आभा शी संपर्क कसा करता येईल हे लक्षात येत नव्हत.. तो त्याच्या डेस्क वर गेला आणि त्याने पटकन आभा ला गुगल वर सर्च केल.. पण तिथे आभा बद्दल काहीच कळल नाही... त्याने फेसबुक वर पण पाहिलं पण तिथे सुद्धा त्याला आभा ची काहीच माहिती मिळाली नाही.. "काय चीज आहे आभा.. स्वतःला जगापासून लपवून ठेवण्यात इतकी हुशार कशी?" रायन च्या मनात विचार आला आणि चेहऱ्यावर हसू आले..."कोई नही... तू मला हूल देऊन गेलीस पण इतक्या सहज सहजी तुला सोडत नाही बघ..." रायन परत हसला.. त्याने मोबाईल बंद केला पण तेव्हाच त्याला काहीतरी लक्षात आलं. तो धावत धावत निघाला. रायन तसा फेमस होताच आणि सगळे लोकं त्याच्याशी चांगले संबंध ठेऊन होते.. त्याला कंपनी मध्ये असलेल्या इम्प्लोयी रेकॉर्ड ठेवतात तिथे गेला.. त्याला अर्थात अडवलं.. पण तो आता हार मानणार नव्हता.

"इथे काय काम आहे?" एक भारदस्त आवाज आला आणि रायन तिथेच थबकला..

"मी रायन.. इथे २ वर्ष काम करतोय.."

"मग मी काय करू? इथे काय काम आहे?" समोरून येणारा आवाज फ्रेंडली नव्हताच... पण आता हात तोंडाशी आलेला हा घास रायन सोडणार नव्हता. त्याला आधीच खूप छान वाटत होते की फायनली त्याला आभा बद्दल माहिती कुठून मिळेल ही गोष्ट वेळेत लक्षात आली होती.. आणि रायन खुश झाला होता. तो कसाही करून माहिती मिळणार होताच कारण त्याच आत्ताचे एम आभा शी संपर्क करून तिला भेटायचे हेच होते. त्याला अर्जुनला फक्त माश्याचा डोळा दिसत होता तसच रायन ला फक्त आभा ला भेटायचं होत..

"अर्जेंट माहिती हवी आहे एका इम्प्लोयी ची.. बघू का माहिती?" थोडी अॅक्टिंग करत रायन बोलला..

"नाही नाही साहेब... अशी माहिती कोणालाही पाहू देता येत नाही.."

"खूप अर्जेंट आहे नाहीतर मी कधीही रूल मोडत नाही... तुम्हाला माहिती असेल..ह्या आधी कधी आलो होतो का रूल मोडायला?" रायन हा सूर थोडा बदलला.. आता त्याच्या बोलण्यात आर्जव केल्याचा सूर मिसळायला लागला होता. आणि रायन ला खात्री होती की त्याला आभा की माहिती इथे नक्की मिळणार... त्यामुळे तो त्याचे प्रयत्न सोडणार नव्हता..

"माहितीचा दुरुपयोग झाला तर?" त्या माणसाने प्रश्न केला.. "आमची नोकरी जायची..."

"नो नो साहेब.. मी तुम्हाला खात्री देतो. माहितीचा दुरुपयोग होणार नाही..."

"काही प्रॉब्लेम झाला तर?" तो माणूस काही ऐकायला तयार होत नव्हता..

"तुम्ही नका काळजी करू... मी मला अर्जेंट माहिती हवी आहे ती मिळवतो आणि बाहेर येतो बघा. बाकी काही उघडणार पण नाही..आणि काही गोंधळ झालंच चुकून तर जबाबदारी मी घेईन.. तुम्ही सगळा ब्लेम माझ्यावर टाका अगदीच काही गोंधळ झाला तर..." रायन ने त्या माणसाला आश्वसन दिले आणि शेवटी तो माणूस इम्प्लोयी ची माहिती पहायची परवानगी दिली..

"ह पण जरा जपून आणि बाहेर कोणाला कळता कामा नये.." या माणसाचे बोलणे ऐकून रायन खुश झाला.. त्याच्या कष्टाचे चीज झाले होते.. तो पटकन आत गेला आणि कॉम्पुटर लावला आणि आभा चे नाव शोधले.. त्याने आभा च्या नावावर क्लिक केले आणि तिची माहिती लोड व्हायला लागली.. तसा रायन च्या चेहऱ्या वरचे हसू वाढायला लागले.. पूर्ण माहिती लोड झाली.. आणि त्याच्या तोंडातून "याय" आले.. तो जोरात ओरडलाच.. त्याने पटकन त्याचा मोबाईल काढला आणि आभा चा फोन आणि पत्ता नोट करून घेतला.. आणि लगबगीने बाहेर आला.. त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला... त्याने त्या माणसाचे मनापासून आभार मानले आणि स्वतःचे कौतुक करायला सुद्धा तो विसरला नाही..

रायन बाहेर आला आणि तेव्हाच नेमका त्याच्या समोर राजस आला.. त्याच्या कपाळावर लगेच आठ्या आल्या..

"आलंच मांजर आडव.." रायन पुटपुटला.. राजस ला रायन काय बोलला ते ऐकू आले होते पण काहीच ऐकू आले नाही असे दाखवत राजस ने रायन ला प्रश्न केला..

"काय बोललास रायन?"

"तुला काही नाही रे बोललो.. तुझ काही काम नसेल तर तू जाऊ शकतोस इथून.. उगाच सारखा तोंडासमोर येऊ नकोस!!"

"मला कुठे हौस आहे रायन तुझ्या तोंडी लागायची... मी पण तुला अव्होइड करत असतो पण आज तूच आलास तोंडासमोर."

"सॉरी ह.... झालं असेल तर यु मे लिव्ह.." रायन गुर्मीत बोलला.. शक्यतो राजस आणि रायन एकमेकांसमोर यायचेच नाहीत.. पण कधी आले तर दोघांमध्ये वाद चालू व्हायचे.. आज रायन कुठून बाहेर आला ते पाहिले होते.. आणि रायन च्या डोक्यात काय शिजतंय हे त्याला जाणून घ्यायचे होतेच..

रायन न बोलता निघून गेला आणि रायन गेला ह्याची खात्री करून राजस रायन जिथून बाहेर पडला तिथे गेला.. त्याला जाणवलं होत की रायन च्या डोक्यात काहीतरी शिजतंय.. काय शिजतंय ह्याचा अंदाज मात्र त्याला येत नव्हता आणि तेच जाणून घ्यायला रायन जिथून आला तिथे राजस जायला निघाला..

क्रमशः