उषा लता द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

उषा

उषा


"या संपल्या का सुट्ट्या? आलातं का फिरून?"


"फिरून नाही गं हनिमूनला जाऊन."उशी खट्ट्याळ हसतं उद्गारली .
गेल्या तीन -चार वर्षापासूनचा आमचा लोकलचा ग्रूप.आमच्या ग्रूपचं सगळं काही ठरलेलं असायचं. म्हणजे बसन्याची जागा ,साजरे करायचे सण,-वार,सुख-दुःख.एवढचं नाही तर कुठल्या सणाला कुठल्या साड्या घालायच्या ते सुध्दा.
आमच्या ग्रूपमध्ये एकूण आम्ही सहाजनी .एकदा एकत्र जमलो की धम्माल गप्पा-गोष्टीतं एवढ्या मशगूलं व्हायंचो की मग भोवतालंचं सारं जग आमच्यासाठी अद्रुष्य असायंचं,डब्यातली गर्दी,भांडणं, रेटारेटी ,चेपाचेपी सर्व काही.
उषा आमच्यातलीचं एक .दरवर्षी ५जानेवारी ते१५जानेवारी सुट्ट्या घेऊन हनिमूला जानारी.मागच्या तीन-चार वर्षापासून तीचा हा नेम कधीचं चूकला नाही.नीत्यं नियमान ती जायचीचं. एक मात्र होतं की तीनं आम्हाला तीच्या नव-याचा फोटो कधीचं दाखवला नाही.विचारलं कधी तर तीचं उत्तर तयार असायचं "मी माझा नवरा तूम्हाला का दाखवू.?"ब-याचं वेळा,ब-याचं त-हेन आम्ही तीला विचारलं पण तीने आम्हाला काही ताकास तूर लागू दिला नाही.नव-याने तीच्यासाठी घेतलेल्या अनेक गोष्टी मात्र आम्हाला दाखवायंची.त्याच्याविषयी खूप खूप बोलायची पण नव-याविषयी वैयक्तीक अशी कोणतीचं माहीती ती सांगायची नाही.उदाहरणंचं द्यायंचं झालं तर नाव,फोटो ई.आणि स्वताःही आई-वडीलांकडेचं राहायची.नावही माहेरचंचं लावायची.राहायची कुठं ते मात्र तीनं कधी सांगितलं नाही. अजब रसायनंचं होती ती. मैत्रीतं मात्र जीवाला जीव देण्यास तयार असायची .
आम्ही तीला नेहमी म्हणायचो" अगं उषा, हनिमूनला काय दरवर्षी जातात का?पहील्या वर्षी फिरायला जातातं तो हनिमून बाकी वेळा आपण फिरायलाचं गेलो असं म्हणतातं .तूझं सगळं जगा वेगळचं बाई. "
उषाच्या लग्नाला चार-पाच वर्ष होऊनही ती दरवर्षी या दिवसातं न चूकता हिरवा चूडा घालायची,हातावर मेंहदी काढायची .लग्नाचे सर्व सोपस्कार करायची. सगंळं कठीण आणि जरा रहस्यमयच असायचं तीचं वागणं .या विषयी विचारलं की ती आम्हालाचं बोरं ठरवायची आणि म्हणायची
"किती बोरं आहातं ग तूम्ही, लग्न ही जीवनातली सर्वात महत्वाची गोष्ट ना.त्याचं सेलिब्रेशन नको करायला.?"
"दरवर्षी".
उषा हे रसायनचं अजब होतं .आम्ही कधी बोलतांना नव-यासोबतंचं भांडणं या विषयी गप्पा मारतं असतील तर तेव्हा मात्र ती फार चिडायची "का भांडता ग नव-याशी ,ते बिचारे किती धडपडतात आपल्याला खूश ठेवन्यासाठी आणि तूम्ही काहीतरी कारणं काढून भांडता,मला नाही पटतं हे संगळ.खूप प्रेम करतं असतात ग नवरे आपल्यावर."असं म्हणून नेहमी आम्हालाचं खोटं पाडायची .
आम्ही नव-याशी घरातं झालेलं भांडणं, धूसपूस ,कुरबूर
एकमेकीनां सांगायचो पण हीने मात्र या तीन -चार वर्षातं कधीचं नव-याच्या भांडणाविषयी सांगितलं नाही.आम्ही तीला या विषयी विचारलं तर सांगायची"आमच्यात नाही होतं कधी भांडणं, नवरा फार समजूतदार आहे माझा.मला नाही दुखवतं तो कधी".नेहमी आनंदी असायची.हसरी असायची .
या काही वर्षातं आम्हा बाकींना एक किंवा दोन मूलं झाली होती. पण हीचं घोडं मात्र कधीचं हनिमूनच्या पूढे गेलं नाही.उत्तर असायंचं"जीवन पडलयं आणखीन मूलं जन्माला घालायला."
तीचं सगळं वेगळचं होतं आणि गूढही.ती कधी आमच्यातली वाटायची तर कधी वेगळी कुणीतरी.
गेली तीन-चार वर्षापासून आमचा दररोजचा दिनक्रम ठरलेला असायचा .म्हणजे तीचं जागा,तोचं डबा,त्याचं मैत्रीणी,तीचं नौकरी ,नेहमीचाच पावसाळा,हिवाळा आणि उन्हाळाही.त्यात जानेवारी सोडला तर उषाही असायची आमच्यातं.
आज मात्र नेहमीची उषाची जागा कोणी वेगळ्यांनीचं पकडली होती.ती तीच्या स्टेशनवर गाडीत चढली नसावी .कदाचीत गाडी चूकली असेल किंवा दुस-या डब्ब्यात असेलं. तीने काही कुणाला मँसेज किंवा फोनही केला नव्हता.
एक,दोन, तीन चार.......आठ दिवस आम्ही तीची दररोज वाटं पाहीली .ती तर नाहीचं पण फोन किंवा मँसेजही नाही. आम्हाला चिंता वाटायला लागली ,फोन केले.उत्तर नाही.काय झालं असावं मन था-यावर नाही.एक दिवस नऊ-दहा वेळा फोन केले तेव्हा कोणितरी फोन उचलला.
"हँलो कोण बोलतयं"
"हँलो, उषा आहे का? आम्ही तीच्या मैत्रीणी"
"नाही"
"कुठे गेली?म्हणजे तीचा काहीचं निरोप नाही म्हणून."
"अँडमीट आहे ती."
"का?काय झालं?"
उत्तर नाही, फोन कट
आम्ही अस्वस्थ, काय झालं असेलं उषीला अचानक?अँडमीट करन्याएवढी अजारी!घरी जावं ?पण अँड्रेस कूठं माहीतं आहे?"
असेचं दोन-तीन दिवस गेले .उषाचा पत्ता नाही.आम्ही सगळ्याजनी काळजीतं .परत धाडस करून फोन केला.
" हँलो,मी उषाची मैत्रीण बोलतेय.तूम्ही?"
"मी तीची आई"
"म्हणजे काय झालय उषाला?बरी आहे ना ती?"आम्हाला भेटायचय तीला ?"
"कशाला?तूमचा काय संबंध?"
आहो,मैत्रीणआहे ती आमची.!हँलो,हँलो......
फोन कट.पून्हा लावला तर स्वीचंआँफ .
तळमळ,तगमग,चीडचीडही काहीचं कळतं नव्हतं नक्की काय झालं असेलं?उषा बरी असेल ना?का सांगतं नाहीतं हे व्यवस्थीतं ?कुठे राहतं असेलं ही,कसा शोधावा हीचा अँड्रेस?सर्व अनाकलनीयं,अंधारात.तीनं आपला नवरा, घरचा अँड्रेस,कुठ राहते ,कशी राहते?यविषयी काहीचं सांगितलं नव्हतं .का नसेलं सांगितलं?विचारलं कितीतरी वेळा पण टाळायची नेहमी.का करतं असेलं असं.विचार करून आणि तेचं ते बोलून डोकं फुटायची वेळ आली.
"हँलो"
"हँलो, कोण बोलतंय?
"ओळख?"
" नाही,म्हणजे नाही ओळख पटतं आपली."
"विसरलीस?अशीचं का आपली मैत्री?खरंचं फार स्वार्थी असतात लोक."
"आहो मँडम,राँग नंबर असेलं बहूतेक?"
हो का?म्हणजे ओळखतं नाहीस मला?मेले मी सुषमा."
"अरे बापरे!!!!सुषमा होय,मेले कुठं मेली होतीस एवढी वर्ष?आणि आज अचानक?किती घाबरवलंस ?आणि कुठूण शोधून काढलास माझा नंबर?"
"सगळ फोनवरचं बोलनारं का?ये उद्या पाठवलेल्या पत्त्यावर .कळेलं सगळं"
"अग पण सुषमा?"
"अग,तूग काही नाही यायचंय तूला."
सुषमा माझी बालमैत्रीण.बारावी पर्यंत आम्ही सोबत जीवाला जीव देना-या .नंतर तीच्या वडीलांची बदली झाली आणि आमचा काँक्टक्ट संपला तो आतांपर्यंत.तेव्हापासून न भेट न फोन.कशी दिसतं असेलं आणि काय करंत असेलं काय माहीती.
मी सकाळी ठरल्याप्रमाणे सूषमाने दिलेल्या अँड्रेसवर पोहचले.पाहीलं तर तीथं एक डिस्पेन्सरी होती.म्हणजे सुषमा डाँक्टर असेल कदाचीतं.बाहेर भिंतीला नेमप्लेट होती. जीच्यावर सुषमाचं नाव होतं पण आडनाव वेगळ.सासरचं असावं.मनसोपचारतज्ज्ञ.
दवाखाना तीन रुमच्या घरातचं होता. हाँलमध्ये लोकांना बसायला चार बाजूनेही बेंच होते त्यावर दहा-पंधरा लोकं बसले होते आणि मध्ये रीकामी जागा .दवाखाना असूनही तसा फिल येतं नव्हता.
दारात स्टूलवर एक मूलगा बसला होता.मला पहाताचं त्याने
त्याच्याजवळची वही काढली "तूमचं नाव?नंबर लावलाय का?"
" नाही, मी त्यांची मैत्रीण.त्यांनीचं बोलावलय मला."मी
पोरंगा जरा वेळ घूटमळला .नंतर मला बसायला सांगून सुषमाच्या केबीनमध्ये गेला.
"मँडमनी बोलावलयं तूम्हाला आत "पोरं बाहेर येतं म्हणालं
"ओके"मी
मी आत जायला निघाले तेवढ्या वेळातचं अनेक विचार मनात थैमान घालू लागले. अनेक प्रश्नांचं मोहळ ऊठलं होतं मनातं.ती कशी दिसतं असेलं? ,जाड झाली असेलं की तशीचं असेलं नाजूक, टापटीप, हसरी, गोड,गुबगुबीत गालाची ?ओळखायला येईलं का आपल्याला?एक नाही अनेक प्रश्न घेऊनचं मी तीच्या केबीनमध्ये प्रवेश केला.तर बाईसाहेब माझ्या स्वागतासाठी खूर्चीतून ऊठून तयार होत्या.तशीचं दिसतं होती जशी मला सोडून गेली होतीअगदी तशीच गो-या गूबगूबीत गालाची.मी आत जाताचं तीने मला कडकडून मीठी मारली .बालपणीच्या जीवलग मैत्रीणी आज ब-याचं दिवसांनी भेटतं होत्या.मोबाईलची मेहरबानी .
"ये,ग,कधी भेटतेय तूला असं झालं होतं.जाड झालीयस जरा पण छान दिसतेयस "तीनं माझं तोंडभरून स्वागतं केलं.
तूही जशीच्या तशी आहेस अगदी गोरी गूबगूबीत गालाची आणि काय ग सायकाँलाँजीस्ट झालीसं "मी नेहमीप्रमाने न राहून तीचा गालगूचा घेतला.
"काय ग आता आपण का लहान आहोतं "सुषमा
काही प्राथमीक चौकशी करून सुषमाने मला काही पेशन्ट तपासेपर्यंत दुस-या रूममध्ये बसन्याची विनंती केली.आम्हाला खूप बोलायचं होतं. अनेक वर्षाचं.
मी बाजूच्या रूममध्ये बसन्यसाठी गेले.तीथे दोन खूर्च्या आणि एक काँट होता ज्यावर कोणीतरी झोपलं होतं "असेल कोणी तीचा पेशन्ट आपल्यामूळे डिस्ट्रब नको व्हायला ."मी शांतपणे त्या रूममध्ये शिरले.हळूचं खूर्ची घेतांना उत्सूकता म्हणून पेशन्टकडे पाहीले आणि..............खूर्ची माझ्या हातून निसटली.मला चक्कर येते की काय असे वाटायला लागले.माझा माझ्या डोळ्यावर विश्वासचं बसतं नव्हता कारण ती दुसरी तीसरी कोणी नसून उषी होती आमची मैत्रीण उषी.
माझ्या मनातं अनेक प्रश्नांचं मोहळ उठले होते.उषा इथे कशी काय?तीला नक्की काय झाले असावे?माझी मैत्रीण तर सायकाँलाँजीस्ट आहे.मग उषाला तसा काही प्राँब्लेम असावा का? माझ्या खूर्चीचा आवाज ऐकून हीला जाग का आली नसावी ?मला काहीचं सूचतं नव्हते.मी चटकन खूर्चीवर बसले.मला या सगळ्यांचा काहीचं अर्थ लागतं नव्हता.उषाच्या आमच्या सोबतच्या वागण्यावरून उषाला असा काही रोग असावा असे आम्हाला कधीचं वाटले नव्हते.आताही माझा या सगळ्यावर काहीचं विश्वास बसतं नव्हता.आमची उषा मानसीक असूचं शकतं नाही.
अशा अनेक प्रश्नांचं मोहळ घेऊन मी जवळ जवळ एक तास तीच्या शेजारी बसून रडतं होते .ती मात्र शांतपणे झोपली होती.
सुषमा आली मला रडतांना पाहून ती गोंधळली माझ्याकडे पाहतचं राहीली "का ग रडतेस ?काय झालं?" तीचे ते शब्द कानी पडताचं मला फार भडभडून आलं मी तीच्या गळ्यातं पडून खूप रडले.माझं रडण ओसरल्यावर सूषमाने मला पाणी प्यायला दिले ."अग ही म्हणजे ही उषाचं नं ? ही इथे कशी?हीला अशा अवस्थेतं.........छी विचारही करवतं नाही .नक्की काय झालय हीला?"
तू हीला ओळखतेस?"
हो. ही आमची लोकलची मैत्रीण उषा."पण ती इथे कशी?" मी.
"म्हणजे तूला हीच्याबद्दल बाकी काहीही माहीती नसावं" सुषमा.
" ती आमची लोकलची मैत्रीण पण तीने आम्हाला तीच्याविषयी कधी जास्त काही सांगितलं नाही.हा एक मात्र होतं ही दरवर्षी जानेवारी महीन्यातं फिरायला जायची नव-यासोबतं त्याला ती हनिमून म्हणायची .पण ती आता इथे कशी?म्हणजे तू तर सायकाँलाँजीस्ट?"
"सगळी उत्तर मिळतील तूला .थोडं शांत हो आधी."
सुषमाने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली.."ती तूम्हाला खोटं बोलायची.त्या दिवसात ती इथे पडलेली असते तेही अशा अवस्थेतं.
"म्हणजे?"माझे ठोके वाढतं होते .आता काय वेगळ एकायला मिळनार म्हणून मी अतूर होत होते.
"उषा एक गूणी मूलगी .तीन चार वर्षाच्या प्रेम प्रकरणानंतर
दोघांच रीतसर आणि जोरातं लग्न लावन्यातं आले.द्रुष्ट लागेल असं जोडप.नवरा देखणा जीवापाड प्रेम करनारा.देवाने दोघांना एक दूजेके लिए बनवलं होतं .आँफीसमध्येही दोघं एकत्रचं.
लग्न झाल्यावर फिरण्यासाठी लोणावळ्याला जायचं ठरलं .इथून लोनावळा जवळ म्हणून बाईकवर निघाले.दैवाने मात्र हीच्यापूढे वेगळचं ताट मांडून ठेवलं होतं.कुठं माहीतं असतो ग कुणाला आपला दुसरा क्षण? रस्त्यात जातांना एका वळनावर बाईक स्लीप झाली आणि दोघही खोलं दरीतं कोसळले.मात्र हीच दैव बलवंतर म्हण किवा खडतर म्हण ही एका झाडाला अडकली ."
" आणि तो"मी सगळं देहभान विसरून कान डोळे एक करून ऐकतं होते.
तो, काय माहीतं खोल दरीतं कोठे लपला तो?सापडलाचं नाही. तेव्हा ही बेशूध्द होती पंधरा दिवस शुध्दीवर आली पण मनाने मात्र ती कधीचं बाहेर आली नाही.त्याच्यासोबतं संसारचं करतेयं ती.खूप समजावलं ट्रिटमेंन्ट केल्या पण काही ही फरक पडतं नाही. एरवी नाँर्मलं असणारी उषा पाच ते पंधरा जानेवारी या दिवसातं फार अबनाँर्मल वागते.मग इथे असते अशी पडलेली."
माझे डोळे पाण्याने भरून वाहतं होते ना मला दिसतं होती उषा ना सुषमा.सुषमालाही तीची कथा सांगतांना गहीवरून आलं होतं.असा सावत्र असल्यासारखा देव का वागतो एखाद्यासोबत तेचं कळतं नाही.का एखाद्याला उधवस्त करतो.त्याचा खेळ असेलं तो कदाचीत पण माणसाचं काय?त्याला कूठं कळतात खेळ त्याचे मग असा थिजून जातो तो जाग्यावरचं..मी माझ्या विचारातचं गूंतले होते एवढ्यातं सुषमा म्हणाली "या वर्षी मात्र ही आजही होत नाहीय नाँर्मंलं.घरच्यांनी तीला वस्तूस्थीती सांगण्याचा प्रयंत्न केला तर आत्महत्या करतं होती.तेव्हापासून इथेचं आहे.गूणी आहे ग पोरं!पण त्याच्यापूढं काही नाही."
मला हे सर्व अनपेक्षीतं होतं.मी बर्फासारखी थिजून गेले होते.मला ह्या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया द्यावी कळतंचं नव्हतं.एक मात्र झालं होतं उषाच्या हनिमूनचं रहस्य मला कळलं होतं आणि रहस्यमय उषाही.

लता ठोंबरे भुसारे