I am a maid - 3 books and stories free download online pdf in Marathi

मी एक मोलकरीण - 3

(भाग 3)

मी एक मोलकरीण आहे सर्व वर्गामध्ये समजल होतं. ज्यांना मी माझ्या जवळच्या मैत्रिणी समजत होते, त्या आज मला एकदम वेगळ्या नजरेने बघत होत्या. मला कळत नव्हतं या मध्ये नक्की कोण चुकिच आहे ? मी आईला मदत करण्यासाठी स्वतः घरकाम करते,माझी चुकी हि आहे का ? मला समजून न घेता हि मोलकरीण आहे अस बोलून माझ्यापासून दूर जाणं हि त्यांची चुकी आहे का ? खुप विचार, प्रश्न माझ्या मनामध्ये तयार झाले होते. आपल्या स्वतःला कुटुंबाला सांभालण्यासाठी दुस-याच्या घरातील काम करणे, खरचं ईतक वाईट असतं का ? आई ईतके दिवस एक मोलकरीण म्हणून हेच सहन करत असेल का ?

त्या पुर्ण दिवस माझं अभ्यासावर लक्ष नव्हते. मी शाळा सुटल्याबरोबर नेहमीपेक्षा वेगाने घरी गेले.मला बघून आईच्या लक्षात आले होते काहीतरी झालं आहे, पण तिला माहित होत मी स्वतःहूनच ते सांगणार म्हणून ती शांत राहून सर्व बघत होती. थोड्यावेळात मी अभ्यास करण्यासाठी बसले पण माझ्या मनातील प्रश्न सतत समोर येत होते . मी सर्व बाजुला केल आणि आई जवळ जाऊन बसले. आई ने मला जवळ घेतल आणि विचारलं नक्की काय झालयं ? पुढे म्हणाली काही झाल तरी अभ्यास अस लगेच बाजुला नाहि करायचा. आई पुढे काही बोलण्याआधीच मी विचारलं,'आई मोलकरीण म्हणून काम करणे चुकीच आहे का ? तुला कधी याची लाज किंवा कमीपणा वाटतो का ?' आईला सर्व समजल होतं, तिला हे कळत होतं की माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण आलं आहे. तिने मला समजावलं, आधी शांत हो आणि नीट ऐक-''कोणत्याही कामामध्ये लाज वाटण्यासारखे किंवा चुकिच काहीच नसते, प्रत्येक जण आपल्या उदरर्निवाहासाठी आपआपल्या पद्धतिने मिळेल ते काम करत असतात, हा प्रत्येक काम प्रत्येकासाठी वेगवेगळ असतं, म्हणून एखाद्याला किंवा त्याच्या कामाला खाली किंवा वाईट समजणे चुकीचे आहे ! कोणतेही काम असूदे आपण ते पूर्ण मन लावूनच पार करायचे, बरेच जण चांगले बोलणार,वाईट बोलणार आपण लक्ष नाहि द्यायचं.मला मोलकरीण असल्याची कधी लाज नाहि वाटली कारण त्यावर मी जगत आहे. मला तु हे काम नको करायला वाटत होते कारण तुझं भविष्य उज्ज्वल असाव म्हणून ! यामध्ये कुठेच लाजास्पद किंवा वाईट वाटून घेण्यासारख काहीच नाहि!' मी आईच उत्तर ऐकून खूपच आश्चर्यित झाले . त्यामधून भरपूर शिकले जे कोणत्याच पुस्तकामध्ये मिळाल नसतं. आता मी ठरवलं माझं भविष्य काय असेल माहित नाही पण ज्या कामाने मला जगायला शिकवलं/ त्याला एक वेगळ स्थान मिळवून द्यायचं.

आता मला मैत्रिणी असो किंवा नसो काही गरज नव्हती वाटतं. कदाचित त्या मला समजून घेण्याईतक्या वयाने, विचाराने मोठ्या नव्हत्या झाल्या. त्यांची परिस्थिति वेगळी होती,त्यांचा दोष नव्हता । असं स्वतःच स्वतःला समजावत पुढे तयार झाले. मला आता दहावी मध्ये राज्यात प्रथम यायचं होतं, त्यासाठी लागणा-या मेहनतीसाठी मी तयार झाले होते. मी ठरवलं सरांची मदत घेण्याची, त्यांना आपली स्वप्न सांगण्याची ! आज सकाळीच मी सरांच्या घरी कामासाठी गेले, सर तसे नेहमीच माझ्यासोबत चांगले वागत असत. मी सरांकडे थोडा वेळ आहे का असं विचारलं, हे ऐकून त्यांना काहीतरी गंभीर असेल असे वाटले म्हणून त्यांनी सर्वच वेळ मला दिला.

त्यानंतर सरांनी मला खुप व्यवस्थित समजून घेतलं आणि समजावून सांगितल की तु आता दहावी होई पर्यंत माझ्याकडे सकाळी कामाला नाहि तर अभ्यास करण्यासाठी यायचं. मी काही बोलण्याआधीच ते पुढे बोलले जे काही पैसे हवे असतील ते मागून घे, हवतर उसने घे नंतर परीक्षा झाल्यावर कामासाठी ये. मला खुप बरं वाटत होतं. मला सरांनी ईतक व्यवस्थित समजून घेतलं म्हणून! मी सरांना सर्व ठरलेल्या गोष्टीसाठी होकार दिला आणि शाळेमध्ये गेले.

सरांनी बहुतेक बाकी सर्व शिक्षकांना माझ्या बोलण्याची थोडी का होईना कल्पना दिली असावी. कदाचित म्हणून मला दुस-या शिक्षकाने पहिल्या बाकावर बसवले. सर्व शिक्षक चांगले होते, मला सर्व मदत करत होते.मला मी खूप नशीबवान असल्यासारख वाटत होतं.मी पण खुप जास्त मनलावून अभ्यास करत होते. माझे कमी गुणांचे प्रश्न सोडवून झाले होते, आता मोठे आणि कठीण प्रश्नांकडे माझं लक्ष होतं. घरी गेल्यावर आई मला थोड ही काम करून नव्हती देत. फक्त अभ्यास हे एकच काम होत माझ्याकडे ! मी रात्री बारा पर्यंत अभ्यास करायचे, तरी आई जागरण करू नको सांगायला येत असे, तिच ऐकाव तर लागायचं. मग मी झोपायचे. पुन्हा सकाळी उठून सरांकडे जायचे मग सर काही महत्वाचे प्रश्न माझ्याकडून करून घेत असतं. जोपर्यंत मला समजत नसे, तोपर्यंत ते करूनच घेत.

मग नंतर शाळा ! आणि शाळेमधील सर्व शिक्षक ! मला अजून उत्साह येत होता. शाळेमधील शिक्षक ही मला कठीण प्रश्न देऊन माझ्याकडून तयारी करून घेवु लागले. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत चालला होता. परीक्षेला फक्त एक महिनाच बाकी होता. माझ्यावरील जबाबदारी वाढत चालली होती. पण एक चांगल होतं, मला सर्व मदत करत होते. मी एक महिना स्वतःला झोकून देऊन अभ्यास करत होते. आणि शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला, माझ्यापेक्षा आईला आणि माझ्या सर्व शिक्षकांना माझी काळजी वाटत होती. पहिलाच पेपर मराठी होता, माझ्यासाठी खुप सोप होता पण या सर्वांसाठी खुप कठीण होता ! मी खुप मन लावून पेपर लिहला, सर्व व्यवस्थित लिहलं, पहिलाच पेपर असा होता म्हणून आत्मविश्वास वाढला होता. आता बाकीचे पेपर हि व्यवस्थित दिले होते. माझी दहावी ची परीक्षा संपली होती, एक ओझ कमी झाल्या सारखं वाटत होतं.

आता सरांसोबत झालेल्या बोलण्यानुसार मला आता सरांकडे कामाला जायचं होत. मी आता सुरूवात केली कामासाठी ! आणखी दोन घरी मला काम मिळाले. आईला हि मदत होत होती. मदन आता बराच हुशार झाला होता. तो पण आम्हाला समजून घेत होता. मी आणि आई रोज एकत्र कामासाठी निघायचो, येताना सुद्धा एकत्र यायचो. आता घरातील आर्थिक परिस्थिति ब-यापैकी सुधारली होती. पण आईला माहित होत, एक महिन्यामध्ये माझा निकाल लागणार मग पुढे अकरावी ची फी लागणार होती म्हणून ती बचत करून ठेवत होती. मी पण तिला त्याप्रमाणे मदत करू लागले. आता माझा निकाल फक्त दहा दिवसांवर होता. मला आता चिंता वाटत होती, सर्वांची अपेक्षा, माझं ध्येय पूर्ण होईल ना ! या सर्वांची ! तरी आई मला सतत आधार देत होती. ' तु कष्ट केलेत म्हणजे तुला फळ नक्की मिळेल ' अस ती मला सतत समजावत होती.

मी पण सतत लिहिलेले पेपर आठवत होते, मध्येच बर वाटायचं तर मध्येच चिंता वाटत होती. असे करता करता उरलेले दिवस हि गेले आणि आज एक वाजता माझा निकाल होता, आता दहा वाजले होते.आई पण आज घरीच होती. सरांनी फोन करून परीक्षा क्रमांक मागून घेतला आणि निकाल ते बघून मग आम्हाला फोन करणार असं सांगितले. मी बारा वाजल्यापासून फोनच्या बाजुला हात जोडून बसले होते. आता एक वाजला होता, मी फोन हातात घेतला आणि सरांच्या फोनची वाट बघत होते.तितक्यात फोनची रिंग वाजली, मी एक सेंकदमध्ये फोन उचलला. सर नाराजीने बोलले, ' हि अपेक्षा नव्हती तुझ्याकडून'! हे ऐकून इतका वेळ आवरून ठेवलेलं रडू बाहेर आलं. मी जोरजोरात रडू लागले, आई घाबरली. मी रडत असताना फोनच काय केलं ते कळलचं नाहि.फोन पुन्हा वाजला, आईने उचलला.तर फोन सरांचा होता ते बोलत होते, ' फोन का ठेवला, पूर्ण न ऐकता ! मग आई बोलली ती रडत बसले, काय लागला तिचा निकाल ? सर काय बोलले ते कळलं नाहि पण आई हि रडायला लागली, आता मला खुप भिती वाटत होती. आई माझ्या जवळ आली आणि मला मिठी मध्ये घेवून रडू लागली. ती बोलत होती, आज तु माझी मुलगी असल्याचा अभिमान होतोय, मी रडत नाहि हे आनंदाश्रू आहेत वेडे ! मी विचारलं म्हणजे ? आई बोलली, ' तु शाळेत नाहितर राज्यामध्ये प्रथम आलीस ! 97% मार्क्स मिळाले तुला ! ' मी माझा आनंद व्यक्त ही करू शकत नव्हते, ईतकी आनंदी होते.

सगळीकडे एक मोलकरीणीची मुलगी मोलकरीण बनून दहावीमध्ये पहिली आली हिच चर्चा होती. मला आज त्या मुलींना भेटावसं वाटतं होतं ज्यांनी मला एक मोलकरीण म्हणूनच बघितलं होतं. पण आज या गोष्टींची सुरूवात झाली होती.आज सर्वात छोट ध्येय मी पूर्ण केलं होतं.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED