मी एक मोलकरीण - 9 suchitra gaikwad Sadawarte द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

मी एक मोलकरीण - 9

(भाग 9)

आजपासून केस माझ्या हातात होती. मी सर्व शोध नव्याने करण्याचे ठरवलं. केस ची फाईल बघून कळलं की आधी मुलगी महिनाभर गायब होती नंतर तिच्या वर अत्याचार करून तिला एका ठिकाणी फेकून दिले होते. हि पुर्ण केस मला सुमाची आठवण करून देत होती फरक इतकाच होता सुमा वयाने लहान होती आणि हि मुलगी वयाने वीस वर्षाची होती. मला आधी मुलीची सर्व माहिती नव्याने हवी होती म्हणून तिच्या घरी जाण्याचे ठरवले. मी आणि एक पोलिस ऑफीसर दोघेही तिच्या घरी पोहचलो. घर जास्त मोठ नव्हतं आणि छोटं ही नव्हतं, मध्यम आकाराच होतं. आम्ही घरामध्ये गेलो तर घरामध्ये फक्त तिचे आई बाबाच राहत असल्याचे समजले. दोघेही शांत बसून होते. मला हे बघून खुप वाईट वाटलं कारण आमच्या घरामध्ये मी आणि मदन असून आईची काय अवस्था झाली होती ते माझ्या अजूनही समोर होतं. हॉलमध्येच त्या मुलीचे बरेच छान छान फोटो होते, मला खुप आवडलेलं आणि नकळत डोळ्यांतून पाणी आलं. तितक्यात कानावर आवाज आला ' मॅडम या त्यांच्या आई आणि हे बाबा !'  मी आवाज ऐकून भानावर आले. मी त्यांना मुलीचे नाव विचारले आणि पुढे काहि विचारण्याआधीच आई बोलली,' नक्की न्याय मिळेल की सतत तिच माहिती मिळवायला येणार, आमच्या दुःखात भर टाकायला!' तितक्यात बाबा बोलले,' शांत हो, ते त्यांच काम आहे, त्यांना ते करू दे !' पण मी यावेळेस नक्कीच न्याय मिळेल असे आश्वासन देऊन गेले.नंतर आई सर्व माहिती व्यवस्थित सांगायला लागली.

' मुलगी वीस वर्षाची होती . तिला सांस्कृतिक नृत्याची खुप आवड होती म्हणून तिने त्याचा क्लास लावला होता. तिला जास्त मित्रपरिवार आवडत नव्हता म्हणून तिला फक्त एक-दोन मैत्रिणी होत्या. क्लासची रोजची वेळ संध्याकाली सहा ते आठ होती. तिला यायला तसा अंधार व्हायचा, आम्ही ब-याचदा तिला तुझी वेळ बदलून घे असं बोलायचो पण माझी मुलगी बोलायची आई बाबा आपण विसाव्या शतकात राहतो तरी तुम्ही मुलीसाठी ईतकी काळजी करता ! असं नका.....' आईला रडू अनावर झालं, हे सर्व सांगताना तिच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या, ती खुप रडायला लागली. रडत रडत बोलायला लागली, ' तिला माहित नव्हतं, फक्त शतक बदलून काय होणार, या नराधमांची प्रवृत्ति नाहि बदलणार.... ' हे ऐकून मला वाईट वाटत होत पण त्यापेक्षा जास्त लाज वाटत होती. हे सर्व होऊन दोन महिने व्हायला आले तरी ते गुन्हेगार मोकाट फिरत होते. पण मी शपथ घेतली होती त्यांना फाशी मिळवून देण्याची. आता मला पुढचा तपास सुरू करायचा होता आणि मी त्यासाठी निघणार तितक्यात मला फोन आला, तो ही माझ्या नव-याचा ! फोन उचलल्या बरोबर आरडाओरड सुरू. "घरी यायचं नाहि का मॅडम ? किती वाजले ? असं काय काम चालु आहे ? लवकर घरी यायचं आता ! "ईतक बोलून त्याने फोन ठेवला. मला केस पूर्ण झाल्याशिवाय कधी लवकर घरी जावसं वाटलं नाही, आईने तर कधीच असं काम सोडून बोलवलं नव्हतं पण आता जावं लागणार होतं. मी माझ्या सोबत असणा-या ऑफीसरला पण उद्या तपास सुरू अस बोलून निघाले. नेहमी घरी न येणारा माझा नवरा आज मात्र वेळेच्या आधीच घरी होता. घरी गेल्यावर लगेच सासुबाईनी काम बाकी आहेत असं आवाज दिला, मी आलेच अस सांगून स्वयंपाक घरामध्ये गेले तर सर्व कामाचा पसारा होता. एक हि काम सकाळ पासून झालेल नव्हतं त्यामध्ये घरातील कामवाली बाई आज पासून कामावर येणार नव्हती कारण यांनी तिला कामावरून काढून टाकलं होतं. म्हणजे मला आता घरी येऊन हि सर्व काम करावी लागणार होती. मी माझ्या नव-याला समजावून सांगत होते की तिकडे काम करून येते मी खरचं थकून जाते आणि त्यापेक्षा घरामध्ये पसारा चांगला नाहि वाटतं. पण त्याने काही उत्तर नाहि दिले.मी पुढे बोलले त्या कामवाली बाईला बोलवा ना मी स्वतः तिला पगार देईल तितक्यात सासू बाईचा आवाज आला," ईतके दिवस करायची ना अभ्यास आणि घरकाम! आता काय झालं ? आणि कोणाला नोकरीचा रूबाब दाखवते ? आईने उलट बोलायला पण शिकवलं का ? कामाला सुरूवात कर ! " आईचं नाव आलं आता मध्ये, तिच्या संस्काराबद्दल कोणी काय बोलले तर मला सहन होत नाहि म्हणून मी शांतपणे ऐकून घेतलं आणि कामाला लागले..

काम संपत नाही तर रात्रीच जेवण ही बनवायचं होत, मग पसारा आवरत जेवण बनवून दिलं. सर्व जेवत होते पण माझी आठवण कोणालाच नव्हती. तस ही त्यांच जेवण झाल्यावरचं मी जेवायचे. सर्वांच जेवण झालं मग मी जेवायला बसले. मी जेवले आणि पुन्हा काम करायला, आवरा आवर करायला लागले. तितक्यात मला पोलिस स्टेशन मधून फोन आला, मी कामात होते म्हणून उचलण्याआधीच फोन कट झाला. पुन्हा फोन आला, माझ्या आधी माझ्या नव-याने उचलला आणि घरी आल्यावर फोन करायचं नाहि सांगितले. मी खुप चिडले आणि बोलले,' माझं काम तसं आहे,त्याला काही ठरलेली वेळ नाहि, मला कधीही तयार असायला लागतं ..माझं वाक्य तोडतं तो पुढे म्हणाला,' बापाच घर नाहि हे, ईथे आमच्या सांगण्यानुसार होतं, नसेल ऐकायचं तरी ऐकावं लागेल. ' मी पुर्ण अडकले होते, सर्व कळून चुकलं होतं. मला आईची गरज होती पण ती इथे नव्हती, त्यात काही संपर्क होत नव्हता. सर्व सोडून द्यावसं वाटतं होत पण आईची गरज होती. काही करून उद्या आईला भेटावचं लागेल, ते कसं शक्य आहे याचा विचार करत झोपी कधी गेले कळलचं नाहि.

आज नेहमीपेक्षा लवकरच उठले. सर्व काम आवरली आणि निघाले. आज केसच्या चौकशीसाठी त्या मुलीच्या क्लास मध्ये जायचं होत. पोलिस स्टेशनला पोहचले आणि एक ऑफीसर सोबत पुढच्या तपासासाठी निघाले. क्लासमध्ये एक शिक्षिका होती आणि तिच्या सोबतचे काही मित्र मैत्रिणी होते. मला थोड सोप वाटलं कारण सर्वच उपस्थित होते. मी आधी शिक्षिकासोबत बोलायला गेले आणि माझ्या सोबतचे ऑफीसर बाकींच्या बरोबर बोलत होते. मला तर अस समजलं ती एक चांगली, हुशार आणि प्रामाणिक मुलगी होती, सर्वासोबत मिळून मिसळून राहायची, कधी कधी तिच सर्वांना रीयाज करून घेत असे. हे सर्व ऐकून तिच्यावरील दया वाढत चालली होती. आता ऑफीसरकडून काही मिळतयं का हे बघण्यासाठी मी बाहेर आले. तसं तिच जवळचं अस कोणी नव्हतं, तरी आम्ही तिच काही प्रेमप्रकरण होत का असं विचारलं तेव्हा अगदी सर्वांनी एकसाथ नाहि असं काही नव्हत, ती तशी मुलगी नव्हती . आता आम्हाला पण अवघड जाणार होत सर्व पण मी पुढे विचारलं,' तिला कोणी त्रास वगैरे देत होतं का ? असं कधी जाणवलं का ?' पण कोणी हवं तसं प्रतिसाद दिला नाहि. मग आता दुसरा मार्ग शोधाव लागेल असं विचार करून आम्ही निघालो.

आम्ही गाडीमध्ये बसणार तितक्यात एक मुलगा आमच्या मागे येत असल्यासारखं दिसत होतं. आम्ही मागे बघितलं तर तो लपून बसायचा. मग मी माझ्या सहका-याला पुढे जाण्यास सांगितले आणि मी थांबले. त्याला मला काहीतरी सांगायचं होत पण तो घाबरला होता. मग मी स्वतःहूनच त्याच्या दिशेने गेले.जर त्याला मला सांगायचं नसतं तर तो निघून गेला असता. आता खात्री झाली होती, याच्याकडे काहीतरी आहे जे केससाठी महत्वाचे आहे. तो ही माझीच वाट बघत होता. मी त्याच्या जवळ गेले आणि विचारले तुला काही सांगायचं आहे का ? त्याने होकारार्थी मान हलवली. मी बोलले इथे सांगायला भीती वाटते का ? त्यांने पुन्हा होकारार्थी मान हलवली. मग मी त्याला एका शांत ठिकाणी घेवून गेले, तिथे फक्त तो आणि मी दोघेच होतो. त्याने काही सांगण्याआधीच विचारले," मी हे सांगितल्यावर तो मला ही मारणार नाहि ना ? " हे ऐकल्यावर मला त्याच्या भीतीच हे कारण आहे हे समजलं. पुढे त्याच ऐकून तपासाला एक वेगळ वळण मिळणार होतं हे नक्की !