I am a maid - 5 books and stories free download online pdf in Marathi

मी एक मोलकरीण - 5

( भाग 5 )

मला हात लावला तर चटका बसेल अशा अवस्थेत मी होते. तरी हि मी बोलत होते, माझी पुस्तक द्या, सराव करायचं आहे. आई आणि सरांना खूप काळजी वाटत होती. त्यांनी डॉक्टर ला सांगितले की जास्त लक्ष द्या, परीक्षा आहे दोन आठवड्यावर ! डॉक्टर ही चांगले होते, त्यांनी पण खरचं मनापासून माझी ट्रीटमेंट पुर्ण केली. तीन ते चार दिवसांमध्ये माझ्या तब्येतमध्ये बरीच सुधारणा वाटत होती. मग आई आणि सरांनी डॉक्टर सोबत बोलून मला घरी आणले. आई माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत तर सर अभ्यासाची ! मी वाचन करून डोक दुखेल म्हणून सर वाचन करीत आणि मी ते ऐकत! असं सतत तीन दिवस चालू होतं. आई आणि सर माझ्यासाठी खुप काही करत होते. मी पण स्वतःला सावरत होते, आतून मजबूत बनवत होते. आता मी पूर्णपणे बरी झाले होते पण आता एक आठवड्यावर परीक्षा होती. आता हा वेळ फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायच ठरवलं होतं, आईच मध्ये जेवणाची, झोपण्याची आठवण करून देत असे. या सर्व मध्ये परीक्षाचा पहिला दिवस कसं आला ते कळलचं नाहि ! आज माझा पहिला पेपर मराठीचा होता, सरांनी ईतक मस्त करून घेतल होत की डोळ्यासमोर आणि कानावर तेच होतं म्हणून मला पेपर खुप सोपा गेला. नंतर विज्ञान शाखेचे प्रमुख विषयांचे पेपर सुरू होणार होते, मला मनामध्ये कसलीच भिती ठेवायची नव्हती ! हि परीक्षा फक्त आई आणि सरांसाठी देणार होते म्हणून जे काही करणार ते मनापासून करणार होते. मग मी चार ही पेपर खुप मनापासून लिहले. मी आनंदामध्ये होते पण यावेळी सर आणि आई यांनी माझ्याकडून राज्यात किंवा शाळेमध्ये पहिली येण्याची आशा सोडली होती.

बरं पण कसं का होईना मी बारावीची परीक्षा दिली, मी आनंदामध्ये होते आणि पुढे काय करायचं त्या तयारीमध्ये सुद्धा ! माझ्या आजारपणामध्ये आणि बारावीसाठी आईने बरेच पैसे उसने घेवून, कर्ज करून उभे केले होते. म्हणून आता मला पुन्हा तिच्या मदतीसाठी पुढे व्हायचं होत आणि मी झाले. मी माझी आधीची दोन्ही काम आणि नवीन काम सुरू केली. मला कोणत्याही प्रकारची लाज नव्हती वाटतं, घरकाम करणे हि अभ्यासाईतकीच माझी आवड झाली होती.मी आता शिक्षकांसोबत वर्ग मित्र-मैत्रिणी च्या घरी सुद्धा न लाजता, न घाबरता काम करायला लागले होते ते ही अभिमानाने ! आता तर त्यांच्या घरचे मला अभिमानाने बघत होते. आईला सुद्धा माझ्याबद्दल अभिमान वाटायला लागला होता. पण आता माझ्या बारावीच्या निकालाची उत्सुकता लागली होती. एक महिना बाकी होता. सर मला धीर द्यायचे, ' काहि काळजी नको करू, जे गुण येतील त्यात आम्ही समाधानी असणार ! ' पण मला तर पेपर व्यवस्थित गेले होते, तरी खात्री नव्हती ! आई पण मला चिंता वगैरे नको म्हणून काहिना काही समजावत असायची. मला कधी कधी खुप नशीबवान असल्यासारख वाटायचं, सर आणि आईसारखी माणसं माझ्या आयुष्यामध्ये होते. अशी माणसं आयुष्यामध्ये असतील तर आपण सर्व मिळवू शकतो.

आज निकालाचा दिवस उजाडला ! मी ठरवलं होत या दोघांआधी मी निकाल बघणार, सरांना माहित होतं निकाल आहे पण मी त्यांना परीक्षा क्रमांक दिला नव्हता मग ते बघू शकत नव्हते. एक वाजता निकाल होता, मी बारा वाजल्यापासूनच कॉलेज मध्ये जाऊन बसले होते काही मैत्रिणी ही होत्या सोबत म्हणून काही वाटलं नाही. कॉलेजमध्ये निकाल लवकर लागला, आमचे शिक्षक बाहेर आले आणि माझ्या बाजुला आले. मला शाबासकी देत म्हणाले, " कॉलेजमध्ये पहिली आलीस, 90% मिळाले बेटा!" मी खुप खुप खुश होते, थोडी नाराज होती की राज्यातून तिसरी होते ! पण आई आणि सरांची मेहनतीच फळ होतं हे म्हणून आनंदी होते. आधी सरांच्या घरी गेले आणि मी कॉलेजमध्ये पहिली आली हे ओरडून सांगितले, त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू मला सर्व सांगून गेले. ते माझ्यापेक्षा जास्त आनंदामध्ये होते. मी त्यांना माझ्यासोबत आईकडे घेवून गेले. माझ्या आधीच सरांनी तिला सांगितले, मी शाळेमध्ये पहिली आले हे !  आईने आनंदाने मला मिठी मारली. त्या दोघांच्या आनंदासमोर माझा आनंद खूप कमी होता.

आता माझ्या आयुष्याला वेगळ वळण मिळाल होतं. सरांनी मला विचारलं पुढे काय व्हायचंय ? तसं आपण पुढे विचार करूया. आता मला माझं स्वप्न सांगण्याची संधी मिळाली होती. मी लगेच सांगितलं," मला स्त्रियांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवायचे आहेत. मला सुमासारख्या निरागस जीवाचा जीव वाचवायचे आहेत, मला असं बनायचयं मदत करा." सर आणि आई यांना धक्का बसल्यासारखे स्तब्ध होते. पाच मिनीट फक्त शांतता होती. आईच्या डोळ्यांमध्ये पाणी होत, त्या दोघांना आज मी मोठी आणि समजुतदार झाल्याची जाणीव झाली होती. सरांनी मला सुचवलं आणि माझ्या समोर उभारलं की आता तुला आय.पी.एस. ऑफिसर व्हायचंय, तु भविष्यातील आय. पी.एस. ऑफिसर आहेस ! हे लक्षात ठेव!

बस्स !!! मला माझा मार्ग सापडला होता. आता माझ एकच ध्येय होत- " आय.पी.एस. बनायचं. सरांनी तस मला मार्गदर्शन करायला सुरूवात केली. मी आता ग्रॅज्यूएशन करत होते पण त्याच बरोबर माझ्या ध्येयाची तयारी करत होते. आता मदन हि मोठा झाला होता त्याला सर्व कळायला लागल होतं. आमच्या परिस्थितिची जाणीव झाली होती. माझ्या आणि आईच्या कष्टाची ही जाणीव होती. त्याच्यावर एक दडपण होतं नेहमी ते अस की सर्व त्याला सतत ताई सारखा हुशार हो बोलायचे, मग त्याला अभ्यासावर जास्त लक्ष द्यायला लागे. तसा तो अभ्यासामध्ये थोडा कमी होता. पण आई आणि माझ्याकडे बघून मन लावून करायचा. आम्ही दोघी ही त्याला जास्त काही बोलायचो नाहि.

माझ्याकडे तीन वर्ष वेळ होता. तसं कॉलेज मध्ये मी आता विज्ञान शाखेतून प्रवेश काढून वाणिज्य मध्ये घेतला होता.म्हणून मला नियमित कॉलेजला नाहि गेलो तरी चालून जायचं. हा वेळ मी आईची काम करण्यासाठी देत असे. आता आईचे चाळीशी मध्ये पोहचले होते, तिच्या शरीराला जास्त काम झेपत नसे. सरांना आता कामासाठी गावी जायचं होत, पुन्हा कधी येणार ते त्यांना ही माहित नव्हत.म्हणून जाण्यापूर्वी त्यांना एका संस्थेमध्ये ओळख करून दिली, जिथे मला हवं तेव्हा योग्य मार्गदर्शन मिळेल. सर जात होते याच दुःख माझ्या ईतकच त्यांना ही होत होत. ईतक्या वर्ष मुलीप्रमाणे माझा सांभाळ केला होता, ते कधीच न विसरणारे क्षण होते.आतापासून माझी परीक्षा सुरू झाली होती.जिथे मी एकटी होते, सर्व निर्णय फक्त माझे होते, काय योग्य ? काय अयोग्य ? याला फक्त मी जबाबदार ठरणार होते.

आता मी एक स्वतंत्र मुलगी म्हणून विचार करत होते. कॉलेजमध्ये फक्त परीक्षा असल्यावर जात असे. सर्व शिक्षक ही मला समजून घेत होते. मी त्याच बरोबर घरकाम करत होते आणि बाकी अभ्यास पण ! मी तीन वर्ष सतत हेच करत होते यामध्ये आईला आराम मिळत होता. तिची तब्येत आता आधी सारखी नव्हती म्हणून तिला मी आता कोणत्याही कामासाठी पाठवणार नाहि हे ठरवलं होत. असे करत माझे तीन वर्ष कसे गेले समजले नाहि, आता मी बी. कॉम. झाले. आईला खूप अभिमानास्पद वाटत होते आणि मदन सुद्धा माझ्यासारख व्हायचयं अस बोलत होता. पण अजून माझं ध्येय पूर्ण नव्हतं झालं. मी सरांनी सांगितलेल्या संस्थेकडे गेले.

आज सरांची मला गरज होती पण काही कारणास्तव त्यांना ईकडे येणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी सांगितलेल्या संस्थेकडे गेले. त्यांना सरांनी आधीच माझ्या बद्दल कल्पना दिली होती.तिथे जे काही शिक्षक होते ते सुद्धा सरांसारखे मला सर्व समजून घेत होते. आय.पी.एस.होण्यासाठी प्रोत्साहित करत होते. असे त्यांनी मला सतत दोन वर्ष तयार केल आणि शेवटी परीक्षा तारीख जाहिर केली

मला खुप भिती वाटत होती पण एक चांगली गोष्टी झाली. ती म्हणजे सर गावावरून आले होते माझ्यासाठी ! थोडक्यात माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या क्षणामध्ये ते माझ्या सोबत होते आणि महत्वाचे म्हणजे मला खरचं गरज असते. मी त्यांना बघूनच आय. पी. एस. झाल्याचं स्वप्न पाहत होते. सरांकडे आणि माझ्याकडे एक आठवडा होता. ते मला अभ्यासासाठी नाहि तर उज्ज्वल भविष्यासाठी आणि माझ्या ध्येयासाठी प्रोत्साहित करत होते. उद्या माझी परीक्षा होती, सर मला काय हवं नको ते सर्व बघत होते. पूर्ण रात्रभर आम्ही दोघेही सराव करत होतो. पहाटे तीनला सरांनी मला आराम करण्यासाठी सांगितले, मी सुद्धा ऐकलं नाहितर तब्येत बिघडली असती. मी लगेच सहा वाजता उठले आणि पुन्हा सराव करत होते. परीक्षा अकरा वाजता होती. मी आणि सर तिथे लवकर पोहोचलो. शेवटी माझी परीक्षा झाली पण मला कसलीच खात्री नव्हती, मला टेन्शन आल होतं. सरांनी मला आल्याबरोबर सर्व विचारलं पण माझ्या चेह-यावरून त्यांना सर्व समजलं होतं म्हणून त्यांनी जास्त काही विचारलं नाही. उलट मला हसवत घरी घेवून गेले. आईला जास्त काही कळत नव्हतं पण ती माझ्यासाठी प्रार्थना करतआज माझा निकाल होता ! माझी घराबाहेर निघण्याची बिल्कुल इच्छा नव्हती. सर, मदन आणि आई तिघेपण माझ्या यशासाठी प्रार्थना करत होते. काही वेळातच सरांना संस्थेमधून फोन आला, अर्थातच तो निकाल सांगण्यासाठीच होता ! फोन ठेवताच, सर आधी माझ्याकडे आले ते चक्क माझे पाय स्पर्श करत होते. मी मागे झाले आणि सरांचे हात पकडून काय झालं विचारले, त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पाहून मला सर्व कळलं. मी खुप रडत होते. मला आज सुमाची खुप आठवण येत होती. आई मला समाजावत होती .

माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता ! मी खूप आनंदी होते सर तर मला आय. पी.एस. म्हणून आवाज देऊ लागले होते. माझं सर्वात मोठ ध्येय आज पूर्ण झालं होत. मला सुमा सारख्या असंख्य निरागस मुलींना वाचवण्याची संधी मिळाली होती.मी आजपासून मोलकरीण नाही तर आय पी एस म्हणून ओळखली जाणार होते आणि माझी आई पण आय पी एस ची आई म्हणून ओळखणार होती !

मी स्वतः माझ्या आय.पी.एस. म्हणून होणा-या प्रवासासाठी सज्ज झाले होते...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED