मी एक मोलकरीण - 8 suchitra gaikwad Sadawarte द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मी एक मोलकरीण - 8

( भाग 8)

आज माझं लग्न होत. मला कळत नव्हतं, नक्की ! मी खुश आहे का नाही ते ? मी कदाचित शरीराने तिथे होते पण मनाने मात्र तिथे नव्हते. पण आई खुश होती म्हणून मी खुश होते. लग्नाची तयारी चालु होती, सर्व व्यस्त होते तितक्यात माझा फोन जोरजोरात वाजत होता. मी फोन उचलण्यासाठी गेले पण आईने फोन माझ्या हातातून घेवून बाजुला ठेवून दिलं. मी तिला समजावत होते,' काहि महत्वाचे काम असेल म्हणून फोन करत असणार, एकदा बोलून तर बघू दे !' पण आई ऐकायला तयार नव्हती तिने माझा फोन बंद करून ठेवून दिला. आता आई मला लग्न मंडपामध्ये घेवून गेली. सर्व माझ्या दिसण्याची स्तुति करत होते कारण पहिल्यादांच मला असं सजून बघितले होते. मग मला नव-या मुलासमोर उभे केले, आणि आंतरपाट लावले. मंगलाष्टका, सात फेरे झाले, माझ्या गळ्यामध्ये आता मंगळसूत्र होतं. आता माझी पाठवणी होती, आई खुप रडत होती आणि मदन पण रडत होता. आजपासून ते दोघेच राहणार होते, हे मला कल्पना ही करू वाटत नव्हतं. तसं मी स्वतःला समजावलं होत कितीही काही झालं तरी आई आणि मदनला आधीसारखचं सांभालायचं. मी सुद्धा खुप रडत होते, असं आईला सोडून जाणं मला सहन नव्हतं होत.

शेवटी हि आपली रीत आहे, मुलींना घर सोडून, आई-बाबांना सोडून जावं लागत. माझी इच्छा नसताना मला हे सर्व करावं लागत. मी गाडी मध्ये बसले, गाडी सुरू कधी झाली आणि तिकडे पोहचलो कधी हे कळलं नाहि. तिकडे गेल्यानंतर आमची वरात बराच वेळ फिरवली. मी खुप दमले होते पण हे सर्व करावं लागत होतं. शेवटी आम्ही

त्यांच्या घरी पोहचलो. माझ्यासोबत तिथे माझं असं कोणीच नव्हतं. मला त्या मुलाशी बोलायचं होत पण आम्हाला एकांत मिळत नव्हता.

घर तस बरंच मोठ होत, मला एक वेगळी खोली दिली होती. घरामध्ये पुजेचा कार्यक्रम झाल्याशिवाय आम्हाला दोघांना एकमेकांसोबत बोलता सुद्धा येणार नव्हते, पण तिथे तो सोडून कोणीच माझ्यासोबत बोलत नव्हते. मला खुप एकट वाटत होतं.पण काही करू शकत नव्हते. एक आय. पी. एस. ऑफीसर असून सामान्य मुलगी म्हणून जगत होते.मी एक आठवड्यामध्येच कामावर जाणार होते पण तिथे गेल्यावर मला एक महिन्याने कामावर जायचं सांगितले. ते पण शांतपणे मी ऐकत होते. सर्व हो ला हो करत होते.

पण मला सर्व विचित्र वाटत होतं. काहितरी संशयास्पद वाटत होतं. त्यामध्ये त्यांनी मला माझे कामावरून येणारे फोन उचलण्यास मनाई केले होती. मी बाकी सर्व शांतपणे ऐकल होतं पण आता हे मला जास्त खटकायला लागलं होतं. मी माझ्या नव-याला विचारलं पण तो ही काही ऐकून घेत नव्हता, मला हवं तसं प्रतिसाद मिळत नव्हता. मी लवकर कामावर रूजु होणार अस बोलले तर बाबाच्या पुढे जायचं नाहि असं उत्तर मिळालं. मला हे सहन होत नव्हतं.

मला एखाद्या पिंज-यामध्ये अडकलेल्या पक्षासारख वाटत होत. जिथे किती प्रयत्न केले तरी शिका-याने ठरवल्याशिवाय उडता येत नसतं. आता दोन आठवडे होत आले मी सर्व सहन करत होते. मला एक सुन म्हणून नाहितर मोलकरीण म्हणून काम करून घेत.मला कामाची सवय ही होती आणि लाज ही वाटत नव्हती म्हणून कोणतीही काम मी आनंदाने आणि उत्साहाने करत होते. आता फक्त उरलेल्या दोन आठवड्यावर माझ लक्ष होतं, कधी मी बाहेर पडते आणि कामाला सुरूवात करते अस झालं होतं. घरामध्ये माणसं असायची पण एकमेकांसोबत बोलायचे नाहि. जो तो आपआपल्या कामासाठी न सांगता निघून जायचे. म्हणून मला आता तिथे दिवसभर राहणं खुप कठीण जात होतं. आता फक्त दोन आठवडे जाऊ दे.

माझा नवरा लग्नाआधी माझ्या सोबत जितका बोलायचा आता तितकाही बोलत नव्हता. काय चाललयं मला कळत नव्हतं. मी बोलण्याच बरेच प्रयत्न करायचे पण काही तरी काम सांगून माझ्याकडे दुर्लक्ष करायचा. आता तिसरा आठवडा चालु होता, माझ्या नव-याला यायला बराच उशीर झाला होता. मी बाहेर हॉलमध्ये वाट बघत बसले होते तितक्यात पायांचा आवाज आला, मला वाटलं हे आले वाटतं. पण ते नव्हते तर माझा दिर होता ते ही खुप जास्त प्रमाणात दारू प्यायली होती. त्यालाच तो सावरत नव्हता. माझी आणि त्याची ओळख ही फार नव्हती कारण तो घरात कमी बाहेर जास्त असे. महत्वाचे म्हणजे त्यांना आवर घालणारे, विचारणारे कोणीच नव्हते. मी या सर्व विचारामध्येच असताना तो पटकन माझ्या समोर येऊन उभा राहिला. तीव्र वास येत होता, तितक्यात तो बोलला ' वहिनी साहेब इथे काय करताय ? झोप नाहि लागत का ? ' त्याची नजर बघून त्याच्या प्रश्नांच्या मागचा उद्देश न समजण्यामागे मी मूर्ख नव्हते. मग मी रागात बोलले ' यांची वाट बघत आहे, तुम्ही आधी स्वतःला सावरा, मग माझा विचार करा !' माझा आवाज आणि बोलण्यावरून एक मिनीट मध्ये तो त्याच्या खोली मध्ये गेला. मी इकडे वाट पाहता पाहता कधी झोपून गेले कळलचं नाहि.सकाळी सकाळी सासूच्या आवाजाने जाग आली, त्या विचारत होत्या की खोली मध्ये जागा नाहि का ? तर ईथे झोपायला आलीस !' मी बोलले हे आले नाहि म्हणून वाट बघत होते. त्या हसायला लागल्या आणि बोलल्या ' त्यामध्ये ईतक काही नाहि, तो आठवड्यातून फक्त एकदा दोनदाच घरी येतो !' मला हे ऐकून धक्का बसला. अस कोणते काम आहे जे दिवस भर संपत नाही म्हणून रात्री पण कराव लागतं । आता सर्व डोक्यावरून चाललं होतं. मला बाहेर पडण्यासाठी एक आठवडाच राहिला होता. सर्व गोष्टीचा शोध मी बाहेर गेल्यावरच लागणार हे माहित होतं. आता मी दिवस मोजत होते, जेणेकरून वेळ लवकर जाईल.

उद्या माझा एक महिना संपणार होता ! हा असा एक महिना होता की आयुष्यभर आलेल्या सर्व कठीण प्रसंगापेक्षा वाईट ! मी आनंदामध्ये होते की उद्या बाहेल पडेल आणि आईला ही भेटेल. ईतक्या दिवस आई बरोबर काही संपर्क झाला नव्हता, तसं तिला काम ही असतं म्हणून मी जास्त वाईट नाहि वाटून घेतलं.मी माझ्या खोलीमध्ये होते, मला कोणी तरी भांडत असल्याचा आवाज येत होता.मी बाहेर गेले तर माझे सासरे फोन वर कोणावर तरी भडकले होते काहीतरी चुकीच केलं म्हणून! असं वाटत होत चुकी केलेली व्यक्ति ईथे असती तर जीवच गेला असता ! मी दिसले तर माझाच जीव जाईल म्हणून दरवाजा लावून खोलीमध्ये गेले आणि शांत विचारांचा गुंता सोडवत बसले.

आज ही यांचा काही पत्ता नव्हता, मी वाट बघणार नव्हते. म्हणून मी झोपले. सकाळी उठून कामावर रूजु होणार होते. दुसरा दिवस उजाडला आणि मी तयारीला लागले. सर्व घरातील काम संपवून निघाले.तसं ही तिथे कोणी कोणाला विचारत नव्हते. मी आता घरातून निघाले आणि अजूनही माझा नवरा घरी आला नव्हता. पण मी लक्ष नाहि दिले कारण आज मला पिंज-यामधून बाहेर पडायचं होतं आणि पडले. मी पोलिस स्टेशन मध्ये पोहोचले, सर्वांनी माझं स्वागत केलं. मला पहिल्या दिवशी कामावर आल्यावर जो आनंद झाला होता त्यापेक्षा हा जास्त होता . मला एक केस दाखवली, त्यावर एक महिना शोध चालु होता पण काही सापडलं नव्हत म्हणून आता ती केस माझ्याकडे देण्यात आली आणि मला ती शोध लावून पुर्ण करायची होती.

या सर्वाआधी मला आई सोबत बोलायचं होतं. पण तिचा फोन लागत नव्हता. म्हणून एक पोलिस हवालदाराला मी आमच्या आधीच्या खोलीवर पाठवले. ते अर्धा तासामध्ये आले पण आई आणि मदन तिथे नव्हते. त्यांनी आजुबाजूला चौकशी केली तर समजलं माझ्या लग्नाच्या दुस-याच दिवशी आई आणि मदन गावाला गेले. मला हे ऐकून धक्का बसला. आई मला न सांगता कशी जाऊ शकते हे विश्वास न बसण्यासारखचं होतं. गावाचा तर कोणाचा फोन नंबर नव्हता म्हणून काही समजलं नाहि. तितक्यात मला माझ्रा वरच्या ऑफीसमधून फोन आला. तो फोन या एक महिना चालु असलेल्या केस बद्दल होता.

आता मला आई आणि मदनला बाजुला ठेवून त्या केसवर लक्ष द्याव लागणार होतं.आज एक महिन्यानंतर मला मी आधीची आय.पी.एस.ऑफीसर वाटायला लागले होते, काही क्षणामध्येच मी माझं लग्न झालं आहे हे विसरून गेले होते कारण त्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख काहीच नव्हत. मी सर्व विचार बाजुला करून केस ची फाईल बघायला सुरूवात केली. 50 एका मुलीच्या संबधित केस होती. अशा केस बरोबर माझं खुप भावनिक नातं होतं.मी अशी केस एक काम, कर्तव्य म्हणून नाहि तर स्वतःचा जीव लावून मुलींसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी सोडवत असे. केस फाईल बघून माझ्या डोळ्यातील अश्रु चेह-यावरून उतरू लागले. अजूनही सुमा आणि तिच्या बरोबर झालेलं मी विसरले नव्हते आणि आज ईतक्या वर्षानंतर सर्व माझ्यासमोर पुन्हा उभारलं होतं. आता मी या वेळेस शपथ घेवून तयार झाले, काहीही करेल पण गुन्हेगारांना सजा मिळेलच आणि तीच्या घरच्यांना न्याय !