थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी .... - 3 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी .... - 3

रात्री लाइट येण्याची अरोही वाट पाहत पाहत कधी झोपून गेली ...तिला काही कळलेच नाही . सकाळी उठून घड्याळात पाहते तो काय? आठ वाजले होते . आठ वाजले तरी, कोणी ....तिला उठवले सूध्हा नाही .नाहीतर ईतर वेळी आई तिला जरा उठायला उशीर जाहला. की, किती रागावत असे .... तिला उशिरा उठलेले अजिबात आवडत नसे . पण .....आज ..
अरोहीने उठून मोबाईल चार्जिंगला लावला. आणि आईला शोधायला ती किचन मधे गेली . तर आई नेहमी प्रमाणे तिच्या कामात बिज़ी ....... अरोही ने आईला जाऊन मागून मिठी मारली .
आई ला तिने विचारले ... आई मला तू आज लवकर का नाही उठवले? रोज कशी लवकर उठ्व्तेस . आणि नाही उठले की, रग्व्तेस .....मग आज काय जाहाले तुला ....? हातातले काम बाजूला सारत आई ने अरोही कडे प्रेमाने बघितले . आता माझ बाळ थोडेच दिवस एथे राहणार? मग सासरी जाणार? मग कोण? त्याला मनसोक्त झोपून देणार ....तिथे गेल्यावर लवकर उठावे लागणार? मग झौप कसली आणि कसला आराम . आणि तिच्याकडे बघत आई गोड हसली . अरोही ही आई कडे बघून गोड हसली .खरच लग्न झल्यावर एवढे सगळे बल्द्णार.... पण, ह्या सगळ्यात साथ द्याला गोड साथीदार असेल ....त्याला नवरा म्हणतात . आदी खरच देईल मला साथ .... मझ्या सुखात दुःखात होईल सामील तो ...माझे काही चुकले तर .... मला सांभाळून घेईल का? अरोही ला अनेक प्रश्न पडत होते .पण उत्तर येणारी वेळच देणार होती .
अरोही रूम मधे आली .तिने फोन चार्जिंग चा काढला .आणि स्विच ऑफ उघडला .हे काय ....? एक ...सूध्हा मेसेज नाही .बहुदा तिला कोणचा तरी मेसेज येणे अपेक्षित असावे .बहुतेक आदी चा .....आणि असावा तरी ...का नाही? त्याचे दिवस च होते एकमेकाना मेसेज करायचे. नवीन नवीन लग्न ठरले होते .पण ....रात्री आदी एवढे गोड गोड बोलला. आणि सकाळी एक सूध्हा मेसेज नाही .अरोही ला थोडा राग आला . आणि का नको यायला ...मुलीना आवडत मुल त्याच्या मागे मागे फिरलेली . त्याना सतत मेसेज करणारी .फोन करणारी ......खरंतर त्याचा तो अधिकारच असतो . पण ....आदी ने नव्हता केला ...अरोही ला मेसेज .... मग अरोही ने स्वतः च आदी ला मेसेज करायचे ठरवले ....तिने मेसेज करयला फोन उचलला .मग तिला वाटले .. मेसेज नको ...फोन करू .....म्हणून तिने फोन करयला नंबर दाबला ...ती फोन करणार ? ऐत्क्यात तिच्या लक्षात आले .फोन करून आपण काय बोलणार ...अस अनोळखी माणसाशी आपल्याला नाही जमत बोलायला . पण, आदी आता अनोळखी नाही .आपला अयुष्भाराचा साथी आहे .आणि त्याच्याशी बोल्याशीवाय का तो ओळखी चा होणार आहे . शेवटी फोन करू का नको? करू का नको? ह्या विचारात अरोही असताना तिकडून आदी चा फोन आला सुढ्ह्हा.. तिने काहीही विचार न करता पहिल्याच रिंग मधे फोन उचलला . हेलो...... अरोही बोलली ......तेवढ्यात आदी ने ही तिकडून हेलो बोलले ....अग, अरोही मी आदी ..... कशी आहेस? अरोही ही गडबडीत बोलली ....हो, मी बरी आहे .तुम्ही कसे आहात..... घरातले सगळे कसे आहेत .लग्नाची तयारी कुठं पर्यंत आली . एका दमात अरोही बोलली. तीच ते गड्ब्ड्लेल बोलण ऐकून आदी ला खूप हसायला आले .तो तिच्या बोलण्यावर खळखळून हसला .अरोही ला आदी का हसतोय? ते काही कळाले नाही ....पण, आपल कहितरि चुकलय एवढे मात्र नक्की .....पण आदी च्या हसण्यावर अरोही थोडी ओशाळली. मग, हसणं आवरत आदी तिला म्हणला ....किती छान बोलतेस ग..... आणि हसण्यासारखे सूध्हा...
हळु हळु अरोही आणि आदी मधे बोलण सुरू जाहले .खूप आनंदाचे बोलणे होते ते . दिवसेंदिवस ते बोलणे वाढू लागले . एकमेकांशी बोलून दोघे ही खूप खुश होते . आपण आपल्या अयुषचा जोडीदार योग्य निवडलाय. असच दोघानाही वाटत होते . थोडे दिवस असेच आनंदात गेले .लग्नाला अजून महिना होता .आदी ला सारखे असे वाटत होते की, अरोही ला एकदा प्रत्क्ष्य भेटावे .तिच्याशी खूप साऱ्या गप्पा माराव्या . म्हणून, तो सारखे अरोहीला भेटण्याविषयी विचारत असे ....पण ती काही तयार होत नसे . पण, तो सतत तिला भेटण्याविषयी विचारत असे . अरोही ला आदी ला भेटायला काहीच प्रॉब्लेम नव्हता .पण, तिला आदिला कोणालाही न सांगता लपवून छापून नव्हते भेटायचे . आणि, ह्या विषयी घरी सांगायाचे, म्हणजे ....तिला घरच्यांची भीती वाटत होती . कारण तिच्या घरच्या चे विचार थोडे जुने होते . आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याना पट तील की नाही .....काय माहीत . ही, शंका होतीच .पण, आदी जे बोलत होता ...ते ही तिला पटत होते .निदान एकदा तरी लग्नाच्या आधी भेटणे गरजेचे होते .त्यामुळे लग्नानंतर समजून घेण्यास त्यामुळे मदतच जाहाली असती .
शेवटी तिने निर्णय घेतला .घरी कोणाला ही न सांगता आदी ला भेटायला जाण्याचा .....शेवटी मुली कधी न कधी तरी हे पाऊल नक्की उचलतात ....किवा त्यांना हे पाऊल उचलावे लागते . अरोही ने भेटण्याचा निर्णय तर घेतला .पण, खरी अडचण पुढेच होती .तिने तसे आदिला कळवले ही ... ठरलेल्या दिवशी दोघे ही ठरलेल्या ठिकाणी आले . दोघे ही थोडेसे अवघडलेलेच होते .कदचित दोघांची ही एखद्या मुलाला किवा मुलीला भेटायची अशी पहिलीच वेळ होती . त्यात आदी अरोहीला मधूनमधून हसवण्याचा प्रयत्न करत होता .पण, अरोही वडिलांना आणि घरच्यांना कोणाला ही न सांगता तीच धड तिथे मन ही लागत नव्हते .आपण, घरच्यांना न सांगता आलो .ही गोष्ट तर तिच्या फार मनला लागली होती .पण, आदी ला मात्र अरोही च्या ह्या वागण्याचा फार राग आला . एवढा चांगला वेळ मिळाला, असताना तो एन्जॉय करायचा सोडून .....अस तोंड पाडून बसली .दिवसभर, अरोही शरीराने जरी आदी सोबत असली ...तरी ती मनाने घरीच होती .तिच्या घरच्यांना सॉरी म्हणत होती . आदी अरोही वर जरी रागावला असला, तरी त्याने तस त्यावेळी काही दाखवले नाही . दोघांनी काही वेळ एकत्र घालवला ....त्यानंतर दोघेनी हॉटेल मधे एकत्र जेवण केले .आणि आदी ने अरोही ला घरच्या जवळ सोडले .आणि तो त्याच्या घरी जायला निघाला . ह्या भेटी ने दोघे ही जवळ यायच्या ऐवजी थोडेसे दूर गेले .आदीच्या मनात अजून ही प्रश्न ऊभा होता की ......अरोही अस का वागते? तिला आपण नक्की आवडतो ना ....का? तर अरोही ला अस वाटत होत की ....आपण घरच्या शी खोट बोलून आदी सठि तिथे गेलो ....आणि आदी आपल्याशी थोड दूर दूर वागत होता .अरोही ला ते जाणवले . पण, जाऊदे... कस का असेना .आदी शी भेटून अरोही ला थोड हलके वाटले . तिने आदिला फोन करयला फोन घेतला ....तिने पटपट नंबर दाबला ... आणि फोन कानाला लावला. पण फोन काही लागेना . तिने परत फोन कानाला लावला . परत काहीच नाही .अरोही ला काहीच कळेना .आदींचा फोन का लागेना .तिला आदी शी बोलण्याची खूप ऐछा जाहली होती .पण त्याचा काही फोन लागेना .अरोही रात्र भर त्याला फोन लावत होती .पण त्याचा फोन काही लागेना .