थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 9 Dhanashree yashwant pisal द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी .... - 9

कहितरि फार मोठ झलय ह्याचा अंदाज तर आदि ला आला होता .... अरोही येत नाही ...हे कळल्यावर त्याने स्वतहाच ते पडलेले कागद उचलायला घेतले . एक एक कागद उचलून तो व्य्व्स्तीथ एकावर एक लावत होता .एवढ्यात त्याला एक उलटा पडलेला फोटो दिसला ... त्याने तो उचला आणि पाहतो तो काय? .....हा फोटो ....एथे कसा? त्याला ही एक क्षण प्रश्न च पडला . अरु, ने ...तर नाही ना ..हा फोटो पहिला . आता त्याच्या लक्षात आले, की ....अरोही आपल्याशी अशी का वागत आहे? आता घरात फार मोठे रामायण होणार आहे ...ह्याची कुणकुण आदी ला लागली . तो पटकन अरोही कडे पळाला .अरोही किचन मधेच होती .तीच किचन मधे काम चालले होते .पण, तिच्या काम करण्याच्या पध्तीने तिला किती राग आलाय .हे समजत होते . आदी तिच्या जवळ गेला ..आणि त्याने तिच्या कमारेतून हात घालून तिला जवळ घेतले .पण अरोही च्या ते लक्षात येताच तिने त्याला दूर ढकलले . आदी ने परत तिला जवळ घेतले .आणि सॉरी म्हंटले . पण अरोही म्हणली मला सॉरी नको ......मला काम करू दे ....तिला खूप रडू येत होते . आदी तिला म्हणला ....अगं, तस काहीच नाही ...प्लीज तू मला माफ कर ...आणि एकदा माझे बोलणे ऐकून घे . ऐत्क्यात आदी ची आई किचन मधे आली . अरोही ने तीच रडणे आवरले ...आणि ती कामाला लागली .ई कडे आदी ही किचन मधून निघून गेला . मग तर अरोही ला खूप च राग आला . कसा स्वभाव असतो ना ......जवळ असल की नको वाटत ...आणि लांब असल की हवं वाटत .....असा च काहीसा अरोही चा स्वभाव होता . पण असा स्वभाव वाईट नसतो .फक्त समजून घेणारी व्यक्ती चांगली लागते . मग आदी नेच काहीतरी बहाणा करून तिला बाहेर नेह्ले ....तिची समजूत काढली . पण, अरोही काही केल्या ...तीच ऐकेना .मग, आदी ने तिला सगळ सांगायच ठरवल . आदी सांगू लागला ...तो फोटो ....शीतलचा आहे .शीतल माझ एकेकाळी प्रेम होत तिच्यावर ....म्हणजे शाळेत असताना ....ती आपल्याच गावची ... लहानपणी खेळता खेळता मैत्री जाहली. ती मुंबई मधे शिफ्ट झल्यावर थोड्याच दिवसात मैत्री तुटली .आणि मग काही दिवसानी वडील वारले. प्रस्तीथी मुळे गाव सोडले आणि मुंबईत आलो . खूप वाईट दिवस पहिले .पण, त्या वाईट दिवसात ही एक गोष्ट चांगली जाहली .ती म्हणजे शीतल भेटली .मुंबईत भेटली .....मग, काय मैत्री च रूपांतर प्रेमात जाहले . प्रेम तर जाहले ....पण, तिला द्याला मझ्याक्डे ना पैसा होता, ना वेळ होता ....शेवटी काय तिने दिवस मझी वाट पाहिली .......मग जेव्हा कधी भेतय्चौ तेव्हा भांडणे व्हायची ....ती रुसय्ची ...पण तिला मनवायला सूध्हा मझ्याक्डे वेळ नसायचा .मग शेवटी ..तीच हुशार बनली आणि तिने मला सोडून दिल ....आणि एका श्रीमंत मुलांसोबत लग्न केल ....दोघांचा खूप छान सुखी संसार चालू होता ...त्यांना एक मुलगा सूध्हा जाहला....आमच्यात दुरावा निर्माण जाहला . तिच्याक्ड्ड सगळ होत...एक सुखी संसार, प्रेम ...पैसा .....आणि मझ्याक्डे ....आदी मिश्किल पणे हसला ....कर्जाचा डोंगर , अर्धवट शिक्षण आणि कमी पगाराची नोकरी .....आणि नंतर व्यसन .......दोन वर्ष असेच गेले ....अनेकांनी खूप समजावले ......काहींनी नावे ही ठेवली ....मग ठरवल ...नाही आता अस नाही वागायचं .....मग काय कामात लक्ष दयाचे ठरवले ...दिवस रात्र मेहनत केली ...शिक्षण पूर्ण केले ....मग हळू हळू पगार वाढला . चार पैसे हाताशी आले ..मग गावाला घर बांधले . मग तूझ स्थळ आले ...तु आवडली ...मग लग्न करायचे ठरवले ...मग लग्न जाहले .....हीच मझी कहाणी आहे .आणि तो फोटो खूप जुना आहे .मझ्या लक्षात ही नव्हता ...की, हा फोटो एथे आहे ...नाहीतर मी तो कधीच फेकून दिला असता ...
अरोही चा राग शांत तर नव्हता जाहला ....पण तिला आदींचे वाईट वाटले . प्रेम नशिबात होते ..पण, परीस्तीथी ने ते मिळू नाही दिले ...... आता आदी विषयी सह्न्भुती वाटली . आणि शीतल विषयी मत्सर .....अस कोणी वागत का? कोणाशी? अस, कोणी सोडून देत का आपल्या प्रेमाला? आज ना उद्या पैसा मिळतोच ...पण गरज असते ...सोबतीची ...मायेच्या छ्त्र्छाय्ची..... पण, जाऊदे नाही जमत कोणा कोणाला ते? .......पण, पुढच्याच क्षणी तिला प्रश्न पडला ....पण, आपण का हे सगळ सहन करायच ....आपली ह्या सगळ्यात काय चूक होती ......आदी ला संधी मिळाली ....त्याच्या अयुषत प्रेमाची जागा भरून काढायची .शीतल तर काय? सुखी आहे तिच्या अयुषत ....पण आपल्या सोबत विश्वासघात झलय ....ह्या सगळ्याची कल्पना आदी ने आधी आपल्याला द्याला हवी होती .......आपल्या निर्णयाची वाट पहायला हवी ...पण त्याने तस काहीच केले नाही ....आता लग्नाला एक महिना पूर्ण झल्यावर तो आपल्याला हे सगळ सांगतोय ....का? त्याने आपल्याला ग्रुहीत धरले .....लग्ना आधी जर हे सगळ कळले असते ...तर कदचित आपण हे लग्न मोडून टाकले असते ...आपण आता हे लग्न मोडू शकत नाही ...काही जाहले तरी हे लग्न आपल्याला नीभव्वावे च लागणार .....अरोही ला आता स्वतःच राग येऊ लागला होता ....तिला खूप काही बोलायचे होते ....आदी ला जाब विचारायचा होता ....पण ..ती शांत होती ...तिला माहीत होते ...बोलून काहीच उपयोग होणार नव्हता ..जाहला तर फक्त त्रस्स च होणार होता . तिने डोळ्यांतील पाणी पुसले ....आणि आहे ती ...परीस्तीथी स्वीकरय्ची ठरवली ...तिने आदी ला माफ केले ...आणि ती आदी सोबत घरी आली ....आदी पण तिला सोडून ऑफीस ला निघून गेला .
आदिला हे शीतल बदल सांगून बरे वाटले .हे सगळ त्याला पण अरोही ला सांगायच होतच ....पण कस सांगावे ते मात्र त्याला कळत नव्हते .सगळ ऐकून ती कशी रेक्ट होते ...का हे सगळ सोडून निघून जाते ..ह्याची भीती त्याला वाटत होती .......पण, जेवढे वाटत होत ....त्यापेक्षा अरोही जरा जास्त रिक्ट जाहली अस त्याला वाटत होते .पण तीच वागण जे होते ते पण, बरोबर आहे .अचानक एका मुलीचा फोटो तो ही आपल्या नवऱ्या बरोबर बघितला ....तर कोणतीही मुलगी चिढ्नारच .आदी ने अरोही च वागण समजून घेतल .आणि अरोही ने ही जे आहे ते तसच स्वीकारायचे ठरवले .
जाहले, सकाळच्या प्रसँगाने अरोही च मन दुखी जाहले असेल, म्हणून आदी ने संध्याकाळी अरोही ला बाहेर फिरायला नेह्न्याचे ठरवले . संध्याकाळी तो ऑफीस वरून लवकर आला . दोघे ही आवरून बाहेर जायला निघाले . आदी तिला घरच्या जवळ च असणाऱ्या हॉटेल मधे घेऊन गेला .दोघे ही छान जेवले ..दोघांनीही बराच वेळ गप्पा मारल्या........दोघानाही खूप दिवसानी असा मोकळा वेळ मिळाला . त्यात आदी ने तिला त्याच्या आर्थिक व्यवहाराची महिती दिली . त्याच्या वर असणाऱ्या घराच्या कर्जाविषयी महिती दिली . त्याचे महिन्याचे खर्च....अरोही ने ही ते नीटसे ऐकले ....आणि आपण आहे त्यात अड्जस्ट करू ....असा म्हणला .... अरोही चा हा समजूतदारपणा आदी ला आवडला . संसार ही एक सुंदर गाडी आहे . जी दोघांनी मिळून चालवायची असते ..... तरच प्रवास सुखाचा होतो .


रेट करा आणि टिप्पणी द्या

Rajan Bhagat

Rajan Bhagat 1 वर्ष पूर्वी

Rajani

Rajani 1 वर्ष पूर्वी

madhuri devarde

madhuri devarde 1 वर्ष पूर्वी

Punam

Punam 1 वर्ष पूर्वी

Shobha Patil

Shobha Patil 1 वर्ष पूर्वी

शेयर करा