लहान पण देगा देवा - 18 - अंतिम भाग Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

लहान पण देगा देवा - 18 - अंतिम भाग

भाग १८

आजोबांशी बोलून अथर्व आजी शंभू काका आणि साक्षी च्या मदतीने लग्नाच्या तयारीला लागला. गणपती विसर्जना नंतर आजोबांच्या वाढदिवशी चा लग्नाचा मुहूर्त काढला. गणपतीच्या आगमना सोबत लग्नाची देखील तयारी सुरु झाली. अथर्व प्रत्येक कामात आजी आजोबांचे मत घेत होता. झाल्या प्रकरणा नंतर अथर्व आणि आजी एक शब्द देखील अथर्वच्या आई वडिलान सोबत बोलत नव्हते. अथर्वची आई खूप प्रयत्न करत होती कि तो काही तरी बोलेल पण, अथर्व ने निश्चय केला होता, तो त्याच्या निर्णयावरून थोडा देखील मागे सरकला नाही, आणि त्यात भरीस भर अथर्वची छोटी बहिण अदिती हि देखील पोहोचली होती. तिच्या सोबत हि हे दोघे असेच वागले होते, तिला नृत्याची आवड होती पण तिला ते न करू देता मेडीकलला पाठवले. इच्छा नसताना ती ते शिक्षण पूर्ण करत होती, कारण तिला त्या कारणानेका होईना घर बाहेर पडता येत होते. ती फक्त वाट पाहत होती कधी एकदा शिक्षण पूर्ण होते आणि ती अथर्व कडे जाते. तिच्या नृत्याच्या कले विषयी अथर्वला माहित होत म्हणून पुढील शिक्षणाचे कारण देऊन तो तिला त्याच्या कडे बोलवून घेऊन तिला योग्य त्या dance academy मध्ये admission घेऊन देणार होता. पण इथेही त्यांना कुठून तरी समजल तर तिचे लग्न ठरवून टाकले. या सर्व गोष्टींची चीड तिच्या मनात होतीच आणि आता ती जास्त वाढली होती कारण त्यांनी स्वतःच्या आई वडिलांना देखील सोडल नव्हत.

ती इथे आल्याने अथर्वला मात्र खूप मोठा सपोर्ट मिळाला होता. आणि अदितीला देखील साक्षी खूप आवडायची त्यामुळे तिने येताच क्षणी लग्नाच्या सर्व कामांची सूत्र हाती घेतली, आणि तयारीला लागली.

गणपती आगमनाची तयारी सुरु झाली. मस्त जोरदार गणपतीचे स्वागत करण्यात आले. सर्वांनी गणपती चे मनापासून आदरतिथ्य केल. आजोबांच्या तब्यती मध्ये देखील सुधार होता. आणि लग्नाचे एक एक कार्यक्रम सुरु झाले. सुरुवात हि खरेदी पासून झाली. आणि या एकही कामात त्याने त्याच्या आई वडिलांना बोलवलं नव्हत.

सर्व काही झाल्यानंतर अथर्वला वाटल आता तरी त्यांना त्यांची चूक समजेल आणि ते आजी आजोबांची माफी मागतील पण अस काहीच झाल नाही, पण त्याने चुकीच देखील काही केल नव्हत जे होत होत ते फक्त पाहत होते.

अखेर लग्नाचा दिवस उजाडला आजोबांसाठी तो फक्त त्यांच्या नातवाचा लग्न दिवस होता पण बाकी सर्वांसाठी तो दिवस त्यांचा वाढदिवस होता, त्यांच्या साठी सरप्राईज तयार केले होते. पण जे सरप्राईज अथर्वला द्याचे होते ते मिळणार का याची भीती होती. लग्नाचा मुहूर्त आला अथर्व साक्षी लग्न मंडपात आले आजी आजोबा मिळून दोघांना आशीर्वाद देत होते, अथर्वची नजर मात्र दरवाज्याकडे होती, त्याला एकाच आशा होती कि त्याचे आई वडील देखील सगळ विसरून त्याला आशीर्वाद देण्यासाठी येतील. आणि शेवटी तेच झाल पण ते आशीर्वाद देण्यासाठी आले नाही उलट त्यांनी तो मान स्वतःहून आजी आजोबाना दिला, अथर्व खूप खुश होता. आजोबांच्या चेहऱ्यावर आज त्यांच्या मुलासाठी एक वेगळी चमक होती. अथर्वला देखील खूप आनंद झाला होता कि त्याने ठरवलेले सरप्राईज त्याला आजोबांना द्यायला भेटले होते. अथर्वच्या आईने साक्षीला खूप सारे आशीर्वाद दिले. आणि आता खरी वेळ होती ती म्हणजे आजोबांच्या वाढदिवस साजरा करण्याची. मस्त पैकी आजोबाना एका खुर्ची वर बसवून त्यांच्या साठी तयार केलेले सरप्राईज आणले त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या साठी सगळ्यात मोठ सरप्राईज होत ते म्हणजे त्यांची मुले त्यांच्या सोबत होती. सर्व आनंदाने घरात आले सर्वांनी खूप आनंदाने साक्षीच घरात स्वागत केल. संपूर्ण घर आनंदाने दुमदुमले होते. घरात सर्वांचे हसण्याचे खिदळण्याचे आवाज ऐकून आज्जी आजोबा सुखावले होते. आणि हे असाच राहूदे या साठी देवा कडे प्रार्थना करत होते.................

समाप्त