The First Love books and stories free download online pdf in Marathi

पाहिलं प्रेम

आजपर्यंत तुम्ही प्रेमाविषयी खूप कथा कविता पुस्तके वाचली असतील ज्यात प्रियासी आणि प्रियकर दोघेही त्यांच्या नात्याला अस्थित्व मिळवून देण्यासाठी लढत झगडत असतात पण जर त्यातल्या एकाने साथ सोडून कायामच निघून गेला तर कल्पना करा त्याच्या साथीदाराची काय अवस्था होईल काय वेदना होतील त्याला कसा जगेल तो त्याच्या शिवाय ...! तुम्ही त्या दुखाचा अंदाजापन नाही लाऊ शकत. पण काही नाती अशी पण असतात जी कितीही मोठी अडचण आली तरी एकमेकांची साथ सोडत नाही आपल्या जोडीदाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतात.

कितीही मोठ्या अडचणीत सापडलात तरी तुमची प्रियासी तुमची साथ कधी सोडत नाही अगदी घराच्यांच्याही विरोधात जाऊन ती तुम्हाला मिळवण्यासाठी प्रयत्न करते चला तर मग पाहूया या कहाणीतील लैला मजनूची साथ कशी आहे ते.

हि कहाणी आहे रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या सोहम आणि आकांशाची आहे. दोघेही लहानपणापासून एकसोबत होते ते राहायलाहि जवळ-जवळच होते. त्यामुळे त्यांची मैत्री खूप घट्ट जुळलेली होती. ते दोघे एकसोबत शाळेत जायचे, घरी येताना पण दोघे एकसोबातच घरी यायचे शाळेतही ते दोघेच असायचे त्यांच्या मध्ये त्यांनी कधीच कोणा तिसऱ्याला जागा दिली नव्हती. त्यानंतर ते हायस्कूल मध्ये गेले असताना त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला कालपर्यंत जो आकांशा शिवाय राहू शकत नव्हता तो सोहम आज अकांशाला विसरत चालला होता तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच कारण होत त्याच्या नवीन मित्र अस म्हणतात कि चांगल्या सावैपेक्षा वाईट सवाई खूपच लवकर लागतात. सोहमच्या मित्रांनी सोहमाला मुलींविषयी एवढ्या निगेटिव थिंग्स त्याच्या डोक्यात घातल्या होत्या कि तो दुसऱ्या मुलींनाच काय तर तो आकांशाला सुद्धा बोलत नव्हता घरी जाताना रोज आकांशा त्याच्यासाठी थांबत होती पण सोहम तिला पाहून न पाहिल्यासारखे करत होता. आणि हा गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक होते एवढ्या लहान वयामध्ये एवढी विचित्र वागणूक त्याच्या घरच्यांनाही खटकत होती त्यामुळे एकदिवशी सोहमच्या आई-वडिलांनी आकांशाला बोलून घेतले आणि सोहमाच्या बदलत्या वागनुकीबाद्धाल विचारू लागले त्यावर आकांशाने उत्तर दिले कि त्याला जेव्हापासून नवीन मित्र भेटले आहेत तेव्हापासून तो तास वागतो आहे आणि त्याचे आणि माझे बोलणे मागच्या १ महिन्यापासून नाही झाले. हे ऐकून सोहमच्या घरच्यांना धक्काच बसतो हा अचानक असा कसाकाय बदलू शकतो जो मुलगा त्याच्या आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मध्ये कोणा तिसऱ्याला येऊ डेट नव्हता तोच मुलगा आत्ता त्याच बेस्ट फ्रेंडसोबत बोलत नाही त्याच्या आई-वडिलांना सोहमची काळजी वाटू लागली होती.

सायंकाळी सोहम घरी आल्यावर त्याला विचारतात हि तू असा का वागतो आहेस काय झाले आहे आणि तू अंकीताशी का बोलत नाहीस तिने आम्हाला आज सांगितल तुमच्या दोघांमध्ये भांडणे झाली आहेत का त्यावर सोहम वर्गांमधल्या मित्रांनी जे काही सांगितल ते सर्व सोहम त्याच्या मम्मी आणि पप्पांना सांगतो. त्यावर सोहमचे वडील त्याला सांगतात कि तू त्या मित्रांशी मैत्री तोडून तक आणि अशा वाईट वळणावर नेणाऱ्या मित्रांसोबत मैत्री करू नको आणि सगळ्यात आधी आकांशाला तुझ्या या वागण्यामुले खूप वाईट वाटले आहे त्यामुळे तिला जाऊन sorry म्हण आणि परत अशी चूक होणार नाही याची हमी दे. त्यानंतर सोहम आकांशाला sorry म्हणतो आणि ते दोघे अनुज पाहिल्यासारखे राहतात. या सगळ्यात त्याचं मैत्रीच नात आजू घट्ट झाल होत १० वी नंतर दोघेही ITI करतात आणि सोहमला जॉब साठी बाहेर गावी जाव लागत तो बाहेरगावी जाणार आहे हे ऐकताच आकांशाच्या डोळ्यात पाणी आल आत्तापर्यंतच्या सोबतीमध्ये त्याचं मैत्रीच नात मैत्रीपेक्षा खूप पुढे गेल होत आत्ता ते दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते हे त्यांनाही माहिती नव्हत कि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.

खरतर सोहमच स्वप्न होत कि त्याने गितकार व्हाव खूप गाणी लिहावी आपली पण या जगामध्ये ओळख निर्माण व्हावी मला माझ्या वडिलांच्या नावाने नाही तर माझ्या नावाने वडिलांना ओळखतील अस काही तरी त्याला करायचं होत आणि आकांशाला हि सोहमला मोठा गीतकार झालेलं पहायचं होत पण आकांशा काही सोहमला सांगू शकली नाही. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या इछेचा गळा दाबला आणि तो जॉब करण्यासाठी बाहेर गावी गेला पण तिथेही त्याच कामावर लक्ष लागेना त्याला आकांशाची सारखी आठवण येत होती आणि तो घर सोडून पहिल्यांदाच बाहेर आला होता तो ज्या कंपनी मध्ये जॉब करत होता त्या कंपनी मध्ये २ महिनेपण टिकू शकला नाही त्याने दोनच महिन्यात तो जॉब सोडला आणि घरी निघून आला. सोहमने जे केले ते बरोबरच होते जर एखाद्या कामात जर आपले मन रमत नसेल तर ते काम सोडून दिलेलाच केव्हाही चांगल सोहम घरी सर्वात पहिल्यांदा त्याने अकांशाला विचारले सोहमच्या आईने सांगितले कि आकांश तिच्या रानात गेली आहे हव तर फोन करून बोलून घेते सोहम म्हणाला नको मी तिला रानातच जाऊन भेटतो तस पण मला पप्पांना सांगायचे आहे मी आलेलो. त्यामुळे मीच जाऊन भेटतो त्यांना अस म्हणून तो घरातून निघून जातो रानात गेल्यावर आकांशा सोहमला बघून खूप खुश होते आणि त्याला मिठी मारते आणि एका पाठोपाठ प्रश्नांचा भडीमार करते त्याच्यावर एवढ्या उशिरा का आलास मला तुझी खूप आठवण येत होती एवढे दिवस झाले एक फोन पण नाही केला ती अचानक बोलायची थांबते आणि लागून तिथून जाण्यसाठी पुढे पाउल टाकते तेवढ्यात सोमम तिचा हात धरतो आणि मागे खेचतो आणि अकांशाला विचारतो तुला माझी इतकी का आठवण येत होती.

आकांशा घाबरलेल्या आवाजामध्ये उत्तर देते तू माझा खूप जवळचा मित्र आहेस न म्हणून आणि आपण दोघे काधीच एकमेकांना सोडू अस लांब राहिलो नाही त्यामुळे जास्तच आठवण येत होती त्यावर सोहम अकांशाला विचारतो तुला मी सारखा तुझ्या जवळ हवा आहे का आकांश त्यावर माल डोलवत हो म्हणते सोहम तिला परत विचारतो आणि अस वाटण्यापाठीमागचे कारण काय आहे आकांशा तिथून लाजून निघून जाते आणि जाता जाता सोहमला म्हणते तुला कारण हव असेल तर वाट बघावी लागेल सोहम आणि आकांशा याच्यामधील प्रेम आत्ता बाहेर यायला लागले होते जे त्यांनी एवढ्या दिवस एकमेकांपासून लपवून ठेवलं होत हे खर आहे कि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासमोर आपण आपल्या मनातल त्याच्यासाठीच प्रेम कधीच लपवू शकत नाही आणि ते समोरच्याला कळत असत पण त्यालाही ते दाखवायचं नसत. सोहम जेव्हा सायंकाळी घरी येतो तेव्हा त्याचे वडील त्याच्यावर कूप रागावतात. तो त्याची जॉब सोडून आलेला असतो आणि त्याच्या वडिलांना याची काहीच कल्पना नसते त्यामुळे त्याचं सोहमवर रागवण साहजिकच होत सोहम आणि त्याच्या वडिलांचा आवाज ऐकून आकांशा घरातून बाहेर येते आणि सोहमच्या घरी जाते काय झाल हे बघायला सोहमच्या घरात गेल्यावर आकांशा सोहमच्या वडिलांना विचारते काय झाल काका तुम्ही एवढ्या जोरात कोणाला रागावताय त्यावर सोहमचे वडील रागीट आवाजामध्ये बोलतात अजून कोणावर ओरडणार हे आमचे कुलदीपक साहेब आम्हाला न विचारता स्वतःच स्वताचे निर्णय घ्यायला लागले आहेत एवढे मोठे झाली कि आम्हाला विचारायचे सुद्धा गरजेचे वाटले नाही त्यावर आकांशा सोहमाच्या वडिलांना शांत करत म्हणते की, काका तुम्ही त्याची बाजू तरी ऐकून घ्या काय माहिती त्याच्या अस करण्यापाठीमागचे कारण तरी समजून घ्या. त्यावर सोहमचे वडील म्हणतात बोला साहेब अस का केल तुम्ही त्यावर सोहम म्हणतो त्या कामात माझ मन गालात नव्हत त्यामुळे मला ते काम व्यवस्थित करता येत नव्हत आणि एखादी गोष्ट जबरदस्तीने करण्यात काहिच अर्थ नाही.

सोहमचे वडील म्हणतात अरे मग आम्हाला सांगायचं ना आम्ही त्याच कंपनी मध्ये दुसर काम दिल असत तुला पण अस माघारी यायची काय गरज होती सोहम आणि सोहमचे वडील हे दोघेही एकमेकांना समजून घेत नव्हती सोहम अचानक बोलतो बास आत्ता या विषयावर चर्चा मला नाही बोलायचं या विषयावर एवढ बोलून सोहम घरातून बाहेर जातो. त्याला समजवण्यासाठी आकांशा त्याच्या पाठीमागे जाते सोहम त्याच्या घरासमोरच्या बाकावर जाऊन बसलेला असतो. आकांशा त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि सोहम ला विचारते काय झाल तुला चिडायला तू अस नाही करायला पाहिजे होत त्याचं तुझ्यावर रागवण साहजिकच आहे आणि तू येतानापण त्यांना नाही सांगितल. त्यावर सोहम म्हणतो तुला तर त्यांचीच बाजू घेणार ना मला कोणीच नाही समजून घेत नाही त्यावर आकांशा म्हणते तुला कोणीच समजून घेत नाही अस समजू नको तुझी काळजी आहे सर्वांना पण आत्ता तू चुकला आहेस. आणि तू आत्ता रागात आहेस त्यामुळे तुला काही कळत नाही आत्ता तू घरी जाऊन शांत झोप आपण उद्या बोलू तोपर्यंत तुझा आणि तुझ्या बाबाचा राग कमी होईल. आणि अस म्हणून आकांशा घरी जायला उठते तेवढ्यात सोहम अकांशाचा हात पकडतो आणि तिला थांबवतो आणि म्हणतो तू रानात काहीतरी म्हणत होतीस आकांशा सोहमला लाजून म्हणते तुला त्याच्यासाठी अजून थोडी वाट बघावी लागेल आणि अस म्हणून आकाश तिथून निघून जाते.

सकाळी सोहम उठल्यावर रानात जातो तेवढ्यात आकांशा सोहमला शोधात त्याच्या घरी येते आणि त्याच्या आईला विचारते सोहम कुठे गेला आहे अकांशाने आज सोहमने दिलेला पंजाबी ड्रेस घातलेला होता आज तिचा वाढदिवस होता ती सोहमला शोधात रानात जाते आणि सोहम कडे जाऊन सोहमला विचारते आज मी कशी दिसतेय त्यावर सोहम मुद्दाम तिला तंग करण्यासाठी तिला म्हणतो जशी रोज दिसतेस तशीच नंतर सोहम अकांशाला विचारतो पण तू आज का विचारल मला आज काही स्पेशिअल आहे का अकांशाला वाटत कि सोहम तीचा वाढदिवस विसरला आणि काही स्पेशिअल नाही म्हणून तिथून निघून जाण्यासाठी मागे फिरते तेवढ्यात सोहम तिचा पाठीमागून हात पकडतो आणि तिला hug करून Happy Birthday Wish करतो. आकांशा म्हणते तुला माहिती होत तर आधी का नाही wish केल सोहम म्हणतो असच तुला चिडवण्यासाठी तुझ्या या छोट्याश्या नाकावर राग नाही सूट करत त्यानंतर आकांशा म्हणते हे काय आहे सोहम म्हणतो काय काय आहे आकांशा म्हणते हे काय करतोयस त्यावर सोहम म्हणतो तुला hug करतोय आकांशा विचारते का सोहम त्यावर विचारतो का तुला मी hug नाही का करू शकत त्यावर आकांशा म्हणते करू शकतोस सोहम तिला परत विचारतो तू त्यादिवशी काय म्हणत होतीस आत्ताच नाही सांगणार त्यावर सोहम तिला विचारतो माझ्यावर प्रेम करतेस आकांशा नाही अस उत्तर देते सोहम त्यावर म्हणतो तू खोत बोलतेस आकांशा त्याला विचारते कस ते सांग हे बघ तुला जर हाच प्रश्न दुसऱ्या कुणी विचारला असता तर तू काय केल असत आकांशा म्हणाली मी त्याला नाही म्हणून तोथून निघून गेले असते मग सोहम त्यावर म्हणतो मी तुला मागशीपासून hug करून थांबलो आहे आणि मी तुला माझ्यावर तुझ प्रेम आहे का नाही हे पण विचारल तरी तू रागावली नाहीस कि माझ्यापासून लांब नाहीस गेली मग कस प्रेम नाही संग त्यावर आकांशा त्याला hug करते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत सोहम तिला विचारतो काय झाल तुला रडायला आकांशा म्हणते मी कितीदिवस हेच ऐकण्यासाठी आतुर झाले होते मी तुझी प्रेत्येक वेळेस वाट बघत होते कधी तू मला तुझ्या मनातल सांगणार आहेस. आकांशा आणि सोहन एकमेकांच्या मनातल सांगत असतात तेवढ्यात तिथे अकांशाचे बाबा येतात आणि त्यादोघांना एकमेकांच्या मिठीत बघुत ते खूप चिडतात आणि अकांशाला तिथून घरी घेऊन जातात. संध्याकाळी सोहमचे बाबा घरी आल्यावर घडलेल्या प्रकरणावर चर्चा होते आणि सोहमचे बाबा आकांशा आणि सोहमला विचारतात तुम्ही आम्हाला किती दिवसापासून खोत बोलत आला आहात किती दिवसापासून चाललाय हे सगळ त्यावर आकांशा तिच्या आई बाबाला समजावण्याचा प्रयत्न करते कि तिने तिच्या आई बाबाचा विश्वास आणि त्यांची मान खाली जाईल असे काम केले नाही आकांशा तिच्या बाबाला सांगते सोहमला मी आजच सकाळी सांगितल आहे माझ्या मना काय आहे ते आणि मी अस कोणताच काम करणार नाही जेणेकरून तुमची मान खाली जाईल आकांशा सोहमच्या बाबांकडे जाते आणि त्यांना म्हणते कि बाबा माझ सोहमवर खूप प्रेम आहे. आणि त्याच्याशिवाय नाही राहू शकत त्यावर अकांशाचे बाबा म्हणतात काय आहे त्याच्याकडे तुला खुश ठेवण्यासाठी न स्वतःच घर नाही नोकरी साधी दीड दमडी कमावण्याची अक्कल नाही आणि निघालेत प्रेम करायला आधी स्वतःच्य पायावर नित उभा राहा म्हणाव साहेबांना आणि नंतर माझ्या मुलीचा विचार करा. अस म्हणून अकांशाचे आई बाबा आकाशाला तिथून घेऊन चालले असतात तेवढ्यात सोहम त्यांना थांबवतो आणि म्हणतो माझ्याकडे स्वतःच घर नाही मी जॉब करत नाही म्हणून मी तुमच्या मुलीसाठी योग्य नाही का पण मला सांगा हे सगळ ऐश्वर्य असणारा एखादा मुलगा तुम्हाला मिळाला आणि तुम्ही त्याच्यासोबत अकांशाचे लग्न लाऊन दिल तर ती आयुष्यभरासाठी खुश राहील का त्याच्यासोबत त्यावर अकांशाचे वडील म्हणतात ते मला माहिती नाही पण तु आजपासून माझ्या मुलीपासून दूर राहिचस परत माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही आणि अस म्हणून अकांशाचे वडील अकांशाला घरी घेऊन जातात. त्यानंतर सोहम त्याच्या वडिलांना बोलतो तुम्ही का काहीच नाहीत बोलला त्यावर सोहमचे वडील म्हणतात काय बोलायचं होत मी तुझ्या बाजूने ते जे बोलून गेलेत ते खर आहे तुझी तू चालू जॉब सोडून आलास कोणत्या तोंडाने मी त्यांना त्यांची मुलगी मागणार होतो. हे ऐकल्यावर सोहम त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसतो दोन दिवसानंतर सोहमला अकांशाच्या घरी गाड्यांची गर्दी झालेली दिसते काय झाल हे बघण्यासाठी सोहम गेटवर जातो तेव्हा त्याला समजत कि आकांशा साठी तिच्या वडिलांनी मुलगा पहिला आहे. अकांशाच्या घराचे पाहुणे गेल्यावर सोहम अकांशाच्या घरी जातो आणि अकांशाच्या बाबांना विनंती करतो कि तिच्या दुसर्या मुलासोबत लग्न लाऊन देऊ नका आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. त्यावर अकांशाचे वडील चिडून बोलतात मी तुला सांगितल होत ना अकांशाचा नाद सोडून दे म्हणून तरी तू परत आलास माणसाने अंथरून पाहून पाय पसरावे आणि स्वप्न अशीच बघावीत जी कधी पूर्ण होऊ शकतात. त्यावर सोहम म्हणतो बाबा माझ हे स्वप्न तर नक्कीच पूर्ण होणार तुमच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या आशीर्वादाशिवाय एवढ म्हणून सोहम तिथून निघून जातो. त्याला खूप वाईट वाटत होत आपली प्रियासी आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्याची होतेय त्याला अकांशाच्या मैत्रिणी कडून समजते कि तिचा साखरपुडा परवा दिवशी आहे आणि तिच्यासोबत अकांशाने सोहमसाठी पत्र पाठवल होत ज्यामध्ये तिच्या भावना पेनाच्या शाईने रेखाटल्या होत्या त्या पत्रामध्ये ती म्हणते.

सोहम मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत बाबा माझे जबरदस्ती लग्न लाऊन देतात माझ्या मनाविरुद्ध वागायला मला भाग पडतात. मी फक्त तुझीच आहे. आयुष्यात लग्न फक्त एकदाच होत आणि ते मला दुसर्या कोनासोबातही करायचं नाहीये मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा please तू मला या सगळ्यातून लांब घेवून जा मी जर तुझी नाही झाले तर कोणाचीच नाही होणार मी लग्नाच्या मंडपात स्वतःचा जीव देईन हे पत्र वाचल्यावर सोहमला थोडा धीर मिळतो आणि सोहम त्या पत्राच्या उत्तरात दोघेही लग्नाच्या आदल्या दिवशी पळून जाण्याची योजना आखतात. आणि योजने प्रमाणे ते दोघेही गावातून बाहेर येतात आणि त्यांच्या नवीन आयुष्याला सुरवात करतात सोहम अकांशाला घेऊन खूप दूर निघून जातो तिथ गेल्यावर दोघेजण लग्न करतात आणि सगळ काही सुरळीत चाललेलं असत २ वर्षानंतर त्यांना एक गोंडस मुलगी होते आणि भावनेच्या भरात अकांशाचा स्वतावर कंट्रोल राहत नाही आकांशा तिच्या आईला फोन करते आणि दोघांच्या चुकीबाद्धाल माफी मागते आणि त्यांच्या मिलचा फोटो त्यांना पाठवते मुलीचा चेहरा बघून नातवंडाच्या प्रेमासाठी त्यांचे आई-वडील त्यांना माफ करतात. आणि परत घरी बोलावतात हि आनंदाची बातमी देण्यासाठी आकांशा सोहमला फोन करते पण सोहांचा फोन बंद लागतो सोहम घरी आल्यावर आकांशा त्याला जोरात मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत सोहम अकांशाला विचारते काय झाल तुला त्यावर आकांशा सांगते मी सकाळी आईला फोन केला होता सोहम गंभीरपणे विचारतो मग काय झाल काय म्हणाल्या त्या आकांशा हसत हसत सांगते त्यांनी आपल्याला माफ केल आहे आणि आपल्याला घरी सुद्धा बोलावल आहे. हे ऐकून सोहम पण खूप खुश होतो.

सोहम आणि आकांशा दुसर्याच दिवशी त्यांच्या गावी जातात आणि दोघांच्या हि घरच्यांची माफी मागतात अकांशाचे वडील म्हणतात खर तर माफी आम्हाला मागायला हवी पोरांनी आम्ही तुमच्या प्रेमाला नाही समजू शकलो. आम्हाला माफ करा तुम्ही आमच्यापासून लांब गेल्यावर आम्हाला समजल. मुलाचं प्रेम काय असत. आत्ता तुम्ही इथूण कुठेही जायचं नाही अस म्हणून सोहम च आणि अकांशाचा गृहप्रवेश होतो. आणि ते दोघेही आनंदाने आपल आयुष्य जगतात.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED