Mitranche Anathashram - 13 books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १३

काल रात्रीचं मनात असुन सुद्धा सर्व मित्र काहीच नाही घडलं असा आव आणून काम करत होती.
बाकीचे सर्व कामात असल्याने संजयच्या आई ने मला रजनीला घ्यायला घरी पाठवले. तिची आई सांगत होती की, "त्या महाराणी उशीरा उठतात आणि एकटी येणार नाही ती, कुणीतरी पाहिजे बरोबर..."
मी संजयच्या घरी गेलो तेव्हा रजनी तयार होती. तिला घेऊन मी आश्रमात आलो. आतापर्यंत अकरा वाजले होते आणि पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली होती. कार्यक्रमात प्रत्येकाच्या ओळखीचे कुणी ना कुणी होते. माझ्या ओळखीचे जास्त कुणी येणार नाही म्हणुन मी एका खुर्चीवर निवांत बसलो होतो.
दोन मुली आल्या तेव्हा त्यांच्याकडे सर्व मुलं धावत गेले आणि त्यांचं स्वागत करत त्यांना माझ्या जवळ बसवलं. माझी त्या मुलींशी काही ओळख नव्हती. संजय, विवेक आणि आम्या त्यांची कामं संपवून आले. संजय ने आल्यावर त्या मुलींची ओळख करून देताना सांगितले, तेव्हा समजले की त्या संध्या आणि निशा आहेत. माझी जास्त ओळख नसल्याने मी काही जास्त बोललो नाही. आम्या ने एक मुलाला सांगितले की ताईला बाबांच्या खोलीत घेऊन जा आम्ही आलो. संध्या आणि निशा सुरेश काकांच्या खोलीकडे जात असताना मला संजय ने केलेलं संध्याच वर्णन आठवलं आणि वाटलं की तो बोलला त्यापेक्षा ती जास्तच सुंदर आहे. निशा संध्या ची मैत्रीण असली तरी तिची सावली वाटते, सख्या बहिणी आहेत असच वाटलं.
संजय कुठेतरी गेला आणि कुणालातरी घेऊन सुरेश काकांच्या खोलीत गेला. आम्या आणि विवेक मलासुद्धा त्यांच्या बरोबर घेऊन गेले. तिथे गेल्यावर समजले की संजय संध्याच्या आईला आणि मामाला घेऊन आला होता. सर्वांची ओळख संजय ने करून दिली. त्यानंतर कार्यक्रमासाठी एक एक करून सर्व मंडपात गेले. ठरल्याप्रमाणे संध्या आणि संजय शेवटी बाहेर पडतील अशी सोय करून आम्ही बाकी सर्व बाहेर येऊन संध्याच काय उत्तर असेल त्याची वाट पहात होतो. बऱ्याच वेळानंतर ते दोघं बाहेर आले. संजयला आम्ही बाजूला घेऊन गेलो. आम्ही तिघेही संजय काय बोलेल याकडे लक्ष देऊन ऐकत होतो. संजय बोलला, "ती हो म्हणाली."
मी, "मग आता पुढे काय ?"
आम्या, "लग्नाचा धूमधडाका, तुझं झालं आता माझं सरप्राइज"
संजय, "आजपासुन तुला दुसरीकडे कामाला जाण्याची गरज नाही. मी आणि तु एका दुकानाचे पार्टनर आहोत."
आम्या, "म्हणजे ?"
संजय, "म्हणजे आता तु मालक झाला आहे. मी खुप शोधले, शेवटी एका माणसाने स्वस्तात दुकान मला विकले."
आम्या, "थँक यू"
संजय, "ते काही बोलू नको, ही दुकानाची चावी घे आणि मजा कर"
असे बोलुन संजयने चाव्या त्याच्या हातात दिल्या.
विवेक, "मला ?"
संजय, "ते बघ मागे आहे."
आम्ही सर्वांनी मागे पाहिले तर तिथे निशा होती.
विवेक, "ही तर निशा आहे."
निशा, "हो मीच आहे, वेडा आहे खरंच, किती वेळा तुला इशाऱ्यात समजवण्याचा प्रयत्न केला. पण तुला समजलेच नाही. ज्या दिवशी पहिल्यांदा तुझ्याशी फोनवर बोलली तेव्हाच तुझ्या प्रेमात पडली होती. हो, मला सर्व माहिती आहे स्वाती बद्दल, संध्या बद्दल पण आता त्यांना विसरायचं. मी याबाबत संध्याला पण काही सांगणार नाही, म्हणून काळजी करू नको तुमची मैत्री तशीच राहील. आता जास्त तोंड मारत फिरायच नाही. फक्त माझ्याबरोबर राहायचं, हा सेमीस्टर पॅटर्न बंद कर आता. कधीची मीच बोलते आहे, तु पण बोल ना काहीतरी"
आम्या, "तु त्याला बोलायला वेळ देणार तेव्हा तो बोलेल ना ?"
निशा, "तु चूप रे"
संजयने आम्याला शांत राहण्याचा इशारा केला.
निशा, "आम्हा दोन प्रेम करणाऱ्या माणसांना तुम्ही एकांत देणार का ?"
संजय, "पण हा हो कुठे म्हणाला ?"
विवेक, "पण मी नाही सुध्दा कुठे बोललो."
सर्व हसायला लागले आणि आपापल्या कामाला गेले.
सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मी विवेकचा विचार करत होतो की एकदाचा कुणाच्यातरी तावडीत तो सापडला आणि निशा त्याला बरोबर सरळ करेल. अश्याच विचारात असताना समोरून संजय आला त्याच्या पाहुण्यांची ओळख करून देत म्हणाला, "हा रजनीचा वर्गमित्र"
त्याच्याबरोबर थोडा वेळ बोलल्यानंतर संजय त्याला घेऊन गेला. मला तो गेल्यावर आठवले की रजनीच्या लग्नासाठी हाच मुलगा पाहिला आहे. कार्यक्रमाच्या तयारीत रजनी आणि माझी चांगली ओळख झाली होती. तिच्या भावाने तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधले याच विचारात असताना, रजनी कुठूनतरी माझ्या समोर आली.
रजनी, "काही काम नाही का तुम्हाला ?"
मी, "नाही, सर्व काम करून झाले."
रजनी, "काय विचार करत होते"
मी, "विवेक आणि निशाचा विचार करत होतो, किती अचानक घडलं सर्व"
रजनी, "हो ना, दादा आणि संध्या वहिनीच सुध्दा जमलं आणि अमर दादाला पण त्यांचं प्रेम म्हणजे दुकान मिळाल"
मी, "हो ना, खुप छान दिवस आहे आजचा"
रजनी, "सर्वांना काही ना काही मिळालं, तुमचं काय ?"
मी, "तुझ्या दादाने सांगितलं आहे की माझ्यासाठी पण एक सरप्राइज आहे पण अजून मिळाले नाही."
रजनी, "मला काहीतरी विचारायचं होत तुम्हाला?"
मी, "बोल ना ?"
रजनी, "तुमच्या वागण्या बोलण्यावरून, राहणीमानावरून तुम्ही खुप साधे आणि एखाद्या मध्यम वर्गीय कुटुंबाचे वाटतात. पण विवेक दादा सांगत होता की तुम्ही शाळेत होते तेव्हा खुप श्रीमंत होते. मग काय झालं, इतके साधे का राहतात ?"
मी, "नाही काही कारण, मला साधं राहायला आवडतं बस"
रजनी, "मग तुमचे आई बाबा ?"
मी, "वारले ते"
रजनी, "तुमचं पूर्ण नाव काय आहे ?"
मी, "समीर हरी देशमुख"
रजनी, "हरी देशमुख हे नाव कुठेतरी ऐकले आहे"
मी, "खुप सामान्य नाव आहे, खुप लोकांचं असतं नाव सारखं"
रजनी, "तुम्ही समीर देशमुख म्हणजे एस. डी. कंपनी चे मालक ना ?"
मी, "ये हळू बोल जरा आणि कुणाला सांगू नको"
रजनी, "काही काळजी करू नका, कुणाला सांगणार नाही"
मी, "पण तु इतके प्रश्न का विचारते आहे ?"
रजनी, "तुमच्याबद्दल माहिती मिळावी, तुम्ही खुप आवडले ना मला म्हणुन..."
मी, "काय ?"
रजनी, "हो, पहिल्यांदा तुम्हाला पाहिले तेव्हाच एक प्रकारचं आकर्षण वाटायला लागलं त्यानंतर सजावट करताना माझ्या हाताला लागलं तेव्हा किती काळजी घेतली तुम्ही माझी, तो तुमचा स्वभाव खुप आवडला मला, तुमची साधी राहणी आवडली मला, तुम्ही आवडले मला, आता तुमच्याशी बोलल्यावर वाटत की प्रेमात पडले तुमच्या, तुम्ही श्रीमंत आहात म्हणुन नाही बरं का, श्रीमंत असूनसुद्धा कसल्याप्रकरचा दिखावा नाही. तुम्ही माझ्याशी लग्न करणार का ?
तुमच्याशी लग्न करावे आणि आनंदाने राहावे हीच इच्छा आहे माझी.
मी ठरवलं आहे, आता जगायचं तर तुमच्याबरोबर, नाहीतर नाही जगायचं,
सांगा, करणार ना माझ्याशी लग्न ?"

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED