नाते बहरले प्रेमाचे - 1 Reshu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते बहरले प्रेमाचे - 1

नमस्कार वाचक मंडळी.. कसे आहात सर्व I know सर्व ठीक असाल आणि कोरोनाचा कहर वाढतच आहे तर स्वतः ची आणि आपल्या परिवाराची नक्की काळजी घ्या...तर मी एक नवीन स्टोरी लिहायला घेतली.. तुम्ही माझी पहिली स्टोरी गाठ प्रेमाची तिला जेवढं प्रतीसाद दिलं तेवढं ह्या स्टोरी ला पण प्रेम द्याल अशी अपेक्षा.. चला तर वाचा आणि समीक्षा पण द्यायला विसरु नका






द सोरते गृप चा सिईओ .... विक्रांत सोरते चेहर्यावर मिलियन डॉलर इतका राग...नेहमीच कमी आणि कामापुरता बोलणारा तरी पण मुली त्याच्या जीव ओवाळून टाकत होत्या. त्याला कारण पण तसाच...... जिममध्ये कमावलेलं पिळदार शरीर.... ट्रिम केलेली बियर्ड.. मोस्ट सक्सेस फुल बिझनेस मॅन....उंच आणि नेहमी नाकावर राग ठेवणारा आणि मोस्ट handsome च्या यादीत पहिल्या स्थानावर असलेला असा हा विक्रांत सोरते ... तर तो आज नागपुरला आला होता..


तर दुसरीकडे पुण्याला सोरतेंच्या घरात जोरदार तयारी चालू होती वाड्याच्या बाहेर छान लायटिंग आणि फुलांनी मोठ . मोठ्या माळांनी सजवलेला वाडा आज नव्या नवरी सारखा सजला होता ....कारण पण तसच होतं.. सोरते घराण्यातील विजय सोरते यांचे मोठे चिरंजीव विक्रांत सोरते ह्याचा उद्याला लग्न जो आहे ... मग तयारीला तर काही सिमाच नव्हती... विक्रांतची आजी शकुंतला सोरते आज ती खुप आनंदात होती... आजीला सोरते परिवारात सर्व आईसाहेब बोलायचे....आणि शकुंतला यांचीच सासुबाई म्हणजे अनुसया सोरते ज्या खुप म्हातार्या आहेत पण घरात सर्व त्यांच्यावर जिवापाड प्रेम करायचे तर विक्रांतची पर आजी अनुसया सोरते त्या म्हणजे एक नंबरच्या विसळभोळ्या त्याना साधी सकाळची गोष्ट विचारली तर त्या भलत्याच काही तरी सांगायच्या पण घरात सर्वानाच माहिती होतं त्यामुळे त्यांची काही प्राॅब्लेम नव्हतीच.. प्राॅब्लेम होती ती म्हणजे विक्रांतची माॅम थोडी गर्विष्ठ स्वभावाची आणि नेहमी हाय सोसायटीट राहणारी तर तीने मुलीचा फोटो पाहीला आणि तिला ती एकदम साधारण आणि जास्तच घरेलू स्वभावाची वाटली

Mother-in-law.. २ मला नाही वाटत ही मुलगी माझ्या विक्रांत साठी बरोबर आहे.. फोटो मध्ये बघा ना कीती साधी आहे.. माझ्या मुलाला तर छानशी परी भेटायला हवी... " विक्रांतची माॅम शकुंतला आई साहेबांना बोलली..

होका ग शुभलक्ष्मी म्हणजे तुला तुझ्या सारखी चेहर्यावर नेहमी मेक अप चोपडवून राहणारी सून हवी.... " आई साहेब त्यांच्या करारी आवाजात बोलल्या

ती अनुसया आजी तर खळखळून हसायला लागली आणि बोलली.. अगं शकुंतला तिला शुभलक्ष्मी नको बोलूस तिचा नाव सॅम आहे.." अनुसया आजी बोलली

हे बरं लक्षात राहते तुम्हाला आजी... " विक्रांतची माॅम तोंड वाकडं करत पुटपुटली

अग बया खरंच की मी कशी काय विसरली.. आई साहेब पण अनुसया आजी ला दुजोरा देत हसून बोलल्या...

खरंच आई साहेब विक्रांतला पण लग्न करायचं नाही आहे.... " विक्रांतची माॅम

बास् खुप झालं आणि विक्रांतचं लग्न हिच्याशीच होणार काय कमी आहे मुलीमध्ये दिसायला सुंदर आहे.. आणि सर्वात महत्त्वाचं ती मुलगी वकीलीचं शिक्षण घेत आहे.. तुझ्या सारखी नाही रिकामटेकड्या सारखी किटी पार्टी करणारी आणि विक्रांत माझ्या शब्दाचा बाहेर जाणार नाही अशी गोष्टच नाही तो लग्नाला तयार झाला... " आई साहेब

तुम्ही विक्रांतला इमोशनली ब्लॅक मेल करून लग्नाला तयार केलं आहे.. " विक्रांतची माॅम

इथे मधा मधात करण्या पेक्षा जाऊन लग्नाची तयारी कुठपर्यंत आली ते जाऊन बघ... आज सन्ध्याकाळी विक्रांतच्या हळदीचा कार्यक्रम आहे ते पण बघ जरा " आई साहेब विक्रांतच्या माॅमला सळर इग्णोर करत बोलल्या

तसत विक्रांतची माॅम तोंड वाकडं करून तिथून निघून गेली... तेवढ्यात तिथे कल्पना बाई आल्या तर ह्या आहेत विक्रांतच्या लहान काकु मिसेस संध्या सोरते.. आणि सोबत भाग्यश्री ही विक्रांतची मोठी वहीनी व संध्या यांची मोठी सून..

. अगं मम्मा हळु येना माझी छोटूसी परी तुझ्या टमी मध्ये झोपली आहे शांत....आणि काही लागलं तर सांगायचं ना मी आणून दिलं असतं तुला... " आरूष बोलला... आरूष हा 5 वर्षाचा भाग्यश्री हीचा मोठा मुलगा आणि भाग्यश्री ला आता आठवा महिना लागला होता म्हणून आरूष काळजीने आपल्या मम्मी ला सांगत होता..

अगं माझं पिल्लू किती मोठ्या सारखा वागतो.. आई साहेब आरूष चा लाड करत बोलल्या. ...

ओके आजी मला नवीन चाचीची फोटो दाखव ना... " आरूष

ओके बघ...

आरूष ने आरोहीची फोटो पाहीली आणि ओरडत... वाॅव चाची कीती ब्युटिफुल आहे... मी चाचुच्या जागी असतो तर मी हिच्याशी लग्न केलं असतं..." हे भगवान मुझे कुछ साल पहिले इस पृथ्वी पर लाते तो मे शायदही आज चाचीसे शादी कर पाता .. लेकीन भगवान तेरा भी सही है.. अच्छे के साथ कभी अच्छा नही होता.. " आरूष सॅड आणी वरती देवाकडे पाहत बोलला...

तिथे बसलेल्या सर्व लेडीज आ वासून आरूष कडे पाहत होत्या... आणि जोरात हसू पण लागल्या



**************************************************************"**



तर नागपूर मध्ये...

एका नामांकित heart of nagpur cafe and Restro मध्ये विक्रांत एका व्यक्तीची आवर्जून वाट पाहत होता. ... त्याचा डोक्याच्या नसा फुटायची वेळ आली होती कारण तो मागच्या एका तासापासून त्या व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत होता.... त्याला तर असं झालं होतं जसा ती व्यक्ती येईल तसाच तो त्याचं डोकं फोडूंनच दम घेईल..

काही वेळाने तिथे एक मुलगी आली... तिची स्कुटी पार्क केली आणि कॅफेमध्ये आली आणि शाॅक त्या कॅफेमध्ये कोणीच नव्हतं... तसच तिथे एक बाॅडीगार्ड आला आणि त्याने त्या मुलीला कॅफेमधल्या प्रायव्हेट केबिनमध्ये जायला सांगितलं... जेव्हा ती आत गेली.. तिथे विक्रांत बसला होता. ..

विक्रांतच लक्ष त्या मुलीकडे गेला.. विक्रांत तर त्या मुलीकडे संमोहित झाल्यासारखं पाहत होता.. तिने ग्रिन कलरचा सुट आणि त्यावर लाल नेटचा दूपट्टा कानात नाजुकसे आणि छोटेसे झुमके आणि गळ्यात चैन अजून तिच्यावर हळदीने उठून दिसणारं तिच्या चैहर्यावरचा ग्लो... आणि नुकताच सकाळी हातात भरलेला हिरवा चुडा... तर ही विक्रांतची होणारी बायको.. आरोही आर्या दिसायला सुंदर आणि साध्या सळर स्वभावाची ... एकदम शांत ..

तुम्ही विक्रांत सोरते... " आरोहीने विचारलं तेव्हा जाऊन विक्रांत भानावर आला..

येस... बस तिथे.... " विक्रांत रुडलु आणि सामोरं च्या चेयरकडे बोट दाखवून बोलला..

आरोही काही बोलणार त्या आधीच विक्रांतने तिच्या सामोरं पेपर्स सरकवले... Read this...

आरोहीने ते पेपर्स वाचले आणि पेन घेऊन त्यावर साईन करणार त्या आधीच... विक्रांतचा तिच्या कडे लक्ष होता पेपर्स वाचतांनी आरोहीच्या चेहर्यावर कसलेही भाव नव्हते...

तुझ्या कडे दूसरा पण optionआहे.... इथून नेहमी साठी पळून जा.. म्हणजे मला तुझ्याशी लग्न करावं लागणार नाही..वाटेल तर मी तुला जेवढा पैसा हवा तेवढा द्यायला तयार आहे " विक्रांत निर्विर्कारपणे बोलला

साॅरी तुम्ही पण ह्या लग्नाला नकाउ देऊ शकता.. " आरोही हळू पण त्याच्या टोनमध्यै बोलली

How dare you😡 माझ्या सामोरं बोलणारी आहे कोण तू...मी माझ्या आई साहेब यांचा एकही शब्द खाली जाऊ देत नाही... त्यांनी मला शपत देउन ह्या लग्नाला तयार केलं आहे... " विक्रांत चिडून बोलला कारण आजपर्यंत तरी त्याने कोणालाही इतकं एक्सप्लेन केलं नव्हत

Exactly माझंही तसच आहे मी पण माझ्या मामाजींचा एकही शब्द वाया जाउ देतं नाही... " आरोही तिच्या आवाजात बोलली

ओके as you wish... पण लक्षात ठेव आपलं लग्न झाल्यावर माझ्या कडून कसल्याही अपेक्षा ठेवायच्या नाही नवरा बायकोचं आपल्यात कोणतचं रिलेशन राहणार नाही you remember..... " विक्रांत

तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही.. तुम्ही ह्या काॅन्ट्रॅक्ट पेपर्स वरच लिहलं आहे सर्व.... " आणि आरोहीने वेळ वाया न घालवता त्या पेपर्स वर साईन केलं

काॅफी... " विक्रांतने रूडली पण थोड्या हळू आवाजात विचारलं

No.. Thanks.. आणि ती निघाली होती तर विक्रांतने काॅल करून

ड्रायव्हर काका यांना यांच्या घरी सोडून द्या.. " विक्रांत

नाही मी माझ्या गाडीने आली आहे तर गरज नाही आहे... " आरोही बोलली आणि स्कुटीची चावी घेऊन निघून गेली..


===================================================

आरोही एका ठिकाणी गेली गाडी बरोबर पार्कींग एरियात लावून गार्डन च्या आत गेली.. तो गार्डन पण आज रिकामा होता...

. थोड्याच वेळात तिथे समीर आला.. तोच तर एक होता जे आरोही त्याच्याजवळ मन मोकळं करायची...

हाय आरोही कशी आहे... आणि तुला नाही का वाटत तु लग्नाचा निर्णय घेऊन स्वतः ची लाईफ बरबाद करत आहे " समीर

हो माहिती आहे मला आणि मला काय झालं बरी व्हायला... " आरोही हसत बोलली

आरोही गोष्ट बदलून काही अर्थ नाही.. आणि तु लग्न कोनाशी करत आहे तो मुलगा ज्याला तु पाहिलं सुद्धा नाही.. आणि दोन दिवसा अगोदर तुला पण तुझ्या लग्ना बद्दल माहिती नव्हतं... " समीर

माझा निर्णय झाला आहे समीर.. तर एकच एक गोष्ट मला रिपीट सांगु नकोस.. " आरोही

ओके रिलॅक्स.. आज किती खाली आहे ना हा गार्डन नाही तर नेहमी लोकांनी भरलेला असतो... " समीर

हो माझ्या सारखाच एकदम खाली आहे.. ज्यात कोणत्याही प्रकारचे लोक अजून इतर काही येऊन आरामशीर काहीही करु शकतात... " आरोही

यार प्लीज तुझी लाईफ काय आहे आणि तु काय करत आहे.. " समीर चिडून पण तेवढ्याच काळजीपूर्वक बोलला..

माहिती आहे माझी लाईफ कशी आहे.. माझ्या जीवनाचा भूतकाळ , वर्तमान काळ , आणि येणारा भविष्यकाळ काहीच नाही आहे.. मला नाही माहीत आज मी इथे आहे पण सामोरं काय होणार I don't know.... " आरोही बोलली आणि जाण्यासाठी निघाली..



प्लीज आरोही मी तुझ्या सोबत नेहमी आहे.. तर बेफिकीर राह्... " समीर

आरोही समीरला बाय् करून तिथून निघून गेली....


क्रमशः

वाचून समिक्षा कळवा... तेवढंच मला लिहायला प्रोत्साहन भेटते