Nate baharle premache - 4 books and stories free download online pdf in Marathi

नाते बहरले प्रेमाचे - 4














आरोहीने विक्रांतला साफ इग्नोर केलं आणि रेडी होऊन खाली आली ... तिला रागच आला त्याचा.....

अरे विक्रांत तुझ्या हाताला काय लागलं.... " आईसाहेब ने विक्रांत चा हात पकडून बोलल्या..

आईसाहेब तेवढं काही नाही जिममध्ये वर्क आउट करतांनी लागलं.. " विक्रांत

बाळा सांभाळून करत जा... " आईसाहेब

अगं आरोही काँलेजला चालली ना .." हो आई

अगं मग साडी घालून जाणार का ...जा जाऊन तुझे आधीचे कपडे घाल... " आई

आई मी माझे कपडे नाही आणले... सध्या माझ्याकडे साडीच आहे घालायला... " आरोही

मी बोलावून घेतले तुझे होस्टेल वरुन कपडे... आणि काही मी न्यु ड्रेसेस पण बोलावले त्यातून घालं जा... "आईसाहेब

ओके आई आलीच मी.. "आरोही

थोड्याच वेळात आरोही ड्रेस घालून आली..

विक्रांत चं लक्ष गेलं ती खुपच सुंदर दिसत होती. तिने ब्लॅक कलरचा जीन्स आणि रेड कलर ची क्राॅप वाली टीशर्ट आणी त्यावर ब्लू कलरचा जॅकेट..केस मोकळे सोडून कानात छोटे स्टोन वाले टाॅप्स... सिम्पल पण खुपच सुंदर दिसत होती आरोही....पण आरोही त्यांच्या कडे पाहत सुद्धा नव्हती... त्याला मनातूनच दुःख झालं...

मी असा कसा आरोहीला किस् करणार होतो.. मी नव्या ची जागा तिला कधीच देणार नाही... "विक्रांत मनात बोलला आणि नाष्टा न करता निघून गेला आँफिसला

अगं सूनबाई तुझा जीन्स फाटला आहे गं.. दे माझ्या कडे मी शिवून देते... आन इकडे... "अनुसया आजी

अहो आई ही फॅशन आहे..आणि तुमचं काय आजकाल मुली अशेच कपडे घालतात.... "आईसाहेब त्यांच्या सासु अनुसया बाईला समजावत बोलल्या

अस आहे व्हय... "अनुसया आजी

आणि वहिनी अगं तुझे जीन्स आणि बाकीचे कपडे बरोबर सांभाळून ठेव नाही तर आजी फाटले आहेत म्हणून शिवून ठेवेल.. माझे छान टाॅप्स शोल्डर कट वाले.. आणि काही जीन्स हीने फाटले आहेत म्हणून शिवले... म्हणून वहिनी तुला आधीच सांगते.. " काजल

☺ आरोही फक्त हसली..

आरोही तु कॉलेज ला जात आहे ना.. की तिथे फ्लॅश मारायला आणि अशे कपडे घालून ... "विक्रांतची माॅम आरोहीला टोमणा मारून...

तुला तोंड सांभाळून नाही का बोलता येत.. आणि ती आधी जशी राहायची तशीच ती सासरी पण राहणार ..ठिक आहे आणि तु पण घालते ना जीन्स वगैरे मग तिला का बोलतीयेस...." आईसाहेब

माझं तसं बोलणं नव्हत मी दुसरीच काही बोलणार होते.. " विक्रांत ची माॅम

असू दे तुझं तुझ्या कडे... " आईसाहेब

आणि आरोही बेटा जा तु.. नाही तर पहिल्या दिवशी लेट होशील. ... " आईसाहेब

आणि आरोही जाशील ना बरोबर.. नाही तर ड्रायव्हर ला घेऊन जा... " संध्या काळजीने बोलली..

अहो मी एकदम ठणठणीत आहे काकु तर मी माझ्या स्कुटीनेच जाते आणि आशिर्वाद द्या मला.. आरोही ने आईसाहेब.. अनुसया आजीचा आणि संध्या काकुंचा आशिर्वाद घेतला आणि निघून गेली.. काॅलेजला..






आरोही आपल्या जान सोबत जाणार होती ( म्हणजे तिची लाडकी स्कुटी हो) काॅलेज ला पण रस्त्यावर खुपच ट्राफिक होतं की काही केल्या कमी होत नव्हता.. तर सामोरं झगडा चालू होता.. आरोहीने सहजपणे डोकावून पाहिलं
..
काही मुलं त्या तिथे भाजीपाला विकणार्या आजोबांना त्रास देत होते.. कारण त्या आजोबांच्या गाडीने त्या मुलांच्या गाडी चा एक हाईडचा मिरर तुटला होता.. एक वेळ तर अशी आली की त्या मुलांनी त्या आजोबांना खाली पाडलं आणि बाकी चे लोक ते फक्त पाहत होते.. आरोहीचा डोकाच सटकला..

ओ दादा काय प्राॅब्लेम आहे आणि ही काय पद्धत आहे.. " आरोही ने त्या आजोबांना उठायला मदत करत त्या मुलांना बोलली

तुम्ही मधात बोलणारे आहार कोण.. आणि हा म्हातारा बहसबाजी करत आहेत..फक्त गाडीचा नुकसान झालं त्याचे पाछ हजार मागत आहोत.. तरी हा म्हातारा तयार होत नाही आहे.. ये म्हातार्या देवा जवळ हात जोड की तुला पोलीस स्टेशन ला नाही टाकलं.. " ते मुलं

तरी पण तुमच्या पेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत हे आजोबा आणि तुम्ही कसे बोलत आहात... " आरोही

मग ह्या म्हातार्या ची पुजा करुन का सर्व... " ते एकमेकांना टाळी देउन हसत बोलले..

ओके कीती नुकसान झालं.? ... " आरोही

फक्त पाच हजार... " ते मुलं

ओके हे घ्या पंधरा हजार... " आरोहीने त्या मुलांना दिले

हे कशाला पंधरा हजार .. " ते मुलं

थांबा सांगते... आरोहीने बाजूला पडलेल्या दगडाने दुसर्या साईडचा मिरर फोडला..

हम्म तर दहा हजार मिरर फुटले त्या साठी आणि बाकीचे पाच हजार आहेत ना त्याने तुमच्या डोक्याचा इलाज करा.. म्हणजे कसं आहे ना दादा तुम्ही काही वेळा पहिलेच माझ्या गाडीला धक्का मारुन गेलात आणि बाजुला जी मुलगी होती तिला आयटम बोललात.. नाही तर असं नको व्हायला स्वत च्या आई आणि बहिणीला पण आयटमच बोलाल. . .. " आरोही

त्या मुलांच्या नजरा खाली झाल्या शरमेने..

साॅरी ताई चुकलं आमचं.. माफ कर आम्हाला... " ते मुलं

साॅरी मला नाही त्या आजोबांना बोला.. त्या मुलांनी त्या आजोबांची माफी मागितली आणि गेले..

विक्रांत जो हे सर्व कार मधून हे द्रुश्य पाहत होता त्याला आरोहीचा अभिमान वाटला..

साहेब मॅडम खुप समजदार आहेत.. " ड्रायव्हर काका

समजदार आणि ही.. समजावण्यासाठी ह्या मुलीने त्याच्या गाडीचा काच फोडला.. " विक्रांत हसून बोलला

झालं असेल तुमचं मनोरंजन निघा आता सर्व.. " आरोही बोलली आणि तिची स्कुटी घेऊन काॅलेजला गेली..


काॅलेजला...

काय रे भोपळ्या इतका उशीर.. माहीत आहे ना तो टकल्या तुझ्या सोबत माझी पण वाट लावेल.. " आरोही

आरो त्या टकल्याला मार गोळी.. आधी आभा तुझं काय करेल ते बघ.. तु लग्न केलं आणि आभाला न सांगता.. तिला झालं माहिती.. आता बघ तुझं काय करते तर... " समीर बोलला आणि आपले हात वर केले

ये भोपळ्या.. नाही नाही माझा लाडला समीर माझी कर ना रे मदत.. ते आभा माहीत आहे ना कसली विचित्र आहे ती.. " आरोही

म्हणजे तुला कळलं आज माझ नाव समीर पण आहे.. " समीर

🙂😊 .. " आरोही

ओके चल नाही तर आज पहिल्यांदा तुझ्या मुळे तो टकल्या आपल्या दोघांना क्लास च्या बाहेर काढेल.. " समीर

भोपळ्या एक सांग आजपर्यंत आपण क्लास च्या बाहेर राहायचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत ना.. " आरोही

आणि ते माझ्या मुळे.. " समीर काॅलर ताट करत बोलला

🙄 नालायक.. सांगायला लाज पण नाही का वाटत तुला.. चला आता.. तो टकल्या आपली.. आरतीचं ताट घेऊन वाट पाहत असेल.. " आरोही..

********

आरो त्या टकल्या वर कोणी जादू टोना केला की काय ❓नाही म्हणजे तो आपल्या ला आज काही बोलला नाही .... " समीर

होऊ शकते.. सोड सर्व.. चलना मला भुक लागली.. आपण पोहा खाऊ.. " आरोही

चल पोह्यांची वेडी.. पुर्ण जगात भुकंप येईल पण तुझा पोहा काही सुटणार नाही.. " समीर

काॅलेज पुर्ण करुन आरोही घरी रिटर्न आली हाॅल मध्ये कोणीच नव्हतं..

शारदा काकु आहात का तुम्ही? ... " आरोही

अरे मॅडम आहे मी सांगा तुम्हाला काय हवं मी आताच बनवून देते. " शारदा काकु

काय हो काकु मला मॅडम नको बोला मी तुमच्या मुली सारखीच आहे ना मग.. मला नावानेच हाक मारा.. " आरोही

ठीक आहे बेटा.. " शारदा काकु

तर काकु मी हे म्हणत होती तुम्ही कुकरला शिजवायला चणाडाळ मांडता का तोपर्यंत मी चेंज करून येते... " आरोही

ठीक आहे बेटा.. ये तु मी करते तोपर्यंत.. " शारदा काकु..


********************************


विक्रांत जेव्हा ऑफ़िस वरुन आला आणि घरात एन्ट्री करत नाही त्याला खुप छान सुगंध .. त्याचे पाय आपसूकच किचन च्या दिशेने गेले.. तिथला कुक घाबरून तिथे उभा होता.. आणि आरोही मग्न होऊन पुरणपोळी करण्यात व्यस्त होती...

त्याने डोळ्याने त्या कुकला बाहेर जायला सांगितलं..

आरोही त्याने आवाज दिला.. आरोही बेसावध होती त्यामुळे तीचा हातचा चमचा पडता पडता वाचला.. तिला माहीत नव्हत विक्रांत आला तर..

तुम्ही इथे...

हो मीच आहे ... " विक्रांत

काल साठी I'm really very sorry.. .. " विक्रांत

आरोही काहीच बोलली नाही..

I know मी काल चुकीचा वागलो.. पण खरं माझ्या मनात तस काही नव्हतं.. " विक्रांत

आरोही बोलणार होती पण आईसाहेब आल्या म्हणून विक्रांतने तिथून काढता पाय घेतला..

अरे वा आरोही आज मस्त बेत आहे पुरणपोळी चा.. " आईसाहेब

हो आई तुम्ही बसा झाल्याच पुरणपोळ्या.. " आरोही

डायनिंग टेबलवर सर्व सोरते परिवार बसला होता.. आरोहीने सर्वांना जेवन वाढलं आणि पुरणपोळी पण..

आरोही thanks... मी काल रात्री तुला सहज बोलली होती आणि तु आज बनवली पण.. " भाग्यश्री

होना ताई आता टेस्ट करुन सांगा.. " आरोही

वाॅव चाची छान आहे ही पुरणपोळी.. ये मम्मा लवकर खा ग माझ्या परीला भुक लागली असेल...मला ही सकाळी पण खायची आहे माझ्या साठी ठेवाल ना ? .. " आरुष पुरणपोळी खाऊन अजून एक घेत बोलला..

हो नक्की 👍👍... " आरोही

वहिनी यार काय मस्त बनली आहे पुरणपोळी.. " काजल

खरंच सूनबाई छान बनवली.. " विजय विक्रांत चे डॅड

Thank you पप्पा.. " आरोही

तर विक्रांत ची इच्छा होती खायची.. त्याने पुरणपोळी घेण्यासाठी हात सामोरं घेऊन मागे घेतला.. आरोही ने ते पाहिलं आणि त्याच्या प्लेट मध्ये पुरणपोळी टाकली..

अगं वहिनी दादाला नाही आवडत.. पुरणपोळी..

नाही खातोय ना मी.. ताटात अन्नाचा अपमान करायचं नसते... " विक्रांत

खायचं आहे ते नाही सांगणार.. डायनासोर कुठला.. " आरोही विक्रांत कडे पाहून मनात बोलली

वा वा वा.. पुरणपोळी असावी तर अशी.. जे तोंडात घालता बरोबर विळघळल्या पाहीजे.. आणि शुभलक्ष्मी तु शिकून घे तुझ्या सूनेकडून.. " अनुसया आजी

हो एकदम खरं बोलला आई.. " विजय आणि आईसाहेब एकसाथ बोलले..

शुभलक्ष्मी तुला आवडली का ग पुरणपोळी ? ... " आईसाहेब

नाही ग शकुंतला.. ती नेहमी कडूच बोलते तर पुरणपोळी पण तिच्या तोंडात जाऊन कडूच झाली असेल.. " अनुसया आजी

विजय पप्पा पण गालात हसले जे की विक्रांत च्या माॅम ने पाहिलं आणि तीचा जेवन होउन त्या उठून गेल्या..

पप्पा आज तुम्हाला मम्मी काही रूममध्ये येऊ देनार नाही तुम्ही हसलात ना म्हणून.. " आरोही सॅड होऊन बोलली

त्यांची तर थतर फतर झाली.. त्यांनी तर विचारच केला नव्हता.. ..

***********

आरोही रूममध्ये आली आणि झोपून पण गेली.. विक्रांत आला तर ती झोपली आहे पाहून तो स्टडी रूममध्ये गेला.. विक्रांत सिगारेट पेटवून ओढत होता.. आणि मनात विचार पण चालू होते

मी नव्याचा राग त्यादिवशी हिच्या वर काढला.. नव्याने जे केलं त्यानंतर मी सर्व मुलींना त्याच नजरेने पाहतो.. जो की मी चुकतोय ह्यात.. विक्रांत सिगारेट ओढून बोलला..


**********

सकाळी आरोही जेव्हा उठली तेव्हा विक्रांत झोपलाच होता.. तीने बाथ घेतला आणि रेडी होत होती.. हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र ओठांवर लाईट लिपस्टिक लावली.. थोडा हलका पाउडर लावला.. रेड कलरच्या काठाची साडी घातली.. ती साडी तिच्या वर खुपच उठून दिसत होती..

विक्रांत तिच्या कडे टक लावून पाहत होता.. आरोही चा लक्ष पण गेलं विक्रांत कडे.. तिने घाईत आपला मोबाईल पकडला आणि खाली गेली कारण आज आत्या येणार होती विक्रांत ची..

विक्रांत तर तिच्या कडे फक्त पाहत होता.. मग उठला आणि जिममध्ये वर्क आउट करायला गेला...



क्रमशः






इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED