Naate baharle premache - 5 books and stories free download online pdf in Marathi

नाते बहरले प्रेमाचे - 5

आरोही रेडी होत होती... विक्रांत तिच्या कडे टक लावून पाहत होता. .
. आरोहीचा लक्ष पण गेलं त्याच्या कडे.. तसच तीने आपला मोबाईल घेतला आणि तिथून घाईत निघाली.. कारण आज आत्या येणार होती विक्रांतची


मग विक्रात पण जिमला गेला..

आरोही जेव्हा खाली गेली तर आधीच आईसाहेब आल्या होत्या..

अगं आरोही माहिती आहे ना तुला आज ताई येणार आहेत.. तर त्यांना कळता कामा नये की.. तुमच्या मध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे... " आईसाहेब

हो आई मी घेईल तेवढी काळजी 😊... " आरोही..

ओके अस कर ना आज शारदाला बरं नाही आहे.. तेवढं काही कर ना नाष्टा... " आईसाहेब

हो आई मी करते.. पोहे करु का? .... " आरोही

अगं पण विक्रांतला कांदेपोहे आवडत नाही.. म्हणजे त्याला पोहे बिना कांद्याचे आवडतात... " आईसाहेब

आई मी करते आणि विक्रांत म्हणजे हे खातील पण आज... " आरोही

अगं काही प्राॅब्लेम नाही.. विक्रांत बोल... पण ताई सामोरं नावाने नको बोलशील.. " आईसाहेब

ओके आई.. पण एक सांगा ना आत्यांच नाव काय❓ आहे..... " आरोही

अगं आता येतीलच तेव्हाच बघून घे... " आईसाहेब

बरं चालेल.. मी करते लवकर नाष्टा तयार... " आरोही

*************************************

काय ग सॅम उर्फ शुभ लक्ष्मी... तुझी सून कशी आहे.. " सुनीता विक्रांत ची आत्या

हमं आहे ठीक ठाक आहे... " विक्रांत ची माॅम

तुला आवडली नाही म्हणजे चांगलीच असणार... " आत्या

विक्रांत च्या माॅमने तोंड वाकडं केलं.. मला ती मुलगी आवडतच नाही... पण मी पण सॅम आहे.. तिला विक्रांत च्या लाईफ मधून काढुनच टाकेल मी... Just wait and watch आरोही.. " विक्रांत ची माॅम हसून मनात बोलली..

कुठे गेलीस ग जा तुझ्या सूनेला बोलावून आण... " आत्या

हो ताई आणते तिला.. " विक्रांत ची माॅम

अग आई कशी आहे तुझी नात सून... " सुनीता आईसाहेब यांना बोलली

सुनीता मला काही नको विचारु तु स्वत बघ.. " आईसाहेब हसत बोलल्या

ओके..

" आरोही आली आणी आत्या शाॅक...

आरु बाळा तु 😮 .... " आत्या

काकु तुम्ही आणि इथे.. वाॅव.. आरोहीने जाऊन आत्या च्या पाया पडून आशिर्वाद घेतला आणि त्यांना मिठी मारली..

हो ग.... " आत्या

म्हणजे तुम्ही विक्रांत च्या आत्या आहात.... " आरोही

हो खरं ओळखली... " आत्या

एक मिनिट तुमचं काय चाललं कोणी सांगेल काय❓... " आईसाहेब थोड्या कंम्फ्युज होऊन बोलल्या..

अगं आई ही आरोही आहे आभाची जीव की प्राण तिची खास मैत्रीण आणि माझी पण.. " आत्या

काकु ती आली आहे का❓.... " आरोही

हो आली आहे मी आणी तुझी चटणी करणार आहे माझ्या पासून लपून तु लग्न केलंय... आता बघ मी काय करते ..... " आभा

ये आभा नाही हा तुझी जान आहे ना मी .. असं करते का आपल्या जान सोबत.. " आरोही.. " आईच्या मागे लपून बोलली..

नाही तुला मी आज सोडणार नाही.. " आभा

काकु, आई हिला सांगा ना काही. ...ही मला मारुन मारुन माझा पीठ पाडेल... " आरोही

ते तुमचं तुम्ही बघा दोघीही ... " आत्या

नाही आभा सासर आहे हे माझं इथे तरी सोड मला.. बाहेर जेवढा बदला घ्यायचा तेवढा घे.. .. " आरोही आणि पळत सुटली

आभा आरोही अगं हळु जा पायर्या वरुन पडाल नाही तर.. पण दोघीही आपल्या मस्तीत होत्या..
आरोही धावता धावता बेडरूममध्ये गेली.. आणि सरळ जाऊन विक्रांतला धडकली... विक्रांत पण नुकताच जिम करून आला होता.. त्यात घामाने भरलेला शरीर व्हाईट कलरची पातळ टीशर्ट त्यात तो खुप attractive दीसत होता.. विक्रांत बेसावध होता त्यामुळे दोघेही खाली पडले... आरोहीचे दोन्ही हात त्याच्या फुगलेल्या छातीवर होते त्याचे हार्टबीट खुप फास्ट चालत होते.. किती तरी वेळ दोघेही एकमेकांना पाहत होते..

मी पण आहे म्हणटलं इथे.. नाही म्हणजे तुम्हाला रोमान्स करायचं असेल तर मी जाते इथून... " आभा

तसेच आरोही आणि विक्रांत भानावर आले आणि बाजूला झाले..

आभा केव्हा आली तु.. आणि इतक्या दिवसांनंतर? ... " विक्रांत

साॅरी हा भाई मी चंद्रपूर ला आजीकडे गेली होती.. सो आता आली.. आणि येत नाही तर इतका मोठा सरप्राईज भेटलं.. " आभा

विक्रांत काही बोलला नाही आणि शावर घ्यायला गेला..

आणि तु माझ्याशी खोटं बोलली.. ये इकडे तुला ना.. आभाने पाण्याचा मग घेतला आणि आरोही वर टाकणार होती पण आरोही म्हणजे आरोही तिने तो मग उलटा करून आभावरच उलटवला..

तुला ना मी सोडणार नाही.. आभा बेड वर बसून नाराज होत बोलली..

का ग ? .. आरोही

कारण मला माहित असतं तर मी पण तुमचं लग्न एन्जॉय केलं असतं ना ... आरोही यार मी माझा रेड कलरचा लहंगा घातला असता ना.. " आभा

ओ असं आहे 🙃 मला वाटलं तु आल्या बरोबर माझ्या बद्दल विचारशील पण तुला लग्नाचं येऊन पडलं आहे.. " आरोही

ओ मेरी जान ना हो परेशान... आरु मानावं लागेल माझ्या भाईला.. म्हणजे आरोही आर्या ज्या मुलीच्या मागे पुर्ण काॅलेज फिदा आहेत... ज्या मुलीला ह्या LLB च्या तीन वर्षांत कोणी इम्प्रेस करु शकलं नाही... जी कोणाला भाव सुद्धा देत नाही.. त्या मुलीशी माझ्या भाईने लग्न केलं... पण मुलांना माहिती होईल की तुझं लग्न झालं तर बिचार्या चा हार्ट ब्रेक होईल..

Just shut up आभा.. आणि हे काय लग्न आहे.. आमचं लग्न फक्त नावासाठी आहे.. You should know आभा आम्ही डिवोर्स घेणार आहोत.. सिक्स मंथनी.. .. " आरोही

अग पण का❓... " आभा

आभा कसल्या गोष्टी करत आहे.. तुला चांगलं माहिती आहे मला लग्न करायचं नव्हत..मामांची गोष्ट मी टाळू शकत नाही म्हणून मी हे लग्न केलं.. " आरोही

पण का❓.. " आभा

प्लीज आभा मला वैताग आलाय.. मी माझी लाईफ साधारण नाही का जगू शकत...मला ह्या लग्नाच्या बंधनात नव्हत अडकायचं...सोड ना ह्या गोष्टी.. आणि चल खाली.. " आरोही

आरोही माझा ड्रेस ओला झालाय.. तुझा ड्रेस देणा.. " आभा

हो जा माझा वाॅर्डरोब मधून घे एखाद्या ड्रेस.. " आरोही

ओके..

आरोही.. अगं लवकर ये... " आभा ओरडून बोलली

तिच्या ओरडण्याने विक्रांत पण आला आणि आरोही..

काय❓ झालं आभा.. " आरोही

आरु बेबी.. हा तुझाच वाॅर्डरोब आहे ना ? ... " आभा

हो ग..का❓.. " आरोही

नाही म्हणजे तुझ्या रूमवर तुझ्या वाॅर्डरोब मध्ये तुझे कपडे.. उत्तर. दक्षिण. पुर्व आणि पच्छीम... कडे पडले असायचे... सो विचारलं... " आभा

🙃🙄🙂... " आरोही डोळ्याने आभा ला चुप राहण्याची विनंती करत होती..

विक्रांत जो आला होता तो पण आरोही कडे तिरप्या नजरेने पाहत होता..

विक्रांत गेल्यावर...

तुला खुप आदत आहे ना जिथे तिथे पचकायची.. " आरोही चिडून आभाला..

" आता जे खरं आहे ते आहे... " आभा पण तिला बोलून ड्रेस चेंजिंग करायला गेली.. आरोही बाहेर आली तेव्हा.. विक्रांत लॅपटॉप वर त्याच काम करत बसला होता, आरोहीने तिचा मोबाईल चेक केला तर मामीचे खुप काॅल्स येऊन गेले होते...

हेल्लो मामी तु फोन केली होती,... "आरोही

" अगं आरु मी काय म्हणते ..तुझा त्या घरातील पहिलाच गुढीपाडवा आहे तर.. सकाळी उठुन .."मामी अजून काही सांगणार त्या आधी आरोही

मामी माहिती आहे मला आणि तुच मला सर्व शिकवली आहे तर मी तसच करणार... ओके " आरोही

हो ग माझी आरु हुशार आहे.. तरी पण ते सासर आहे तुझं काळजीपूर्वक कर सर्व.. आणि चुकीने कोणाचं मन नको दुखाऊस.. "मामी

होग माते ..अजून काही ? ..." आरोही हसत बोलली

बरं मी ठेवते फोन तुझे मामा ओरडून चहा मागत आहेत.. " मामी

आरु चल ग .. I'm ready... " आभा

दोघेही खाली गेल्या ...सर्वांचा नाष्टा झाला होता..

विक्रांत आला आणि नाष्टा केला त्याला पोह्यांची टेस्ट थोडी वेगळी वाटली ..त्याने नेहमीच्या पेक्षा आज थोडे जास्त खाल्ले...

शारदा काकु छान केले आजचे पोहे.. " विक्रांत पोहे खात बोलला

नाही बेटा.. पोहे मी नाही आरोहीने केले आणि ह्यात कांदे पण आहेत .. "शारदा काकु

अच्छा छान झाले.. " विक्रांत

******

विक्रांत रूममध्ये आला पण आरोही तिथे नव्हतीच...त्याची नजर तिला का पण शोधत होती.. त्यांच्या लग्नाला एक महिन्या च्या जवळ होऊन गेला होता.. आरोही आणि विक्रांत एकाच रूममध्ये राहून सुद्धा बोलत नव्हते.. पण विक्रांत ला तिला रोज पाहायची सवय झाली होती.. त्यामुळे त्याचे पाय आपसुकच खाली गेले.. खाली गेला पण आरोही काही दिसली नाही ...तो रुममध्ये रिटर्न आला आणि बेडवर झोपला..

चला काकु झाल्या एकदाच्या ह्या फुलांच्या माळा.. म्हणजे सकाळी तेवढी धावपळ होणार नाही.. आणि तुम्ही जाऊन झोपा आणि सकाळी थोडा आराम करा.. तुम्ही सर्वांची काळजी करता तसच स्वत ची पण घेत जा.. " आरोही

बरं बेटा.. " शारदा काकु बोलून निघून गेल्या..

आरोही रुममध्ये गेली तर बेड वर विक्रांत झोपला होता..तिने त्याचा अंगावर व्यवस्थित ब्लँकेट टाकलं तिथेच बसली थोडावेळ..

कीती रागीट आहेत विक्रांत सारखं चिडचिड करत असतात.. तो झोपला होता तरीही कपाळावर आठ्याच होत्या.. माझ्या मुळे तर जास्तच चिडचिड करतात.. काहीच दिवस आहे मी तुमच्या लाईफ मध्ये ह्या सहा महिन्यांनी कायमची निघून जाईल मी... मी पण मोकळी आणी तुम्ही पण मोकळे ह्या लग्नाच्या नात्यातून .. झतकं बोलून आरोहीने बेड वरचं पिलो घेतलं आणि विक्रांत जिथे झोपत होता तिथे झोपली..तिला आज छान झोप लागली होती.. कारण ती बेडरूम तर होतीच सोबत ओपण गॅलरी पण जी बेडरूमच्या राइट साईडला होती जिथे विक्रांत झोपत होता आणि आरोही आत झोपत होती...

त्या बेडरूमची सजावट पुर्ण व्हाईट ब्राउन कलरच्या शेडने केली होती... खुप छान वाटलं आरोहीला तिथे... मग ती झोपायला जाणार तर तिथेच लेफ्ट साईडला स्विमिंग पूल होता तिथे गेली आणि पाण्यात पाय बुडवून तिथे मोबाईल चाळत बसली

*****

" रात्री जेव्हा विक्रांतला जाग आली तेव्हा त्याने टाईम पाहिला तर 2वाजले होते ..त्यानेडोळे उघडले तर तो आतमधल्या बेडरूम मध्ये झोपून होता.. त्याला एकदम क्लिक झालं आरोही कुठे आहे..?

तो तसाच बेडवरून उठला आणि तो झोपत होता तिथे पाहिलं पण आरोही नव्हतीच ..त्याने खाली हाॅल किचनमध्ये, गार्डन मध्ये , मागच्या बाजूला असलेल्या बागेत पाहिलं... गेस्ट रुममध्ये पण पाहिलं आता आखरी राहिली ती काजल ची बेडरूम ती पण चेक केली ...तिथे पण नव्हती..

आता गेली कुठे आहे ही ? ...त्याला त्याच्या मनात भलते सलते विचार येत होते... घर सोडून तर नाही गेली ..नाही नाही आरोही तशी नाही आहे.. तो रिटर्न बेडरूम मध्ये गेला आणि तिचा फोन नंबर डायल करून लावला पण फोन लागत नव्हता... त्याने विकास ला फोन केला पण तो पण उचलत नव्हता विक्रांत सहज गॅलरीमध्ये गेला ..त्याने ती रुम चेक केली तर आरोही खाली पडली होती आणि आरामात झोपली होती..

" घ्या हिला पुर्ण घरात मी वेड्या सारखा शोधत आणि ही इथे आरामात झोपली आहे.. ह्या बेडवर आरामशीर पाच झण झोपू शकतात आणि हीला इथे जागा होत नाही आहे.. वेडी कुठची कित्येकदा बेडवरून पडत असेल ही ?
" ..त्याने तिला उचलून बेडवर झोपवून तिच्या अंगावर ब्लॅकेंट टाकून बाजुला पिलो लोड् लावलेत आणि लाईट बंद करून तो पण जाऊन झोपला ....

" सकाळी आरोही जेव्हा उठली ... तिच्यावर एकदम सुगंध दरवळत होता.. हा परफ्यूम तर विक्रांत लावतात.. म्हणजे ते आले होते का ?..." आरोही विचार करत उठुन शॉवर घेतला आणि रेडी होऊन खाली गेली..

" खाली जाऊन आरोहीने पुर्ण पुजेची तयारी केली.. पुर्ण दारांना तोरण लावले मोठ मोठ्या फुलांच्या माळा लावल्या ..दारातच बाजुला छान रांगोळी काढली जी खुप सुंदर दिसत होती...

अरे वा सूनबाई छान झाली तयारी.. तुला कोणी सांगितलं हे सर्व? .." आईसाहेब आणि संध्या काकुनीं विचारलं

आई आणि काकु मला मामीने शिकवलं सर्व.. " आरोही

वा मस्त.. आरोही तुझ्या मम्मी चा फोन आला होता आणि तु का नाही करत फोन ? तुझी मम्मी बोलली की तु कधीच फोन करत नाही " ...आईसाहेब

आई करते मी नंतर.. याना आपण आधी पुजेचं पाहून घेऊया .." आरोहीने ती गोष्ट टाळली आणि कामाला लागली

बरं चल... " आईसाहेब

आई मी आंब्याच्या झाडाचे पाण आणते.. थोडे कमी पडले तर ..." आरोही

नको जाऊ तु रॉबिन ला पाठव... " आईसाहेब

नाही ना आई मी जाते ना मला कच्चे आंबे तोडायचे आहेत... " आरोही आईसाहेब ला हट्ट धरून बोलली

ओके जा पण बरोबर तोडशिल... झाड खुप उंचावर आहे.. "आईसाहेब

ओके आई ...

ये चाची मी पण येते मला पण खायचा आहे आंबा... " आरुष

ओके बेबी चल... "आरोही

*****

विक्रांत जिमवरुन आला आणि टॉवेल घेऊन फोन वर बोलत तो गॅलरीमध्ये आला ... त्याच लक्ष आरोहीकडे गेलं.. तीचे पान तर तोडून झाले ...पण आंबा तोडतांनी हातच पुरत नव्हतं आणि आरुष तीला हसत होता..

चाची तुझी हाईट छोटी आहे.... मी तोडू का आंबा ? ...आरुष

आरु बेबी हसु नकोस.. आणि तुझा हात पुरणार नाही.. " आरोही

" Beautiful 😍....." विक्रांत आरोही कडे पाहत मनात बोलला

आणि फोनवरचा विकास शाॅक झाला ..

बाॅस काय बोलला तुम्ही मी ब्युटीफुल आहे ..देवा मला विश्वास होत नाही आहे... "विकास

बाॅस अब मे क्या करु.. मे इतना सुंदर हु तो ..क्या करु.. क्या करु .." विकास खुश होऊन बोलला

जिथे आहे ना तु तिथे येऊन तुला चांगलं धुवुन काढेलं ..so stop your drama.. " विक्रांत विकासला दम देत बोलला

" आरोहीने पोपटी लाल काठाची पैठणी साडी नेसली होती.. हात भर बांगड्या.. नाकात नथ.. गळ्यात ठूसी छोटासा मंगळसूत्र... भांगेत कुकुं भरला होता.. केसांचा अंबाडा आणि सामोरं येणाऱ्या बटा...पायात पैजन... ते आरोही चालत असतांना एखाद्या मधुर संगीतासारख्या वाजत होत्या... फायनली तिने दोन तीन आंबे तोडलेच.. आणि उड्या मारत ती आरुष ला दाखवत होती..

येईई मी तोडले आंबे.. आरू बेबी बघ.. " आरोही

वाॅव मला पण दे ना चाची ..." आरुष

ओके घे आणि चल आई आवाज देत आहेत ...

कीती इनोसंट आहे ना ही.. लहान लहान गोष्टी मध्ये आनंदी होते.. आणि ती होती एक नव्या ..."विक्रांत बोलून बाथ घ्यायला गेला आणि रेडी होऊन खाली जाणार होता


*****

गुढीपाडव्याची पुजा आरव ने केली ..तर आरव हे आरुष चे डॅडी ...

व्यवस्थित गुढीची पुजा करुन ती वर उभारली.. आणि बाकी जणांनी पण पुजा केली व रोज होणारी आरती ती पण आरव व भाग्यश्री दोघांनी जोडीने केली.. ...( ह्यात काही चुकले असेल तर माफी असावी कारण आमच्या इथे साधारण पुजा करतात त्यामुळे मी माझ्या मनानी लिहंलं) ...

आरोहीने सर्वाना कापुर दिला..ती सामोरं गेली तर विक्रांत उभा होता तिथे जाऊन तिने त्याच्या सामोरं आरती चा ताठ सामोरं केला

आईसाहेब.. आरोही काय करतेय विक्रांत चिडेल तिच्या वर त्याला पुजा आणि देवांवर बिलकुल पण विश्वास नाही आहे... " संध्या काकु घाबरून बोलल्या

विक्रांतची माॅम तर मनातच खूश झाली.. तिला वाटलं विक्रांत चिडेल पण झालं उलटचं.. विक्रांत च्या दोन्ही हातात एका हातात लॅपटॉप आणि दुसर्‍या हातात दोन फाईल्स होत्या

त्याने इशारा केला पण आरोहीला कळलं नाही..

माझे दोन्ही हात बिझी आहेत तर तूच ओवाळून.. " विक्रांत येवढंच बोलला..

आरोहीने कापूर त्याच्या वरुन फिरवला आणि त्याच्या कपाळावर कुंकू चा टिका लावला ..तीने विक्रांत ला द्यायला प्रसाद हातात घेतला पण त्याने त्या आधीच तोंड उघडलं... आरोहीला प्रसाद भरवून द्यावंच लागलं.. तिला खुप आँकवर्ड वाटत होतं

हे बाप्पा हे विक्रांत कधी कधी अशे का वागतात.... कळतच नाही... " आरोही मनात बोललीक्रमशः
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED