नाते बहरले प्रेमाचे - 6 Reshu द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाते बहरले प्रेमाचे - 6
















गुढीपाडवा तर छान झाला साजरा ...

रात्री विक्रांतला यायला लेट झालं..आरोही जागीच होती..ती डिनर साठी त्याची वाट पाहत हाॅल मध्ये हातात बुक्स घेऊन तिथेच डायनिंग टेबलवर डोकं ठेवून झोपली होती...

विक्रांत रूममध्ये गेला.. त्याला आरोही काही दिसली नाही.. त्याने शारदा काकु ला फोन करून पाहिला तेव्हा त्याला कळलं की आरोही त्याचा डिनरला वेट करत होती.. विक्रांत खाली गेला..


आरोही.. " त्याने आवाज दिला

" आरोही गाढ झोपेत होती... आरोही त्याने तिला थोडं जोरात आवाज दिला... "

हम्म.. " आरोही डोळे किलकिले करून उठली

तु जेवन केलं?... " विक्रांतने आरोहीला विचारलं

नाही.. " आरोही

विक्रांत उठला आणि तिच्या साठी जेवणाची प्लेट लावून आणली ..हे घे आणि डिनरला माझी वाट पाहायची काही गरज नाही.. " विक्रांत

ते आई.. " ती काही बोलणार तर विक्रांत तिला थांबवत बोलला

Let me be clear to you आरोही यापुढे माझी वाट पाहत बसु नकोस..आपल्या मध्ये कोणतच रिलेशन नाही आहे.. येवढं लक्षात ठेव आणि Eat and sleep.. "येवढं बोलून विक्रांत रूममध्ये रिटर्न आला

आरोहीने ती प्लेट बाजुला सरकवली आणि रुममध्ये जाऊन झोपली...

*******

आरोही कॉलेजला जायला रेडी होऊन खाली आली आणि नाष्टा करुन निघणार तर आईसाहेबांनी अडवलं..

आरोही थांब.. " आईसाहेब

हा आई बोला ना ..." आरोही

तुला माहीत आहे तुमच्या लग्नाला एक महीना झालाय ? ..." आईसाहेब

हो आई... " आरोही

विक्रांत तो नाही घेत पुढाकार तु तरी घे आरोही तुमचं लग्न झालं आहे.. तुमचं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न कर.. नाही तर तुमचं नातं तुटायला वेळ लागणार नाही.. बेटा मी तुझ्यावर जबरदस्तीने ही लग्नाची जिम्मेदारी लादली आहे. पण तरीही तु प्रयत्न तर करु शकते ना? ... " आईसाहेब

आरोही काही बोललीच नाही..

आरोही ऐकत आहेस ना.... " आईसाहेब

हो आई.. मी प्रयत्न करेल पण विक्रांत त्यांच काय ...मी तरी त्याना जबरदस्तीने नाही करु शकत ना आपलं ... " आरोही

ओके मी बोलेल विक्रांत सोबत.. " आईसाहेब

नाही आईसाहेब तुम्ही नाही बोलणार विक्रांत ला काही.... जे पण होईल ते होऊ द्या त्याला स्वत कळु द्या.. " संध्या काकु

आरोही जा बेटा तु.. आणि आपल्या स्टडी वर फोकस कर ... .. " संध्या काकुंनी तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि आरोही ला जायला सांगितलं

विक्रांत पण आला ...

विक्रांत थांब ..." आईसाहेब

हा आईसाहेब बोला ना .." विक्रांत

जातांनी आरोहीला काॅलेजला सोडून दे... तिच्या स्कुटीची चावी भेटत नाही आहे... आणि तिला लेट पण झालं आहे.. " आईसाहेबांनी विक्रांत ला आँर्डर देत बोलल्या

" मला पण लेट होतोय.. ड्रायव्हर आहे ना दुसरा तो सोडून देईन.. विक्रांत बोलून मोकळा झाला

" विक्रांत आमचं काही ऐकायचं नसेल तर सांगा तस.. " आईसाहेब जरा चिडूनच बोलल्या

आरोही तु जा आणि बस कारमध्ये... मी पाहते कसं सोडून देतं नाही तर आरोही तु जात आहेस की मला काही करावं लागेल ..." आईसाहेब

जाते मी आई ..." आरोही

आईसाहेब तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लग्न तर लावून दिलं पण माझ्या कडुन मी लग्न टिकवणार अशी अपेक्षा नका ठेवु.. is that clear..." विक्रांत

हो लक्षात तु ठेव विक्रांत... आरोही आहे ती नव्या नाही .." आईसाहेब


*********

कार मध्ये मागच्या सीटवर विक्रांत आणि त्याची पर्सनल असिस्टंट समीक्षा बसली होती आणि आरोही सामोरं ड्रायव्हर च्या बाजुच्या सीटवर... विक्रांत आणि समीक्षा त्यांच्या आँफीस कामाबद्दल बोलत बसले होते...

इतकी भयान शांतता। ? .. त्यापेक्षा मी पायदळ गेलेली बरी... " आरोही मनात बोलून गेली

काका गाणे लावा ना ? ..." आरोही

ड्रायव्हर ने एक नजर विक्रांत कडे पाहिलं.. विक्रांतने डोळ्याने हो बोलला

ते सर्व साॅन्गस छान होतेच.. एक गाणा लागला आणि ड्रायव्हर काका तो गाणा चेंज करणार होते..

काका असू द्या ना तो साॅन्ग छान आहे .." आरोही

In my city ,I Am alone
मे ही ना जानू
के मे हु कौन ?
I love you lady, please be mine
जो हा तू करदे
Then I'll be fine

विक्रांत...त्याला ती आठवली.. तो तिच्या सामोरं रिक्वेस्ट करत होता आणि ती फक्त तिच्यात मग्न होती.. हे आठवून विक्रांत ला त्याचा श्वास थांबल्या सारखं वाटत होतं.. त्याने शर्टाच्या वरच्या दोन बटन खोलल्या..

दिन हो चाहे रात हो
रहे ये बस् आशिकी का मारा
है अपना दिल तो आवारा..

आरोही छान गाणा एन्जॉय करत होती ..

बातो बातो मे वो क्या बात हो गयी
अजनबी सी खलबली साथ हो गयी
दिल कि जीत पर मेरी मात हो गयी,
मात हो गयी..
लब खुले नही मगर आँखो से ये कर
गया इशारा
है अपना दिल तो आवारा ..

दिन हो चाहे रात हो
रहे ये बस् आशिकी का मारा
है अपना दिल तो आवारा

मौसम आज तो बडा बेकरार है
ऐसे मे मुझे तेरा इंतजार है
कर ले इश्कबाजिया ,दिन ही चार है
दिन ही चार है
खोया खोया रहता
तेरी ही बेकरारी मे बिचारा
है अपना दिल तो आवारा
( song ... हिमेश रेशमिया... नक्की ऐका)

Stop the song ..." विक्रांत ओरडून ड्रायव्हर ला बोलला

तो गाणा आणि त्या वेळेस ची विक्रांत ची कंन्डीशन सेम गाण्याला मॅच होत होती जेव्हा नव्या विक्रांत ला सोडून गेली

And you तुला इतकंच गाणे ऐकायचं आहे तर फोन आहे ना तुझा.. " विक्रांत आरोही वर चिडत बोलला

आरोही पण काही बोललीच नाही...

मॅम तुमचा काॅलेज आलाय... " ड्रायव्हर काका

ओके thank you kaka. .. " आरोही

आरोही बाहेर आली.. पण गाडी मध्ये फोन विसरून...

आरोही काॅलेज च्या आत जाणार तर तिथे.. रणवीर आला. .. आणि डायरेक्ट आरोही ला मिठी मारली...

हाय आरु कीती दिवसांनी भेटत आहोत आपण.. तुला तर आठवण पण येत नसेल माझी.. '' रणवीर

आरोहीने रणवीर ला जोरात धकललं.. लिमिट मध्ये राहत जा रणवीर..

दूरुन बोलत जा.. ओके... " आरोही रणवीर ला रागाने बोलली कारण रणवीर एक नंबर चा नालायक मुलगा होता.. आणि तुझी आठवण करायला तु बॉयफ्रेंड नाही आहेस माझा ..तुझा ड्रामा झाला असेल तर निघ इथुन

" विक्रांत गाडीत बसून हे सर्व पाहत होता त्याचा डोकाच खराब झाला.. तो बाहेर निघणार तर ड्रायव्हर काका बोलले..

सर मी देतो मॅम चा मोबाईल.. गाडीत विसरून गेल्या त्या... " ड्रायव्हर काका

No need. .. मी देतो.. " विक्रांत ने मोबाईल घेतला आणि आरोही तिथे होती तिथे गेला..

हाय ..काय चाललंय.. "विक्रांत रणवीरला टाईट हग करत बोलला.. रणवीरला इतकं जोरात विक्रांतने मिठी मारली... की त्याच दम घुटमळायला लागलं होतं ..जस विक्रांतने रणवीवला सोडलं तसच रणवीर तिथून पळून गेला..

तुझा मोबाईल ..." विक्रांतने आरोहीला तिचा मोबाईल दिला व तिथून आँफीस ला निघाला

*****

काॅलेजला असतांनी आरोहीला फोन आलाय ..

हेल्लो मॅम मी विक्रांत सरांच्या आँफीस मधून बोलतोय .." विकास

हा बोला ना काही काम ? ..." आरोही

ते सरांनी तुम्हाला आँफीसला यायला सांगितलं आहे .." विकास

ओके येते मी ..." आरोहीने फोन ठेवला आणि गेली आँफीसला

****

Excuse me ...मिस्टर विक्रांत यांच केबिन कुठे आहे?... "आरोहीने विचारलं

मॅम सर मिटिंगमध्ये बिझी आहेत, तुम्ही वेट् करा थोडावेळ.. "

ओके ..no problem ..I'm waiting for them.. " आरोही

अर्धा तास होउन गेला पण विक्रांत ची मिटिंग काही संपली नाही.. आरोहीला तिथे बसून कंटाळा आला होता.. तरी पण तिने वाट पाहीली..

आरोहीने विकास ला रिटर्न काॅल करुन कळवलं.. की ती आँफिस ला आली आहे

सर आरोही मॅमआल्या आहेत.. " विकास

ओके तिला आत यायला सांग ..." विक्रांत

विकासने आरोहीला फोन करून आत जायला सांगितलं..

मला कळत नाही... विक्रांत माझा नवरा आहे की विकास ? .. विक्रांत यांना काम असते तर स्वत फोन करावं ना ...नाही फोन सुद्धा तो विकास च करतो.. " आरोही मनात बोलून तिने केबिनचा डोअर ओपण केला

केबिनमध्ये गेल्यावर तिथला दृश्य पाहून शाॅक झाली.. समीक्षा त्यांच्या मांडीवर बसली होती.. आणि आरोही आत जाता बरोबर दोघेही वेगळे झाले..

छी म्हणजे हे बघण्यासाठी बोलवलं होत का❓.. " आरोही बोलली आणि डोअर बंद करून काॅलेज ला गेली..


*******


How dare you 😡... तुझी हिम्मत कशी झाली माझ्या इतक्या जवळ यायची .. विक्रांत तिच्या वर रागाने आणि जोरात गालावर थापड मारून तिला दूर करून बोलला ..

विकी I'm sorry ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. मी गेली होती तुला सोडून पण मी नाही विसरु शकली तुला ..तुचं नेहमी माझ्या डोळ्यांसमोर येतोस काय करु मी ..I want your love , your touch, your everything... I love you Vikky... " ती विक्रांतच्या जवळ जाऊन त्यांच्या शर्टाच्या बटणाशी चाळत बोलली

Stay away from me,,, 😡 I don't want to think about.. coming to back my life..."विक्रांत तिला खाली धक्का देत बोलला

विक्रांत तु हे चांगलं करत नाही आहे.. माझा insult करतोस ना ..खूप महागात पडेल तुला .. विक्रांत सोरते लक्षात ठेवीन तुला मी.. " ती रागाने लालबुंद होतं बोलली आणि तिथून तावातावाने गेली

विक्रांत डोकं धरुन चेयर वर बसला ..त्याला स्वतःचा खूप राग येत होता.. असं कसं त्याने तिला स्वत जवळ येऊ दिलं

विकास आताच्या आता.. ती देशमुख गृपच्या कंपनीची डिल कॅन्सर कर.. आणि कोणतहीं प्रोजेक्ट घेतांना मला विचारनं गरजेचं नाही आहे का? ...आणि हा प्रोजेक्ट मॅनेजरने घेतला होता ना त्याला आताच्या आता कंपनीतून काढ नाही तर माझ्या पेक्षा जास्त वाईट कोणीच नसणार .." विक्रांत ला सुचत नव्हतं का आणि कशाचा इतका राग आहे त्याला कळत नव्हतं

नव्या चं त्याचा इतक्या जवळ येणं त्याला खटकत होतं ..याआधी पण तर ती माझ्या इतक्या जवळ आली आहे. आरोही तिला काय वाटेल... ." विक्रांत मनात बोलला

******

आरोही काॅलेजला रिटर्न आली.. तिने क्लासेस अटेंड केले आणि आभा कडे आली ..

आरोही कुठे गेली होती गं ..."आभा

बाहेर काम होता थोडा म्हणून गेली होती.. " अच्छा ठिक आहे ना आपण जातांनी मंदिरात दर्शनासाठी जाउ ना गणपती बाप्पाच्या... " आभा

बरं जाऊ .." आरोही शांतपणे बोलली

आरोही काही झालं का? ..." आभा बोलली

नाही ग मला काय होणार.. चल वेळ होतं आहे आपल्याला ..आरोही नजर खाली करूनच बोलली

आभा मी पण येतोय ना तुमच्या सोबत .. " राहुल

ठिक आहे चला.. " आभा बोलली

तु तर चल म्हणालीस पण तुझी मैत्रीण ती नाही ना बोलली काही... " राहुल

मी नाही बोलली तरी तु येणारच आहे ..मग मी माझी एनर्जी कशाला वाया घालवू.. " आरोही

ठिक आहे येतो मी.. पण एक गोष्ट सांग ना तु आणि मी आपण दोघेही नागपूर ला राहतो.. पण आरोही तु कधी दिसली नाही.. " राहुल

जस काही मला काही काम धंडे नसतात आणि मी रिकाम् टेकड्या सारखीं हिंडत असते.. तुला दिसायला.. पागल इंन्सान.. नागपूर आहे तो काही तुझं घर नाही जे मी नागपुरात फीरत तुला दिसणार ..."आरोही राहुल ला वैतागून बोलली

।ठीक आहे ना इतकं चिडायची काय गरज आहे.. " बिचारा राहुल

************

आरोही पार्टी ला जायला तयार झाली तिने तिची साडी निट केली आणि खाली जाणार तर विक्रांतने तिचा हात पकडला ..

मगाशी तु जे पाहीलं आँफीसमध्ये तो गैरसमज झाला तुला.. आमच्या मध्ये तसं काही नाही आहे " विक्रांत

ठीक आहे ना विक्रांत मी काही बोलली का तुम्हाला तुम्ही काही कराल तरी मला काय? .. " आरोही

तुला म्हणायचं काय आहे की मी तुला असा तसा वाटतोय का? .. " विक्रांत

विक्रांत प्लीज हात सोडा माझा .आणि खाली जायचं आहे मला ..." आरोही

त्याने अजून हात घट्ट पकडला..

First.. answer me... " विक्रांत

तुम्ही काहीही करा I don't care.. आणि आपण ना घरच्यांन सामोरं नवरा बायको आहोत.. इथे रूममध्ये नाही
आणि तुमची लाईफ आहे तुम्ही बाहेर काहीही करा मला त्याच्याशी काय .." आरोही बोलली आणि त्याला दुर केलं

त्याने अजून आरोहीला जवळ ओढून.. तिचा हात पाठीमागे करत गच्च धरून ठेवला

विक्रांत सोडा मला....






तुला कसं काही वाटत नाही.. तुझ्या सारख्या 36 मुली माझ्या मागे फिरतात माझ्या एका शब्दात काही पण करायला तयार होतात आणि तु आहेस कोण? . एक साधारण घरातील मुलगी कशाचा घमंड आहे तुला इतका.. " विक्रांत रागात बोलून गेला

आरोहीने जोरात त्याचा गालावर थापड दीली..

बाकीच्या सगळ्या मुली फिरत असतील तुमच्या मागे मी नाही.. आणि मला तुम्ही इतकं सगळं सांगायला बायको नाही आहे मी तुमची... आणि फक्त पाच महिने.. नंतर आपला डिवोर्स होणार आहे.. आणि माझ्या जवळ यायची काही गरज नाहीये.. " आरोही ला पण सहन नाही झालं आणि ती इतकं बोलून गेली

मी तुझ्या जवळ आलोय तर तुला प्रॉब्लेम आहे आणि त्या मुलाने तुला डायरेक्ट येऊन मिठी मारली तर तुला ते चालतं.. हो ना .." विक्रांत आरोहिला त्याच्या तावडीतून सोडत बोलला आणि मिररला जोरात हात मारला ..

विक्रांत तुम्ही काय करत आहात... माझ्या मुळे स्वतः ला नुकसान पोहचवण्याची काही गरज नाही.. हात द्या इकडे कीती रक्त येत आहे हातातून ...

आरोहीने विक्रांत चा हात पकडला पण त्याने तीला दुर केलं..

Leave me alone ..and get out of here 😡..माझा डोका खराब करू नकोस आणखी नाही तर मी काय करून ठेवेल I don't know.. " विक्रांत ओरडून आरोहीला बोलला आणि तिला रूमच्या बाहेर काढून टाकलं


क्रमशः